थिअरी
प्रतिक्रिया
In reply to एकही लेख लिहिला गेला नाही by अवलिया
In reply to एकही लेख लिहिला गेला नाही by अवलिया
In reply to मिपावर कुणा काँग्रेसप्रेमी by नितिन थत्ते
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
In reply to >>>सुभाषचंद्र, भगतसिंग, by नन्दादीप
In reply to एकही लेख लिहिला गेला नाही by अवलिया
In reply to एकही लेख लिहिला गेला नाही by अवलिया
माझ्या मते हीच भावना इतर स्वातंत्र्यप्रेमींची असेल यात शंका नाही.या अशाच प्रवृत्तींना माझ्यासारख्यांचा विरोध असतो.तुमची मते पटली नाहीत म्हणजे तो मनुष्य स्वातंत्र्यप्रेमी नाही का?की कोण स्वातंत्र्यप्रेमी/स्वातंत्रद्वेष्टा, हिंदू समर्थक/द्वेष्टा हे ठरवायचा अधिकार केवळ तुम्हालाच का?तो कोणी दिला?दिला असल्यास कोणत्या capacity मध्ये दिला?दिला नसेल तर तो तुम्ही स्वत:हून तो आपल्याकडे ओढून घेतला का? सुभाषबाबूंच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेत नाही.तशी शंका घ्यायची योग्यता मिपावरील कोणाही सभासदाची असेल असे वाटत नाही, निदान माझी तरी नाही.पण तरीही त्यांच्या उद्देशाविषयी पूर्ण आदर ठेऊन मी म्हणतो की जपानची मदत घेऊन भारत स्वतंत्र करायच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन मला तरी करता येत नाही.एकेकाळी मी पण "सशस्त्र क्रांती गटातला" होतो आणि सशस्त्र मार्गाने जाणाऱ्या सगळ्यांना मी पाठिंबाच देत होतो.पण इतर काही गोष्टींचा विचार करता सावरकर आणि त्या मार्गातील सशस्त्र क्रांतिकारक सोडून इतर सशस्त्र क्रांती करणाऱ्यांना पूर्वीइतका डोळे झाकून पाठिंबा देऊ शकत नाही. माझ्या पाठिंबा देण्या न देण्याने काही फरक पडत नाही हे मला माहित आहे.पण मी जरी कोणीही नसलो तरी मला माझी स्वतंत्र मते ठेवायचा अधिकार आहेच. असो. सुभाषबाबूंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
In reply to स्वातंत्र्यप्रेमी by क्लिंटन
In reply to जपानची मदत न घेण्यामागची by मृत्युन्जय
जापानी किमान स्वतःच्या स्वार्थासाठी का होइना पण आपली मदतच करत होते. वाईट काय त्याच्यात?बरोबर आहे.जपानी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला मदत करत होते.पण जपान्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांचे इरादे इतके नेक असतीलच असे १००% खात्रीने म्हणता येत नाही.जपान्यांना खरा रस होता पॅसिफिकमध्ये साम्राज्यविस्तार करण्यात.त्यासाठी त्यांनी सुरवात केली हवाई बेटातील पर्ल हार्बरवर हल्ला करून आणि दक्षिण पूर्व आशियात सिंगापूर-इंडोनिशिया या भागातही साम्राज्यविस्तार केला.चीनमधील नानकिंग हे बंदर ताब्यात असणे जपान्यांना महत्वाचे ठरले असते म्हणून त्या शहरावर जपान्यांनी हल्ला केला आणि तिथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले.त्याला
In reply to कारण by क्लिंटन
In reply to एक लक्षात घेतले पाहिजे कि by निनाद मुक्काम …
मुळात पानिपत चा निकाल उलट लागला असता तर त्यांनी प्लासीची लढाई केलीच नसती .प्लासीची लढाई (१७५७) पानिपतच्या तिसऱ्या लढाईपूर्वी (१७६१) झाली होती.तेव्हा तुम्हाला पानिपतची तिसरी (मराठे विरूध्द अब्दाली) ही लढाई अपेक्षित आहे की इतर कोणती?
जपानच्या कल्पनेपेक्षा मोठा हा खंडप्राय प्रदेश त्यांना काही दिवस सुध्धा टिकवता आला नसताबरोबर आहे.जपानी चीनमध्येही घुसलेच होते पण त्यांनी सगळा चीन आपल्या ताब्यात घेतला असे नक्कीच नाही तर जपानला जवळचा मांचुरिया प्रदेशात ते घुसले होते.भारतही पूर्णपणे नाही तरी बंगाल आणि किनारपट्टीचा प्रदेश, अंदमान हा त्यांच्या पॅसिफिकमधील वर्चस्वाला अनुसरून सलग भाग नव्हता का? जपान्यांनी अंदमान-निकोबार बेटे जिंकली.नेताजींनी त्यांचे नामकरण शहिद आणि स्वराज्य असे केले.पण जपान्यांनी अंदमानातही काही प्रमाणावर कत्तली केल्याच होत्या. (संदर्भ: पान १०२-१०३ ) त्यात म्हटले आहे की इंग्रजांनी अंदमान-निकोबारचा ताबा मिळविण्यापूर्वी ७५० सामान्य लोकांची हत्या केली. १९४५ मधील अंदमानची लोकसंख्या लक्षात घेता ७५० हा आकडा तसा मोठाच नव्हता का?या संदर्भात मागे मी Japanese in Andaman & Nicobar Islands red sun over black water या पुस्तकाची गुगल बुक्समध्ये उपलब्ध असलेली काही पाने वाचली होती.त्या पुस्तकाची सगळी पाने उपलब्ध नाहीत कारण कॉपीराईटमुळे अनेक पाने दिसत नाहीत.तरीही उपलब्ध पानांमधील संदर्भातून कळते की अंदमानमधील हॅवेलॉक बेटावर जपान्यांनी अत्याचार केले होते.आणि या पुस्तकाचे लेखक कोण?तर खडकवासल्याच्या एन.डी.ए मधील प्राध्यापक! तेव्हा हिटलर-जपान्यांच्या वाईट गोष्टी हजार पटीने वाढवून सांगायच्या आणि आपल्या वाईट गोष्टींविषयी काही बोलायचे नाही हा इंग्रज-अमेरिकनांवर होणारा आरोपही त्यांच्यावर करता येणार नाही. एकूणच काय?की जपान्यांचा उद्देश होता आपल्याला पाहिजे त्या भागात हातपाय पसरायचे आणि कोणी विरोध करेल तर सरसहा कत्तली करायच्या मग ते नानकिंग असो, मांचुरिया असो की अंदमान.समजा जपानी (माझ्या मते) त्यांच्या इंटरेस्टच्या क्षेत्रात--पूर्वोत्तर भारत आणि बंगाल (बांगलादेशासकट) घुसले असते तर आणखी काही वेगळे झाले असते असे म्हणायला काय जागा आहे? अंदमानातील लोकांच्या हाल-अपेष्टा नेताजींपर्यंत पोहोचल्या होत्या की नाही याची कल्पना नाही.तशा त्या पोहोचल्या असत्या तर ते नक्कीच गप्प बसले नसते.आणि त्या बातम्या नेताजींना समजल्या असतील तर जपान्यांना विरोध करण्याइतकी आझाद हिंद सेना सक्षम नव्हती या कारणाने नेताजी हतबल होते का?अशा जपान्यांच्या हातात कोलीत देणे योग्य होते का?कदाचित त्या काळी अंदमानात काय झाले हे त्यांना कळले नसेलही पण १९३६-३७ पासून जपान्यांनी व्यापलेल्या मांचुरियातही आणि नंतरच्या काळात व्यापलेल्या पॅसिफिकमधील प्रदेशातही काय झाले हे पण १९४२-४३ मध्ये माहित नव्हते? आणि समजा त्या काळी ते कळले नसेल तरीही आज या सगळ्या घटना कळल्यानंतरही केवळ सशस्त्र क्रांतीला समर्थन (किंवा गांधींच्या मार्गाला विरोध) म्हणून आंधळेपणाने जपानची मदत घ्यायचे समर्थन आपण का करतो? त्यामुळेच नेताजींविषयी पूर्ण आदर बाळगत मी म्हणतो की मला त्यांचा जपान्यांची मदत घ्यायचा मार्ग मान्य नाही.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to खरे आहे... by विकास
बाकी खालील प्रतिसादातील जपान संदर्भात आणि जर्मनी संदर्भात देखील असेच वाटते. पण हे देखील लक्षात घेतले पाहीजे की हिटलरचे घॄणास्पद काम अथवा जपान्यांची क्रुरता यासंदर्भात त्या काळात, हे निर्णय घेताना सुभाषबाबूंना किती कल्पना असावी याबद्दल खात्री वाटत नाही.या संदर्भात मी गुगल न्यूजवर १९३५ ते १९३९ या काळात काही मिळते का ते बघायला रेप ऑफ नानकिंग असा शोध घेतला तेव्हा त्याविषयी अनेक दुवे मिळाले.त्यातील महत्वाचे दोन दुवे मिळाले. पहिला दुवा न्यू यॉर्क टाइम्समधला १८ डिसेंबर १९३७ चा. या दुव्यावर जपान्यांनी नानकिंगमध्ये अनन्वित अत्याचार केले आहेत असे म्हणतो. आणि दुसरा दुवा मेलबर्नमधील "द एज" वर्तमानपत्रातील २८ जानेवारी १९३८ चा आहे.या दुव्यावर त्या दिवशीच्या वर्तमानपत्राची स्कॅन्ड कॉपी वाचायला मिळेल.त्यात पान २२ वर नानकिंग आणि हॅंगचो शहरात अत्याचार झाल्याचे लंडनमधील "द टेलिग्राफ" वर्तमानपत्राच्या वार्ताहाराच्या हवाल्याने म्हटले आहे. जपान्यांनी इतर काय काय कुठे केले याचा गुगल न्यूजवर शोध घ्यायच्या भानगडीत मी पडलो नाही.पण तशा गोष्टी मिळायला कठिण जाऊ नये.तेव्हा जपान्यांचे अत्याचार जगापासून लपून राहिलेले नव्हते. आज मला एका माऊस क्लिकवर घरबसल्या ही सगळी माहिती मिळाली.अर्थातच ही माहिती त्या काळी इतक्या सहजपणे मिळणे शक्यच नव्हते.पण डिसेंबर १९३७ मध्ये न्यू यॉर्क टाइम्समध्ये या बातम्या येत असतील तर इंग्लंडमधील वर्तमानपत्रात त्याचा उल्लेखही होणार नाही हे जरा कठिणच वाटते.इंग्लंडमधील बातम्या अगदी ५ मिनिटात नाही तरी महिन्या-दोन महिन्यात तरी भारतात पोहोचतील इतपत तरी संदेशवहन त्या काळी नक्कीच पुढारलेले होते.तसेच जपानने मांचुरियावर १९३० च्या दशकातच पूर्वी (मला वाटते १९३२-३३ मध्ये) हल्ला केला होता त्यातूनच जपानची साम्राज्यवादी महत्वाकांक्षा पूर्णपणे लपून राहिलेली नव्हती.तसेच मुसोलिनीचे ऍबिसिनीया (इथियोपिया) वरील आक्रमण १९३५-३६ चे.स्पॅनिश यादवी युद्ध १९३५-१९३६ च्या दरम्यानचे.जनरल फ्रॅन्कोने स्पेनची सत्ता ताब्यात घेतली याचा १९३६ च्या फैजपूर कॉंग्रेसमध्ये निषेधही झाला होता.आणि फ्रॅन्कोला हिटलरने मदतही केली होती हे पण लपून राहिलेले नव्हते.तेव्हा फॅसिस्ट शक्तींविरोधात कॉंग्रेसची भूमिका पहिल्यापासून होती असे म्हणायला नक्कीच वाव आहे. हिटलरने ऑस्ट्रीया घशात घातला मार्च १९३८ मध्ये.तेव्हा या सगळया पार्श्वभूमीवर नानकिंगमधील अत्याचार होते.ती isolated घटना नव्हती की त्याचा फारसा कुठे उल्लेख होणार नाही. पंडित नेहरू हॅरो आणि केंब्रिजमध्ये शिकलेले होते.ब्रुसेल्समधील साम्राज्यवाद विरोधी परिषदेत त्यांनी भाग घेतला होता.तसेच रशियन राज्यक्रांतीपासून अनेकविध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास नक्कीच होता.मार्च १९३८ मध्ये पंडित नेहरूंचा लंडनमधील ट्रॅफल्गार स्क्वेअरमध्ये भाषण करतानाचा फोटो मी नेहरूंचे चरित्र वाचले त्यात आहे.म्हणजे मार्च १९३८ मध्ये नेहरू लंडनमध्ये हजर असतील तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नानकिंगच्या अत्याचाराचा अजिबात थांगपत्ता त्यांना नसेल हे जरा कठिणच वाटते. तसेच नेताजी स्वत: इंग्लंडमधून आय.सी.एस ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते.तेव्हा त्यांनाही आंतरराष्ट्रीय perspective नक्कीच होता आणि त्यांना या घटनांचे गांभीर्य कळले नसेल असे म्हणता येणार नाही.इतक्या घटना एकामागोमाग एक घडत असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असेल यावर विश्वास कसा ठेवायचा?त्यांना हिटलरचे Concentration camps माहित नसतील पण जपान्यांनी अत्याचार केले आहेत याचीही त्यांना कल्पना आली नसेल? बरं जे काही झाले ते झाले.नेताजींनी जे काही केले ते उदात्त भावनेने केले.पण कदाचित नेताजींना माहित नसलेल्या गोष्टी आज माहित झाल्या आहेत.तरीही आपण या मुद्द्यावर का अडून राहतो? पंडित नेहरू म्हणाले होते की आझाद हिंद सेना भारतात आली तर त्याचा मी तलवारीने विरोध करेन.त्यांच्या या वाक्याची थट्टा उडविणे सोपे आहे.अगदी अविनाश धर्माधिकारींनीही त्याबद्दल नेहरूंवर टिका केली आहे.पण त्या सेनेच्या संगतीने जपानी भारतात घुसतील अशी भिती नेहरूंना वाटली असेल का?नक्की सांगता येणार नाही.पण तशी भिती वाटणे अगदीच निराधार नाही.
गांधीमार्गाला विरोध हा केवळ अहींसेमुळे झाला असे वाटत नाही तर त्यातील एका अर्थाने हुकुमशाही पद्धतीने स्वतःचे मतच पुढे नेण्याच्या पद्धतीस आणि त्याला अनुसरुन राजकारण करण्याला ती प्रतिक्रीया होत गेली असे कुठेतरी वाटते.ते कारण असेलही.पण मला वाटते की महत्वाचे कारण गांधींची टिंगळटवाळी करणे, छे त्यांनी काय नुसते चरखे चालवले आणि बकरीचे दूध प्यायले, खरे योगदान आमच्या क्रांतिकारकांचे इत्यादी इत्यादी असे अनेकांना वाटणे हे असावे. (मी एकेकाळी त्याच कळपात वावरलो आहे त्यामुळे मला याची नक्कीच कल्पना आहे). मला कल्पना नव्हे खात्री आहे की हे सगळे वाचणारे अनेक लोक "फुकटचे स्वातंत्र्य मिळाले म्हणून चढलेला माज" आणि तत्सम गोष्टी बोलतील.माझा त्यावर प्रश्न एकच-- जपान्यांनी जे नानकिंगमध्ये केले, अंदमानात केले, इतर अनेक ठिकाणी केले तेच आझाद हिंद सेनेबरोबर भारतात घुसून केले नसतेच असे म्हणायला आधार कोणता?तेव्हा त्या प्रयत्नाला अपयश आले ही एका अर्थी चांगली गोष्ट झाली का?आणि परत वरचाच प्रश्न: १९४२-४३ मध्ये नेताजींनी त्यांना माहित असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन भारताचे हित लक्षात घेऊनच सगळा त्याग केला.पण नवीन माहिती आपल्याला कळली आहे त्यावरून जपान्यांशी संगत म्हणजे असंगाशी संग नव्हती का?
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to जपान्यांनी नानकिंग मध्ये by मृत्युन्जय
In reply to जपान्यांनी नानकिंग मध्ये by मृत्युन्जय
In reply to हे राम ! हे राम !! जागतिक by अवलिया
In reply to जपान्यांनी नानकिंग मध्ये by मृत्युन्जय
ब्रिटिशांचे मित्र राष्ट्र असलेल्या रशियात बसुन स्टेलिनने हिटलरपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतलाबरं मग? परकियांची भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत घेण्यात काहीही गैर नाही.पण त्या परकियाचा आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नको हा महत्वाचा मुद्दा का डावलला जात आहे?नाहीतर भारतीयांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जपानी (किंवा जपान्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतीय) इंग्रजांवर हल्ला करणार.ते यशस्वी झाले तर जपान्यांनाही भारतात इंटरेस्ट असल्यामुळे (याची कारणे आधी मांडलेली आहेत. तसेच ब्रम्हदेशापर्यंत थडकलेले जपानी अचानक भारतीय सीमेवर स्तब्ध उभे राहतील असे मानायचेही काही कारण नाही.त्यातही नेताजींनी मनुष्यबळ भारतीयांकडून उभे केले असले तरी दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे त्यांना कुठून येत होती?म्हणजे जपानवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे आले आणि त्यातच जपानचा भारतीय प्रदेशातील इंटरेस्ट हे लक्षात घेता त्याचे परिणाम गोड झालेच असते असे मानायला तुम्हाला वाटते तितका आधार आहे असे वाटत नाही. त्यातही मला वाटते की परकियांची मदतच घ्यायची तर वेळ पडल्यास रशियाची मदत घेतली असती तर ते जपानची मदत घेण्य़ापेक्षा अधिक श्रेयस्कर ठरले असते. अर्थात त्या वेळी रशिया आपल्याला मदत करायच्या परिस्थितीत नव्हताच पण समजा असता तरी रशियाला भारतात इंटरेस्ट होता याचा पुरावा काय? तसेही रशिया अगदी शेवटपर्यंत इंग्लंडचा शत्रू राहिला असता तरीही चीन हा महाकाय देश ओलांडून भारतात ते यायची शक्यताही नव्हती. तेव्हा: सर्वात महत्वाचे की ज्या परकियाकडून आपण मदत घेणार आहोत त्याचे आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नकोत. कत्तली हा मुद्दा महत्वाचा आहेच पण तरीही एखाद्या परकियाचे आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नसतील (उदा. रशिया) तर त्यांनी इतरत्र केलेल्या कत्तलींची डायरेक्ट झळ भारताला लागायची शक्यता कमी होती. जपानबद्दल हे म्हणता येते का?
सुरुवातीच्या काळात भारतातूनही गुलाम युरोपात नेले गेलेच. हे जापान्यांनी नक्कीच नाही केले ना?म्हणजे जपान्यांनी हे प्रकार इतरत्र केले नाहीत असे म्हणायचे आहे का तुम्हाला? जपानी Comfort women याविषयी माहिती गोळा करा म्हणजे अनेक काळ्याकुट्ट गोष्टी कळून चुकतील.जर जपानी सैन्याने चीनमध्ये अनेक स्त्रियांना Comfort women म्हणून नेले तर त्यांनी ते भारतात केले नसते हे म्हणायला काय आधार आहे?दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रज सद्गुणाचे पुतळे नक्कीच नव्हते पण थोड्या काळात त्यांनी घेतलेल्या बळींची संख्या आणि क्रौर्य या बाबतीत ते इंग्रजांपेक्षा कितीतरी पुढे होते.तेव्हा माझा म्हणायचा मुद्दा एकच की इंग्रज वाईट हे मान्य पण त्यांना घालवायला त्यांच्यापेक्षा दहापट वाईट आणि कदाचित अधिक बलिष्ठ शत्रूला घरात घेतले तर त्याचे परिणाम चांगलेच होतील हे म्हणायला काय आधार आहे?
वस्त्रोद्योगात भारताकडे सर्वोत्तम कारागीर होते. त्यांचे अंगठे कापून, दडपशाही करुन किंवा आर्थिक दहशतवादाने त्यांची उपजीविका नष्ट करणारे आणि मग एका देशाला पार नागवा करुन पारतंत्र्यात लोटणारे जपानी नक्की नव्हतेयाचे कारण १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत जपान स्वत:त गुरफटलेला आणि इतर जगाशी फारसे देणेघेणे नसलेला देश होता.पण नंतर त्यांनी मोठी प्रगती केली आणि त्यातच त्यांची रक्तपिपासाही वाढली.पण तोपर्यंत इंग्रज राज्य भारतात स्थिरावलेले होते आणि जपानला चीन आणि पॅसिफिकमधील इतर प्रदेश जिंकण्यापूर्वी भारतात अंतरामुळे येता आले नसते.बाकी इंग्रज राज्याचे भारतावर आर्थिक दुष्परिणामही झाले, जालियनवालाबाग, बंगाल दुष्काळ यासारख्या घटनाही घडल्या.माझा मुद्दा एकच की जपान्यांनी मांचुरियावर हल्ला केल्यापासून (१९३२-३३) पुढील १२ वर्षात काय केले ते बघा. ते इंग्रजांनी भारतात १५० वर्षे केलेल्या लुटी/कत्तलीला नक्कीच comparable आहे.आणि एवढे प्रताप इतक्या थोड्या काळात करणाऱ्यांना मुद्दामून आपण होऊन घरात घ्यायलाच हवे होते का?
जालियनवाला बागेसारखे नृशंस हत्याकांड घडवणारे तुमचे प्रेमळ इंग्रजच होते.यातील ’तुमचे प्रेमळ इंग्रज’ या शब्दाला माझा आक्षेप आहे. इंग्रज वाईट आणि मुख्य म्हणजे परकिय म्हणून त्यांना हकलवा हे मान्य.काट्याने काटा काढायचा हे पण मान्य.पण दुसरा काटा इतका भयंकर असेल की तो रूतून बसल्यानंतर पहिला परवडला अशी परिस्थिती आली तर असा काट्याने काटा काढायचा प्रयत्न न केलेलाच इष्ट.
क्लाइव च्या राजवटीत १० लाख लोकांना प्रत्यक्ष / अप्र्त्यक्षपणे मारले गेले.क्लाइव्ह हा एक बोका होता.तो अजिबात संतसत्पुरूष नव्हता.पण १० लाख या आकड्याला संदर्भ देऊ शकाल का?क्लाइव्हचे राज्य मुख्यत: बंगालमध्ये होते. १८९१ मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे २९ कोटी होती . ती क्लाइव्हच्या काळात म्हणजे अजून १३० वर्षे आधी नक्कीच कमी असणार.अगदी conservative estimate २० कोटी समजू.त्याच्या १०% लोकसंख्या बंगालमध्ये असेल तरी २ कोटी.त्यातील १० लाख म्हणजे ५% लोक क्लाइव्हच्या राजवटीच्या काळात म्हणजे ५-६ वर्षात मारले गेले हे जरा अशक्यच वाटते.तुम्ही हिटलरचे आकडे क्लाइव्हच्या नावावर सांगत नाही ना?
जपानी वाईट असतीलही कदाचित पण इंग्रजही अमानुषच होते.उलट मी म्हणतो की जपानी इंग्रजांपेक्षा बरेच जास्त अमानुष होते म्हणूनच त्यांची मदत घेऊन इंग्रजांना हाकलायच्या प्रयत्नांना माझे समर्थन नाही.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to परकियांची भारतीय by मृत्युन्जय
१९४० साल उजाडेपर्यंत देश पुर्णपणे जागृतावस्थेत होता.देश पूर्णपणे जागृतावस्थेत होता या भागाला माझी १००% सहमती नाही पण तुम्हाला देश पूर्णपणे जागृतावस्थेत होता यात नक्की काय अभिप्रेत आहे? स्वातंत्र्य मिळावे असे जवळपास सगळ्यांना वाटत होते अस अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे असे मी गृहित धरतो.इंग्रज राज्याच्या सुरवातीच्या काळात इंग्रजांचे राज्य हे दैवी देणगी आहे आणि त्यात आपला होईल तितका उत्कर्ष करून घ्यावा असे वाटणारे अनेक लोक होतेच ना?तसेच १८ व्या शतकाच्या शेवटच्या काळापासून (मुख्यत: पेशवाईची पडझड व्हायला सुरवात झाल्यापासून) जो सावळा गोंधळ माजला होता त्या पार्श्वभूमीवर इंग्रजांचे कायद्याचे राज्य सामान्य जनतेला अधिक चांगले वाटले असेल तर त्यात त्यांना दोष देता येणार नाही.तसेच "साहेबाच्या राज्यात काठीला सोने बांधून काशीला गेले तरी काही धोका नाही" असे सुरवातीच्या काळात म्हटले जायचे.इतकेच काय तर कॉंग्रेसचे पहिले १८८५ मधील अधिवेशनही राणीची स्तुती करून सुरू झाले होते. इथपासून १९४० पर्यंत देशातील जवळपास सर्वांना स्वातंत्र्य हवे असे वाटायला लागणे हे मोठे स्थित्यंतर आहे हे नाकारता येणारच नाही.हे स्थित्यंतर कोणी केले? सुरवातीला लोकमान्य टिळकांनी मूठभर वकिलांपर्यंत मर्यादित असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात सामान्यांचा सहभाग करून घ्यायला सुरवात केली.त्यांना तेल्यातांबोळ्यांचे पुढारी (इथे कोणताही जातीवाचक अर्थ अभिप्रेत नाही) उगीच म्हटले जायचे का?पण टिळकांना मुळात आयुष्य कमी मिळाले आणि त्यातही त्यांची ६ वर्षे मंडालेत गेली.त्यानंतर गांधीजींनी टिळकांनी केलेले कार्य पुढे नेऊन स्वातंत्र्य चळवळ अगदी खेडोपाडी आणि घरोघरी नेली.आणि त्यातूनच तुम्ही म्हणता तशी जागृतावस्था निर्माण झाली होती.पण स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट आली की गांधीजींचे हे योगदान मुळात मान्य करायलाच (विशेषत: इथले) अनेक लोक तयार नसतात.अशांचा दावा असा की अहिंसक चळवळीतून काय झाले?जे काही केले ते क्रांतिकारकांनी.पण हे असे म्हणणाऱ्यांपैकी किती लोकांना बंदूक घेऊन माणसाचा मुडदा पाडणे शक्य होते?फारच थोड्या.मग हेच लोक १९२०-३० च्या दशकात असते तर त्यांनी एकतर स्वातंत्र्यलढ्यासाठी काहीच केले नसते नाहीतर गांधींच्याच लढ्यात ते सामील झाले असते ही सत्य परिस्थिती नाही का?मग अशा लोकांना गांधीजींना नावे ठेवायचा काय अधिकार?
गांधींच्या कच्छपी लागलेल्या भोळ्या जनतेला जर ते बंदुकीच्या जोरावर मिळु शकते हे कळाले असते तर त्यांनी प्राणाची आहुती देउनही ते मिळवले असतेच.गांधीजींच्या कच्छपी लागलेल्या हा भाग सोडून इतर भागाशी सहमती.पण भारतीय समाज कसा आहे?मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ३००० भारतीयांमागे एक इंग्रज भारतात होता (समजा अगदी ३००० नसेल पण भारतीयांच्या मानाने इंग्रज अगदीच मूठभर होते). मग त्या ३००० पैकी एका (किंवा ५-१० च्या गटाने) प्रत्येकी एका इंग्रजाला मारायला सुरवात केली असती तरी स्वातंत्र्य मिळणे अशक्य नव्हते. सगळ्या इंग्रजांना मारायचीही गरज नव्हती. त्यांच्यापैकी पाव जणांना मारले असते तरी उरलेले भितीने पळून गेले असते.तेव्हा १२ हजार भारतीयांपैकी कोणीतरी एका इंग्रजाला मारावे असे गणित होते.पण ते झाले का?नाही. याचे कारण काय?आपलीच भारतीय मनोवृत्ती.एकतर मला काय त्याचे असे वाटणारे लोक किंवा अरे मी माणसाला कसे मारू असे वाटणारे लोक. किंवा मी का करू? इतर ११ हजार ९९९ लोक आहेत ना ते करायला असे वाटणारे लोक.त्यामुळे ते करायला तयार झाले फारच थोडे लोक.बहुदा ते लाखांमध्ये एक असावेत.ही भारतीय मनोवृत्ती अचानक बदलून लोक स्वत:च्या प्राणांची आहुती द्यायला तयार झाले असते हे कोणत्या आधारावर वाटते?
रशिया भारताला मदत करण्याच्या मनस्थितीत नव्हता.हो बरोबर.मी रशियाचे उदाहरण या कारणाने दिले की भारतात विस्तार करावा हा इंटरेस्ट नसलेल्या परकियाकडून मदत घेतली असती तर त्यात काहीच हरकत नव्हती पण जपानकडून ती घ्यायला नको होती या माझ्या मुद्द्यासंदर्भात.
शत्रुचा तोटा हा आपला फायदा या न्यायाने त्यांनी भारताला मदत केली जे मला वाटते खुप स्वाभाविक आणि व्यवहार्य आहेहो अगदी बरोबर.पण जपानचा नक्की हेतू काय होता?इंग्रजांविरूध्द strategic depth मिळवायला की भारताला स्वतंत्र करायला genuine मदत करणे? मला वाटते की इंग्रजांना आपल्या प्रभावक्षेत्रापासून शक्य तितके दूर ठेवावे या कारणासाठी जपानचा भारतात इंटरेस्ट होता.आणि भारतीयांचा इंटरेस्ट इंग्रजांना हरविण्यात होता त्यामुळे एक सोयीचे लग्न (marriage of convenience) म्हणून ते एकत्र आले.तसेच जपान इंडोचायना, मलाया, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी लढाईत गुंतलेला असल्यामुळे भारताच्या आघाडीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आणि इंग्रजांना पूर्ण भारतातून कायमचे हाकलवणे हे फारच कठिण आहे हे त्यांना कळले नसेल असे मला तरी वाटत नाही.तेव्हा विजय मिळाला असता तरी जपानी सैन्य इंग्रजांना आपल्या प्रभावक्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी भारताच्या भूभागात तळ ठोकून राहिले असते यात अशक्य काय?तेव्हा जपान्यांना नक्की काय हवे होते?एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांचे आणि आपले मार्ग आणि ध्येय सारखे होते हे मान्य.पण पुढे काय? तसेच अंदमानात जपान्यांनी काय केले हे एका प्रतिसादात लिहिले आहे.तेच त्यांनी भारताच्या इतर भागात केले नसते याला आधार काय या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही.
गांधी आदी नेत्यांनी अगदी मदत नसती केली तरी नेताजींची सेना बंगाल मध्ये घुसल्या घुसल्या त्यांना मोठ्या प्रमाणवर जनता येउन मिळाली असती, सैन्य वाढले असते.यात एक महत्वाचा मुद्दा आपण दुर्लक्षित करत आहात असे वाटत नाही का?सैन्यात लोक आले असते हे मान्य केले तरी दारूगोळ्याचे आणि शस्त्रात्रांचे काय?ती जपानच पुरवत होते ना?की ती आकाशातून पडत होती?दुसरे म्हणजे लोक सैन्यात कितीही उदात्त भावनेने सामील झाले तरी योग्य ते प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे नसतील तर त्या फौजेत हौशा-गवशांचा भरणा जास्त नसता का?
जपान्यांनी भारतीयांवर अत्याचार का केले नाहीत हा मूळ मुद्दा नाहीच आहे.बरोबर आहे.पण जपान्यांनी इतरत्र जो धुमाकूळ घातला त्यावरून भारतातही त्यांनी काही वेगळे केले असते असे मानायला जागा नाही.भारतावर त्यांची राजवट आली नाही हे आपले भाग्यच म्हणायचे.भारतावर ज्या ज्या परकियांचे आक्रमण झाले त्यात अलेक्झांडर सर्वात सुसंस्कृत म्हटला पाहिजे.इंग्रज सुसंस्कृत नसले तरी मोंगल,हूण यांच्यापेक्षा बरेच सोबर होते.लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली त्यावेळीही त्यांच्यावर कोर्टात रितसर खटला दाखल करून त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी देऊन इंग्रज कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली.तसेच सर्व क्रांतिकारकांना फाशी दिले नाही.अनेकांना जन्मठेपेची शिक्षाही केली.तेव्हा विरोध करतोस ना?मग घालतो गोळी अशी तालिबानी किंवा जपानी राजवट त्यांची नव्हती.म्हणूनच इंग्रजांना घालवायला त्यांच्याहून क्रूर जपान्यांची मदत घ्यायला माझा विरोध आहे. बाकी इंग्रज राज्याचा मी समर्थक नक्कीच नाही.इंग्रज राज्याचे काय किंवा इतर कसलेही जे काही चांगले आणि वाईट हे दोन्ही परिणाम आहेत ते बघावेत आणि त्यावरून मत बनवावे असे मला वाटते.इंग्रज राज्याचे वाईट परिणाम भारतावर झाले हे कोणी नाकारू शकतच नाही.पण एकूण जपान्यांची वर्तणूक बघता इंग्रज म्हणजे lesser evil होते हे माझे मत कायम आहे.आणि असे मत मांडले तर इंग्रज राज्याचा भाट असल्याचा आरोप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to मग अशा लोकांना गांधीजींना by मृत्युन्जय
तालिबान पेक्षा भयानक होते इंग्रज.असो.यापुढे मात्र बोलणेच खुंटले.
कित्येकांना जे भर चौकात, जंगलात फाशी दिले, गोळ्या घातल्या त्याचे काय? जालियनवालाचे काय? कानपुर हत्याकांडाचे काय? बंड मोडुन काढल्यावर उरलेल्यांना मारुन टाकले त्याचे काय? उगाच विरोधासाठी विरोध नका करु क्लिंटन.नाही हो विरोधासाठी विरोध नक्कीच नाही.इंग्रज राजवटीचे हे सगळे दुष्परिणाम होतेच.पण माझा मुद्दा आहे की जपान्यांच्या ताब्यात भारताचा थोडा भाग जरी काही काळ राहिला असता तरी इंग्रज परवडले पण जपानी नको असेच म्हणायची वेळ आपल्या लोकांवर आली असती.
क्लिंटन खरे सांगा तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला तरी पटते आहे का? तो काही खटला होता का? एकतर्फी प्रकार होता सगळा. सद्दामला अमेरिकेने फाशी दिले ना तसेमाझा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही की मी तो नीट मांडला नाही.एक उदाहरण म्हणून गांधींनी दांडीयात्रेला जाणार आणि इंग्रजांचा कायदा मोडणार हे आधीच जाहिर केले होते.पण तरीही गांधीजी दांडीला पोहोचेपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासारखे त्यांनी काहीही केलेले नाही म्हणून इंग्रजांना त्यांच्यावर नक्की काय कारवाई करावी हे समजेना (संदर्भ: अविनाश धर्माधिकारींचे गांधीजींवरील भाषण).कारण कोणी रस्त्यावरून पदयात्रेला निघाला तर त्याच्यावर कायद्याच्या कोणत्या कलमाखाली कारवाई करता येईल? असे तालिबानी किंवा जपानी राज्यात चालले असते का याचा विचार करा.जास्त शहाणपणा करतोस काय घे घालतो गोळी हिच प्रतिक्रिया या राज्यांमध्ये आली असती.किंबहुना गांधींजींची चळवळ भारतात उभी राहू शकली याचे कारण भारतावर राज्य करणारे इंग्रज होते ते तालिबानी नव्हते.अर्थात यामुळे गांधीजींच्या कार्याचे महत्व कमी होत नाही कारण परकिय कोणीही असते तरी भारतीय समाजाची अंगभूत नेमस्त मनोवृत्ती बदलली जायची शक्यता नव्हती.आणि मग एखादा शिवाजी जन्मतो का याची अनेक शतके वाट बघावी लागली असती.
पुढे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. मिळत होता तोच फायदा जपानसाठी खुप मोठा होता. त्यांनी त्याहुन जास्त काही अपेक्षा करणेच चुकीचे होते.तेच. आमचा रामराम घेऊन जपानी नामानिराळे राहिले असते तर त्यात तक्रार करण्यासारखे काहीच नाही.पण ब्रम्हदेशापर्यंत म्हणजे भारताच्या दारापर्यंत पोहोचलेल्या जपान्यांना भारतातही घुसायचेच होते याची शक्यता अगदी शून्य कशावरून?आणि जपान्यांनी इतरत्र केलेल्या कृत्यांमुळे त्यांनी भारतातही तेच केले असते ही भिती अगदी निराधार नक्कीच नाही. माझ्या मते ही किंमत चुकविणे योग्य नव्हते. असो. हा मुद्दा मी N वेळा मांडला आहे तेव्हा यापुढे परत नको.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to तालिबान पेक्षा भयानक होते by llपुण्याचे पेशवेll
गोडसे भटजींचा माझा प्रवास नावाचा धडा ११वीला मराठीला होता आठवतो आहे?नाही ब्वा. मला ११वी मध्ये मराठी नव्हतेच.
तालिबान पेक्षा इंग्रज भयानक होते हे वाक्य पटण्यासारखे आहे.इथे इंग्रज राजवटीचे अजिबात समर्थन नाही.१८५७ नंतर इंग्रजांनी जे अत्याचार केले त्याचे पण अजिबात समर्थन होऊ शकत नाही.तरीही तालिबानपेक्षा इंग्रज का परवडले असे मी म्हणतो?ऍलन ह्यूमने कॉंग्रेसची स्थापना करण्यात पुढाकार घेतला यामागचे कारण म्हणजे त्याला १८५७ नंतरच्या काळात भारतीय जनता इंग्रज राजवटीपासून दुरावलेली आहे आणि त्यातूनच पुढे इंग्रज राजवटीला भविष्यात धोका होईल म्हणून भारतीयांना त्यांचे म्हणणे मांडायला फोरम द्यावा भले इंग्रज राज्याच्या भल्यासाठी असेल पण भारतीयांना शांततेत आपले म्हणणे मांडायचा फोरम द्यावा इतपत सुसंस्कृतपणा इंग्रजांकडे होता.तालिबान्यांना आपल्या राज्याला धोका होऊ नये असे वाटत असेल तर त्यांचा मार्ग काय? घाला गोळ्या, विरोधच उखडून टाका! मोतीलाल नेहरू,चित्तरंजन दास प्रभृतींनी स्वराज्य पक्ष स्थापन केला होता.त्याचे ध्येय काय होते?इंग्रजांना विधीमंडळात जाऊन विरोध करणे.म्हणजेच काय की भारतीयांना इंग्रज राज्याच्या विधीमंडळात प्रवेश होता आणि तिथे जाऊन विरोध करता येत होता.तो विरोध कायदे बनवताना विचारात घेतला गेला असेल हे संभवत नाही पण स्वराज्य पक्षाने इंग्रज भारताचे कसे नुकसान करत आहेत हे देशातील जनतेला विधीमंडळातून सांगितले आणि तसे करायची त्यांना परवानगी मिळाली. स्थानिक पातळीवर भारतीयांना काही प्रमाणावर अधिकार दिले गेले.उदाहरणार्थ सरदार पटेल आमच्या अहमदाबादचे महापौर होते.त्यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत त्यांनी एलिस ब्रीजच्या पलिकडे अहमदाबाद शहराचा विकास करायला प्राध्यान्य दिले.लोकमान्य टिळकांनी "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का" आणि "राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे" यासारखे अग्रलेख केसरीमध्ये लिहिले.मुळात भारतीयांना स्वत:चे वर्तमानपत्र काढायची परवानगी असणे आणि असे सरकारवर टिपीकल लोकमान्य स्टाईलमध्ये सडकून टिका करणे याचा परिणाम म्हणून कोणालाही गोळ्या घातल्या गेल्या नाहीत.इंग्रज राजवटीला गांधीजींनी किती वेळा उघडउघड आव्हान दिले.त्यांना सरकारने तुरूंगात टाकले पण "आम्हाला आव्हान देतोस काय मग घालतो गोळी" असे सरसकट केले नाही. असे अनेक गोष्टींविषयी लिहिता येईल. हे सगळे तालिबानी राजवटीत करणाऱ्याची किंवा अफगाणिस्तानात तालिबानी राजवट असताना "मुल्ला ओमरचे डोके ठिकाणावर आहे का" असे लिहिणाऱ्याची गत काय होईल हे मी सांगायची गरज नाही. इंग्रज राजवटीचे दुष्परिणाम भारतावर नक्कीच झाले पण त्याचप्रमाणे इंग्रज राजवट ही सामाजिक सुधारणांसाठी चांगली असे वाटणारे अनेक लोक होते आणि त्यात राजा राममोहन रॉय आणि महात्मा फुले यांच्यासारख्या धुरिणांचा समावेश होता.इंग्रजांनी टाकलेल्या तुकड्यांमुळे लाचार होणाऱ्यांपैकी हे लोक नक्कीच नव्हेत.तेव्हा इंग्रज राजवटीमुळे भारताचे नुकसान झाले तसा काही प्रमाणात फायदाही झालाच. अर्थातच देश भारतीयांचा होता आणि हे सगळे करून इंग्रजांनी अजिबात उपकार केले नाहीत.पण सांगायचा मुद्दा म्हणजे तालिबान्यांमध्ये असा कोणताही विरोध ऐकूनच घ्यायची परंपरा नाही. त्याला उत्तर एकच-- सरसकट गोळी घालणे. दुसरे म्हणजे गझनीच्या महंमदापासून औरंगजेब आणि नादिरशहा पर्यंतचे अनेक हे याच तालिबानी राजवटीचे पूर्वसुरी.त्यांच्यामुळे भारताचा कसला डोंबलाचा फायदा झाला?त्यांच्या कत्तली म्हणाल तर हिटलरनेही शरमेने मान खाली घालावी अशा! तेव्हा तालिबानी इंग्रजांपेक्षा चांगले हे विधान पटण्याजोगे नाही.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to क्लिंटन तालिबान आणि by मृत्युन्जय
इंग्रज दुसर्या देशात जाउन राज्य करत होते. तालिबान स्वतःच्याच देशातले हुकुमशाह होते.म्हणून तालिबानींचा गुन्हा क्षम्य होतो का?तुम्ही म्हणता त्याच न्यायाने माओ सुध्दा स्वत:च्याच देशातला हुकुमशहा होता म्हणून त्याच्या कत्तली क्षम्य होतात का?अगदी तुम्ही म्हणता तोच न्याय लावायचा असेल तर जपान्यांनीही कत्तली बाहेर जाऊनच केल्या मग त्यांनाही दोष द्यायलाच हवा ना?
प्रत्यक्षात कधी कुठल्या भारतीयाला न्याय मिळाल्याचे ऐकीवात नाही.बरोबर आहे.इंग्रज अजिबात संत नव्हते. माझा मुद्दा आहे की तालिबानी राज्यात विरोध करायची कोणाची हिंमत झाली तर त्याला डायरेक्ट गोळी घालणे हाच न्याय (?) आणि इंग्रज राज्यात मात्र विधीमंडळात जाऊन सरकारविरोधी भूमिका लोकांना सांगितली तरी ते चालणाऱ्यातले होते.इंग्रज सज्जन अजिबात नव्हते पण तालिबानींपेक्षा ते सोबर होते हाच माझा मुख्य मुद्दा आहे.
लोकांच्या अमानुष कत्तली झाल्या आहेत, गोरगरीबांची पिळवणुक झाली आहे. अर्थात तुम्हाला या सगळ्याकडे डोळेझाक करायची असेल तर बोलणेच खुंटले.नाही डोळेझाक अजिबात झालेली नाही तेव्हा बोलणे खुंटवायची गरज नाही.माझा मुख्य मुद्दा आहे की तुम्ही जो उपाय सांगत आहात त्यात इंग्रजांनी केल्या त्यापेक्षा जास्त कत्तली आणि पिळवणूक व्हायची शक्यता होती. आणि जपान्यांनी थोड्या काळात ज्या वेगाने कत्तली केल्या (अंदमानसारख्या भारताच्या भागातही केल्या) त्यावरून ही भिती निराधार नक्कीच नाही. म्हणून इंग्रज जपान्यांपेक्षा परवडले असे मी म्हणतो.दगडापेक्षा वीट मऊ असे काहीसे म्हणतात ना त्याला तेच मला यासंदर्भात वाटते.याचा अर्थ मी इंग्रज राज्याचा समर्थक झालो का?
दोन हरामखोरांमध्ये कमी हरामखोर कोण ही चर्चा करणे मला तरी पटण्यासारखे नाही. पण जर एखादा हरामखोर दुसर्या हरामखोराला मारण्यासाठी माझी मदत करणार असेल तर मी जरुर करेन.अगदी लाख मोलाची बात केलीत.माझ्या घरात घुसलेल्या हरामखोराला घालविण्यासाठी दुसऱ्या हरामखोराची मदत घेताना तो दुसरा हरामखोर आपल्याच घरी घुसणार नाही याची खात्री नको करायला?इथे तो दुसरा हरामखोर तसाही आपल्या दारापर्यंत आला होता. तेव्हा त्याला आपल्याच घरात घुसायचे आहे असे वाटले तर त्यात चूक काय?आणि वर त्याला आपल्याच घरात घुसायला आपण मदत करायची?बरं घुसला तरी तो पहिल्या हरामखोरापेक्षा सोबर असेल तर ठिक इथे दुसरा हरामखोर तर पहिल्याला लाजवेल असा.आगीतून फुफाट्यात पडणे तुम्हाला चालत असेल पण मला तरी फुफाट्यात पडण्यापेक्षा आगीची (त्या मानाने) कमी धग चालेल. असो.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to क्लिंटन, तुमचा मुद्दा मान्य by llपुण्याचे पेशवेll
तुमचा मुद्दा मान्य करू की जपान्यांनी जे चीनमधे केले ते भारतात केलेच नसते असे नाही पण असते असेही म्हणता येत नाही.पण ते केले असते तर इंग्रज परवडले असे अत्याचार त्यांनी केले असते हे तर मान्य?तसेच त्यांनी अंदमानातही ते प्रकार केले होते.तेव्हा त्यांनी इतर भारतातही तेच केले असते याचीच शक्यता जास्त नाही का?तेव्हा माझ्या मते ती न परवडण्याजोगी किंमत झाली असती.
चीनबद्दल विषेश वैर असण्याबद्दलचे कारण कळत नाही.त्यांचे जे काही कारण असेल ते पण जपान्यांनी त्या किंवा अन्य कारणाने भारतीयांविषयीही असेच वैर ठेवले असते तर?विषाची परीक्षा का घ्या?
फक्त जपान्यांचा विरोध करण्यासाठी हत्यारंच उचलावी लागली असती सत्याग्रहाने काही झाले असते असे वाटत नाही.यातून तुम्ही माझ्याच मुद्द्याला समर्थन देत नाही का? सत्याग्रह जपान्यांपुढे का चालला नसता?याचे कारण सत्याग्रह वगैरे करायला गेले की घाला गोळी मग कसला सत्याग्रह आणि कसले काय?पण इंग्रजांपुढे सत्याग्रह चालले कारण सत्याग्रहींवर फारफार तर लाठीमार त्यांनी केला indiscriminate गोळीबार प्रत्येक ठिकाणी केला नाही (केला तो जालियनवाला बागेत आणि १९४२ मध्ये चिमूर आणि इतर काही ठिकाणी पण जपान्यांनी तो प्रत्येक ठिकाणी करायची शक्यता बरीच जास्त होती). त्यातूनही लाला लजपतरायांसारखे मोठे नेते त्या लाठीमाराला बळी पडलेच.तरीही जपान्यांचे क्रौर्य त्यापेक्षा बरेच जास्त होते. म्हणूनच मी म्हणतो की जपान्यांपेक्षा इंग्रज परवडले आणि याच कारणासाठी मी म्हणतो की ही परिस्थिती लक्षात घेता मुद्दामून जपान्यांच्या हातात कोलीत द्यायला नको होते.त्यांचा पराभव झाला म्हणून ठिक अन्यथा आपले काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to तालिबान्यांचा गुन्हा क्षम्य by मृत्युन्जय
मुद्दा फक्त एकच उरतो की जपान्यांनी भारतीयांवर अत्याचार केले असते का? तर त्याचे उत्तर नाही आहे. कारण त्यांची तेवढी ताकद भारतात नव्हती.जिथे जिथे त्यांनी कत्तली केल्या तिथे तिथे पहिल्यांदा त्यांची ताकद नव्हतीच तर त्यांनी तिथे गेल्यानंतर स्वत:ची ताकद establish करून मग कत्तली केल्या.इथे तर भारतीयच त्यांना यायला मदत करत होते.तेव्हा पहिल्यांदा त्यांची मदत घेऊन यायचे, स्वत:चा दारूगोळा द्यायचा, सैनिक मात्र जास्त भारतीयच. इंग्रजांबरोबर लढताना परस्पर मरतील ते बहुसंख्य भारतीय आणि मग त्याच भारतीयांच्या सेनेबरोबर भारतात यायचे आणि मग ते ऐकत नाहीत हे लक्षात येताच कत्तली करायच्या असा त्यांचा डाव कशावरून नसेल?त्यातून भारतीय शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याच्या बाबतीत पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून.नुसत्या रिकाम्या बंदुकांचा आपल्याला काय उपयोग होणार होता?भारतातल्या क्रांतिकारकांकडची पिस्तुले त्यांच्याकडील मशीनगनना आणि रणगाड्यांना पुरी पडणार होती का?आणि जपानी सैन्याने काही महिन्यात सिंगापूर,इंडोनेशिया,मलाया या मोठ्या प्रदेशातून इंग्रजांना हरवले होते.तेव्हा जपानी सैन्य आपल्यापेक्षा नक्कीच अधिक बलिष्ठ होते.तेव्हा जपान्यांनी दमदाटी केली असती तर साध्या शब्दात सांगायचे तर आपण काहीही करू शकलो नसतो.आणि जपान्यांचा पूर्वेतिहास, इतर प्रदेशांमधील कृत्ये आणि इतकेच काय अंदमानातील कृत्ये लक्षात घेतली तर तेच त्यांनी केले असते याची शक्यता जास्त. १९४१ मध्ये जर्मनीने रशियावर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदा जर्मन सैन्य बरेच आतमध्ये घुसले.स्टालिनच्या अत्याचारांना कंटाळलेल्या युक्रेनमधल्या अनेकांनी नाझी सैन्याचे त्यांचे मुक्तीदाते म्हणून स्वागत केले होते.पण त्याच जर्मनांनी काय केले?किएव्हमध्ये एका रात्रीत काही हजारांना यमसदनी पाठवले.तेव्हा त्याच लोकांना कळून चुकले की स्टालिन परवडला पण हिटलर नको.माझे तरी मत आहे की जपान्यांबरोबर आपलीही गत वेगळी झाली नसती. एकूणच काय की सगळ्या प्रतिसादांमधून समान सूत्र दिसते. एक तर गांधींच्या अहिंसक मार्गात काही अर्थ नव्हता आणि इंग्रज गेले ते एकतर क्रांतिकारकांमुळे/महायुध्दात नुकसान झाल्यामुळे किंवा लुटायला काही शिल्लक राहिले नाही म्हणून.दुसरे म्हणजे जपान्यांनी इतरत्र कत्तली केल्या तरी ते तशा कत्तली भारतात करणे शक्य नव्हते.हे कोणत्या आधारावर वाटते याची कल्पना नाही.It simply can't happen with us!! अनेकदा दहशतवादी कारवायांमध्ये इतरांचा बळी पडला तरी आपला पडणार नाही असा एक विश्वास अनेकांना असतो त्यातलाच हा एक प्रकार. विविध अंदाजांप्रमाणे जपान्यांनी व्याप्त प्रदेशात त्यांनी कत्तल केलेल्या नागरिकांची संख्या ५० लाख होती. म्हणजे सुमारे १० वर्षात ५० लाख इतका स्पीड होता.पण भारतीय दिसल्यावर त्यांना काय प्रेमाचे भरते येणार होते कोणास ठाऊक.तिसरे म्हणजे जपानी कत्तली करणे शक्य नव्हतेच तेव्हा ते जिंकूनही कशाला भारतात राहिले असते? ते गपगुमान भारतीयांच्या हातात सत्ता सोपवून आपल्या देशातून चालते झाले असते.यालाच विशफुल थिंकिंग म्हणतात.असो. या प्रतिसादाबरोबर मला या चर्चेत जे काही म्हणायचे होते ते सगळे म्हणून झाले आहे तेव्हा माझ्या बाजूने मी या चर्चेला पूर्णविराम देत आहे.
In reply to पूर्णविराम by क्लिंटन
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to @.भारतही पूर्णपणे नाही तरी by निनाद मुक्काम …
त्यांचे अस्तित्व चुटकी सरशी आपण उडवले असते जर त्यांनी असा काही कावा केला असताहे नक्की कोणत्या आधारावर म्हणता येईल?आपल्याच भारतीय सैन्याला १९४७-४८ मध्ये काश्मीरचा १/३ भाग पूर्ण जिंकून घेता आला नव्हता.त्याची कारणे (मला वाटते): काश्मीरात त्या भागात रसद,दारूगोळा पोहोचवता न येणे आणि यासारख्या logistical अडचणी, मुळातच रसदीची चणचण इत्यादी इत्यादी.आणि त्याविरूध्द मलाया-इंडोचायना-सिंगापूरमधून तीन-चार महिन्यात बलाढ्य इंग्रजांचा पराभव करणारे जपानी सैन्य! त्यांना नवख्या प्रदेशात अडचणी नक्कीच आल्या असत्या तरीही चुटकीसरशी आपण त्यांचे अस्तित्व उडवले असते हे भावनेच्या आहारी जाऊन बोलणे ठिक आहे पण ते त्या काळच्या परिस्थितीला धरून होते असे वाटत नाही. भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला तो इंग्रंच्या पराक्रमामुळे नाही तर आपल्या स्वताच्या हेव्या दाव्यामुळे बरोबर आहे.पण लाखभर इंग्रज ३० कोटींच्या भारतावर १५० वर्षे राज्य कसे करू शकले? त्यात हेव्यादाव्याबरोबरच अजून एक गोष्ट महत्वाची आहे.ती म्हणजे क्षात्रतेज म्हणा की killer instinct म्हणा त्या गोष्टीचा अभाव.सुमारे ३००० भारतीयांमागे एक इंग्रज असे प्रमाण होते तेव्हा ३००० भारतीयांपैकी एकाने तरी (किंवा अनेकांच्या गटाने) प्रत्येकी एका इंग्रजाला मारले असते तरी इंग्रज राज्य उखडून टाकता आले असते.पण ते करणार कोण?मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?३००० पैकी प्रत्येक जण दुसरा कोणीतरी करेल म्हणून वाट बघायला लागला तर ते व्हायचे कसे?अशा परिस्थितीत आणखी खुनशी शत्रू डोक्यावर बसायची शक्यता असेल तर काम आणखी कठिण होणार नाही का? टी.एन.कौल म्हणून भारतीय परराष्ट्रसेवेतील अधिकारी होते.त्यांना १९५०-५१ मध्ये चीनमध्ये अफगाण दूतावासाचा अधिकारी भेटला.तेव्हा ३० कोटींच्या देशावर लाखभर इंग्रज इतकी वर्षे राज्य कसे करू शकले याविषयी त्याने आश्चर्य व्यक्त केले.तो म्हणाला की अफगाणिस्तानात आम्ही त्यांना वर्षभरही टिकू दिले नसते (संदर्भ: टी.एन.कौलांच्या परराष्ट्रसेवेतील आठवणींवरील पुस्तक. नक्की नाव आता आठवत नाही). तेव्हा ही भारतीय समाजाची मर्यादा होती.त्यात जपान्यांसारखा रक्तपिपासू शत्रू डोक्यावर येऊन बसायची अगदी ०.१% शक्यता जरी असेल तरी मला वाटते की ती किंमत महाभयंकर होती.त्यापेक्षा इंग्रज परवडले.
In reply to पण या सगळ्या खटाटोपात भारतीय by क्लिंटन
In reply to @.भारतही पूर्णपणे नाही तरी by निनाद मुक्काम …
जपानमध्ये राजा हाच देव मनाला जायचा (पुढे अमेरिकन सरकारने त्याला फाशीवर चढवला )काय??? दुसर्या महायुद्धाचे वेळी जपानचा सम्राट हिरोहितो हा होता, असे आठवते. तो परवापरवापर्यंत (वीसपंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत) जिवंत होता, आणि चांगला म्हातारपणी मरण पावला, असेही आठवते. विकिपीडियावरील दुव्यावरून त्याचा मृत्यू हा दीर्घ आजारानंतर घडला, असे कळते. एवढेच नव्हे, तर अमेरिकेने त्याला फासावर लटकवला तर नाहीच, उलट त्याच्यावर युद्धगुन्हेगार म्हणून खटलासुद्धा भरला जाऊ नये, आणि इतर युद्धगुन्हेगारांच्या साक्षींतून चुकूनसुद्धा सम्राटाकडे अंगुलिनिर्देश होऊ नये याकरिता अमेरिकेने पुरेपूर दक्षता घेतली असेही कळते. वाटेल ती विधाने ठोकून देण्यापूर्वी संदर्भ तपासून पाहण्याची किमान तसदी घ्यावी, असे सुचवावेसे वाटते.
In reply to काय??? by पंगा
In reply to दमानं घ्या साहेब. बहुतेक by स्वानन्द
In reply to स्वातंत्र्यप्रेमी by क्लिंटन
In reply to स्वातंत्र्यप्रेमी by क्लिंटन

In reply to जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' by वाहीदा
In reply to अब्बूजान !! by अर्धवटराव
In reply to नेताजींबद्दल कधीच कुण्या by विजुभाऊ
In reply to नेताजींबद्दल कधीच कुण्या by विजुभाऊ
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to हे राम!!! by निखिल देशपांडे
In reply to नेताजींचे कर्तुत्व मोजक्या by निनाद मुक्काम …
In reply to अवलियांच्या धाग्याचा परिणाम! by पैसा
In reply to थत्ते,अवलिया, पुपे, जपान, by भडकमकर मास्तर
In reply to एक दिवस उशीरा का होइना, पण by Nile
भविष्यात पुन्हा स्वातंत्र्य मिळविन्याची वेळ आली तर पुन्हा असा कीस काढुन घेन्यासाठि कोण जीव धोक्यात घालणार आहेअगदी बरोबर नाही घालणार जीव कोणीही धोक्यात. पण असेच लोक क्रांतिकारकांचा जयघोष करत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गांधीजी कसे बावळट असे सिध्द करायचा जो प्रयत्न करतात. स्वत:ला क्रांतिकारकांचे मुकुटमणी समजून सुभाषबाबूंनी स्वातंत्र्य कसे मिळवले हे दाखविण्याऐवजी ते गांधींनी कसे मिळवले नाही हे दाखवून द्यायची अनेकांची धडपड चालू असते.त्या प्रवृत्तीला विरोध म्हणून तर इतके रामायण लिहिले.मला वाटते थत्ते साहेबांच्या मूळ चर्चा प्रस्तावाचा उद्देशही तोच आहे.
In reply to चर्चेचा रोख घसरलाय विशेषत: by विजुभाऊ
In reply to गांधीमार्ग !! by अर्धवटराव
In reply to विसर by नितिन थत्ते
In reply to विसर by नितिन थत्ते
सदरहु मंडळींचा उदोउदो झाला नाही म्हणजे त्यांना विसरले गेले असे समजायचे कारण नाही असे अवलिया यांचेही मत दिसते.ह्या वाक्याला आमच्या परिच्छेदातील
ह्या महान लोकांचा आम्हाला कधीही विसर पडत नाही त्यामुळे "अरे हो .. बरे झाले आठवण आली... " असे कधीही होत नाही.हे वाक्य आधार वापरले असावे असे वाटते. सबब खुलासा असा की, आमच्या वाक्यातील "आम्हाला" हा शब्द केवळ प्रथमपुरुषी एकवचनी "मी" या शब्दाने सुचित होणार्या अर्थाला पर्याय म्हणुन वापरला आहे. सुज्ञांना ते आधीच समजले असेल, इतरांना आता कळले असावे अशी अपेक्षा आहे. बाकी चालू द्या !!
रंगून येथील आझाद हिंद बँक किंवा बँक ऑफ ईंडीपेंडन्स तर्फे जारी केलेली हि नोट.
आताच्या नोटेवरचा फोटो बघून कंटाळा आलाय,येत्या काळात भारतीयांच्या खिश्यात नेताजींचे चित्र असलेल्या नोटा असतील हीच आशा आर.बी.आय. कडून !
१९४३ साली नाझी जर्मनी मध्ये तयार करण्यात आलेलं नाणं, यावर आर्झी हुकुमत ए आझाद हिंद असं कोरलेलं आहे
एकही लेख लिहिला गेला नाही