स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार
In reply to खरा प्रश्न ! by मीली
In reply to लेख आवड्ला.. मात्र... by ऋषिकेश
In reply to लेख आवड्ला.. मात्र... by ऋषिकेश
In reply to लेख आवड्ला.. मात्र... by ऋषिकेश
In reply to सुंदर लेख आणि चर्चा. काही by नितिन थत्ते
In reply to सुंदर लेख आणि चर्चा. काही by नितिन थत्ते
In reply to अभिनिवेशरहित, समंजस आणि by मेघना भुस्कुटे
In reply to लेख by स्वाती दिनेश
In reply to स्त्री मुक्तीमधील भेदभाव by वाहीदा
आणखिन एक प्रश्न आपल्याकडे 'चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे', 'एक औरत ही घर को आबाद करती हैं, या बरबाद करती हैं !' अश्या म्हणी रुढ होण्यामागचे कारण आपण स्त्रीयाच आहोत ना ? आपल्या स्त्रीयांमध्येही इतर स्त्रीयांसाठी इतकी असूया, हेवेदावे, विषमता का भिनली आहे ? मग जेव्हा आपण मुक्त होण्याचा विचार करतो तेव्हा या सर्व Negative Energy पासूनही मुक्त होणे गरजेचे आहे.निगेटिव एनर्जीपासून मुक्त होणे आवश्यक आहे याच्याशी सहमत आहे. स्त्रियांमध्ये आसूया, हेवेदावे अधिक दिसतात याच्याशीही सहमत आहे परंतु याचे कारण स्त्रियांच्या प्रचंड उर्जेचा योग्य ठिकाणी व्यय होत नाही म्हणून. जसजसे स्त्रियांची शैक्षणिक पातळी, वाचन, स्वावलंबन, पैशाची आवक वाढत जाईल तसतसे तिचे विचार बदलत जातील. डोके योग्य ठिकाणी कारणी लागेल आणि आसूया, हेवेदावे करण्यास वेळ मिळणार नाही आणि स्त्रियांची अशाप्रकारे उन्नती होण्यासाठी तिला घरच्या पुरुषाची साथही आवश्यक आहे. एक उदाहरण सांगते. परवा माझ्या एका मैत्रिणीकडे पार्टी होती. त्याच दिवशी फूटबॉलचा सामनाही होता (दुर्दैवाने आम्ही तो हरलो..पण ती वेगळी गोष्ट) माझा नवरा कामानिमित्त परदेशी आहे. इतर मित्रमंडळ तेथे उपस्थित होते. घरात काहीही काम करायचे नव्हते. सर्व पुरुष बसून सामना बघत होते. बायका मात्र वेगळ्या बसून गप्पा मारत होत्या. मला सामना बघायचा होता. मी साडे तीन तास बसून सामना पाहिला. आमचे सर्व मित्र सामना बघताना व्यवस्थित माझ्याशी खेळ डिस्कस करत होते. खेळात घडलेला एक फाऊल मी समजावून सांगितला तेव्हा व्यवस्थित ऐकूनही घेत होते. मी प्रश्न विचारला तर समरसून उत्तरे देत होते. गंमत म्हणजे त्यापैकी एकही पुरुष आपल्या बायकोला म्हणाला नाही की 'इंटरेष्टींग सामना आहे. बस ना इथे आपण एकत्र बघू.' याच सुमारास माझ्या नवर्याने फोन करून मला स्कोर विचारला आणि नेमके काय झाले हे विचारून घेतले. (म्हणजे सामन्यात काय होते आहे हे विचारण्यासाठी त्याला उपस्थित मित्रांपैकी एखाद्याला फोन लावावा लागला नाही) संपूर्ण साडे तीन तास माझ्या मैत्रिणी बाजूला बसून 'आपण स्नोमध्ये मुलांना घेऊन शॉपिंग कसे केले?' यापासून "यावेळेस आयब्रो करताना आर्च कसा चांगला आला.", "शाळेत मुलांना टिचरने काय सांगितले" वगैरे गप्पा मारत होत्या. सोबत त्यांनी 'आज बहुधा हीचा (माझा) मूड नाही' असे मला सुनावले. त्यावर माझे उत्तर होते की 'माझा मूड चांगला आहे. मी आनंदाने सामना बघते आहे. हरलो तर मूड बहुधा खराब होईल पण असे होईलच असे नाही.' ---- खेळाचे हे उदाहरण क्षुल्लक आहे परंतु मी सहसा स्त्रियांना राजकारणाबद्दल, कारच्या सर्विसिंगबद्दल, विविध इन्शुरन्सेसबद्दल, सेविंग पॉलिसीजबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल तासंतास चर्चा करताना पाहत नाही.
In reply to रिकामी बाई by प्रियाली
In reply to स्वत:च्या आत्मउन्न्तीसाठी कोणाचीही आवश्यकता नाही by वाहीदा
अवांतर : मी कामात आहे म्हणून तुम्ही सगळ्या रिकाम्या आहात असं कुठे म्हंटल ग मी प्रियालीताई ??मी तुला किंवा इतरांना रिकाम्या म्हणत नव्हते. रिकामा न्हावी ...प्रमाणे रिकामी बाई असा वाक्प्रचार वापरत होते. :) हिंदीत म्हण आहे ना - खाली दिमाग* शैतान का घर. * खाली दिमाग म्हणजे निर्बुद्ध डोके नव्हे पण क्षमता असूनही योग्य ठिकाणी न वापर झालेले डोके. --- विशेषतः भारतात फ्रस्ट्रेशन लेवल खूप जास्त आहे. बायकांची तर आहेच. त्यांना ऑफिस, घर, मुले, पाहुणे, सासू-सासरे सर्वच बघावे लागते. परदेशाप्रमाणे नवर्यांची खूप मदत होत नाही. हे नैराश्य ट्रेनमध्ये बाहेर पडत असावे. परक्यांवर राग काढणे सोपे असते म्हणून भारतात पुरुषही जरा काही झाले की रस्त्यावर मारामारीस उतरतात. (उदा. गाडीला सायकलचा धक्का लागल्यावर एकदम अक्षयकुमारश्टाईलने फायटींग करताना पाहिले आहे.), रस्त्यावर जोरजोरात हॉर्न वाजतात वगैरे.
In reply to स्वत:च्या आत्मउन्न्तीसाठी कोणाचीही आवश्यकता नाही by वाहीदा
In reply to रिकामी बाई by प्रियाली
In reply to रिकामी बाई by प्रियाली
In reply to लेख छान आहे, पण बरेच मुद्दे by ५० फक्त
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to स्त्रीमुक्ती, नोकरी करणारी स्त्री, पूर्णवेळ गृहिणी वगैरे by स्वाती२
In reply to तुम्ही स्वतः खंबीर असाल तर by यशोधरा
In reply to >> ती मुक्तच आहे की. केवळ by नगरीनिरंजन
In reply to >>>एखादी गोष्ट नष्ट करायची by मितान
In reply to एखादी गोष्ट रद्द व्हायची असेल by गवि
In reply to बहुतेक असाच विचार पाश्चिमात्य by शिल्पा ब
In reply to अर्थात कोणीतरी आपली सुरक्षा by गवि
In reply to किंवा by आजानुकर्ण
In reply to बॉडी गार्ड म्हणायचंय का? पण by शिल्पा ब
In reply to स्त्रीमुक्ती, नोकरी करणारी स्त्री, पूर्णवेळ गृहिणी वगैरे by स्वाती२
नवर्याबरोबर परदेशात गेल्यास तिथल्या नियमांमुळे नोकरी न करु शकणे, नवर्याच्या होणार्या बदल्या, 'आई' होण्यासाठी डॉक्टरी सल्ल्याने घ्यावी लागणारी सक्तीची बेडरेस्ट, बाळंतपणात उद्ध्भवलेल्या समस्यांमुळे खालावलेली तब्येत, मूल प्रीमी असणे किंवा त्याच्या तब्येतीचे प्रॉब्लेम, घरातील वडिलधार्या माणासांचे आजारपण वगैरे अनेक कारणासाठी स्त्रीला नोकरी सोडायची वेळ येऊ शकते. नोकरीत गॅप आल्यावर सर्वच क्षेत्रात लगेच नोकरी मिळतेच असे नाही.सगळं खरं. परदेशातल्या अडचणी या भारतातल्या अडचणींपेक्षा वेगळ्याही असतात. कायद्याने, विस्कळीतपणाने माणसाचे हात बांधले जातात. तरीही यातील अधोरेखीतांतून मी स्वतः गेले आहे. नोकरीत २ वर्षे आणि ५ वर्षे अशा गॅप्स आहेत पण जेव्हा नोकरी पुन्हा स्वीकारायची ठरवली तेव्हा हातात पडेल ती करेन असा स्टँड घेतला. निदान चारचौघांत वावरायची सवय सुटली आहे ती तरी पुन्हा येईल असा विचार केला. लाइन बदलली. परिस्थिती बदलत असते, दिवस बदलत असतात. मुले मोठी होतात. तब्येत सुधारते. माणसाचे निर्णय बदलतात. घरी बसणार्या बायकांना कमी लेखणे हा सांगण्याचा हेतू नाही किंवा त्यांना हसण्याचाही हेतू नाही. कारण मी स्वतः गृहिणीची भूमिका व्यवस्थित केली आहे आणि नवर्याच्या बळावर. भीती याची वाटते की समजा संसारातले एखादे चाक अवेळी मोडले तर कुटुंबाची काळजी कोण घेणार? त्यावेळी बाईच्या हातात नोकरी नसेल तर निर्माण होणारे प्रश्न अधिक गंभीर असतील. प्रश्न अडचणी आहेत म्हणून नोकरी न करण्याचा निर्णय घेतला हा नाही. जर नोकरी करायची इच्छा असेल आणि तरीही करता येत नाही हा आहे. अडचणी तर सर्वच बाबतीत असतात. म्हणून पुरुष नोकरी सोडून घरी बसत नाहीत. हा त्याग बाईलाच करावा लागतो. मग मुलांना आईची गरज असते/ घरातली बाई चांगली काळजी घेऊ शकते अशा सबबी पुढे केल्या जातात. जेथे इच्छा असते तेथे मार्ग असतो अन्यथा, अनेक सबबी आणि कारणे पुढे करता येतात असे म्हणेन. (बाईला पुढे करता येतात असे म्हणायचे नाही. कुटुंब पुढे करते.) नोकरी करायची की नाही हा निर्णय बाईचा हवा एवढेच सुचवायचे आहे.
तेव्हा सरसकट सगळ्यांना एका मापात मोजणे योग्य नाही.१००% मान्य. कुटुंबांच्या गरजा वेगवेगळ्या असतात परंतु 'बाईने नोकरी सोडून घरी बसावे' याखेरीज किती कुटुंबे वेगळा मार्ग स्वीकारतात. असे किती कुटुंबात दिसते की नवरा म्हणतो आपण दोघे पार्टटाईम नोकरी करू आणि काही दिवस तू घरी रहा, काही दिवस मी घरी राहतो. किंवा तू संध्याकाळी नोकरी कर पण पायावर उभी रहा. एखाद्या केसमध्ये तरी नवरा घरी बसला - निदान आपल्या आई वडलांची काळजी घ्यायला असे दिसले का? तेव्हा समानता हा शब्द वापरला तरी समानतेपासून अद्याप आपण दूर आहोत असे आहे.
In reply to सगळं खरं by प्रियाली
In reply to जर का नवरा हा अधिक कमावणारा by स्वाती२
In reply to स्वाती२ आणि प्रियालीतै, दोघी by रेवती
तरीही जमेल ती समाजसेवा ती नेहमी करताना दिसते. तिला वाईट वाटत असावे पण या बाबतीत इलाज नाही.रेवतीताई, स्वतःचं काहीतरी ती करते आहे, स्वतःसाठी काहीतरी जागा निर्माण करते आहे, मुळीच वाईट वाटण्याचं कारण नाही. प्रियाली म्हणते त्याप्रमाणे उलट परिस्थिती (स्त्री मोठ्या पदावर आणि तिचा नवरा मुलांच्या सुरक्षिततेसाठी नोकरी सोडून त्यांची देखभाल करतो आहे) असं दिसणं कठीण सध्यातरी आहे. पण प्रियाली, माझा प्रश्न असा आहे की स्त्रियांनी नोकरी करणं, घराबाहेर काहीतरी स्वतःची जागा निर्माण करणं हे सगळं किती जुनं आहे? भारतात साधारण ५० वर्ष, अमेरिकेत ~ २००? म्हणजे हा टू-बॉडी (किंवा मल्टी-बॉडी) प्रश्न तुलनेने नवा आहे आणि प्रचलित पुरूषप्रधान (किंवा मुख्य कमावणारा पुरूषच) संस्कृती काही हजार वर्ष जुनी आहे. या बाबतीत अजून समानता नाहीच आहे, पण ती निर्माण व्हायला पुरेसा कालावधीही झाला नाही आहे असं मला वाटतं. किती वर्ष/पिढ्या लागतील माहित नाही पण भारतातच बघायचं तर स्त्रियांची फारतर तिसरी पिढीच नोकरी करणारी असेल. स्त्रियांची पैशांसाठी नोकरी इथपासून ते करियरसाठी नोकरी यासाठी ५० वर्ष लागली तर कुटुंबप्रमुखपद स्त्रीकडेही दिसण्यासाठी आणखी काही काळ नक्कीच जावा लागेल. स्पेशल नीड्स असणार्या मुलासाठी ले-ऑफ नंतर नोकरी न धरणारी एक आई भेटली; कदाचित अजून काही वर्षांनी तिलाही जबाबदारीची नोकरी करता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पण तोपर्यंत ती स्वतः, मुलाच्या केसवरून अभ्यास करते आहे, स्वतःचा नृत्याचा छंद जोपासत आहे. तिच्यासाठी शुभेच्छांव्यतिरिक्त माझ्याकडे प्रचंड आदर आहे. ऋ आणि स्वातीताई यांचे प्रतिसाद आवडले.
In reply to गॅप पडल्यावर परत नोकरी मिळवणं by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्पेशल नीड्स असणार्या मुलासाठी ले-ऑफ नंतर नोकरी न धरणारी एक आई भेटली; कदाचित अजून काही वर्षांनी तिलाही जबाबदारीची नोकरी करता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पण तोपर्यंत ती स्वतः, मुलाच्या केसवरून अभ्यास करते आहे, स्वतःचा नृत्याचा छंद जोपासत आहे. तिच्यासाठी शुभेच्छांव्यतिरिक्त माझ्याकडे प्रचंड आदर आहे.ही बाई जे करते ते उत्तमच आहे आणि आदरणीय आहे. मी कुठल्याही पद्धतीने त्याला नावे ठेवत नाही. प्रश्न उद्भवतो जेव्हा काही कौटुंबिक कारणांसाठी बाई नोकरी सोडून बसली आणि नंतर कुटुंबात काही वाईट झाले तर तिने कुठे बघायचे? एक उदाहरण पाहिले - एका अतिशय श्रीमंत घरात पडल्याने आमच्या ओळखीतल्या एका मुलीने नवर्याच्या स्टेटसला शोभा देत नाही म्हणून नोकरी सोडली. नोकरीची गरज नव्हतीच. भल्या मोठ्या घराची निगा राखायला, आजारी सासूची काळजी घ्यायला वगैरे बायको होती. कालांतराने सासू वारली पण दोन मुले झाली. मुलांचे संगोपन करण्यात वेळ निघून गेला. नंतर नवरा बायकोचे पटेना. नवर्याचा बाहेरख्यालीपणा बाहेर आला. तो नाद सोडून द्यायची शक्यता शून्य आहे हे कळल्यावर ही बाई त्याला सोडून आली कारण मुलांना घेऊन सोबत राहणे कठिण झाले होते. आता परिस्थिती अशी आहे की मुले श्रीमंतीला सरावलेली आहेत, त्यांच्या शाळेच्या फी जबरदस्त आहे. मुलगी माहेरची सर्वसाधारण आहे. तिला नोकरी नाही. नवरा विचारत नाही. सर्वच त्रांगडं झालं आहे. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की आपली इच्छा असेल तर नोकरी करावी. काही वेळेस नोकरी करणे अशक्य असू शकते पण शक्य असल्यास अवश्य करावी. ती करताना आता पैसे फारसे वाचत नाहीत, दगदग होते हे सर्व खरे असते परंतु भविष्याचा विचार करून तरी करावी.
In reply to प्रश्न by प्रियाली
In reply to १००% सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्त्रीमुक्ती, नोकरी करणारी स्त्री, पूर्णवेळ गृहिणी वगैरे by स्वाती२
In reply to लेख आवडला by सखी
In reply to वामांगी. by अडगळ
In reply to वामांगी. by अडगळ
In reply to वामांगी. by अडगळ
In reply to वामांगी. by अडगळ
In reply to वामांगी. by अडगळ
In reply to वामांगी. by अडगळ
In reply to शत्रू by नितिन थत्ते
In reply to शत्रू by नितिन थत्ते
In reply to पॉवर पॉलिटिक्स by श्रावण मोडक
In reply to शत्रू by नितिन थत्ते
In reply to <<<लग्न करायच्या वेळी "नोकरी by शिल्पा ब
सगळ्यांना फाट्यावर मारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा....असेही झगडायचे तसेही झगडायचेच...बाहेरचे लोक फक्त गप्पा हाणणार मदत करणार नाहीत...काय उगा कोणालाही महत्त्व द्या.हे आवडले! (तूर्तास एवढेच.)
In reply to चित्राताई फारच संयमित संतुलीत by विजुभाऊ
In reply to एकांगी लेख. सोयीस्कर by Pain
हम्म...मुलं असतील तर बराच फरक