स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार
लेखनप्रकार
पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली.
स्त्रियांच्या मुक्ततेचा प्रश्न हा सर्व मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या समाजाच्या दृष्टीने नेहमीच थोडा टिंगलीचा, थोडा टवाळीचा तर कधीकधी अतिशय गंभीर असा ठरला आहे. मुळात मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांबद्दल असे म्हणण्याचे कारण असे की एका पीडीत अशा व्यक्तीची ती स्त्री आहे म्हणून पीडीत आहे, आणि म्हणून तिची सुटका करावी, हा विचार मध्यमवर्गियांनीच महत्त्वाचा समजला आहे/असावा. या प्रश्नांकडे अभ्यासक म्हणून बघण्याची गरज मध्यमवर्गानेच जाणली असावी, असा माझा समज आहे. तरी हे प्रश्न मात्र मध्यमवर्गाच्या पलिकडले, सगळ्याच समाजांना, समाजातील सगळ्याच स्तरांतील लोकांचे आहेत.
मी ज्या गावात वाढले, तेथे कुणबी, ब्राह्मण, कायस्थ आणि मुसलमान अनेक वर्षे राहत होते. ब्राह्मण कनिष्ठ मध्यमवर्गीय अधिक होते, कायस्थ हे त्यामानाने सुखवस्तू, शिकलेले असत आणि मुसलमान कारागीर अधिक होते. याउलट कुणबी विशेष करून लोणावळ्याकडील भागातून वसतीला आले होते, आणि लहान लहान "बेडी" करून राहत असत. हे सांगण्याचे विशिष्ट कारण असे, की या जातींप्रमाणे आणि आर्थिक स्तराप्रमाणे स्त्रियांवरील बंधने कमी-जास्त होती. तरीही एका विशिष्ट पातळीवर त्या स्त्रिया समान होत्या. तसेही 'अर्थ' सारख्या चित्रपटांमधून कथेतील पुरुषाच्या आजूबाजूच्या सर्व स्तरातील निम्न, मध्यमवर्गीय आणि यापेक्षा उच्चस्तरीय आणि वरवर पाहता मध्यमवर्गीयांच्या सोवळ्या बंधनांमधून मुक्त स्त्रियांचेही प्रश्न असतात त्यांची झलक दिसलीच होती. त्यावेळी साम्य लक्षात आले नाही, पण जशी मी मोठी झाले तशी माझ्या आजूबाजूला असलेल्या घरांमधली स्त्रियांबद्दलची अॅपथी, थोडेसे दुर्लक्ष, थोडीशी हात झटकून टाकण्याची भावना दिसायला लागली.
माझ्या माहेरी कामाला येणारी बाई लग्न होऊन आमच्या वाडीत आली, तेव्हा आम्ही त्यांच्या घरच्या सत्यनारायणाला गेलो होतो ते आजही आठवते. तिची सासू वर्षानुवर्षे आमच्याकडे कामाला होती. तिच्या सुंदर आणि शालीन अशा त्या सुनेला लग्न करून आणल्यानंतर त्यांच्या घरी प्रसाद देताना पाहिल्याचे मला आजही जसेच्या तसे आठवते. पण नवरा व्यसनी झाला, लवकर गेला, त्याच्यामागे चार मुलांचा सांभाळ करण्यात तिचे आयुष्य कसे जाते आहे हे आम्ही पाहत होतो, पण थोडीफार पैशाची मदत आणि तिच्या मुलांच्या शिकवण्या याखेरीज आम्ही फार काही केले असे वाटत नाही. आता तिचे स्वतःचे घर आहे, मुले बर्यापैकी नीट शिकली, पण तिने खूप भोगले आहे/असावे. अजूनही चार घरची कामे सोडू शकत नाही, हेही तिचे वास्तव आहे. ज्या स्त्रिया तिच्याएवढ्याही नशीबवान नव्हत्या, त्यांना नवर्याच्या मृत्युनंतर घर सोडावे लागले, त्यांच्याबद्दल काहीबाही ऐकू येत असे. लहानपणची माझी खेळण्यातली मैत्रिण तिच्या बहिणीच्या बाळंतपणातल्या निधनानंतर सोळाव्या वर्षी लग्न होऊन तिच्याच मेव्हण्याला दिली गेली. माझ्या मुसलमान मैत्रिणीच्या घरातली अगदी थेट हीच कथा. तेव्हा आम्ही चौथीत असू. अकरावीतल्या तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीला अपघाती निधन झालेल्या बहिणीच्या पंचवीशीतल्या नवर्याच्या मागे स्कूटरवर बसून जाताना पाहिली तेव्हा वाटलेले आश्चर्य अजून आठवते.
आमच्या घरी शिक्षण होते, घरदार व्यवस्थित होते. तरी कुठे फारशी स्त्री मुक्त होती? अर्थात पुरुषही मुक्त नव्हते. नोकरीला बांधलेले होते. पण घरातल्या स्त्रियांचा दिवस हा पहाटे चारला सुरु होई आणि रात्री अकराला मावळे. चार वाजता उठून करायचे काय तर आंघोळी करून सर्वांचे डबे, मुलींच्या वेण्या, आणि तयारी. दहाला परत थोडी सुटका झाली, तरी बारापर्यंत सकाळी शाळेत गेलेली मुले घरी येण्याची वेळ व्हायची, मग त्यांची जेवणे, अडीच तीनच्या सुमाराला दुपारची थोडी झोप आणि परत चार वाजल्यापासून संध्याकाळची तयारी. उन्हाळ्यात उन्हाळ्यातली कामे - वाळवणे घालणे, वर्षभराच्या तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवायचा (हा काय प्रकार होता, तो जे केले आहे त्यांनाच कळेल. तांदूळ दोन हातांमध्ये घ्यायचा आणि पांढर्या पावडरने भरलेले हात घासून ती त्या तांदळाला चोळायची. असा वर्षभराचा तेरा-चौदा माणसांना लागेल एवढा तांदूळ आमच्या घरी उन्हाळ्यात यायचा), डाळींना उन्हे द्यायची, पापड, लोणची, मिरगुंडे, बटाट्याचा वर्षभरच्या उपासांना पुरेल एवढा कीस घालायचा, चिकवड्या-कुरड्या इ. इ. दहा कामे असत. ही कामे करण्यासाठी आम्ही मदत करत असू, पण मुख्य काम बायकांचेच. ती झाली की महिनाभर विश्रांती, माहेरी जाण्याची चंगळ असे. तेवढे झाले की परत जूनच्या पहिल्या आठवड्यात घरी. शिवाय एकत्र कुटुंबांमधील रुसवे-फुगवेही असत. या सगळ्या धबडग्यात नवर्याबरोबर चित्रपटाला जाण्यासारखी हौस तरी भागवायला वेळ कुठे होता? पुढे मी जेव्हा नवर्याकडून सासू-सासरे एकत्र चित्रपटांना जायचे हे ऐकले तेव्हा आठवले की आईबाबा दोघेच मिळून एकत्र चित्रपटाला गेले आहेत असा केवळ एक दिवस मला आठवतो. तेव्हा आईला झालेला आनंद आठवतो. माझ्या घरातल्या इतर स्त्रियांचीही कथा याहून काही फार वेगळी नव्हती. असे वाटते की या बायकांनी आपल्या जाणत्या आयुष्यातील खूप वेळ हा आपल्याला दिला, घरच्यांच्या सन्मानासाठी, पाहुणे-रावळ्यांसाठी दिला. आता तिला माणसांची ऊठबस करण्याचा फार कंटाळा येतो, इतका की कधीकधी मला तिच्या कंटाळ्याचा कंटाळा येतो. पण कधीतरी विचार करताना असे वाटते की तो कंटाळा येण्याचा तिला हक्क आहे. तो तिच्या वेळेवरचा तिचा अधिकार आहे. तो कसाही, तिला हवा तसा घालवण्याचा अधिकार तिला आहे.
मुळात स्त्रियांची मुक्ती हा विषय इतका चावून चघळून चोथा झालेला विषय बनला आहे, की त्यावर वेगळे काय बोलणार असे कधीतरी वाटते. कधी वाटते की आपली एवढी पात्रता नाही. पण तरीही असे म्हणावेसे वाटते की प्रत्येक माणूस, जो जिवंत असतो, त्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाची लांबी ही सारखीच असते. पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांना मिळणारे क्षण हे कसलेही लिंग न स्विकारता येतात. त्या क्षणांमध्ये स्त्रियांचा क्षण किंवा पुरुषांचा क्षण असे भेद नसतात. त्या क्षणाच्या काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे अनेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे. हे कोणाही व्यक्तीला करावे लागू नये. यासाठी पैशाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, दुसर्याच्या इच्छेचे, वेळेचे मोल समजणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे. बाईने डाळीला फोडणी द्यावी, का पुरुषाने; किंवा बाईने बाळाची शी काढावी, का पुरुषाने, हे प्रश्न माझ्या मते महत्त्वाचे आहेत, पण दुय्यम आहेत, प्रत्येक जित्याजागत्या व्यक्तीला मिळालेला वेळ कसा वापरता यावा या विचारांचे बाय-प्रॉडक्टस आहेत. मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे.
स्त्री-मुक्ती चळवळीची उपेक्षा होते, त्यांचा अजेंडा कसा चुकीचा, एकांगी आहे हे खरेखोटे दळण आपण नेहमीच दळत असतो. मराठी लेखक आणि लेखिकाही एकेरी, कंटाळवाण्या कथा लिहून समाजातील विसंगती दाखवत राहतात. पण हे असे सतत कंटाळवाणे काहीतरी कथा-कादंबर्या-लेखांमधून दाखवणारे भले मूर्ख, एकांगी असतील, पण आजूबाजूला जे जिवंत व्यक्तींच्या आकांक्षा दाबणे, त्यांचा स्वतःच्या वेळेवर हवा तेवढा अधिकार नसणे घडत होते/घडत आहे ते अधिक चुकीचे आहे असे नाही वाटत?
वाचन
30017
वाचनखूण
प्रतिक्रिया
161
स्वातंत्र्याची व्याख्या आवडली.
लेखातील विचारांना सहमती आहे
एक चाक !!
In reply to एक चाक !! by अर्धवटराव
....स्त्रीयांची हि घुसमट
In reply to ....स्त्रीयांची हि घुसमट by अनामिक
समाज !!
In reply to ....स्त्रीयांची हि घुसमट by अनामिक
नोकरी
In reply to नोकरी by अन्या दातार
अहो पण तुम्हाला त्या गोष्टीचा
In reply to अहो पण तुम्हाला त्या गोष्टीचा by पक्या
पगार हा एक प्रकारचा बेनेफिट आहे
In reply to पगार हा एक प्रकारचा बेनेफिट आहे by आजानुकर्ण
घी देखा....
In reply to घी देखा.... by नितिन थत्ते
म्युच्युअली एक्सक्लुझिव
In reply to म्युच्युअली एक्सक्लुझिव by आजानुकर्ण
तेच तर...तसं वाटत नाही. पण
In reply to घी देखा.... by नितिन थत्ते
म्युच्युअली एक्सक्लुझिव
मोकळेपणाने सांगितलेले अनुभव
In reply to मोकळेपणाने सांगितलेले अनुभव by धनंजय
अजून स्पष्ट करते
लेख आवडला. संयत वाटला.
In reply to लेख आवडला. संयत वाटला. by शुचि
धन्यवाद
In reply to धन्यवाद by चित्रा
गरज
In reply to गरज by अन्या दातार
अन्या, स्त्रियांच्या डब्यातही
In reply to अन्या, स्त्रियांच्या डब्यातही by यशोधरा
शंका
In reply to शंका by आजानुकर्ण
न निवडून सांगतात कोणाला?
In reply to न निवडून सांगतात कोणाला? by यशोधरा
दुरुस्ती
In reply to दुरुस्ती by आजानुकर्ण
भाज्या निवडणे हे जसे
In reply to भाज्या निवडणे हे जसे by यशोधरा
चकाट्या पिटणे हे केवळ
In reply to चकाट्या पिटणे हे केवळ by आजानुकर्ण
बेटर. तसेच भाज्या निवडणे हे
In reply to बेटर. तसेच भाज्या निवडणे हे by यशोधरा
ऑ
In reply to ऑ by आजानुकर्ण
मी ह्या चर्चेत दिलेले
In reply to मी ह्या चर्चेत दिलेले by यशोधरा
अन्या दातार ह्या आयडीला
In reply to शंका by आजानुकर्ण
समता
In reply to लेख आवडला. संयत वाटला. by शुचि
जास्त कमावणारा नवरा
In reply to जास्त कमावणारा नवरा by प्रियाली
>>...... असून कायमस्वरुपी
In reply to >>...... असून कायमस्वरुपी by शुचि
खरेच?
In reply to खरेच? by प्रियाली
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे
In reply to असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे by शुचि
शिक्षणाने माहिती वाढली, पण
In reply to शिक्षणाने माहिती वाढली, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच
In reply to तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच by शुचि
मनोगतावरली गोष्ट
In reply to मनोगतावरली गोष्ट by प्रियाली
कथा आवडली. वास्तव वाटली.
In reply to तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच by शुचि
कुचंबणा होते हे खरं आणि
In reply to तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच by शुचि
कुचंबणा होऊ दिली जाते म्हणून
In reply to असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे by शुचि
काय सांगतेस
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
पूर्णपणे सहमत
In reply to पूर्णपणे सहमत by आजानुकर्ण
हो
In reply to हो by टारझन
स्त्री समर्थक न राहून सांगतोस
In reply to खरेच? by प्रियाली
पण तिचा नवरा जर परवानगी देत
In reply to पण तिचा नवरा जर परवानगी देत by शुचि
हे कुठून आले?
In reply to पण तिचा नवरा जर परवानगी देत by शुचि
पण तिचा नवरा जर परवानगी देत
In reply to खरेच? by प्रियाली
>> एमबीबीएस होऊन तुमची
In reply to >> एमबीबीएस होऊन तुमची by शुचि
माझ्या एका मैत्रिणीची आठवण
In reply to माझ्या एका मैत्रिणीची आठवण by रेवती
या मुलीचं वागणं आवडलं...असंच
In reply to माझ्या एका मैत्रिणीची आठवण by रेवती
रेवती ताई आपल्या मैत्रिनीने
In reply to >>...... असून कायमस्वरुपी by शुचि
एका कळीला फुल होन्याचि संधी
In reply to जास्त कमावणारा नवरा by प्रियाली
पुरुषांना कमी पगाराच्या बायका
In reply to पुरुषांना कमी पगाराच्या बायका by विजुभाऊ
धन्यवाद
In reply to जास्त कमावणारा नवरा by प्रियाली
पुरुषांना कमी पगाराच्या बायका
चित्राताई, तुझी
In reply to चित्राताई, तुझी by मितान
सिनेमाला एकट्याने जाणे
In reply to सिनेमाला एकट्याने जाणे by प्रियाली
बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ
In reply to बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ by नीधप
करेक्ट!
In reply to करेक्ट! by पिवळा डांबिस
>>>>मुंबईकर आणि इतर
In reply to >>>>मुंबईकर आणि इतर by मितान
तशी एकटी बाई खात बसलेली बघुन
In reply to करेक्ट! by पिवळा डांबिस
की मुंबईकर आणि इतर
In reply to बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ by नीधप
सिनेमा, हॉटेलात जाउन खाणं,
In reply to सिनेमा, हॉटेलात जाउन खाणं, by पुष्करिणी
गुड!
In reply to गुड! by पिवळा डांबिस
त्यांना न्याहाळत बसतात हे
In reply to गुड! by पिवळा डांबिस
खरं तर माझा अनुभव असा आहे की
In reply to गुड! by पिवळा डांबिस
शंका
In reply to शंका by पंगा
सहमत आहे
In reply to शंका by पंगा
सहमत आहे
In reply to शंका by पंगा
सूर्य!
In reply to सूर्य! by पिवळा डांबिस
हाहाहा
In reply to हाहाहा by मुक्तसुनीत
तुमच्या उपप्रतिसादाची वाट
In reply to हाहाहा by मुक्तसुनीत
:)
+१
सामाजिक स्वतंत्रता....!!
In reply to सामाजिक स्वतंत्रता....!! by इन्द्र्राज पवार
याला कारण काही अंशी स्त्रीच
In reply to सामाजिक स्वतंत्रता....!! by इन्द्र्राज पवार
याला कारणे अशी असू शकतात की,
उत्तम
लेख आवडला!
In reply to लेख आवडला! by स्वाती२
माझीदेखील केस काहीशी अशीच आहे
In reply to लेख आवडला! by स्वाती२
जिथे तिथे आपल्या मतांची पिंक
In reply to जिथे तिथे आपल्या मतांची पिंक by Pearl
उत्तर
लेख छान आहे. पण असे व्हायला
धन्यवाद
In reply to धन्यवाद by चित्रा
>>>>>शिल्पा ब, म्हणतात स्पेस
लेख अतिशय संतुलित आणि संयमित
चांगला लेख
चांगला लेख व वाचनीय
वरील प्रतिसाद वाचून आणि शुचीच
In reply to वरील प्रतिसाद वाचून आणि शुचीच by शिल्पा ब
उच्चशिक्षण घेऊन घरी का
खरा प्रश्न !