घरकाम/बालसंगोपन व जीडीपी
माझ्या माहितीत अमेरिकेतलं उदाहरण आहे, जिथे आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी आईने वर्षाला सत्तर हजार डॉलरची नोकरी सोडली. तिचं गणित सोपं होतं. मुलांना चाइल्ड केअरमध्ये ठेवायचं तर वर्षाला पंचवीस ते तीस हजार, टॅक्स पंधरा हजाराचा जाणारच, शिवाय गाडी ठेवणं, बाहेर खाणं यात आणखीन खर्च. त्यातून किती हातात राहाणार? एवढी दगदग, जिवाचा आटापिटा करून शेवटी मुलांना आई मिळणार नाहीच. त्यापेक्षा ती घरी राहिली तर जे सुख मिळेल ते हातात पडणाऱ्या दहा पंधरा हजारापेक्षा कितीतरी अधिक असेल.तुम्ही दिलेले उदाहरण अमेरिकेतले आहे. सध्या पुण्यात पाळणाघरासाठी वेटींगलिस्ट आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7239474.cms किंचित अवांतर - कधी कधी सरळ कामाला फाट्यावर मारुन मी दोन चार दिवस भटकत बसतो. किंवा घरी पुस्तकं वाचण्यात वेळ घालवतो. तितक्या प्रमाणात मला उत्पन्न कमी मिळतं, त्यामुळे खर्च कमी होतो. जीडीपी कमी होते. मला वाईट वाटत की मी जीडीपीत भर घालु शकत नाही. पण असे केल्याने मला मिळणारा आनंद तो कसा मोजणार? की असा आनंद मिळवणं या विचारापासुन मानव खूप दूर आला आहे असा मला प्रश्न पडतो.
In reply to विचार शृंखला चांगली मांडली by अवलिया
पण असे केल्याने मला मिळणारा आनंद तो कसा मोजणार? की असा आनंद मिळवणं या विचारापासुन मानव खूप दूर आला आहे असा मला प्रश्न पडतो.हा चांगला मुद्दा आहे. किंबहुना निव्वळ पैशात मोजता येण्याच्या गोष्टी, निव्वळ पैशात मोजत बसल्यामुळे या न मोजता येण्यासारख्या (इन्टॅंजिबल) गोष्टींना पुरेसं महत्त्व मिळत नाही असं माझं प्रांजळ मत आहे. वस्तुंचं/सेवांचं उत्पादन मोजण्याऐवजी एकंदरीत आनंदाची मोजमाप करता आली तर आपण योग्य गोष्ट ऑप्टिमाइझ करू असं वाटतं. आंतरिक आनंद मोजणं कठीण आहे - पण तरीही पैशांप्रमाणेच तुमच्या वेळेची किंमत आहे. त्यातला किती वेळ तुम्ही कशासाठी द्यायला तयार असता यावरून तत्वतः तुम्ही मोजलेली किंमत काढता येईल. निदान तसा प्रयत्न व्हावा असं वाटतं. मग वस्तुंनी गरीब पण सुसंस्कृत, सुशिक्षित व जीवनात रस घेणाऱ्या व्यक्ती, समाज व वस्तुंनी श्रीमंत पण जीवनात रस घ्यायला वेळच नसलेले यांच्यातली कृत्रिम दरी कमी होईल. निव्वळ जास्तीत जास्त पैसा मिळवावा हे मूल्य बदलून पैसा व आनंद जास्तीत जास्त मिळवावा याकडे कल होईल.
'सर्वच गोष्टींचं कमोडिटायझेशन व्हावं' अशा कोत्या अर्थाने घेतील. कमोडिटायझेशन या शब्दाला खरेदी-विक्रीचे संदर्भ आहेत.असं म्हटलं आहे. इथं मला एक गोष्ट नाही लक्षात आली. "मानवी आनंदासाठी जे व्यवहार होतात ते सर्वच अर्थशास्त्राच्या अभ्यासात यावेत" असं म्हणताना अर्थशास्त्रीय दृष्ट्या त्याचं काही तरी मूल्य ठरावं लागेल. ते ठरवायचं म्हटलं की, त्या-त्या सेवेचं मूल्य खरेदी-विक्री अशा स्वरूपातील विनिमय संदर्भाच्या चौकटीतच होणार. एकदा ते झालं की, वस्तूकरणच झाल्यासारखं होतं. तेव्हा या पेचातून बाहेर कसं पडायचं? कारण शास्त्र म्हटलं की काही नियम आले, संदर्भांच्या चौकटी आल्या. त्यावर तो-तो मुद्दा घासून पुसून लखाखून बाहेर आला पाहिजे.
स्त्रीच्या जीवनातल्या प्रश्नांपैकी एक म्हणजे सर्वसाधारण स्त्रीची दखलच न घेण्याच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या यंत्रणांचा कल. अनेक संस्थांमध्ये (धर्मसंस्था, कुटुंबसंस्था वगैरे) हे होतं हे त्या उलगडून दाखवतात. अर्थशास्त्रामध्येदेखील हे होतं.हे काहीच्या काही overestimation आहे. जीडीपी हा देशाच्या अमुक एका कालावधीतील अर्थव्यवस्थेचा एक इंडिकेटर आहे.तो १००% दोषरहित आहे असे अजिबात नाही.अर्थशास्त्राप्रमाणे जीडीपीची व्याख्या आहे: GDP is the market value of all final foods and services produced within a country in a given period of time. या व्याख्येप्रमाणे घरी दिलेल्या सेवा/बनविलेल्या कोणत्याच वस्तूंची मार्केट व्हॅल्यू होत नसल्यामुळे त्या जीडीपीचा भाग बनत नाहीत. समजा मी गाडीसाठी ड्रायव्हर ठेवला तर त्याला दिलेला पगार हा जीडीपीचा भाग बनतो.पण मी स्वत:च गाडी चालवली तर तो जीडीपीचा भाग बनत नाही.गाडी चालवणारे पुरूष आणि स्त्रिया या दोन्ही असतात.तेव्हा केवळ पुरूषांनी स्वत: गाडी चालवली तर ते जीडीपीमध्ये धरावे आणि स्त्रियांनी स्वत: गाडी चालवली तर ते धरू नये असे होत नाही.पंचतारांकित हॉटेलांमध्ये शेफ हे अनेक वेळा पुरूष असतात.त्यांनी हॉटेलात बनवून विकलेले अन्नपदार्थ जीडीपीचा भाग बनतात पण त्यांनी घरीच काही अन्नपदार्थ समजा बनविले तरी ते जीडीपीचा भाग बनत नाहीत.असे अनंत गोष्टींविषयी लिहिता येईल.इथे स्त्री-पुरूष असल्याचा काही संबंध नाही.
In reply to स्त्री-पुरूष असल्याचा काही संबंध नाही by क्लिंटन
In reply to वेल... by श्रावण मोडक
In reply to आपले म्हणणे योग्य आहे by क्लिंटन
जीडीपीमधील त्रुटींमुळे खरोखरचे जीडीपी कागदावरील अंदाजापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे जीडीपी हे conservative estimate आहे.हे वास्तव असल्याने सारे काही जीडीपीवर आधारलेले नसावे असे म्हटले जाते. जीडीपीत नसलेल्या, कागदावरही आणि वास्तवातही, अनेक गोष्टींचं मूल्यच ठरत नसल्याने तो जीडीपीचा आकडा गडबडीचा ठरतो आणि त्यातून मग पुढे त्याच आकड्यावर आधारून ठरलेल्या धोरणांत गडबड होत असते. रादर, 'विकासविरोधकां'चा हा एक मुद्दा नेहमी असतोच. जीडीपीवर आधारित धोरणांमुळेच विनाश वाढतो आहे, असे ते म्हणतात ते याच हिशेबात. अर्थात, ही एक बाजू आहे. तुम्ही म्हणता तसे,
तेव्हा कागदावरील आकडे समजा कमी दिसत असले तरीही प्रत्यक्षात त्यामुळे होणारा त्रास थोडासा का होईना कमी असतो.हीही एक बाजू आहेच.
In reply to बरोबर आहे देवा by श्रावण मोडक
विकासविरोधकां'चा हा एक मुद्दा नेहमी असतोच. जीडीपीवर आधारित धोरणांमुळेच विनाश वाढतो आहे, असे ते म्हणतात ते याच हिशेबात.जीडीपी हा पूर्णपणे दोषरहित इंडिकेटर नाही हे मी वर म्हटले आहेच.अशा विकासविरोधकांना माझा उलटा प्रश्न आहे की जीडीपीपेक्षा अधिक दोषरहित (समजा १००% दोषरहित नसला तरी) आणि मोजता येण्याजोगा अजून एखादा इंडिकेटर त्यांनी द्यावा आणि मग विनाश कमी कसा करता येईल हे बघता येईल.
अनेक गोष्टींचं मूल्यच ठरत नसल्याने तो जीडीपीचा आकडा गडबडीचा ठरतोहो नक्कीच पण एक ट्रेंडतर त्या आकड्यामुळे समजतोच ना?दुसरे उदाहरण घ्यायचे झाले तर दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणना केली जाते त्यात देशात नक्की किती लोक आहेत हे शेवटच्या माणसापर्यंत मोजता येतच नाही.तरीही जनगणनेमुळे एक ट्रेंडतर समजतोच ना?तसेच काहीसे जीडीपीविषयी.आता या जीडीपीच्या आकड्यावर किती विसंबून राहायचे हा त्या त्या देशातील अर्थमंत्र्यांचा प्रश्न झाला पण निदान त्या आकड्यावरून एक दिशा कळते आणि वर म्हटल्याप्रमाणे ते एक conservative estimate असते.कोणत्याही प्रकारच्या धोरणात्मक निर्णयात conservative estimate असणे हे overestimate असण्यापेक्षा चांगले.
In reply to आपले म्हणणे योग्य आहे by क्लिंटन
समाधानाची मोजदाद करता येणार नाही ही अडचण आहेचआंबा खाऊन कोणाला किती समाधान होतं याची तुलना करता येत नाही, तरीही आंब्याचा बाजारभाव ठरतोच की.
असे करून नक्की उपयोग काय?उपयोग नाही कसा? इकॉनॉमिक एफिशियन्सी वाढवण्यासाठी नक्की काय वाढवायचं हे अचूकपणे मोजता आलं पाहिजे. मी दिलेल्या उदाहरणात १०० रुपयांचं आउटपुट वाढलं तरी ते कागदोपत्री १४५ (किंवा २०० देखील असेल...) रुपयांनी वाढल्याचं दिसलं तर एफिशियन्सीचं मोजमाप चुकणार नाही का? समाज कुठच्या दिशेला जावा हे या आकड्यांवरून ठरतं. अचूक मोजमाप कठीण आहे म्हणून ती वाऱ्यावर सोडून देणं याला मी वैचारिक आळस म्हणतो. भारताला विकसनशील म्हणतात, पण अमेरिका विकसित हा निष्कर्ष व त्याबरोबर येणारं गुण-मूल्यमापन (व्हॅल्यू जजमेंट) ही अशा चुकीच्या आकड्यांतूनच येते. स्त्रीला तिच्या कष्टाचं चीज शून्य असं छातीठोकपणे या चुकीच्या आकड्यांतूनच अप्रत्यक्षपणे सांगितलं जातं. फायदे बरेच आहेत.
In reply to असं कसं? by राजेश घासकडवी
आंबा खाऊन कोणाला किती समाधान होतं याची तुलना करता येत नाही, तरीही आंब्याचा बाजारभाव ठरतोच की.आपले म्हणणे रास्त आहे पण आंब्याच्या (किंवा इतर कोणतीही वस्तू विकायच्या) व्यवहारात आणि आई घरी असल्यामुळे मला मिळालेल्या मानसिक समाधानात नक्की साम्य/फरक काय? आंबा खाऊन आपल्याला मिळेल ते समाधान आणि त्यासाठी पैसे मोजून आपल्याला होणारा त्रास ज्या किंमतीला एकत्र येतील ती आंब्याची बाजारातील किंमत ठरते.समजा ती किंमत २५ रूपये मानू.समजा मला आंबा खाऊन होणारे समाधान २५ रूपयांपेक्षा कमी असेल तर मी आंबा विकत घेणार नाही पण ते २५ रूपयांपेक्षा जास्त असेल तर मी आंबा विकत घेईन.आता वळू या घरकाम करणाऱ्या स्त्रीकडे. कुटुंबाकडे दोन पर्याय आहेत: घरातल्या स्त्रीने काम करावे किंवा बाई ठेवावी.आता बाई ठेवली तर तिचा व्यवस्थितपणा,टापटीप,चव,वेळ या सगळ्या गोष्टी घरच्या स्त्रीपेक्षा कमी असतील असे मानू.त्यामुळे घरकाम करणाऱ्या स्त्रीने काम केल्यास सगळ्या कुटुंबाला ’क्ष’ इतके समाधान मिळत असेल तर त्यापेक्षा कमी समाधान बाईने काम केल्यामुळे मिळेल.(समजा ते ०.५ क्ष आहे असे मानू). तसेच बाई ठेवल्यामुळे घरच्या स्त्रीचे कष्ट आणि वेळ वाचल्यामुळे मिळणारे समाधान समजा ’य’ मानू. तेव्हा एकूण समाधान झाले ०.५ क्ष + य. त्याचबरोबर बाईला पगार द्यावा लागल्यामुळे खिशाला पडलेला त्रास समजा ’अ’ असेल. ’अ’ ही गोष्ट एकूण मिळकत आणि बाई किती पगार मागते यावर अवलंबून असेल. जिथेजिथे ०.५ क्ष + य > अ असेल तिथेतिथे घरची स्त्री घरकाम करण्याऐवजी बाई ठेवेल. यात ०.५, क्ष, य आणि अ हे सगळे आकडे कुटुंबपरत्वे बदलतील.समजा घरची स्त्री पण नोकरी करणारी असेल तर घराच्या मिळकतीत घरच्या स्त्रीचा पगार धरला जाईल आणि त्याप्रमाणे ’अ’ ची किंमत बदलेल.म्हणून ते वेगळे consider करत नाही. घरी बाई ठेवली की तिचा पगार जीडीपीमध्ये येईल आणि आंब्याच्या भावाच्या मेकॅनिझमप्रमाणेच बाईचा पगार ठरेल. पण समजा ०५ क्ष + य अ असेल तर बाई ठेवली न जाता घरची स्त्री घरचे काम करेल आणि ते जीडीपीमध्ये येणार नाही.याचे कारण ०.५ क्ष + य ची किंमत ’अ’ पेक्षा कमी पण नक्की किती कमी?म्हणजेच मोजमाप करायला अडचण येईल.
समाज कुठच्या दिशेला जावा हे या आकड्यांवरून ठरतं.प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय घेताना जीडीपीच्या आकड्यांवर किती विसंबून राहतात याची नक्की माहिती तशाप्रकारचे निर्णय घेणारेच लोक देऊ शकतील.म्हणजे जीडीपी वाढीचा आकडा समजा ८% असला तर तोच प्रमाण मानून सगळे निर्णय घ्यायचे की त्यात करेक्शन करायची आणि किती प्रमाणात करेक्शन करायची हे असे निर्णय घेणाऱ्यांनाच माहित असेल.तेव्हा जीडीपीतील त्रुटींमुळे सगळे निर्णय उलटेपालटे होतील असे मला तरी वाटत नाही.त्यातही जीडीपी हे conservative estimate असल्यामुळे त्यावर अवलंबून राहिले तरी प्रत्यक्षातला परिणाम त्यापेक्षा थोडा का होईना चांगला असेल.
अचूक मोजमाप कठीण आहे म्हणून ती वाऱ्यावर सोडून देणं याला मी वैचारिक आळस म्हणतो.नाही हो.फायनान्स आणि अकाऊंटिंगमध्ये असे चालते.एक उदाहरण म्हणजे एखाद्या उद्योगाने एखादी इमारत १० वर्षांपूर्वी घेतली आहे.आज जागांचे भाव वाढल्यामुळे त्या इमारतीचा भाव नक्कीच जास्त असेल.पण बॅलन्स शीटमध्ये इमारत १० वर्षांपूर्वी घेतलेली किंमत वजा घसारा असेच दाखवतात.कारण त्या इमारतीची मार्केट किंमत ती विकायला गेल्याशिवाय कळणार नाही आणि मार्केट व्हॅल्यू लिहायची झाली तर भरपूर subjectivity येईल.तेव्हा objectivity आणि correct value यात रस्सीखेच आहे.त्यात अकाऊंटिंगप्रमाणे objectivity ला अधिक महत्व देतात.एखाद्या उद्योगाकडे भरपूर जमिन, इमारती असतील तर आपली परिस्थिती बॅलन्स शीटवरून वाटते त्यापेक्षा जास्त चांगली आहे याची कल्पना तो उद्योग सांभाळणाऱ्यांना असतेच.तसेच काहीसे जीडीपीविषयी. दुसरे म्हणजे अचूक मोजमाप करायला गेले तर त्यातून पडणारी माहितीत भर आणि त्यासाठी खर्च करावा लागणारे पैसा, श्रम आणि वेळ याचे प्रमाण अनुकूल नसेल तर अचूक मोजमाप करायला न जाता approximations किंवा काही ठोकताळ्यांवरून corrections करतातच ना?तुम्ही शास्त्रज्ञ आहात त्यामुळे तुम्ही सुध्दा कधीनाकधी हे केले असेलच.आता तो पण वैचारिक आळस झाला का?इथे फरक इतकाच की असे correction मूळ जीडीपीच्या आकड्यात नाही तर त्यावरून घेतलेल्या निर्णयांमध्ये करत असावेत (असे मला वाटते).तसाही नुसता जीडीपीचा आकडा by itself काही महत्वाचा नाही.तो आकडा अनेक धोरणात्मक निर्णयांसाठी इनपुट म्हणून वापरतात तेव्हा ते निर्णय घेताना योग्य ती काळजी घेतली की झाले.
स्त्रीला तिच्या कष्टाचं चीज शून्य असं छातीठोकपणे या चुकीच्या आकड्यांतूनच अप्रत्यक्षपणे सांगितलं जातं.तुम्ही केवळ स्त्रीच्या कष्टाला किंमत नाही असे म्हटले जाते असे का म्हणता?घरी स्वत: केलेल्या कोणत्याही गोष्टीचा समावेश जीडीपीत नसतो मग ती स्त्री ने केलेली असो की पुरूषाने. आणि असा समावेश का नाही याचे कारण वर दिलेच आहे.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
आंबा खाऊन आपल्याला मिळेल ते समाधान आणि त्यासाठी पैसे मोजून आपल्याला होणारा त्रास ज्या किंमतीला एकत्र येतील ती आंब्याची बाजारातील किंमत ठरते.बाजारातील किंमत या अर्थाने ही शंका आहे. आंब्याची मागणी आणि पुरवठा यातील दरी वाढते तसा आंब्याचा भाव वाढत जातो. या वाढीला केवळ पुरवठा कमी हेच कारण असते? की, त्या तशा परिस्थितीत आंबा खाऊन मिळणाऱ्या समाधानाचे मूल्यही (जे इथे या मुद्यापुरते क्ष असे असते असे मानूया) वाढलेले असते? आणि असे समाधानाचे मूल्य खरोखरच वाढलेले असते का? की ते टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील त्या दीड-पावणेदोन लाख कोटी रुपयांसारखे मानायचे? इथे आंब्याचा बाजारभाव नेमका त्या दोन फॅक्टरवरच ठरतो हे एक गृहीतक आहे. पण आंब्याबाबत जे घडते ते साऱ्याच शेतमालाबाबत भारतात घडते असे मानता येत नाही, असे मला वाटते. मग अशावेळी जीडीपीचा घोळ होत असावा ना (म्हणजेच जीडीपीचा आकडा चुकत असावा ना)?
In reply to प्रश्न by श्रावण मोडक
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to वैचारिक आळस by क्लिंटन
शास्त्रात करतात ते correction आणि approximation पण अर्थशास्त्रात करतात तो ’वैचारिक आळस’ असे कसे असेल?यात अर्थशास्त्रशाखेला कमी लेखण्याचा उद्देश नव्हता. कोणे एके काळी कदाचित ते ठीकठाक अॅप्रॉक्झिमेशन असेलही . पण हे अॅप्रॉक्झिमेशन आहे, असं कुठे म्हटल्याचं मला दिसलेलं नाही. जर डोळसपणे ते केलेलं असेल तर एव्हाना एखादा संदर्भ आला असता. वैचारिक आळस हा तसा सौम्य शब्द आहे, तेव्हा तो तितका मनाला लावून घेऊ नका. कट्टर स्त्री-मुक्तीवादी याला 'पुरुषप्रधान यंत्रणांचा स्त्रीचं नगण्यीकरण करण्यासाठीचा कट' असंही म्हणतील. मी तसं मानत नाही. :) तुम्ही वर क्ष, य व अ मांडून निर्णयप्रक्रिया अगदी अचूक मांडली आहे. तक्रार अशी आहे की क्ष व य च्या किमती सहजी मोजता येत नसल्यामुळे त्या जवळपास शून्य, नगण्य मानल्या जातात. खरं तर त्या दोन्ही अ च्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या आहेत. किंबहुना त्या स्त्रीचा वेळ मोकळा झाल्याने तिला तो अ पेक्षा अधिक किमतीची नोकरी करण्यासाठी वापरता येतो (य >> अ) हे आताचं सत्य आहे. दोनशे वर्षांपूर्वी ते नव्हतं. त्यामुळे दोनशे वर्षांपूर्वीचीच अॅप्रॉक्झिमेशन वापरू नयेत इतकंच म्हणतो. प्रकाशाच्या वेगाच्या जवळपासच्या वेगाने जाणाऱ्या वस्तुंसाठी सापेक्षतावादाऐवजी कोणी न्यूटनचेच नियम वापरायचे ठरवले तर तो वैचारिक आळसच ठरेल. अॅडम स्मिथ म्हणतो "The value of any commodity … is equal to the quantity of labour which it enables him to purchase or command. Labour, therefore, is the real measure of the exchangeable value of all commodities." घरकामात 'लेबर' शून्य असतं का? जवळपास निम्म्या लेबर फोर्सचे दिवसाला सुमारे ४ ते ५ तास किमान त्यात जात नाहीत का? मग ते नगण्य का म्हणावं?
In reply to अॅप्रॉक्झिमेशन by राजेश घासकडवी
तुम्ही वर क्ष, य व अ मांडून निर्णयप्रक्रिया अगदी अचूक मांडली आहे. तक्रार अशी आहे की क्ष व य च्या किमती सहजी मोजता येत नसल्यामुळे त्या जवळपास शून्य, नगण्य मानल्या जातात. खरं तर त्या दोन्ही अ च्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या आहेतनोकरीला जाणाऱ्या स्त्रिया घरी कामाला बाई ठेवतात याची किती उदाहरणे दाखवू तुम्हाला?असे निर्णय घेताना क्ष,य,अ च्या किंमती काढायला कोणी जात नसले तरी unknowingly त्याचा कुठेतरी विचार केला जात नाही का? मेकॅनिक्समध्येही मुळातले समीकरण सोडविताना एकदम ideal गृहितके घेऊनच सुरवात करतात ना?म्हणजे घर्षण शून्य वगैरे.तेव्हा घर्षण शून्य हे गृहित धरून त्यावर निर्णय घेतले तर ते चुकणारच.त्यातही गुळगुळीत पृष्ठभागावर घर्षण अगदी शून्य नसले तरी बरेच कमी असते पण हेच गृहितक खरखरीत पृष्ठभागावर वापरले आणि त्यावरून निर्णय घेतले तर ते चुकणारच की.नेमका हाच प्रकार क्ष,य च्या किंमती शून्य धरून होईल.ही error of judgment झाली त्यामुळे मूळ अर्थशास्त्र खोटे ठरत नाही. तुम्ही अॅडम स्मिथचे उदाहरण दिले हे योग्यच आहे.पण अॅडम स्मिथ झाला जवळपास २५० वर्षांपूर्वीचा.त्यानंतर अर्थशास्त्राच्या विचारांत बरेच बदल झाले आहेत.भौतिकशास्त्रात जो प्रवास गॅलिलिओ ते आईन्स्टाईन झाला तसाच काहीसा अर्थशास्त्रातही झाला. तेव्हा या सगळ्या रामायणाचा उद्देश म्हणजे: जीडीपीमध्ये घरकामामुळे किंवा इतर गोष्टींमुळे नक्की किती भर पडते हे घरोघरी जाऊन मोजणे शक्य नसल्यामुळे ते करत नाहीत.तरीही वर दिलेल्या आकड्यांप्रमाणे कोणत्यातरी (मला माहित नसलेल्या) ठोकताळ्याच्या आधारे त्याचा अंदाज घेता येतो आणि त्याचा निर्णयप्रक्रियेतही समावेश करता येऊ शकतो/होतो.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to गणित by राजेश घासकडवी
In reply to स्त्री-पुरूष असल्याचा काही संबंध नाही by क्लिंटन
या व्याख्येप्रमाणे घरी दिलेल्या सेवा/बनविलेल्या कोणत्याच वस्तूंची मार्केट व्हॅल्यू होत नसल्यामुळे त्या जीडीपीचा भाग बनत नाहीत.हे पटत नाही. मला साहचर्य कमोडिटाइज करायचं नाही. करता येईल की नाही, खात्री नाही. पण अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून लग्न हा एक प्रकारचा करार आहे - बार्टरचा. बायको स्वयंपाक करत नाही हे कारण काही समाजांत घटस्फोटासाठी पुरेसं होतं असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल का? जर पारंपारिक (नवरा नोकरी करणार, बायको घरचं बघणार) कुटुंबात बायको मेली तर पतीला दुःख होईल वगैरे ठीकच आहे. पण त्याला त्याची पूर्वीची जीवनपद्धती कायम ठेवण्यासाठी किमानपक्षी पैसे मोजून स्वयंपाक बनवून घेण्यासाठी सोय करून घ्यावी लागेलच ना? निदान या खर्चाची तरी मोजदाद व्हावी असं माझं म्हणणं आहे. नोकरी करून पैसे मिळवणाऱ्या नवऱ्याच्या पगाराची जीडीपीमध्ये मोजदाद होते. स्त्रीच्या घरकामाची मोजदाद नाही. ही त्रुटी आहे. व ती सर्वसाधारण स्त्रियांवर अन्याय्य आहे. इतकंच नव्हे तर दोघे नोकरी करून घरकाम आउटसोर्स करणाऱ्या समाजात 'उत्पादन' अधिक आहे असं भासवणारं माप आहे.
In reply to पटत नाही... by राजेश घासकडवी
असं म्हणताना अर्थशास्त्रीय दृष्ट्या त्याचं काही तरी मूल्य ठरावं लागेल.हा कळीचा मुद्दा आहे. कमोडिटायझेशन या शब्दाला खूपच नकारात्मक छटा आहेत. प्रत्येक आंतरिक अनुभवाची खरेदी विक्री करता येणार नाही इतकंच म्हणायचं होतं. पण बाजारात ज्या सेवा उपलब्ध आहेत त्या गृहिणीने केल्या तर त्यांची मोजदादच होत नाही हे अन्याय्यही वाटतं. म्हणून मी घरकामाचं उदाहरण घेतलेलं आहे. पैसे देऊन ते करवून घेतलं तर नोंद होणार, जर ते घरच्या घरीच केलं तर नोंद नाही - हा मला वैचारिक आळस वाटतो. एखाद्या गोष्टीचं मूल्य हे तीशिवाय राहाण्यासाठी सर्वसामान्य मनुष्य काय स्वीकारतो यावरून (डिमांड) ठरवता यावं. तसंच तिचा पुरवठा पर्यायी मार्गांनी करण्यासाठी किती खर्च येतो यावरूनही (सप्लाय) ठरवता यावं. मला वाटतं कमोडिटायझेशनचा धोका टाळूनही काही गोष्टींच्या (घरकाम, घरातलं व्यवस्थापन, मुलांचा सांभाळ करण्यासाठीचे किमान कष्ट वगैरे) किमती ठरवता याव्यात. कारण सरासरी गृहिणी एका विशिष्ट मर्यादेपलिकडे वेतन मिळालं तर या गोष्टी आउटसोर्स करायला तयार होईल, होताना दिसते असं मला वाटतं. हे गणित सोपं नाही. पण जिवाची किंमत सरकार, समाज कॅल्क्युलेट करताना दिसतात. अपघातात हात गेला तर अमुक नुकसानभरपाई याचा अर्थ प्रत्येक जण हात विकायला तयार होतो असं नाही. पण म्हणून हाताची किंमत शून्यच असं म्हटलं तर कसं चालेल? तसंच हेही.
In reply to कमोडिटायझेशन by राजेश घासकडवी
मला वाटतं कमोडिटायझेशनचा धोका टाळूनही काही गोष्टींच्या (घरकाम, घरातलं व्यवस्थापन, मुलांचा सांभाळ करण्यासाठीचे किमान कष्ट वगैरे) किमती ठरवता याव्यात.सहमत, पण जीडीपीची आत्ता असलेली निरुंद व्याख्या बदलल्याशिवाय ते शक्य नाही. आत्ताची, वर क्लिंटन यांनी मांडलेली व्याख्या GDP is the market value of all final foods and services produced within a country in a given period of time अशी आहे. यात मार्केट व्हॅल्यू हा शब्द आला आहे. एक तर ही व्याख्या बदलून तिला मानवी समाधानाची संदर्भचौकट बहाल करणे किंवा मग जीडीपीच्या आधारे सामर्थ्य किंवा विकास मोजण्याची पद्धत बंद करणे हाच मार्ग राहतो. अवांतर, डोक्यातला एक लोळ - जीडीपी मोठी असूनही एखाद्या समुदायात गरीब-श्रीमंत ही दरी मोठी असेल, विषमता असेल आणि त्यामुळे असमाधान असेल तर त्या समुदायापुढचे प्रश्न जटील आणि धोक्याच्या सीमेवर कोणत्याही क्षणी जाऊन पोचणारे असू शकतात. ते प्रश्न तसे जातात कारण अनेकदा या विषमतेपोटीच तो समुदाय स्थिर असत नाही. तसे असेल त्याचा अर्थ जीडीपी मोठी असूनही सामर्थ्य किंवा विकास नाही असा अर्थ घ्यावा लागेल. पण पंचाईत अशी की सामर्थ्य किंवा विकास या दोन्ही गोष्टी त्या मार्केटच्या स्थैर्यावरच बहुदा आधारलेल्या असाव्यात आणि मार्केटचे स्थैर्य बहुदा केवळ समाज स्थिर असेल तरच मार्केट स्थिर असू शकते अशा काही तरी गृहीतकावर आधारलेले असावे. आणि इथेच कोंबडी आधी की अंडे आधी अशी स्थिती येते. एकूण हा झोल आहे मोठा... पुन्हा सालं भारतासारख्या देशात फुडची फायनल मार्केट व्हॅल्यू कशी काढतात कोण जाणे? कांद्याची आजची मार्केट व्हॅल्यू आणि पाच महिन्यांपूर्वीची मार्केट व्हॅल्यू आणि ती मार्केट व्हॅल्यू जनरेट होण्यासाठी त्या शेतकऱ्याने केलेल्या खर्चाची व्हॅल्यू, त्यात त्याच्या सबसिड्या वगैरे... अवघडच आहे.
In reply to सहमत by श्रावण मोडक
भारतासारख्या देशात फुडची फायनल मार्केट व्हॅल्यू कशी काढतात कोण जाणे?फायनल मार्केट व्हॅल्यू ही महत्वाची संकल्पना आहे.समजा गव्हाचे पीठ विकणाऱ्या कंपनीने दलालाकरवी शेतकऱ्याकडून गहू विकत घेतले आणि त्याचे पीठ करून विकले.पुढे तेच पीठ एखाद्या हॉटेलने विकत घेतले आणि त्या पीठाच्या रोट्या करून विकल्या असे समजू.इथे एकूण किती उलाढाली झाल्या?एकूण चार.त्या अशा १. शेतकऱ्याने कोणा दलालाला गहू विकले. (समजा १० रूपये किलो) २. दलालाने ते पीठ करणाऱ्या कंपनीला विकले. (समजा ३० रूपये किलो) ३. पीठ कंपनीने गव्हाचे पीठ करून ते हॉटेलला विकले. (समजा ७० रूपये किलो) ४. हॉटेलने त्या पीठाच्या रोट्या करून त्या विकल्या. (समजा १२० रूपये किलो) यातील प्रत्येक पायरीवर मुळातल्या गव्हाची किंमत आहेच.तसेच गव्हाच्या पीठाची किंमत ३ आणि ४ या पायऱ्यांमध्ये आहे. तेव्हा या पायऱ्या वेगवेगळ्या धरल्या तर मुळातील गव्हाची किंमत चार वेळा तर पीठाची किंमत दोन वेळा मोजली जाईल.हे टाळण्यासाठी फायनल व्हॅल्यू बघतात. म्हणजेच जीडीपीमध्ये भर या चार उलाढालींनंतर १२० रूपयांची पडली.हे शेवटच्या end product ची किंमत बघून किंवा प्रत्येक पायरीत किती value addition झाली (पायरी १ मध्ये १०, पायरी २ मध्ये २०, पायरी ३ मध्ये ४० आणि पायरी ४ मध्ये ५०) ते बघून सगळ्याची बेरीज म्हणजे जीडीपीमध्ये पडलेली भर असते. समजा या वर्षी गहू पहिल्या पायरीत १० रूपये आणि पुढच्या वर्षी १२ रूपये असेल आणि प्रत्येक पायरीत २०% ने भाववाढ झाली तर?म्हणजे सगळ्या पायऱ्यांमध्ये किंमत वाढली पण end product एक किलो गव्हाच्या रोट्या यात काही बदल झाला का?तर असा काही बदल झाला नाही.तेव्हा पुढील वर्षीचे जीडीपी १२० गुणिले १.२ = १४४ रूपये असे धरले तर जीडीपी वाढल्याचा खोटा आभास उभा राहतो.ते होऊ नये म्हणून १४४ या किंमतीला वर्ष १ ते वर्ष २ या काळातील महागाईच्या दर अधिक १ ने भागतात.तो दर समजा २०% असेल तर जीडीपी परत १४४ भागिले १.२ = परत १२० रूपये असेल. (यात इतर काही complications आहेत पण ढोबळ मानाने अशाप्रकारे जीडीपी काढतात). आता महागाईचा दर हा ठराविक वस्तूंच्या बास्केटच्या किंमतीत किती वाढ झाली यावर ठरतो.या बास्केटमध्ये अनेक वस्तू असतात.आणि महागाईचा दर हा एकूण बास्केटमधील वस्तूंच्या individual महागाईच्या दराची weighted सरासरी असतो.म्हणजे महागाईचा दर समजा १५% असेल तर प्रत्येक वस्तू १५% ने वाढली असे नक्कीच होत नाही.वरील उदाहरणातील गहू समजा २०% ने वाढले असले तरी महागाईचा दर १५% म्हणून १.१५ ने भागले जाईल आणि अर्थातच जीडीपीत भर १४४ भागिले १.१५ म्हणजे १२० पेक्षा जास्तने पडेल.ही जीडीपीमध्ये असलेली आणखी एक त्रुटी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या अब्जावधी वस्तू आणि सेवा यांचा अंतर्भाव जीडीपीमध्ये होतो.त्यातील प्रत्येक वस्तू/सेवा देशातील ६ लाख खेडी आणि काही शे शहरे यात किती किंमतीला विकली गेली, किती प्रमाणात विकली गेली याचा विदा घेऊन नक्की जीडीपी किती हे काढता येईल.पण त्यासाठी वेळ आणि श्रम वाजवीपेक्षा जास्त जातील म्हणून असे करायच्या भानगडीत कोणी पडत नाही.
In reply to क्लिंग्टन आणि श्रामो by विजुभाऊ
समजा घरकाम करुनझालेले काम अथवा स्वतःसाठे केलेले काम हे जीडीपी मध्ये मिळवून काय साधणार.घरकाम स्त्रीने केलंच पाहिजे हा जो काही साधारण दृष्टीकोन दिसतो किंवा "पाळणा-गाडीत रेडि-टू-कुक मध्ये एक पाकिट दाल-तडका चं देखील आहे, याची अजिबात लाज, खंत, शरम चेहर्यावर दिसणार नाही, उलट माज दिसेल." अशासारखी वाक्य काय दर्शवतात? एवढंच की शेतातून आलेले पदार्थ विकत आणून त्यांची फर्मास पाकृ बनवणे हे स्त्रीचं भूषण आहे. निसर्गाने स्त्रीवर फारतर मुलांना जन्म देणे आणि अर्भकांचं पोषण करणे याच जबाबदार्या टाकल्या आहेत. अर्भकं आणि बालकांचं पालन करणे ही जबाबदारीसुद्धा सध्याच्या समाजात बहुतांशी स्त्रीवरच ढकलली जाते. जबाबदारी घरातल्या एका (प्रौढ) व्यक्तीवर टाकण्यात काहीच गैर नाही, पण या व्यक्तीच्या कष्टाची आणि श्रमाची योग्य किंमत न करणे किंवा त्याचा योग्य मोबदला न देणे हे अन्यायकारक आहे. सध्याची जीडीपीच्या व्याख्या अपुरी असेल किंवा नवीन संकल्पना जन्माला आणून त्यात या श्रमांचं, कष्टांचं मोजमाप योग्य रितीने झाल्यास बहुतांश स्त्रियांचं सबलीकरण होण्यास मदत होईल. आदिवासी समाजात (माझा या विषयाचा फार अभ्यास नाही, पण अभ्यासपूर्ण 'ब्र' कादंबरीवरूनदेखील कल्पना येईल की) नवर्याकडून पुरेशी 'श्रीमंती' मिळत नसेल, दुसरा पुरूष जास्त खायला घालणार असेल, किंवा इतर काही, तर आदिवासी स्त्रिया काडीमोड घेतात. त्यांच्याकडे तो अधिकार आहे. लेखाच्या सीमेच्या बाहेरचा थोडा विचार जो या पुस्तकातूनच आला आहे: या सर्व जबाबदार्या स्त्रीच्याच आहेत असं वर्षानुवर्षे स्त्रीला शिकवलं आहे. आपण थोडं काही वेगळं करू शकतो, या जबाबदार्या घरातला पुरूष, मग तो बाप, भाऊ, नवरा कोणीही असेल, घेऊ शकतो हे सुद्धा स्त्रियांना समजतंच असं नाही. आणि मग 'स्त्री हीच स्त्रीची वैरी असते' असली टाळ्याखाऊ वाक्य येतात. स्त्रियांची जबाबदारी घर सांभाळण्याची आहे, आणि पुरूषांची पैसे कमावण्याची असं मान्य केलं तर नोकरी, व्यवसाय करणार्या स्त्रिया डबल रोल करत आहेत. सुस्थितीत असलेल्या घरांमधे हा डबल रोल करणं तसं नवीनच आहे, साधारण दोनशे वर्ष, म्हणजे आठ ते नऊ पिढ्या? (आपल्याकडे कदाचित २-३ पिढ्याच!) बदलासाठी कदाचित पुरेसा वेळही मिळालेला नाही. हे पुस्तक अर्ध वाचून झालं आहे आणि त्याबद्दल लिहीण्याचा विचार होता. पण राजेशने आधीच लिहील्याबद्दल त्याचे आभार.
In reply to चर्चाविषय आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
सध्याची जीडीपीच्या व्याख्या अपुरी असेल किंवा नवीन संकल्पना जन्माला आणून त्यात या श्रमांचं, कष्टांचं मोजमाप योग्य रितीने झाल्यास बहुतांश स्त्रियांचं सबलीकरण होण्यास मदत होईलअदिती तुझ्या लेखातील इतर सगळी मते मान्य.पण जीडीपी तसे मोजून स्त्रियांचे सबलीकरण कसे होईल हे कळले नाही. जीडीपीमध्ये फारतर विविध क्षेत्रांचा (शेती, खाणकाम,आय.टी इत्यादी) वाटा किती याची मोजदाद करतात.पण त्यात स्त्रियांचा वाटा किती/पुरूषांचा किती याची मोजदाद कशी करणार?याचे कारण जीडीपीचा बराचसा वाटा हा कॉर्पोरेट्सचा असतो-- त्यांना स्त्री धरणार की पुरूष? स्त्रियांचे सबलीकरण करावे असा तुझा मुद्दा असेल तर त्यात अमान्य करण्यासारखे मला तरी काही वाटत नाही.पण जीडीपी असे मोजण्यापेक्षा इतर अनेक चांगले आणि अधिक योग्य मार्ग नक्कीच असतील.
In reply to कसे काय? by क्लिंटन
In reply to कसे काय? by क्लिंटन
In reply to कसे काय? by क्लिंटन
In reply to क्लिंटन, मला असं वाटतं आहे की by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मांजराच्या घरात घंटा बांधणार कोण आणि कशी? by क्लिंटन
In reply to चर्चाविषय आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अच्छा !! by सुहास..
टिंब टिंब मध्ये दम असावा लागतो.आता लक्षात आलं तुम्ही तुमच्या आयडीमध्ये टिंब टिंब बाहेर काढून दाखवता ते. (शक्ति)प्रदर्शनाचा भाग असावा. राजेश माझ्या खरडवहीत/लेखांवर अर्वाच्य भाषा वापरून दांडगाई करत येणार्यांना सक्त मनाई आहे. अपमान करण्यात येईल !!
In reply to अच्छा !! by सुहास..
अन्यथा.......(पुढे सांगायची गरज नाही, मोडक तर भेटतीलच ग दोन एक दिवसात, आन नाय भेटले तर मी आहेच की !)म्हणजे काय? का उखडताय? आपण जाहीर लिहितो तेव्हा त्यावर टीका-टिप्पणी होणार. टीका-टिप्पणी झेलता येत नसेल तर जाहीर लिहूच नये. तुम्ही जे लिहिले आहे ते तुमचे मत आहे, असे म्हटले असते, पण इथं "अन्यथा......." आणि पुढे 'भेट' व ती 'न झाली तर' असे उल्लेख असल्याने भलते अर्थ निर्माण होतात म्हणून हे विचारलं आहे.
In reply to का by श्रावण मोडक
In reply to चर्चाविषय आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
"पाळणा-गाडीत रेडि-टू-कुक मध्ये एक पाकिट दाल-तडका चं देखील आहे, याची अजिबात लाज, खंत, शरम चेहर्यावर दिसणार नाही*, उलट माज दिसेल**." अशासारखी वाक्य काय दर्शवतात?मी सांगू, मी सांगू? काय दर्शवतात ते? अनेक शक्यता डोळ्यांसमोर येतात. - अशी वाक्ये फेकणार्याला स्वतः होऊन घरात काहीही करावे लागलेले नाही. (बहुधा सर्व आयते मिळालेले आहे.) - अशी वाक्ये फेकू शकणार्याच्या आईने बहुधा आयुष्यात कधीही नोकरी केलेली नसावी (गृहिणी असावी***), आणि म्हणून समस्त स्त्रीजातीकडून त्याच्या तशाच (अवास्तव) अपेक्षा आहेत. - अशी वाक्ये फेकणारा पुराणमतवादी (आणि बहुधा जुन्या पिढीतला****) आहे. - अशी वाक्ये फेकणारा महामूर्ख आहे. *****, ****** ठीक आहे. असतात जगात महामूर्ख. पण त्यांच्याकडे कितपत लक्ष द्यायचे, त्याचा आपल्याच डोक्याला कितपत त्रास करून घ्यायचा, हा प्रश्न आहे. (थोडक्यात, याचा संबंध जीडीपीशी का जोडा?) बाकी चालू द्या. ================================================================== * शंका: यात लाज वाटण्यासारखे नेमके काय असते? ** सौंदर्याप्रमाणेच माज हाही पाहणार्याच्या दृष्टीत असावा का? *** म्हणजे गृहिणी असण्यात काही गैर आहे असे म्हणण्याचा उद्देश नाही. पण त्याचे असेही साइडइफेक्ट्स होऊ शकतात कधीकधी. **** जुन्या पिढीतील सर्वच लोकांचे विचार असेच असतात असे म्हणण्याचा मुळीच उद्देश नाही. ***** या वाक्याच्या बाबतीत मात्र सामान्यीकरणाचा गुन्हा सपशेल मान्य आहे. ****** आधीच्या शक्यतांपैकी कोणतीही जमेस धरल्यास, किंवा न धरल्याससुद्धा, ही शक्यता बोनस म्हणून मोफत.
In reply to अवांतर by पंगा
In reply to मलातर हा प्रकार काहीच समजला by शिल्पा ब
In reply to सहमत by आजानुकर्ण
रेडी टू कुक पदार्थ चांगले लागत नाहीत. घरी वरणभात बनवायला फारसे कष्ट पडत नाहीत. साधे वरण, भात, लिंबू, (रेडी टू ईट) तूप असे पदार्थ खाल्यास वरणाला फोडणी द्यायचीही गरज पडणार नाही.सर्व मुद्द्यांवर व्यक्तिशः सहमत आहे (विशेषतः अधोरेखित मुद्द्याशी, तुलनात्मकदृष्ट्या), पण येथे तो मुद्दा नाही. प्रश्न असा आहे, की एखाद्याला (यात 'एखादी'चाही समावेश व्हावा) कोणत्याही कारणासाठी रेडीटूकूक पदार्थ आणणे आपल्या पथ्यावर पडते असे वाटत असेल (कोणत्याही कारणासाठी - मग ते सोय म्हणून असो किंवा वेळ नाही म्हणून असो किंवा रेडीटूकूक पदार्थांची चव आवडते म्हणून असो), तर अशी व्यक्ती हीन आहे हे (केवळ अशा व्यक्तीची शॉपिंगकार्ट पाहून) इतरांनी काय म्हणून ठरवावे? किंवा त्या व्यक्तीला लाज वाटायला हवी अशी अपेक्षा काय म्हणून करावी? किंवा अशा व्यक्तीला माज आहे हे कशावरून ठरवावे? हा अधिकार इतरांना नेमक्या कोणत्या धर्मवचनाने दिला? 'माइंडिंग वन्स ओन बिझनेस' ही दुर्दैवाने दक्षिण आशियाई खासियत नाही. असो. (बाय द वे, आमच्या घरीही आम्ही क्वचित कधीमधी फ्रोझन, रेडीटूमायक्रोवेव पदार्थ आणतो. तितकेसे चांगले लागत नाहीत हे माहीत असूनही. आता नेमक्या अशा दिवशी आमच्या शॉपिंकार्टेत नाक खुपसून कोणी जर मला - आणि विशेष करून माझ्या पत्नीला - स्वयंपाक येत नाही, त्याची लाज वाटत नाही आणि त्याबद्दल माज आहे असा निष्कर्ष काढला, तर काढो बापडा. तथ्य काय आहे याबद्दल जोपर्यंत मला आणि माझ्या पत्नीला माहीत आहे, तोपर्यंत त्याची फिकीर आम्ही काय म्हणून करावी?)
In reply to मलातर हा प्रकार काहीच समजला by शिल्पा ब
कोणत्याही पुरुषाला आणि स्त्रीला किमान डाळ भात आणि वरणाला फोडणी तरी द्यायला येता हवीच...असे नेमक्या कोणत्या धर्मग्रंथात लिहिले आहे बरे? नाही म्हणजे, व्यावहारिकदृष्ट्या किमान डाळभात आणि वरणाला फोडणी देता येणे हे उपयुक्त आहे याबद्दल वाद नाही. आणि म्हणून आल्यास हितकरच. पण म्हणून एखाद्याला/एखादीला येत नसेल, तर त्यात हिणवण्यासारखेही काही आहे असेही वाटत नाही. शेवटी ज्यानेत्याने (यात 'जिनेतिने'चाही समावेश व्हावा) आपापल्या पोटात काय ढकलावे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. जोपर्यंत रेडीटूकूक वापरणारे (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) 'आमचीच पद्धत श्रेष्ठ (तुम्हीही हेच करा, नाहीतर तुम्ही स्वयंपाक - सैपाक नव्हे! - करता म्हणजे तुम्हाला लाज वाटायला हवी)' म्हणून काहीही कारण नसताना आपण होऊन सांगायला येत नाहीत, तोपर्यंत इतरांना यात लाज किंवा माज पाहण्याचेही काही कारण नसावे, नाही का? (हे थोडेसे 'शाकाहारी श्रेष्ठ (आणि मांसाहारी/मत्स्याहारी हीन), की मांसाहारी/मत्स्याहारी श्रेष्ठ (आणि शाकाहारी हीन)'च्या वळणावर जात नाही काय?)
In reply to पटले नाही by पंगा
In reply to धर्मग्रंथ कशाला पाहिजे by शिल्पा ब
पण अगदीच वरणाच पाकीटसुद्ध लोक घेतात तेव्हा आश्चर्य वाटते असं म्हटलंयवाटत असेल कोणाकोणाला सोयिस्कर. किंवा नसेल वेळ बनवत बसायला. (फार वेळ लागत नाही हे मान्य केले तरीही.) किंवा संध्याकाळी बाहेरून कामावरून वगैरे आल्यावर कुकर लावायचा येत असेल कंटाळा. किंवा इतर काहीही कारण असेल. कोण कसा विचार करेल, कोण कसा जगतो आणि कोणाला काय वाटते याची आपल्याला काय माहिती असते आणि आपण काय म्हणून ठरवणार? आणि आश्चर्य तरी का करावे? त्यांना ठीक वाटते तर करू द्यात की.
मी कोणालाही हिणवले नाही , अजूनतरी.आपल्यावर असा आरोप केलेला नाही, करण्याचा उद्देशही नाही. पण हिणवणारे दिसतात. इथेही.
त्यात हिणवण्यासारखं अन हिणवुन घेण्यासारखं काय हेच मला समजले नाही...आणि तसंच म्हणायचं तर कोणी काय घालावं, काय खावं वगैरे वैयक्तिक गोष्टीच आहेत नाही का?हेच म्हणायचे आहे. पण हिणवणार्याने जर हिणवले, तर ज्याला हिणवले तोही कधी ना कधी हिणवून घेण्याची शक्यता असतेच, नाही का?
In reply to उत्तर by पंगा
In reply to आधीच भरपूर अवांतर आणि महाभारत घडून गेलेलं असलं तरीही ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जीडीपीमुळे निर्माण होणारे 'इंडिया' आणि 'भारत'...! by इन्द्र्राज पवार
जीडीपीमुळे प्रॉड्क्टची मार्केट व्हॅल्यू ठरत असेल तर मग समाजातील एक विशिष्ट वर्ग अर्थव्यवस्था आपल्या लहरीनुसार कमीजास्त करू शकेल का?जीडीपीमुळे प्रॉडक्टची मार्केट व्हॅल्यू ठरत नाही तर महागाई या घटकाचा विचार केला तर प्रॉडक्ट व्हॅल्यूपेक्षाही पूर्ण अर्थव्यवस्थेत कोणत्या वस्तू आणि सेवा दिल्या जातात आणि त्या किती प्रमाणावर यावर जीडीपी अवलंबून असते.आपल्याला वरकरणी दिसतो तो आकडा पूर्ण अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवा यांचाच निर्देशक असतो.तेव्हा समाजातील एक विशिष्ट वर्ग अर्थव्यवस्था आपल्या लहरीनुसार कमीजास्त करू शकेल का? यात तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे हे समजले नाही.
तर चित्र २५ टक्क्यांचा "इंडिया" आणि ७५ चा "भारत" अशी भीती यामुळे वाटत राहिल.समाजात विषमता वाढत आहे हे तर समोरच दिसत आहे.त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही.तरीही गरीब सगळे चांगले आणि श्रीमंत सगळे हलकट हा टिपीकल समाजवादी विचार मला तरी मान्य नाही.
मग ज्याच्याकडे क्रयशक्ती अधिक, ते वापरत असलेल्या वस्तू व सेवानाच अधिक मागणी राहिल आणि बाजारात त्याच प्रमेयानुसार पुरवठा वाढता राहिल्याचे दृश्य दिसणार.हे मला १००% मान्य नाही.पूर्वी १९७० च्या दशकात लोकांकडे इतका पैसा नसे.तेव्हा घरोघरी नोकर नसत.पण जसा लोकांकडचा पैसा वाढला त्याप्रमाणे घरोघरी नोकर ठेवायचे प्रमाणही वाढले.लोकांकडे गाड्या आल्या तशी गॅरेजची गरजही वाढली.गॅरेजचे मालक श्रीमंत असतात हे मान्य पण तिथे कामाला असलेले लोक तर तेवढे श्रीमंत नसतात ना?गाड्यांचा खप वाढला त्याप्रमाणे वाहन-उद्योगाशी निगडीत सगळ्या (प्रत्यक्ष वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या,स्टील,रबर इत्यादी) क्षेत्रांमध्ये कुशल आणि अकुशल कामगारांसाठी नोकऱ्याही वाढल्या.गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या त्याबरोबरच वीटभट्ट्या, रंगकाम,सुतारकाम,बांधकाम मजूर,टाईल्स कापणारे अशा नोकऱ्याही वाढल्या.मॉल वाढले त्याप्रमाणे मॉलमध्ये हेल्परच्या नोकऱ्याही वाढल्या.जितक्या प्रमाणात लोकसंख्या वाढली तितक्या प्रमाणात या नोकऱ्या वाढल्या नाहीत हे १००% मान्य.तसेच महागाईमुळे या वर्गाची मोठी अडचण झाली हे अमान्य करता येणारच नाही.पण केवळ श्रीमंत लोक वापरतात त्याच वस्तू आणि सेवांना मागणी अधिक राहिल हे मत म्हणूनच मला १००% मान्य नाही.
वाढता शेअरबाजार, ब्रोकरिंग, सट्टेबाजी संबंधित जे व्यवहार आज चढत्या भाजणीचे दिसत आहेत त्यांचे प्रमाण नजिकच्या भविष्यकाळात उत्पादनाशी निगडित असलेल्या व्यवहारांपेक्षा जास्त होतील असा जो समज सर्वसामान्य जनतेत आहे तो साधार आहे का?आहेच.या संदर्भात दोन गोष्टी आहेत. १.शेअर बाजाराच्या नावाने अनेक लोक खडे फोडतात पण शेअर बाजार आहे म्हणून किमान ३५०० कंपन्यांना अधिक विस्तार करायला वाव मिळाला.नुसते बॅंकेचे कर्ज घेऊन वाढण्यावर मर्यादा असतात. एकाच उद्योगाला बॅंक एका मर्यादेपेक्षा जास्त कर्ज देऊ शकत नाही.तेव्हा अशा उद्योगांनी शेअरबाजारातून पैसे उभे केले आणि ते पुढे गेले.या ३५०० कंपन्यांमध्ये लहान कंपन्यांपासून लाखांना नोकऱ्या देणाऱ्या इन्फोसिस, रिलायन्स यासारख्या मोठ्या कंपन्याही आहेतच. २. शेअरबाजारात लोक यशस्वी होतात त्याप्रमाणे मारही खातातच.अगदी वर चढणाऱ्या शेअरमार्केटच्या दिवसातही भरपूर नुकसान झालेले लोक दिसतील आणि पडत्या मार्केटमध्येही पैसा कमावणारे मुरब्बी लोकही दिसतील.एकूणच बऱ्याचदा हा ’झिरो सम गेम’ असतो.त्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान त्यात होईल असे मला तरी वाटत नाही.याला अपवाद आहेतच. उदाहरणार्थ धान्यांच्या व्यवहाराशी काही संबंध नसलेले लोक त्यावर सट्टा करून पैसा कमावतात आणि धान्यांच्या किंमती वर घालविण्यात त्यांचा वाटा असतो.अशा गोष्टींना जरूर बंदी घालावी पण सरसकट शेअरबाजार वाईट हे मला तरी पटत नाही.
In reply to धन्यवाद इंद्रा by क्लिंटन
In reply to जीडीपीमुळे निर्माण होणारे 'इंडिया' आणि 'भारत'...! by इन्द्र्राज पवार
घरी पुस्तकं वाचण्यात वेळ घालवतो. तितक्या प्रमाणात मला उत्पन्न कमी मिळतं, त्यामुळे खर्च कमी होतो. जीडीपी कमी होते.त्यांचा मुद्दा स्वतंत्र म्हणून पटण्यासारखा आहे. पण विशेष म्हणजे या चर्चाप्रस्तावात तो मुद्दा श्री. घासकडवी सुसंदर्भ मानतात. म्हणजे स्वतःच्या उपयुक्ततेसाठी केलेले उत्पादन आणि खर्चसुद्धा सुसंदर्भ आहे. तसे पाहाता मी श्वास घेण्याकरिता स्नायूंचा "खर्चिक" वापर करतो, स्वतःला अन्न भरवतो आणि माझे सुदृढ दीर्घायुष्य उत्पादन करतो. या सर्व उलाढालीचा हिशोब सुसंदर्भ होऊ लागेल. यावरून सहज लक्षात येईल, की काही खर्च-उत्पादने जीवनासाठी अत्यावश्यक असली, तरी बाजारपेठ त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. बाजारपेठेचे दुर्लक्ष म्हणजे "या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत" असे प्रतिपादन मुळीच नसते. बहुतेकांचा श्वासोच्छ्वास, अन्न भरवणे, यांची सार्वत्रिक बाजारपेठ नाही इतपत म्हणण्यापुरते ते दुर्लक्ष असते. या दोन क्रियांची उदाहरणे केवळ अचरट नाहीत. ज्या थोड्या लोकांना स्वतःच्या बळाने श्वासोच्छ्वास करता येत नाही, किंवा स्वतःला अन्न भरवता येत नाही, ते लोक या सेवा बाजारातून विकत घेतात. रेस्पिरेटर, परिचारक-सेवा यांची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत किती पैशांची-सेवेची उलाढाल होत आहे? हा बाजारपेठेला उपयोगी आकडा आहे. "पण जे लोक स्वतःच्या बळावर श्वास घेत आहेत, आणि स्वतःला अन्न भरवत आहेत, त्यांचा हिशोब का नाही केला? हा त्यांचा अपमान नाही काय?" असे कोणी म्हणाले तर बाजारातले ग्राहक-विक्रेते किंकर्तव्यमूढ होतील. त्यांचा हिशोब केला म्हणून बाजारपेठेतील (किंवा बाहेरील) व्यक्तीची कुठली कृती बदलणार आहे? चर्चाप्रस्तावक म्हणू शकेल "स्वतःची सेवा सोडा". मग बालसंगोपनच घेऊ. बाळपणी आईवडलांनी मला मोफत अन्न भरवले, अंग धुतले, वगैरे. पालक असेच आजकालही बाळासाठी करतात. आता इस्पितळात बाळाची काळजी घेणारी परिचारिका असली - तिच्या सेवेचा दर कसा ठरवायचा? जितकी बाळे या सेवेसाठी बाजारात आहेत ती गरज मानावी, जितके सेवादाते बाजारात उपलब्ध आहेत त्यावरून पुरवठा, आणि त्या दोहोंवरून सेवेची किंमत ठरवता येईल. जे पालक आपल्या बाळांना स्वतः न्हाऊमाखू घालत आहेत - बाजारपेठेत नाहीत - त्यांचा हिशोब उत्पादक आणि ग्राहक म्हणून केला तर आपण करू शकतो ना. पण त्या प्रचंड उत्पादनावरून आणि ग्राहकसंख्येवरून इस्पितळातल्या बाळासाठी परिचारिकेच्या सेवेची किंमत कशी ठरवणार? बाजारपेठेबाहेरच्या ग्राहक-उत्पादकांचा हिशोब न-करता सेवेची किंमत ठरवली जाते. म्हणजे जगातल्या सर्व पालक-बालकांच्या आनंदमय नात्यांचा अपमान होत नाही. ("बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई" या गाण्यात थोडेसे अर्थशास्त्रीय विश्लेषण करायचा प्रयत्न केला आहे. पण तो काव्यालंकार मानून त्याबद्दल कोणीही गंभीर विचार करत नाही. पण वाटल्यास मायक्रोइकोनॉमिक विश्लेषण करता येईल. पण ते विश्लेषण केल्यानंतर फक्त "पैशांची आदलाबदल न होणार्या आई-बाळांमधील देवाणघेवाण" याबद्दल ज्ञान मिळेल. परिचारिकेच्या सेवेबद्दल किती मोबदला द्यावा याबद्दल काहीच उजेड पडत नाही.)
In reply to भावना आवडली पण लेख तसा समजला नाही by धनंजय
जीडीपी या आकड्याचा उपयोग हल्ली कशासाठी करतात?एकंदरीत राष्ट्राची प्रगतीशीलता या आकड्याने ठरते. कमी जीडीपी (दरडोई) असलेले देश मागास, विकसनशील वगैरे म्हटले जातात. देशाचा मानवी विकासाचा निर्देशांक (ह्युमन डेव्हेलपमेंट इंडेक्स) काढताना जीडीपी वापरलं जातं. त्यामुळे काय कृती केल्याने देश प्रगतीशील वा प्रगत म्हणावा हे या आकड्यावरून ठरतं. प्रगती म्हणजे काय याची व्याख्याच ज्या आकड्यावर अवलंबून असेल त्यात एका मोठ्या लोकसंख्येच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणं चूक असा माझा दावा आहे. जीडीपीच्या वाढीचा मी हिशोब दिला आहे. त्यात घरी बसून घरकाम करण्याऐवजी ती सेवा बाजारातून विकत घेतल्यावर लगेच ती 'उत्पादनवाढ' या स्वरूपात दिसते. हे उत्पादन मोजणी यंत्रणेचं अपयश नाही का?
जितकी बाळे या सेवेसाठी बाजारात आहेत ती गरज मानावी, जितके सेवादाते बाजारात उपलब्ध आहेत त्यावरून पुरवठा....आता इस्पितळात बाळाची काळजी घेणारी परिचारिका असली - तिच्या सेवेचा दर कसा ठरवायचा?माझा मुद्दा असा आहे की घर व बाजार असं द्वैत असूच नये. काही उत्पादन कारखान्यात होतं, काही घराच्या चार भिंतीत होतं. त्यामुळे बालसंगोपन करणाऱ्या सर्वच परिचारिका आहेत, व सर्वच बालकं ही ग्राहक आहेत. मात्र काही विशिष्ट परिस्थितीत पैशांचं हस्तांतरण होतं, व इतर परिस्थितीत होत नाही. ज्या परिचारिकांना पैसे मिळत नाहीत, त्यांच्या सेवेची किंमत कशी करावी हा खरा प्रश्न आहे. फर्स्ट अॅप्रॉक्झिमेशन म्हणून व्यावसायिक परिचारिकेइतकंच मूल्यवान कार्य त्यांनी केलं अशी मोजणी व्हावी. कुटुंब ही कंपनी मानली तर त्या कंपनीने स्त्रीला त्या कामाबद्दल पगार द्यावा.
बहुतेकांचा श्वासोच्छ्वास, अन्न भरवणे, यांची सार्वत्रिक बाजारपेठ नाही इतपत म्हणण्यापुरते ते दुर्लक्ष असते.ही उदाहरणं फसवी आहेत. मी "स्वतःची सेवा सोडा" असं म्हणत नाही. एखाद्या संसाधनाच्या विनियोगासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात तेव्हाच तिच्यातून होणाऱ्या उत्पादनाची मोजणी करायला अर्थ असतो. श्वासोच्छ्वास यंत्रणा ही तशी नाही. याउलट घरात काम करणारी स्त्री आपली संसाधनं इतर उत्पादक कामासाठी वापरू शकते. किंबहुना 'श्वासोच्छ्वासासाठी फुफ्फुस बांधील आहेच' हे जसं आपण गृहित धरून दुर्लक्ष करतो तसंच 'घरकाम करायला स्त्री आहेच' असं म्हणून दुर्लक्ष करणं हीच तर तक्रार आहे. बाकी अवलियांनी जे तीन दिवस काम न करता वेळ घालवण्याचं उदाहरण दिलं आहे त्यातला आनंद मोजला जावा याबाबतही मी ठाम आहे. शेवटी अर्थशास्त्राचं ध्येय संसाधनं व गरजा यांची सांगड हाच आहे. गरजा भागवणं म्हणजे आनंद निर्माण करणं. तो मोजण्यासाठी सध्या उत्पादन ही अतिशय तोकडी मापनपद्धती वापरली जाते. तो मोजणं कठीण असलं तरी अशक्य नाही. ती पायरी गाठण्याआधी निदान 'स्वतःचं स्वतःसाठीचं उत्पादन' या गटातल्या मोजता येऊ शकणाऱ्या गोष्टी तरी मोजू.
In reply to खुलासा by राजेश घासकडवी
ज्या परिचारिकांना पैसे मिळत नाहीत, त्यांच्या सेवेची किंमत कशी करावी हा खरा प्रश्न आहे. फर्स्ट अॅप्रॉक्झिमेशन म्हणून व्यावसायिक परिचारिकेइतकंच मूल्यवान कार्य त्यांनी केलं अशी मोजणी व्हावी. कुटुंब ही कंपनी मानली तर त्या कंपनीने स्त्रीला त्या कामाबद्दल पगार द्यावा.केले अॅप्रॉक्झिमेशन, आणि काढला पगाराचा दर, समजा. (हे सोपे आहे. संयुक्त राज्यांत हा दर वार्षिक १५,०००-७०,००० डॉलरच्या दरम्यान येईल. अशिक्षित-परिचारक-सेवक आणि प्रशिक्षित परिचारक यांच्या मध्ये कुठेतरी.) एका जोडीदाराला बाजारभावाइतका पगार देणे कंपनीला जमले नाही, तर काय कारवाई व्हावी, तेसुद्धा कळलेले नाही. त्याहून त्रांगडे होऊ शकते की दोन्ही जोडीदारांना त्यांच्या-त्यांच्या कार्याबाबत बाजारभावाने पगार देणे कुटुंब-कंपनीला शक्य नसेल. (बहुतेक कनिष्ठ-मध्यमवर्गीय जोडप्यांच्या बाबतीत असे होत असावे. ३० ते १४० हजार डॉलरपेक्षा आमदनी कमी असणारी बरीच कुटुंबे सापडतील.) अशा परिस्थितीत काय करावे? आणि जर काही करायचेच नसेल तर हिशोब करण्यात काय म्हणून शाई खर्चावी? - - -
जीडीपीच्या वाढीचा मी हिशोब दिला आहे. त्यात घरी बसून घरकाम करण्याऐवजी ती सेवा बाजारातून विकत घेतल्यावर लगेच ती 'उत्पादनवाढ' या स्वरूपात दिसते. हे उत्पादन मोजणी यंत्रणेचं अपयश नाही का?यश-अपयशाचे काय निकष आहेत, ते मला कळलेले नाही. **वैद्यकात "इन्फन्ट मॉर्टॅलिटी दर" असा एक हिशोब असतो. एका वर्षामध्ये जितकी काय मुले जिवंत जन्माला येतात, त्यांच्यापैकी पहिल्या वाढदिवसापूर्वी जितकी मुले मरतात, त्यांचा दर-हजारी वार्षिक दर, असे काही गणित असते. आजकाल असे होते, की गर्भाला दुर्धर असा रोग झाला असेल (मेंदू नसणे, अॅनेन्केफाली) वगैरे, तर गरोदर स्त्रिया गर्भपात करून घेतात. गर्भपात केला नाही तर ही मुले जिवंत जन्मतात आणि लगेच काही दिवसांत मरतात. तेव्हा त्यांची मोजणी "इन्फन्ट मॉर्टॅलिटी"मध्ये होते. गर्भपात झाला, तर तो जन्मही मोजला जात नाही, आणि मृत्यूही मोजला जात नाही. हे "इन्फन्ट मॉर्टॅलिटी" या आकड्याचे यश मानायचे की अपयश मानायचे? की यश-अपयशाच्या पलीकडे नि:संदर्भ मानायचे?** याबाबत तुम्ही काही निर्देश देता : तुम्ही म्हणता की जीडीपीच्या आकड्यामुळे एखाद्या देशाल विकसित म्हणतात, एखाद्या देशाला विकसनशील म्हणतात. वेगळा काही हिशोब केला, तर देशांची क्रमवारी बदलेल. बदलेल ना. साधारणपणे लोकसंख्येच्या क्रमाने हा हिशोब राहील - फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. (हे अप्रॉक्सिमेशन तुमच्या म्हणण्याचा विपर्यास नाही. तुम्ही म्हणता : मोठ्या लोकसंख्येच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणं चूक असा माझा दावा आहे.) कारण लोकसंख्येतील प्रत्येक व्यक्ती पैशांची देवाणघेवाण न-करता काही उत्पादन करत असते. नुसत्या स्त्रियाच मोजल्या तरी देशातील स्त्रियांच्या संख्येची क्रमवारी एकून लोकसंख्येच्या क्रमवारीशी मिळतीजुळती असेल. आता लोकसंख्या-क्रमाने जगातील देशांची यादी करून त्यावरील मथळा म्हणून "प्रगतीचा क्रम" असे लिहिले, म्हणून कृतीमध्ये काय फरक पडतो? मुद्द्याचे तुम्ही म्हणता :
त्यामुळे काय कृती केल्याने देश प्रगतीशील वा प्रगत म्हणावा हे या आकड्यावरून ठरतं.कदाचित तुम्हाला असे म्हणायचे आहे "प्रगत म्हणवून घेण्यासाठी देशाच्या राज्यकर्त्यांची धोरणे असतात, आणि जीडीपीमध्ये हिशोब केलेल्या घटकांचाच विचार ते करतात. हे योग्य नाही." याबाबत मी अंशतः सहमत आहे. पण (१) जीडीपी नि:संदर्भ मानून केलेली अनेक धोरणे बहुतेक देशांत दिसतात - त्यामुळे देशात धोरणे करण्यालायक अन्य गोष्टीसुद्धा आहेत याचे भान कायदेमंडळाला आणि शासनाला असावे. "जीडीपीचे गुलाम" या आरोपात तथ्यानुसार तारतम्य असावे. (२) तुम्ही म्हणता त्या अप्रॉक्सिमेशनमध्ये "लोकसंख्या" हा घटक इतका प्रबळ आहे, की त्या अप्रॉक्सिमेशनने कुठलेसे मोजमाप "नवीन-जीडीपी" ठरवले, तर ते मोजमाप वाढवण्यासाठी "लोकसंख्या वाढ" हेच धोरण सर्वात कार्यक्षम ठरेल. उदाहरणार्थ मुले किती का दरिद्री-भुकेली असो, त्यांच्या पालकांनी त्यांचे केलेले संगोपन उत्पादन म्हणून अतिशय मोलाचे म्हणून मोजले जाईल. म्हणून कुटुंबनियोजनाचे अंतिम स्वातंत्र्य अबाधित ठेवून कुटुंबनियोजन नकोसे व्हावे, असे धोरण शासनाने अंगीकारावे हेच नवीन-जीडीपीच्या वाढीसाठी कार्यक्षम धोरण होईल. कुटुंबनियोजनाविरुद्ध जाहिराती करणे, कुटुंबनियोजन सल्लागारांवर भरपूर कर लादणे, न-झालेल्या मुलांमुळे नवीन-जीडीपीला हानी होते त्याबद्दल निपुत्रिक जोडप्यांकडून काही वसुली घेणे... अशी सौम्य-ते-जाचक वेगवेगळी धोरणे सुचतात. "जीडीपीने धोरणे आखतात, त्याऐवजी हे अप्रॉक्सिमेशन घ्या" हा तुमचा मुद्दा इतका सैल आहे, की त्या विश्लेषणामुळे माझ्या विचारांची काहीच प्रगती झालेली नाही. "जीडीपीने जितपत धोरणे आखतात, त्यापेक्षा कमी धोरणे आखावीत" याबाबत सहमती असूनसुद्धा, या अप्रॉक्सिमेशनने केलेले विश्लेषण मला उपयोगी पडत नाही.
In reply to अत्यंत रोचक विषय आणि by नगरीनिरंजन
जर स्त्रीच्या घरकामाला पुरेशी किंमत आणि परतावा मिळत नाही तर स्त्रिया लग्न, संसार वगैरे का मांडतात? का त्या घरकाम करतात?(पुरेसं) शिक्षण नाही, म्हणून नोकरी नाही; भांडवल नाही म्हणून व्यवसाय नाही, एवढंच काय हो अनेकींनातर लहानपणापासून भावाला, वडलांना सुग्रास भोजन वाढून स्वतःला शिळं खाऊन मोठं व्हावं लागतं आणि त्यामुळे शरीरही पुरेसं निरोगी नसतं. बापाने दिलं उजवून तर काय करायचं त्यांनी? अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुख्य गरजा किती टक्के (भारतीय) स्त्रियांना स्वतःच्या कमाईवर भागवता येतील. मुलगा असावाच हा हट्ट, आणि त्या वंशाच्या दिव्याच्या तब्येतीसाठी बहिणींची आबाळ अशांतून आजही अनेक मुली वयाची पन्नाशी, साठी गाठेपर्यंत जगतात त्यांनी कमावता येत नाही म्हणून मरून जायचं का? तर अशा स्त्रिया अनेक पिढ्यांच्या गतानुगतिकतेने जगतात, त्यांची लग्न होतात, आणि त्या घरकाम करतात. आणि दुर्दैवाने यातल्या अनेकींना आपली पिळवणूक होते याचीही जाणीव नसते.
या मागण्या पैशाच्या स्वरूपात नसून भावनिक आणि इतर गरजांच्या पूर्तीच्या स्वरूपात असतात.पैसा सोडून भावनिक आणि इतर गरजा फक्त स्त्रिच्याच असतात असं नाही. बायको, आई, बहिण, मुलगी या नात्यांमधून घरातल्या इतर सभासदांच्या गरजाही भागवल्या जातात; या गरजाही भागवण्यात अनेकदा स्त्रियांनाच जास्त कष्ट पडतात, उदा: बालसंगोपन. आनंद, गुडविल किंवा इतर अमूर्त मोबदला फक्त कमावणार्या वा न कमावणार्या स्त्रीपुरताच मर्यादित नसावा.
नवरा आणि बायकोचे उत्पन्न समान नसतानाही नवर्याने घरकामात समान वाटा उचलण्याची अपेक्षा नवर्याचे आर्थिक शोषण करणारी आहे काय? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.अनेक आस्थापनांमधे पुरूष आणि स्त्रियांना एकाच प्रकारच्या कामांसाठी समान मोबदला दिला जात नाही, अनेकदा फक्त "स्त्री आहे (आणि ती मॅटर्निटी, बालसंगोपन, पोरांची आजारपणं इ. कारणांसाठी रजा मागेल)" या कारणास्तव नोकरी देताना डावललं जातं (अजूनपर्यंत स्वानुभव नसला तरीही अशा उच्चशिक्षित स्त्रियांना भेटलेली आहे.), बालसंगोपनासाठी मुद्दामच पार्ट-टाईम किंवा फार जास्त जबाबदार्या नसलेली नोकरी पत्करणं, 'टू-बॉडी प्रॉब्लेम' सोडवण्यासाठी असलेली चांगली नोकरी सोडून (नवरा-बायकोपैकी कोणीही एकाने) कमी पगाराची, पण एकत्र रहाता येईल अशा ठिकाणची नोकरी पत्करणं अशा अनेक गोष्टींचा विचार झाल्याशिवाय नवरा-बायकोचं उत्पन्न नॉर्मलाईझ करता येणार नाही. अलिकडच्या काळात करियरचा मार्ग ठरल्याशिवाय लग्न होत नाहीत. एखाद्या व्यवसायात पगारच कमी असतो; हे माहित असल्यानंतरच लग्न केल्यास "(नवरा वा बायकोचं) उत्पन्न कमी आहे" या तक्रारीचं काय करायचं? या कारणांमधली काही कारणं एक किंवा अनेक उच्चशिक्षित स्त्रियांच्या घरीच असण्याचंही कारण असू शकतात. काही वर्षांपूर्वी युकेच्या संसदेत या विषयावरून चर्चा झाल्याचं आठवतं आहे. घर सांभाळणारी स्त्री मुलांची देखभाल स्वतः करते, मुलांकडे जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकते, आणि म्हणून ती आज नाही तरी पुढे दहा-पंधरा वर्षांनी (मुलं नोकरी/व्यवसायाला लागतील तेव्हा) जीडीपीमधे वाढ करण्यात हातभार लावते अशा प्रकारची चर्चा झाली होती. त्यामुळे गरोदरपणची आणि बालसंगोपनाची रजा २-३ वर्ष असावी का, तेवढा काळ नोकरी केली असं मानावं, किंवा देशासाठी साधनसंपत्ती (शिक्षित/ trained माणसं) निर्माण करते म्हणून अशा स्त्रीलाही मानधन मिळावं का अशा काही प्रकारची ती चर्चा होती.
In reply to माझ्यासारख्या, शिकलेल्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to माझ्यासारख्या, शिकलेल्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to <<अशा स्त्रीलाही मानधन मिळावं by शिल्पा ब
In reply to छान... by प्रसन्न केसकर
In reply to नक्की प्रोड्युस by अन्या दातार
In reply to अश्या परिस्थितीत... by प्रसन्न केसकर
In reply to पीसीआय by श्रावण मोडक
In reply to आश्चर्य... by प्रसन्न केसकर
In reply to नाय... by श्रावण मोडक
In reply to पीसीआय... by प्रसन्न केसकर
या चर्चेत असा सुर वाटला की जीडीपी हा एकमेव क्रायटेरिया आहे प्रगती मोजण्याचा.तसं नाही. एकमेव नसला तरीही तो एक खूप महत्त्वाचा मानदंड आहे. भारत सरकार आपला आर्थिक अहवाल सादर करतं त्यात पहिल्या परिच्छेदात जीडीपी वाढीचा दर लिहिलेला असतो. आपण नक्की काय वाढवायचा प्रयत्न करतो आहोत हे पाहाणं फायद्याचं ठरतं. ज्या देशांत सर्वच जण नोकरी करतात व घरकाम आउटसोर्स करतात तिथे जीडीपी अतोनात फुगलेलं दिसेल. याउलट ज्या देशांत गृहिणी घर सांभाळतात तिथे जीडीपी आहे त्यापेक्षा कमी दिसेल. प्रत्यक्षात 'उत्पादनात' फक्त थोडासाच फरक असला तरी. म्हणजे सांस्कृतिक व लैंगिक भिन्नत्वामुळे दोन समाज साधारण सारखंच उत्पादन करत असतील तरीही 'प्रगत, विकसित, इंडस्ट्रियलाइज्ड' देशांमध्ये उत्पादन जास्त आहे असा भास होईल. मग 'अप्रगत' देशदेखील तोच मार्ग चोखाळतील.
माझ्या माहितीनुसार त्या मुद्यावर भारतीय कायद्याची भुमिका खुपच सुस्पष्ट आहे. अर्थात कायदा अनेकदा पुस्तकापुरताच रहातो हे मान्य केले तरी उगीचच असा कुणी कधी विचारच केलेला नाही ही ओरड संपुर्णतः अनाठाई आहे.मान्य. मी फक्त उत्पादन म्हणजे काय याविषयी बोलत होतो. पण याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.
In reply to उपक्रमावर आल्या सारखं वाटलं by टारझन
In reply to उपक्रमावर आल्या सारखं वाटलं by टारझन
In reply to In your example if you think by डीलर
Had she been working and employed other peopel she would have created more GDP by spending her income.तुम्ही चांगला मुद्दा मांडला आहे. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की समजा १० बायका आहेत. त्यांनी प्रत्येकीने आपापलं घर सांभाळण्याऐवजी एकीने सगळ्यांची मुलं सांभाळायची, एकीने सगळ्यांचे कपडे/भांडी धुवायची, एकीने स्वयंपाक करायचा, एकीने इतर सटरफटर कामं करायची मग इतर सहा जणी कारखान्यात काम करून उत्पादन वाढवायला मोकळ्या. हे बरोबरच आहे. पण या दोन सिनारिओमध्ये पहिल्यात जीडीपी शून्य (खरं तर इनएफिशियंटली का होईना, चार युनिट काम होत होतं) दुसऱ्या सीनारिओमध्ये १० युनिट जीडीपी. एफिशियन्सी अडीचपट झाल्यासारखी वाटते, पण ओव्हरहेड्सदेखील वाढतात. मुलांना सांभाळणारीकडे सोडून येणं, कारखान्यापर्यंत प्रवास करणं वगैरे. हे वाढलेले ओव्हरहेड्स वर मल्टिप्लायर इफेक्ट म्हणून दिसतात... National Income= Expenditure + Savings. हा मुद्दा थोडा अधिक समजावून सांगा. ही बचत कशी मोजली जाते?
विचार शृंखला चांगली मांडली