जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे - भाग -०३
हॊटेल शीतल
पत्ता - कर्वे पुतळ्याच्या चॊकातच डाविकडे, म्हणजे पेट्रोल पंप, डोमिनोजच्या उजव्या साईडला. बदामाचं झाड ही खुण
प्रकार - शुद्ध शाकाहारी ---वेळ - सकाळी ७ ते रात्री ११
खाण्याचे प्रकार - नाष्टा व जेवण
खर्च - नाष्टा - . १००/- जेवण - रु.२००/- ( दोघांसाठी,पोटभर या हिशोबात)
हॊटेल शीतल, कर्वे पुतळ्याच्या चॊकात असलेले हे एक जुनं आणि छान हॊटेल आहे. डोमिनोज च्या बाजुने पुढे डेक्क्नकडे जायला लागलं की एक दोन बदामाच्या झाडांच्या मागे हे आहे. बेसिकली उडुपी असलेलं हे ठिकाण फक्त साउथ ईंडियन नाही तर पंजाबी डिश व सॆंडविच वगॆरे पण सर्व्ह करतं.
नाष्ट्याला इथे सगळे साउथ ईंडियन पदार्थ मिळतातच आणि छान पण असतात. इडली वगॆरे तर डिश मध्ये एक छोटंसं केळिचं पान टाकुन दिली जाते. सांबार व नारळाच्या चटणीबरोबर पुदिन्याची चटणी असते. इथल्या इडल्या गरम गरमच संपवाव्या लागतात, बहुधा जाड्या रव्याच्या असल्याने गार झाल्यावर थोड्याश्या चिकट होतात. इतर डोसा, उत्तपा हे प्रकार मस्त असतात. इथे बटाटेवडा हा खरेच बटाटेवडा असतो, उगीचच जोशी/रोहित सारखा चपटा नसतो. उपावास असेल तर फक्त साबुदाणा वडा घ्या,उपवासाची कचोरी हा मला कुठेच न आवडणारा प्रकार आहे तेच इथे पण.
इथे जेवणासाठी पंजाबी व चायनीज पर्याय आहेत, पण बहुधा उडुपी हॊटेल असल्यानं चायनीजची टेस्ट फारशी बरी नाही, त्यापेक्षा पंजाबी छान, माझी इथली आवडणारी डिश व्हेज बगदादी - मिक्स व्हेज भाजीवर एक छोटंसं टोमॆटो ऒम्लेट टाकुन ती भाजी पुर्ण कव्हर केलेली असते, जशी बिर्याणि कणीक लावुन पॆक करतात ना तशी.ती भाजी आणि त्या ऒम्लेटचा मिक्स वास हा लगेच भुक वाढवतो. बाकी रोटी इत्यादी चांगले असतात इतर हॊटेलपेक्षा फार ग्रेट नाही.
कोथरुड ते कर्वे पुतळा या भागातील व्हेज जेवणासाठी शितल हे एक सेफ बेट आहे असं मी म्हणॆन.
हर्षद.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6765
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
कामत गेलं आता. त्याच्याजागी
In reply to +१ by मी-सौरभ
स्विकार...स्विकार रे!
In reply to कामत गेलं आता. त्याच्याजागी by मृत्युन्जय
धम्या..
In reply to स्विकार...स्विकार रे! by धमाल मुलगा
कामतचं आता थाट्बाट झालंय, आणि
..
In reply to कामतचं आता थाट्बाट झालंय, आणि by ५० फक्त
आता विषय निघालाच आहे तर,
जं. महाराज रोडवरपण एक लोणी
In reply to आता विषय निघालाच आहे तर, by ५० फक्त
शीतलचा दही वडा
शितल अगदी नविन नविन होतं
मला आठवतं त्याप्रमाणे शीतलची
जायला पायजे शीतल ला .. अजुन
छान लेखमाला. लेखकानी शक्य
त्या स्टीमी अफेअर्स
लज्जत
टुक्कार हो!
In reply to लज्जत by सखी
अरेरे
In reply to टुक्कार हो! by धमाल मुलगा
सर्व प्रतिसादकांना अतिशय
अहो..... ते कुठल्या उद्देशाने
In reply to सर्व प्रतिसादकांना अतिशय by ५० फक्त
हा हा हा, सविता ताई ते
In reply to अहो..... ते कुठल्या उद्देशाने by सविता
मानकर चा डोसा