डॉ. बिनायक सेन
In reply to निटासे कळले नाही काय म्हणायचे आहे ते. by चिंतामणी
In reply to या पूर्णच विषयाचे आणि विशेषतः by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिका- तुम्ही समर्थन करीत नाहीत हे मान्य. by चिंतामणी
In reply to सहज एक माहिती इथे देतो : by चिंतामणी
In the winter of 2006, after my experiences in Dantewada, I gave a public lecture in Bhubaneshwar. The State’s Chief Minister, Naveen Patnaik, was in the audience. I urged that the rash of mining leases being proposed by the State government on tribal land be stopped. As it happened, foreign and Indian mining companies were invited into the State, without any attempt to make adivasis stakeholders in these projects. The consequence is that Orissa, a State once completely free of Naxalites, has seen them acquiring considerable influence in several districts of the State.मी जेव्हा या सगळ्याबद्दल समजून घेऊ लागलो तेव्हापासून मला पडलेला सगळ्यात मुख्य प्रश्न तो हाच. विकास करताना सामाजिक घटकांना बरोबर घेता येत नाही का? त्यांचा उच्छेद करूनच विकास साध्य होतो? विकासाला विरोधच असतो असे नाही. पण तो करताना ज्यांचा विनाश होणार आहे अशांना त्यात काहीच भूमिका घेऊ देऊ नये असे का? परत त्या विनाशाची किंमत तरी नीट आणि न्याय्यपद्धतीने चुकवावी. काही ठिकाणी, स्थानिकांचा लढा केवळ "आम्ही इथून उठायला तयार आहोत, आम्हाला प्रकल्पात भागिदारीही नको, पण पुनर्वसन तरी नीट आणि न्याय्य करा!" इतपतच मर्यादित आहे. एवढे मागणे नक्कीच फार नाही. फारतर काय, विकास प्रकल्पात भागिदार असलेल्यांचा नफा कमी होईल. पण मग 'लोकशाही, कल्याणकारी' राज्यात हक्क / न्याय महत्त्वाचे की नफा याचा काय सोक्षमोक्ष एकदाचा लागूनच जावा. असो. लिहिण्यासारखे खूप आहे. पण मी लेखक नाही. नीट मांडणी करता येणे हे ही शिकतो आहे. त्यामुळे, अधिक चर्चा प्रत्यक्ष भेटीत करता येईल. *** ता. क. : तुम्ही व मी ज्या पुण्यात राहतो, त्या शहराच्या उंबरठ्यावरही असे अनेक उद्योग चाललेले आहेतच. व्यवस्था१ स्वतःच व्यवस्था२ साठी सुपीक जमीन उपलब्ध करून देत आहे याचे भान कुणालाच नाही. आज छत्तिसगढमधे चालू आहे. फारच दूर की म्हणजे. जाउद्या! कोणाला फिकिर करत बसायला वेळ आहे? उद्या मात्र हे असले प्रकार तुमच्या माझ्या अंगणात सुरू झाले तर मग ते बळ वापरून बंद होतील? आणि इथे निपजलाच एखादा महेंद्र कर्मा, तर किती लोक भरती होतील त्या 'सलवा जुडुम'मधे? परत एकदा, असो. मी माझ्या पद्धतीने आकलन वाढवायचा प्रयत्न करत राहीनच, आणि जमेल तेवढे करतही राहीन. त्याहून अधिक माझ्या हाती तरी काहीच नाही. बेस्ट लक टू ऑल ऑफ अस!
In reply to श्रावण मोडक by अमोल खरे
In reply to श्रावण आणि आळश्यांचा_राजा by बिपिन कार्यकर्ते
In reply to माझ्यामते ईंद्रराज पवार साहेब by डावखुरा
In reply to माझ्या मते नितीन थत्ते अगदी by अवलिया
In reply to +१ by टारझन
In reply to माझे by प्रदीप
In reply to माझ्या मते नितीन थत्ते अगदी by अवलिया
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to माझ्या मते नितीन थत्ते अगदी by अवलिया
In reply to नक्षवादासंबंधी काही वाचनीय लिखाण. by चिंतामणी
(त्यात साटेलोट्यची शक्यता नाकारता येत नाही)याला
In reply to आदिवासी.....! by इन्द्र्राज पवार
In reply to (लक्षात ठेवा : हा विषय by यकु
In reply to प्रश्न विश्वासाचा....! by इन्द्र्राज पवार
In reply to निकाल by श्रावण मोडक
In reply to मी सुद्धा!! by पिवळा डांबिस
In reply to आरारा... by श्रावण मोडक
In reply to विनोद सोडा! by पिवळा डांबिस
जर डॉक्टरसाहेब खरोखरच भारतीय घटना, संविधान किंवा लोकशाही किंवा एकंदरीत कायद्याच्या विरुद्ध काही बोलले-लिहिते झालेले नसतील तर त्यांना झालेली शिक्षा वरच्या न्यायालयात टिकणार नाही. आणि जर त्यांच्याकडून तशी कृती झालेली असेल तर त्यांचे त्यामागील हेतू वा पूर्वकार्य लक्षात न घेता त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.सहमत आहे.
पण बाकी हा मुद्दा इतका गहन का व्हावा हे मला कळत नाही.मुद्दा गंभीर होतोय, कारण, आत्ताचा खटला तितका साधा-सरळ झालेला नाही. त्या खटल्याने पायंडा पडण्याची भीती आहे. ती अनेकांना भेडसावते आहे. मी वर म्हटलं तसं, इथं मी जे लिहिलं तेही त्या न्यायाने राजद्रोहाचे ठरेल. माझे सोडून द्या. पण फील्डवर काम करणाऱ्या अनेकांपुढे यातून प्रश्न उभे ठाकणार आहेत. कारण तिथं काहींचा तरी नक्कीच या माओवाद्यांपैकी, माओवाद्यांचे नेते सोडून द्या, पण गावातल्या शेवटच्या माणसाशी तर संबंध येतोच येतो. नुसताच नाही, तर तिथं अनेक प्रकारची देवाणघेवाण होते. त्यात वैद्यकीय सेवा ही प्रमुख असते. शिक्षण हा दुसरा भाग. अशा प्रत्येक माणसावर असा आरोप लावून आत टाकणं आणि लटकवणं सरकारला शक्य होईल असा हा पायंडा आहे. या प्रकरणात सेन यांना जामीन मिळाला तोही प्रदीर्घ काळ तुरुंगात काढल्यानंतर. सर्वोच्च न्यायालयातून. आरोपीला जामीनही मिळत नाही असे कायदे आहेत आणि त्यांच्या आधारावर ही प्रक्रिया चालवली जाते आहे. आजचा निकाल पुढे टिकणार नाही हे खरे, पण तोवर काय? खालच्या कोर्टातली लढाई थोडीच चुकते. म्हणजे त्यात वेळ, पैसा, श्रम हे सारे आलेच. तितका काळ कामाचाही खोळंबा. राज्यसंस्थेच्या हाती हे नेमके कसले हत्यार जाऊन पडते आहे असा हा प्रश्न आहे. यामुळं मुद्दा गंभीर होतोय.
In reply to सहमत by श्रावण मोडक
In reply to निकाल by श्रावण मोडक
In reply to जामीन by नितिन थत्ते
In reply to जामीन by नितिन थत्ते
In reply to चर्चा by भवानी तीर्थंकर
In reply to अर्थ by नितिन थत्ते
In reply to चर्चा by भवानी तीर्थंकर
In reply to धन्यावद परा सेन ह्यांना by निनाद मुक्काम …
In reply to गोंधळ वाढतो आहे माझा! by बिपिन कार्यकर्ते
In reply to गोंधळ वाढतो आहे माझा! by बिपिन कार्यकर्ते
In reply to गोंधळाचे काही कारण नसावे....! by इन्द्र्राज पवार
तुम्हा आम्हाला (आणि इथल्या बहुतांशी सदस्यांना)...अगदी तळागाळापर्यंत जाऊन प्रतिकूल परिस्थितीही काम करणारे अगणित छोटेमोठे कार्यकर्ते जर माहित असतील तर न्यायालयीन पातळीवर काम करणार्या अधिकारी वर्गाला त्या व्यक्ती किंवा त्यांच्या कार्याची महती माहित नसेल असे मानण्याचे कारण नसते.माहिती असणे वेगळे आणि त्याविषयी नेमक्या धारणा असणे वेगळे. न्यायालयांमध्ये (म्हणजेच न्यायाधिशांमध्ये) धारणा नसतात? तेथील हे मानवी घटक खरोखरच भावनीक वगैरे न होता निखळ तर्कसगंतीने काम करतात? या प्रश्नांची माझी उत्तरे अनुक्रमे 'आहे' व 'नाही' अशी आहेत (माझी उत्तरे अपवादात्मक स्थितीसाठी आहेत, असे वाटल्यास म्हणूया).
देशद्रोह आणि कट याबद्दल अगोदरच शिक्षा सुनावण्यात आलेले माओवादी नेते नारायण संन्याल यांची तुरुंगात डॉ.सेन यानी वारंवार भेट घेतली होतीच आणि ती त्यानी नाकारलेलीदेखील नाही; जरी ते म्हणत असले की, त्यांच्या संन्याल यांच्याशी झालेल्या भेटी ह्या पी.यू.सी.एल. चा जनरल सेक्रेटरी या नात्याने घेतलेल्या होत्या.मुद्दा स्पष्ट होत नाही. वरकरणी जे दिसते त्यानुसार या न्यायाने कलम १२०(ब) सिद्ध झालेल्या गुन्ह्यात असा इतर कोणताही आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगाराची भेट घेणारा गुन्हेगार ठरू शकेल. सेन यांच्या प्रकरणात तर कलम १२० (ब)ची सिद्धता शंकातीत पद्धतीने झालेली नाही हे निकालपत्राच्या वाचनातून दिसून येते.
भारत सरकारने यापूर्वीच बंदी घातलेल्या 'माओईस्ट पॉलिटब्यूरो या संघटनेशी निगडीत असलेल्या पत्रव्यवहाराची त्यानी (डॉ.सेन) देवाणघेवाण करण्याचे प्रयोजन काय, हा न्यायालयाचा आक्षेप बचाव पक्षाला अनुत्तरीत करणारा ठरला.पुन्हा एकदा निकाल वाचून घेतला. हाही आरोप संशयातीत पद्धतीने सिद्ध झालेला नाही. कारण त्याला पुरेशा पुराव्यांचा आधार नाही. सेन यांचे म्हणणेच आहे की, हे पत्र त्या धाडीमध्ये पोलिसांनीच गुंतवले. त्यावरचे संशयातीत स्वरूपातील उत्तर नाही. (अवांतर: या पत्रावर काही सही वगैरे नाही. म्हणजे, कायद्याच्या दृष्टीने तो पुरावा ठरू शकत नाही. आता, त्यापलीकडे, माओवादी पत्रावर सही कशाला करतील हा एक मुद्दा असू शकतो. तो मान्य. पण त्याहीपलीकडे सेन जर थेट तुरुंगात भेटू शकत असतील तर माओवादी पत्रं पाठवतील? छ्या. हा त्यांचा 'अवमान' आहे. सेन यांच्यासारखा शिकलेला माणूस भेटत असतो तेव्हा लेखी पुरावा काही देऊ नये, नव्हे तो देण्याची गरज नाही, हे न कळण्याइतके ते बावळट किंवा मूर्ख नाहीत. त्यांना असे समजून जाणारी सरकारेच मूर्ख आहेत आणि म्हणून हे असले प्रश्न निर्माण होतात.)
न्यायाधिशांनी शिक्षा सुनावताना आणखीन एका बाबीची देखील गंभीर दखल घेतल्याचे दिसते. डॉ.बिनायक सेन यांच्या पत्नी ईलिना सेन छत्तीसगड येथे नागरी स्वातंत्र्यासाठी "रूपांतर" नावाची जी संस्था चालवितात, ती अधिकृत तर नाहीच, शिवाय देशद्रोहाचे आरोप सिद्ध झालेले (पण अद्यापि फरार) नक्षलवादी शंकर सिंग आणि मालती ह्या रुपांतरसाठी काम करीत आहेत, व त्याना आसरा खुद्द डॉ.सेन यानीच दिला होता.ही बाब गंभीर आहे. शंकर आणि मालती यांच्या संदर्भातील आरोपही समाविष्ट झाले पाहिजेत. किंवा ते स्वतंत्रपणे गुन्हा म्हणून तरी सिद्ध झालेले असले पाहिजेत आणि तसे दिसत नाही. या बाबींचा सरकारने काय फैसला केला, असे न्यायाधिशांनी विचारले आहे का? या नक्षलवाद्यांना आसरा दिल्याबद्दल विनायक सेन हे आणि 'रुपांतर'च्या जबाबदार म्हणून इलिना सेन याही आधी आरोपी आणि आरोप सिद्ध झाले तर गुन्हेगार ठरतात. तसे झाले आहे? किंवा न्यायाधिशांनी तसे काही विचारले आहे? 'रुपांतर' अधिकृत नाही म्हणजे काय? ती नोंदणी झालेली नाही, असेच का? तसे असेल, त्याने काय बिघडते? बिघडते फक्त एकाच गोष्टीत - शंकर आणि मालती यांच्याशी असलेला संबंध. अशा मामल्यातही गुन्हा दाखल करायचा आणि न्यायप्रक्रिया चालवायची हे न्यायाधिशांना, आणि सरकारलाही माहिती नाही? तो गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच निकालपत्रात त्याचा आधार? (ताजा कलम: निकालाच्या वाचनातून दिसते ते असे की, 'रुपांतर'शी संबंधित शंकर हा माओवादी असल्याचे फक्त आरोप आहेत. तो सिद्ध गुन्हेगार नाही. मालती नावाची एक माओवादी आहे, पण ती हीच रुपांतरमध्ये काम करणारी हे संशयातीत सिद्ध झालेले नाही. म्हणजे हा आधारही पक्का नाही. हा निकाल वाचला की या खटल्याचा दर्जा काय आहे हे कळते. बाकी लिहिण्याची गरजही पडत नाही. इच्छुकांनी विनायक सेन यांच्यासंबंधी http://www.binayaksen.net या संकेतस्थळावर जाऊन आधी हा निकाल वाचावा. आपली मते बनवावीत, अशी विनंती. नंतर त्यानी या संस्थळावरील इतर लेखन, निकालाविषयीची टिप्पणी वगैरे वाचन करण्यास हरकत नाही.)
In reply to गोंधळाचे काही कारण नसावे....! by इन्द्र्राज पवार
In reply to गोंधळाचे काही कारण नसावे....! by इन्द्र्राज पवार
In reply to श्रावण मोडकांशी सहमत आहे. by नितिन थत्ते
In reply to सहमती...! by इन्द्र्राज पवार
"सहमती"..." + १, + २", "छान चर्चा..." "चालू दे"....अशा टिपण्यांनी काय असे भरीव साध्य होते?बर्याचदा , पान-दोन पान भर रतिब घातलेल्या टिपण्यांनी पण काय भरिव साध्य होते ? असा प्रश्न पडतो :) टीप : हा प्रश्न कोण्या एकाला उद्देशुन नैय्ये काय ;)
In reply to "सहमती"..." + १, + २", "छान by टारझन
In reply to सहमती...! by इन्द्र्राज पवार
In reply to ह्या सर्व प्रकरणात एक मुद्दा by निनाद मुक्काम …
In reply to श्री. निनाद, हा मुद्दा योग्य by बिपिन कार्यकर्ते
In reply to श्री. निनाद, हा मुद्दा योग्य by बिपिन कार्यकर्ते
In reply to @या घटनेचे भारतिय समाजावरील by निनाद मुक्काम …
In reply to मत...!! by इन्द्र्राज पवार
दोन दिवस येथील श्री.श्रावण मोडक, श्री.बि.का. आणि आजची खुद्द श्री.थत्ते यांच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर परत माझे असे मत बनत चालले आहे की, आपण दोन विषय एकत्र मिसळून पहिल्या विषयावरील वजन निकालाच्या तराजूत टाकून डॉ.सेन यांची शिक्षा हा एक भावनिक प्रश्न बनवित चाललो आहोत.खरे तर, इतर दोघांच्याही वतीने, पण माझ्यापुरता तरी नक्कीच, असहमत. माझे याआधीचे प्रतिसाद पुरेसे बोलके आहेत. येथे त्यातूनच काही वाक्ये पेस्ट करतो - या मजकुरात आत्ता मुद्दाम काही वाक्ये जाड ठशात देतो. पहिला प्रतिसाद वरच्या कोर्टात हा निकाल टिकणार नाही. तकलादू आधारावर तो उभा आहे. निकाल टिकला तर सेन यांनी शिक्षा भोगली पाहिजे. "माझ्या धारणेचा विचार करता, मी गुन्हा केला नाही, पण तुम्ही त्याला गुन्हा मानत असाल तर मी शिक्षा भोगेन" ही भूमिका असली पाहिजे. संपूर्ण न्याय होण्यासाठी सेन यांच्या एकूण भूमिकेची झाडाझडती झाली पाहिजे. सेन यांच्याच नव्हे तर त्यांच्यासारख्या ज्या कोणाला माओवाद्यांचे सहानुभूतीदार म्हटले जाते त्या साऱ्यांच्याच. हिंसेच्या आधारावर उभ्या राहणाऱ्या गोष्टींचा त्यातून स्वीकार होतो आहे का, हे पाहिले पाहिजे. तसे होत असेल तर त्या मंडळींना अशा शिक्षांना सामोरे जावेच लागेल. हिंसेचा अस्वीकार करताना शासनाचीही हिंसा अस्वीकृत मानली जाते आणि म्हणून त्याचा अर्थ प्रतिपक्षाच्या (म्हणजेच इथे माओवाद्यांच्या) हिंसेचा पुरस्कार असा घेतला जाणार असेल तर बाकी चर्चेची गरज नाही. निकाल लागला आहे. सेन यांनी न्यायप्रक्रियेला सामोरे जावे. दुसरा प्रतिसाद सेन यांच्या प्रकरणात एक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि तिला आव्हान देण्याची सोय उपलब्ध आहे; त्यामुळे त्याचा पुढे फैसला होत राहणार आहे. हे सारे खरे असले तरी, इंद्रराज यांचा वरील प्रतिसाद वाचता सध्याच्या प्रक्रियेचे इतके सोपेकरण होते आहे का असा प्रश्न निर्माण झालाच, आणि तसे होत असल्यास ते इंद्रराज यांच्याकडून होत असल्याने अधिक धोकादायक. माझा मुद्दा येथे फक्त न्यायालयीन प्रक्रियेपुरता मर्यादित आहे. सेन वगैरेंच्या भूमिकांची झाडाझडती झाली पाहिजे, ही माझी भूमिका कायम आहे. शंकर आणि मालती यांच्या संदर्भातील आरोपही समाविष्ट झाले पाहिजेत. किंवा ते स्वतंत्रपणे गुन्हा म्हणून तरी सिद्ध झालेले असले पाहिजेत आणि तसे दिसत नाही. या बाबींचा सरकारने काय फैसला केला, असे न्यायाधिशांनी विचारले आहे का? या नक्षलवाद्यांना आसरा दिल्याबद्दल विनायक सेन हे आणि 'रुपांतर'च्या जबाबदार म्हणून इलिना सेन याही आधी आरोपी आणि आरोप सिद्ध झाले तर गुन्हेगार ठरतात. तसे झाले आहे? किंवा न्यायाधिशांनी तसे काही विचारले आहे? 'रुपांतर' अधिकृत नाही म्हणजे काय? ती नोंदणी झालेली नाही, असेच का? तसे असेल, त्याने काय बिघडते? बिघडते फक्त एकाच गोष्टीत - शंकर आणि मालती यांच्याशी असलेला संबंध. अशा मामल्यातही गुन्हा दाखल करायचा आणि न्यायप्रक्रिया चालवायची हे न्यायाधिशांना, आणि सरकारलाही माहिती नाही? तो गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच निकालपत्रात त्याचा आधार? या दुसऱ्या प्रतिसादातील प्रश्न विचारणे म्हणजे या मुद्याचा भावनिक प्रश्न करणे होत नसावे. या निकालाची स्वतंत्रपणे मीमांसा होऊ शकते. ती करावयाची असेल तर त्याचीही तयारी आहे. पण माझा मुद्दा सेन वगैरेंसारख्यांच्या भूमिकेची झाडाझडती हा होता (म्हणजे बिका म्हणतात, त्यापेक्षा माझा सूर वेगळाच आहे). पण तो बाजूला ठेवू. निकालाची मीमांसा करू. सवडीने लिहितो.
पण त्यामुळे आत्ता झालेल्या शिक्षेविरूद्ध जर काही बोलायचे असेल जिल्हा न्यायमूर्तीना नावे ठेवून नव्हे तर ते हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावूनच.शिक्षेविरुद्ध बोलायचे तीन प्रकार आपली घटना आपल्याला देते - कोर्ट, विधिमंडळ आणि शासनव्यवस्था. मो.क.गांधींना शिक्षा झाली तो कायदा भारतावरील ब्रिटिश राज्याला घातक होता. न्यायाधीश ब्रूमफील्ड यांचे हात बद्ध असले, तरी सेडिशन कायद्याने ब्रिटिश सरकारच कालांतराने धोक्यात येणार आहे, याबद्दल तत्कालीन व्हाईसरॉयने डोळे उघडे ठेवायला हवे होते, आणि त्याच्या विधिमंडळाने आणि सल्लागारांनी योग्य निर्णय घ्यायला हवा होता. आपल्या भारतीय लोकशाहीचे व्हाईसरॉय, आणि विधिमंडळाचे सल्लागार, म्हणजे कोण - तर आपण लोकच. सध्याचा "छत्तिसगड विशेष सुरक्षा अधिनियम" जर भारताच्या लोकशाही शासनपद्धतीला दीर्घकाळात घातक ठरू शकेल, किंवा त्याची शासनाकडून अंमलबजावणी जर हल्लीच्या लोकशाही शासनपद्धतीला घातक ठरू शकेल, तर त्याच्याविरुद्ध युक्तिवाद करणे, किंवा प्रचार करणे आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षितच आहे. आपले कर्तव्य आहे. असा युक्तिवाद करताना घडलेल्या या खटल्याचा तपशीलवार विचार करणेही ओघानेच येते. म्हणजे विचार नुसता सैद्धांतिक होत नाही - खर्या माणसांबद्दल, खर्या परिस्थितीबद्दल युक्तिवाद आहे, हे ठीक लक्षात येते. महाराष्ट्रातील उदाहरणे घ्यावीत, तर डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटे यांनी उघड-उघडच सांगितले आहे की जेथवर आरोग्यसेवा पुरवण्याची बाब आहे, तेथवर त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध येतात. त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य डॉ. बिनायक सेन यांच्या अटकेच्या संदर्भात केलेले आहे. डॉ. बंग हे आजकाल फक्त आरोग्यसेवा पुरवत नाहीत. अनेक प्रकारची सामाजिक कार्ये करतात. वेगवेगळी कल्याणकारी कार्ये सुरळित व्हावी, म्हणून क्षेत्रातील हिंसक गटांशी संबंध येतच असतील. भारतीय राज्यघटना मुळात लोकशाही, स्वातंत्र्यवादी आणि कल्याणकारी आहे. असे असल्यामुळे लोकांना जुलूम वाटणार नाही, आणि भारत दीर्घ काळ टिकून राहील, असे घटनाकारांचे शाहाणे धोरण आहे. मतभिन्न लोकांचे स्वातंत्र्य बेबंद असले, तर अनेक संघर्ष होतात, म्हणून काही स्वतंत्र अभिव्यक्तीवर आणि काही स्वतंत्र कृतींवर बंधन आणले जाते, ते ठीकच आहे. पण ही बंधने मुळातल्या स्वातंत्र्याचा, लोकशाहीच्या आणि कल्याणाच्या मानाने दुय्यम आहेत. मुळातले व्यापक स्वातंत्र्य टिकते, तिथवरच ही दुय्यम बंधने ग्राह्य असतात. जर दुय्यम कायदे स्वातंत्र्याच्या, लोकराज्याच्या, किंवा कल्याणाच्या मुळावर घाव घालत असतील, तर आपला भारत दीर्घ काळ शांत-समृद्ध टिकण्यावरच संकट येते. अशा परिस्थितीत शासनाने या दुय्यम कायद्यांची अंमलबजावणी कशी करावी? आणि विधिमंडळाने दुय्यम कायद्यांमध्ये काय फरक करावा? ही चर्चा सुसंदर्भ आणि उचित आहे. सत्र न्यायालयाने आपला निर्णय प्रसिद्ध केलेला आहे, त्याबद्दल टीका करणेही ठीकच आहे. मिसळपावावर वेगवेगळ्या न्यायालयीन निकालांवर टीका आधीही झालेली आहे. (कुठल्याशा मुसलमानविरोधी पुस्तकावरची शासकीय बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली, त्या निर्णयातील युक्तिवादांबद्दल मिसळपावावर साधक-बाधक चर्चा झाल्याचे आठवते. श्री. विकास चर्चाप्रस्तावक होते, जमल्यास ते चर्चेचा दुवा देतील.) शासनाने आणि पोलिसांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्य करावे, असा कायदा आहेच. लोकांकडून निर्णयाची टीका झाली, उच्च न्यायालयात खटला उलटेल अशी भाकिते झाली, म्हणून त्या कारवाईत काही बाधा येत नाही.
In reply to मुद्दा by नितिन थत्ते
In reply to त्या मार्गाने जाउन प्रश्ण सुटणार आहेत का? by चिंतामणी
In reply to आजच बर्याच नामंवत लोकानी ह्य शिक्षेविषयी by वेताळ
In reply to सलवा जुडुम by विनायक बेलापुरे
In reply to सलवा जुडुम by नितिन थत्ते
In reply to सलवा जुडुम by नितिन थत्ते
संपूर्ण न्याय होण्यासाठी सेन यांच्या एकूण भूमिकेची झाडाझडती झाली पाहिजे. सेन यांच्याच नव्हे तर त्यांच्यासारख्या ज्या कोणाला माओवाद्यांचे सहानुभूतीदार म्हटले जाते त्या साऱ्यांच्याच. हिंसेच्या आधारावर उभ्या राहणाऱ्या गोष्टींचा त्यातून स्वीकार होतो आहे का, हे पाहिले पाहिजे. तसे होत असेल तर त्या मंडळींना अशा शिक्षांना सामोरे जावेच लागेल.याच्याशी सहमत.
हिंसेचा अस्वीकार करताना शासनाचीही हिंसा अस्वीकृत मानली जातेहे श्रामोंचे मत आहे की कसे ते समजले नाही. शासनाची हिंसा ही कायद्याच्या पाठबळावर उभी असते - ऑफेन्सिव्ह नसते, डिफेन्सिव्ह असते. त्यामुळे शासन ज्यावेळी (कायदेशीर ) बळाचा वापर करते, त्यावेळी अशा वापराला माझ्या मते हिंसा म्हणता येणार नाही. त्यामुळे माझ्या मते शासनाची हिंसा अस्वीकृत असू नये. हिंसक आंदोलन संपवण्यासाठी शासनाने हिंसक पावले उचलणे आवश्यक असू शकते, ते डिफेन्सिव्ह पाउल असते. (त्याला मुळात हिंसा म्हणणेच योग्य नाही.) आपल्याला 'नक्षलवाद' मान्य आहे की नाही इथपासून विचाराला सुरुवात व्हावी असे वाटते. कारण या प्रश्नावर तटस्थपणे चर्चा होऊ शकत नाही. कोणतीतरी एक भूमीका घ्यावीच लागते. यात नक्षलवाद्याची भूमीका काय असेल, सिन्सियर पोलीसाची काय असेल, नक्षलवादाशी संबंध नसलेल्या खेडूत आदिवासीची (संबंध नसेल म्हणजे, तो फक्त वापरला जातो/ नाडला जातो, त्याचे मत बित काही नसते) काय असेल, नक्षलग्रस्त राज्यातील सरकारची काय असेल, याचा विचार करुन आपण - (मी गृहीत धरतो, आपण म्हणजे, नक्षलग्रस्त भागापासून दूर असणारे, शहरी/ निमशहरी भागात राहणारे मध्यमवर्गीय) कुठे उभे आहोत, आणि आपली भूमीका काय असायला हवी याचा विचार केला पाहिजे. त्यातून विनायक सेन यांच्या भूमीकेची झाडाझडती घेतली जाऊ शकते. ''मी माओवाद्यांच्या हिंसक मार्गांचा निषेध करतो. त्यासोबतच, शासनाच्याही हिंसक पद्धतींचा निषेध करतो. माओवाद्यांना टेबलवर (चर्चेच्या!) बोलवा." अशी काहीशी भूमीका विनायक सेन ''पोज'' करतात असे मला वाटते. तसे असेल, तर ही ''पोज'' इंटरेस्टिंग आहे.
ती भूमिका आणि वर इंद्रराज पवार यांनी दिलेला इशारा एका चौकटीत बसवला तेव्हा हे ध्यानी आले की, या भूमिकेबद्दल मलाही तशीच शिक्षा होऊ शकते. आता इथे हे जे लिहिले आहे, ते लेखन म्हणजेच राजद्रोहाचा कबुलीजबाब मानला जाऊ शकतो बहुदा.हे समजले नाही.
In reply to इंटरेस्टिंग by आळश्यांचा राजा
In reply to इंटरेस्टिंग by आळश्यांचा राजा
हिंसक आंदोलन संपवण्यासाठी शासनाने हिंसक पावले उचलणे आवश्यक असू शकते, ते डिफेन्सिव्ह पाउल असते. (त्याला मुळात हिंसा म्हणणेच योग्य नाही.)तत्वतः सहमतच. या तत्वाची अंमलबजावणी कशी होते यातून प्रश्न निर्माण होतात. लोक अहिंसक पद्धतीनं आंदोलन करत असतात तेव्हा शासन त्याची दखल घेत नाही. हिंसा केली की दखल घेतली जाते, असे होते. अशावेळी शासनाकडून होणाऱ्या कारवाईला हिंसा ठरवून त्याचा निषेध होणारच. आता त्याचे परिमार्जन करण्याऐवजी शासन जर त्याचे फक्त समर्थन करण्याच्या मागे लागते. असा निषेध होणार आहे, हे स्वीकारून त्याला थोडं संवेदनशीलतेनं उत्तर द्यायचं झालं तर मग आधीच्या मुद्यावर थोडी 'माघार' घेत काही सकारात्मक पावले उचलून पुढे जाता येते. पण अशी 'माघार' शासनातील व्यक्तींचे इगो आड येतात. मग प्रश्न गुंतागुंतीचे होतात. अशा परिस्थितीतून पुढे शासनाने हिंसक म्हणता येईल अशी कारवाई कितपत करायची एवढा मुद्दा महत्त्वाचा. स्थिती तितकी सरळ राहिलेली नाही. अशा सकारात्मक पावलांनाही आव्हान दिले जाते आहे हे वास्तव आहे. ते मोडून काढावे लागेलच. माओवादी प्रश्नाचे उदाहरण घ्यायचे झाले तर हे कसे मोडून काढणार? एखादे गाव माओवादी ठरवून गावाला आत टाकून? आपल्या जमिनी क्षमता विस्तारून त्याआधारे अधिक उत्तम गुप्तमाहिती मिळवून, पोलिसींग सुधारून या गावाला त्या मार्गावर नेणाऱ्या मुखंडांना जेरबंद करून? माझ्या मते दुसरा पर्यायच स्वीकारला पाहिजे आणि त्यासाठी थोडी कळ सोसण्याची तयारी हवी. हा व्यवहारातील भाग मुद्दाम लिहिला. एरवी पहिल्याच वाक्यात म्हटलं तसं तत्वतः सहमत.
आपल्याला 'नक्षलवाद' मान्य आहे की नाही... यात नक्षलवाद्याची...आणि आपली भूमीका काय असायला हवी याचा विचार केला पाहिजे.अगदी, अगदी. मी आधीही म्हटलं आहे आणि पुन्हाही म्हणतो. हिंसेच्या आधारावर उभे राहणारे तत्वज्ञानच नामंजूर (त्यामुळेच तर मी चारू, कनू यांचा नक्षलवाद समर्थनीय आणि आजचा म्हणजे गुंडगिरी असले भेदही करत नाही. चारू, कनू यांचाही नामंजूर, आणि म्हणूनच आजचाही नामंजूर). नामंजूर केलं. म्हणून निषेधही केला. पुढे? पुढे प्रश्न सोडवण्यासाठी पावले तर उचलावी लागतीलच. ती कुणी उचलायची? सरकारनेच. आता अशावेळी पुन्हा वर म्हटलं तसं गाव जेरबंद करून प्रश्न सोडवणार आहोत का? एकदा त्याचाही फैसला झाला पाहिजे. दिलेले शस्त्र हाती घेऊन उभा असलेल्या खेडूत, गावकरी, आदिवासीला खरेच माओ किंवा मार्क्स वगैरेंशी काही देणेघेणे असते? शस्त्राच्या आधारे प्रश्न सोडवण्याचे तत्वज्ञान करणारे मोजके असतात, त्यांच्या अनुयायांची संख्या मोठी असते. त्या दोघांमध्ये भेद न करता, त्यांना प्रतिपक्ष म्हणून एका मापात मोजतो आहोत. आणि त्यांना शत्रू ठरवून निघतो आहोत कारवाई करायला असंही आहे ना चित्र. त्या चित्रापुरता माझा 'नक्षलवाद्यांशी', 'माओवाद्यांशी' चर्चा व्हावी याला पाठिंबा आहे. ही चर्चा करण्याइतपत राजकीय मुत्सद्देगिरी, प्रतीपक्षात नेमका भेद करण्याची कुवत व्यवस्थेत नसेल तर ते व्यवस्थेचे अपयश आहे. ते अपयश दूर करायचे आणि तोवर सकारात्मक पावलांसाठी थोडी अधिक किंमत मोजायची, की व्यवस्थेत ती मुत्सद्देगिरी नाही यासाठी प्रतिपक्ष हा शत्रूच आहे असे म्हणून त्याचा निकाल म्हणजे प्रश्नाचा निकाल अशी कारवाई करायची का इतकाच काय तो प्रश्न आहे. त्याचे उत्तर मी नाही असे देईन. ज्या भूमिकेवरून मलाही शिक्षा होऊ शकते, असे मी म्हटले आहे, ती भूमिका आणि या धाग्यात मांडलेल्या भूमिकांचे सार एकच आहे. या भूमिकेमध्ये मी सरकारी कारवाईचा विरोधक ठरतो आहे. त्यावरून मीही राजद्रोही ठरू शकतो असा युक्तिवाद अशा कायद्यांखाली होऊ शकतो. आणि बिनायक सेन यांच्या खटल्यातील निकालाची स्थिती पाहता तो स्वीकारला की काम झाले. मी आत जाईन.
In reply to हिंसा, नक्षलवाद... by श्रावण मोडक
स्थिती तितकी सरळ राहिलेली नाही. अशा सकारात्मक पावलांनाही आव्हान दिले जाते आहे हे वास्तव आहे. ते मोडून काढावे लागेलच.नक्षलवाद्यांशी चर्चेचा मुद्दा : शासनाने दमन न करता चर्चा करावी अशी जी भूमीका आहे, त्याविषयी. नक्षलवादाला चर्चा मान्यच नाही. चर्चा करण्यासाठी शासनाला भाग पाडावे या हेतूने, शासनाला 'दखल' घ्यावी लागावी या हेतूने नक्षल हिंसा करत नाहीत. यावर आपले मत काय? माझ्या मते नक्षल हिंसा सोडू शकत नाहीत. त्यांच्या फिलॉसॉफीचे ते अभिन्न अंग आहे. उद्या समजा ते सत्तेवर आले, तर पहिली गोळी डॉ. विनायक सेन यांना प्रदान करण्यात येईल. (फार बोलतात म्हणून.) हे एक. दुसरे, चर्चा केली. समजा. झाली. उत्तम चर्चा झाली. समस्या सुटण्याची चिन्हे दिसली. मग काय नक्षली बंदूक खाली ठेवणार म्हणता? विसरा. ते म्हणणार, सरकारने चर्चेत काही आश्वासने दिलीत, ती नीट राबवली जातात की नाही ते बघण्यासाठी 'प्रेशर' ठेवणे आवश्यक आहे, त्यासाठी बंदूक पाहिजे. मग शासनाने काय करावे? हे प्रतिशासन निमूटपणे चालवून घ्यावे? हे विनायक सेन यांना समजत नसेल असे वाटत नाही. तरीही ते चर्चेचा मुद्दा लावून धरत असतील, तर ते या आंदोलनाचे दमन करु पाहणार्या यंत्रणेला त्रासदायक वाटू शकतात. बाकी - समस्या सुटत नाही, शासनाचे अपयश, दमनमार्गाच्या मर्यादा, त्यातून वाढणारे अजून काही प्रश्न, भरडले जाणारे आदिवासी तसेच अन्य नागरिक - याबद्दलच्या भाष्याबद्दल सहमत. जरा वेगळ्या शब्दांत नक्षलवाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही. त्यांनाच चर्चा नको आहे. समस्या त्यांनाच हव्या आहेत. समस्या संपल्या तर नक्षलवादही संपायला हवा. अशी आत्महत्या कशाला करतील ते? आपण मस्त धुडगूस घालायचा. खापर शासनाच्या निष्क्रियतेवर, भ्रष्टाचारावर, दमनशाहीवर फोडायचे असा मस्त बेत आहे. समस्या सोडवण्यासाठी आपली काहीच जबाबदारी नाही. फक्त दंगा करायचा. इलेक्शनमध्ये भाग घ्यायचा नाही. कशाला नस्ती अकौंटिबिलिटी? आपण गांजलेले, पीडित. आपण आपल्यासारख्या अन्य पीडितांचे कैवारी. अशी भूमीका असणार्यांशी काय चर्चा होणार आहे? मग यांच्याशी चर्चा करा, गोळ्या घालू नका, कारण त्यातल्या निम्म्या गोळ्या निरपराधांना लागतात असे कुणी म्हणू लागले, तर त्याला शासन 'आत' टाकणार नाही तर काय मुख्यमंत्री करणार? म्हणजे निरपराध चिरडले जातात त्याला जबाबदार शासन. नक्षलवादी नाही. का, तर शासनाने विकासाकडे दुर्लक्ष केले म्हणून नक्षल तयार झाले - अशी अत्यंत सोयीची तर्कटी भूमीका यामागे आहे. शासनाने विकासाकडे दुर्लक्ष केले म्हणून नक्षल्यांनी काय केले विकासासाठी हा प्रश्न डॉ विनायक सेन विचारत नाहीत, ते चतुरपणे एवढेच म्हणतात, मला नक्षल्यांचे हिंसक मार्ग पसंत नाहीत. त्यांची हिंसेची आणि अहिंसेची कल्पनादेखील सोयीस्कर असते. केवळ बंदूक न वापरणे म्हणजे अहिंसा का? कंस्ट्रक्टिव्ह मार्गाने काम करून शासनाला दखल घ्यायला भाग पाडता येते. झळाळते उदाहरण राजेन्द्र सिंह, राजस्थान - जोहड वाले. आपले अण्णा हजारे तर आहेतच. (त्यांच्या उपोषणाला मात्र मी हिंसा मानतो. दबाव आणणे ही हिंसा झाली.) "करेंगे या मरेंगे" ही माझ्या मते अहिंसक मार्गाची व्याख्या आहे. करेंगे , म्हणजे, काहीतरी अॅसर्टिव्ह काम. रास्ता रोको वगैरे मार्ग अहिंसक नव्हेत. नक्षलवादी फार फार लांब आहेत यापासून. ते कसलेही अॅसर्टिव्ह काम करत नाहीत. माओने त्याच्या लाँग मार्चमध्ये जमिनीचे फेरवाटप केले होते. यांनी काय केले आहे? हे कसले माओवादी? असो. डॉ विनायक सेन यांच्या भूमीकेची झाडाझडती हाच माझ्या दोन्ही प्रतिसादांचा मुद्दा होता. तर त्यांची भूमीका माझ्या मते कुठे अहिंसक दिसत नाही. हिंसेच्या निषेधाच्या नावाखाली जबाबदारी शासनावर ढकलायची, आणि अप्रत्यक्षरीत्या नक्षलवाद अनिवार्य असल्याचे भासवायचे अशी काहिशी ती भूमीका मला तरी वाटते. बाकी निकालाबद्दल आणि न्यायव्यवस्थेबद्दल इंद्रा आणि श्रामोंनी लिहिलेले वाचतो आहे, समजून घेत आहे.
In reply to हिंसा, अहिंसा, चर्चा by आळश्यांचा राजा
In reply to आ रा- एकदम भारी. by चिंतामणी
या निमित्ताने ज्या भागात माओवादी झपाट्याने पसरत आहेत तेथिल लोकांची चाललेली लुबाडणूक, त्याबाबत डॉ. सेनसारख्या लोकांनी उठवलेला आवाज, आणि सरकारने नेहमीच्या पद्धतीने आरंभलेला दडपशाहीचा वरवंटा हे सगळेच परत ऐरणीवर येत आहे.कालच्या बातम्या सर्वांनीच वाचल्या/पाहील्या असणार. "सलवा जुडुम" या मोहिमेचे जनक श्री.महेंद्र कर्मां यांनातर शेकडो गोळ्या मारण्यात आल्या. "सलवा जुडुम" विरोधात (तथाकथीत) मानवाधीकारी सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यात डॉ.सेन, अरुंधती रॉय यासारखे लोक होते. ह्या हल्ल्याची बातमी आता जगभर झाली आहे. आता हे (तथाकथीत) मानवाधीकारी कुठे आहेत? त्यांनी कोणतिही प्रतिक्रीया दिल्याचे वाचनात आले नाही. येथे डॉ.सेन आणि मानवाधिकार यांचे समर्थन करणा-यांनी आपले मत मांडावे. (या संबंधी फेसबुकवर एक छान लेख वाचनात आला.)
In reply to पुन्हा एकदा by चिंतामणी
"सलवा जुडुम" विरोधात (तथाकथीत) मानवाधीकारी सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यात डॉ.सेन, अरुंधती रॉय यासारखे लोक होते. ह्या हल्ल्याची बातमी आता जगभर झाली आहे. आता हे (तथाकथीत) मानवाधीकारी कुठे आहेत? त्यांनी कोणतिही प्रतिक्रीया दिल्याचे वाचनात आले नाही.अहो माओवादी म्हणजे सशस्त्र गांधीवादी आहेत हे तुम्हाला माहित नाही का? (हा उपरोध आहे हे वेगळे सांगायलाच नको). अहो या मानवतावाद्यांना आपले दुकान चालवायचे असते आणि माओवाद्यांना पाठिंबा देऊन यांना प्रसिध्दी मिळतेच आणि कदाचित पैसेही मिळत असावेत.मग ते आपले दुकान बंद कसे करतील?
In reply to दुकान by क्लिंटन
In reply to क्लिंटन, एक प्रामाणिकपणे by बिपिन कार्यकर्ते
तू जसे म्हणतो आहेस, खरंच गोष्टी इतक्या सरळ / एकपदरी असतात का?पण नक्षलवादी हिंसेचा कधीच निषेध या मानवतावाद्यांनी न केल्यामुळेच तर माझ्यासारख्यांना असे म्हणणे भाग पडते.माओवादी म्हणजे Gandhians with guns असे म्हणणार्या व्यक्तीनेच माओवाद्यांमध्ये महात्मा गांधींचे कोणते गुण आढळले हे स्पष्ट केलेले बरे.The onus is on her. (अरूंधती रॉयचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन
In reply to प्रामाणिक उत्तर by क्लिंटन
In reply to धन्यवाद! by बिपिन कार्यकर्ते
In reply to सहज एक माहिती इथे देतो : by बिपिन कार्यकर्ते
In reply to तुमच्या बद्दल पूर्ण आदर राखून by पिंपातला उंदीर
उद्या हे माओ वादी आपल्या पण आंगणात प्रवेश करणार आणि आम्ही दर महा एक उतपन्न मिळवतो म्हणून आमचे पण मनसोक्त शिरकाण करणार. जे रशिया मधे झाले जे सगळ्याच साम्यवादी देशात झाले तेच इथे पण होणार.डावे विचार (?) आणि हिंसा हे कायमच एकत्र असतात.कम्युनिझम या एका विचारसरणीने (?) जगात अगदी हिटलरपेक्षा जास्त रक्तपात घडवून आणला आहे. हिंसेची ० ते १०० अशी स्केल केली तर ० वर फारच क्वचित डावे सापडतील.नक्षलवादी हिंसेच्या बाबतीत १०० वर असतील तर अरूंधती रॉयसारखी माओवाद्यांना पाठिंबा देणारी किमान १० वर धरायला हवी---निदान ० वर नक्कीच नाही. तेव्हा डावे म्हटले की हिंसा आलीच.म्हणूनच लाल रंगाच्या सगळ्या छटांना विरोध करायला हवा. डायनासोर जसे केवळ पुरातन काळाशी संबंधित पुस्तकात दिसतात आणि प्रत्यक्षात त्यांच्यासारख्या कुठल्याही प्राण्याचे अस्तित्व नाही तसे कम्युनिस्टांचे व्हायला हवे. (माझ्या माहितीतील इतर कोणापेक्षाही डाव्यांचा जास्त विरोध करणारा आणि डाव्यांचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन
In reply to डावे आणि हिंसा by क्लिंटन
In reply to डावे आणि हिंसा by क्लिंटन
डावे विचार (?) आणि हिंसा हे कायमच एकत्र असतात.कम्युनिझम या एका विचारसरणीने (?) जगात अगदी हिटलरपेक्षा जास्त रक्तपात घडवून आणला आहे. हिंसेची ० ते १०० अशी स्केल केली तर ० वर फारच क्वचित डावे सापडतील.नक्षलवादी हिंसेच्या बाबतीत १०० वर असतील तर अरूंधती रॉयसारखी माओवाद्यांना पाठिंबा देणारी किमान १० वर धरायला हवी---निदान ० वर नक्कीच नाही. तेव्हा डावे म्हटले की हिंसा आलीच.म्हणूनच लाल रंगाच्या सगळ्या छटांना विरोध करायला हवा. डायनासोर जसे केवळ पुरातन काळाशी संबंधित पुस्तकात दिसतात आणि प्रत्यक्षात त्यांच्यासारख्या कुठल्याही प्राण्याचे अस्तित्व नाही तसे कम्युनिस्टांचे व्हायला हवे.सहमत.
In reply to सहज एक माहिती इथे देतो : by बिपिन कार्यकर्ते
Even while, politicians across the political spectrum are terming this as an attack on democracy, let us not forget that every time an adivasi is jailed, killed, their houses burnt, women raped and their schools occupied to facilitate resource grab or termed as collateral damage in the 'Operation Green Hunt', democracy is attacked and the faith of citizens in the State's ability to uphold justice and rule of law, shaken. Violence on both sides is condemnable and should be avoided forever.मागे झलेली चर्चा वाचली असेलच. पण काही मुद्दे कदाचीत विसरला असाल. मला एक सांगा की हे नक्षलवादी म्हणजेच त्यांचे नेते हे कितीवेळा चर्चेला तयार झाले?? डेमॉक्रसी म्हणजे काय? जर यांची आदिवसी जनतेवर पकड असेल तर हे निवडणुकीचा मार्ग का वापरत नाहीत. सलवा़ जुडुममुळे यांची दहशत कमी झाली म्हणून आणि नवी कुमक मिळेना (मनुष्यबळ) हेच लोक जे हिंसा करीत आहेत ते घरे जाळणे इत्यादी गोष्टी करु शकत नाहीत का? किंबहुन स्वत:ची दहशत बसण्यासाठी यांनी असले उद्योग केले नाहीत का? चुका दोन्ही बाजुकडुन झाल्या असतील. नव्हे झाल्या आहेत. पण भाबड्या आदिवासींना आपल्या हाताशी धरुन आणी परदेशी मदतीच्या जोरावर हे नक्षलवादी हिंसाच करतात हे सत्य आहे.
In reply to हिंसा, अहिंसा, चर्चा by आळश्यांचा राजा
हिंसेच्या आधारावर उभे राहणारे तत्वज्ञानच नामंजूर (त्यामुळेच तर मी चारू, कनू यांचा नक्षलवाद समर्थनीय आणि आजचा म्हणजे गुंडगिरी असले भेदही करत नाही. चारू, कनू यांचाही नामंजूर, आणि म्हणूनच आजचाही नामंजूर). शस्त्राच्या आधारे प्रश्न सोडवण्याचे तत्वज्ञान करणारे मोजके असतात, त्यांच्या अनुयायांची संख्या मोठी असते. त्या दोघांमध्ये भेद न करता, त्यांना प्रतिपक्ष म्हणून एका मापात मोजतो आहोत. आणि त्यांना शत्रू ठरवून निघतो आहोत कारवाई करायला असंही आहे ना चित्र. त्या चित्रापुरता माझा 'नक्षलवाद्यांशी', 'माओवाद्यांशी' चर्चा व्हावी याला पाठिंबा आहे. ही चर्चा करण्याइतपत राजकीय मुत्सद्देगिरी, प्रतीपक्षात नेमका भेद करण्याची कुवत व्यवस्थेत नसेल तर ते व्यवस्थेचे अपयश आहे. ते अपयश दूर करायचे आणि तोवर सकारात्मक पावलांसाठी थोडी अधिक किंमत मोजायची, की व्यवस्थेत ती मुत्सद्देगिरी नाही यासाठी प्रतिपक्ष हा शत्रूच आहे असे म्हणून त्याचा निकाल म्हणजे प्रश्नाचा निकाल अशी कारवाई करायची का इतकाच काय तो प्रश्न आहे. त्याचे उत्तर मी नाही असे देईन.ही चौकट आरांच्या मुद्याला थोडी अधिक विस्तारून चर्चेच्या मार्गाकडे नेते असे माझे मत आहे. हा विस्तार आवश्यक आहे, कारण येथे आपल्याच देशातील एका मोठ्या समुदायाचा प्रश्न आहे. त्यांच्या चार-सहा मुखंडांचा नव्हे. आय रेस्ट माय केस (याचा अर्थ शब्दशः घ्या).
In reply to राजद्रोही...व्याख्या...! by इन्द्र्राज पवार
ज्या भूमिकेवरून मलाही शिक्षा होऊ शकते, असे मी म्हटले आहे, ती भूमिका आणि या धाग्यात मांडलेल्या भूमिकांचे सार एकच आहे. या भूमिकेमध्ये मी सरकारी कारवाईचा विरोधक ठरतो आहे. त्यावरून मीही राजद्रोही ठरू शकतो असा युक्तिवाद अशा कायद्यांखाली होऊ शकतो. आणि बिनायक सेन यांच्या खटल्यातील निकालाची स्थिती पाहता तो स्वीकारला की काम झाले.यासंदर्भात आधीचा एक मुद्दा (जे माझे मत आहे आणि त्यावर मी माझे पुढचे मत बनवले आहे).
एकूण साक्षीदारांचे म्हणणेच उचलून धरायचे असेल तर हा खटला चालवण्याचे कारणच शिल्लक रहात नाही. साक्षीदारांनी पोलिसांना जे सांगितले तेच इथेही सांगितले आणि तेच मान्य अशी ही भूमिका आहे. याला न्यायप्रक्रिया म्हणायची?इंद्रांनी दिलेली कायद्यातील तरतूद आणि तिच्या संदर्भात निकाल असाच विचार मी ही मते मांडताना केला आहे. आय रेस्ट माय केस (याचा अर्थ शब्दशः घ्या).
In reply to डेमॉक्रसी नाऊ by मुक्तसुनीत
In reply to रिपोर्ट by प्रदीप
In reply to सहमत आहे. एकतर्फी आहे. (हा by आळश्यांचा राजा
In reply to उद्बोधक चर्चा by विसुनाना
In reply to उत्तरे by मुक्तसुनीत
In reply to ताज्या बातमीनुसार सेन यांचा by नितिन थत्ते
In reply to चला आता परकीय प्रसारमाध्यमे by निनाद मुक्काम …
In reply to ६ वर्षे-जन्मठेप by नितिन थत्ते
In reply to याचे उत्तर द्याल का? by चिंतामणी
In reply to नको बुवा by नितिन थत्ते
In reply to काळजी करू नका. by चिंतामणी
In reply to आग माझ्यामुळे लागायला नको. by नितिन थत्ते
In reply to नको बुवा by नितिन थत्ते
In reply to या विषयावर हा एक खूप चांगला by श्रीगुरुजी
In reply to चांगला लेख आहे. by चिंतामणी
निटासे कळले नाही काय म्हणायचे आहे ते.