(एक बाई ठेवावी म्हणतोय!)
काव्यरस
ह्या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल
:)
एक बाई ठेवावी म्हणतोय....
एक बाई ठेवावी म्हणतोय,
करायला गरमागरम भाकरी
मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर,
जोडी जुळत नाही हो दुसरी!!
शुभ्र दळलेली जवार
बनवी होऊनि तदाकार
अस्सल मर्हाटी भाकर
सुबक, पातळ, गोलाकार
एक बाई ठेवावी म्हणतोय
दिसायला असु द्या कशीतरी
नसो अंगी बाकी काही गुण
फक्त भाकरी मिळो ऊनऊन
तर एक बाई ठेवावी म्हणतोय!
(मित्रहो, तुमचा काय सल्ला?)
:)
वाचने
6209
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
हा हा
कल्पवृक्षाखाली बसून फुळकवणी ताकच मागनार का तुमी ;)
In reply to हा हा कल्पवृक्षाखाली बसून by शुचि
ड्यांबिसाचार्य .... आपण लेखणास्त्र पुण्हा घारण केल्यामुळे आमचे डोळे अंमळ पाणावलेले आहेत.
आणि षिर्षक वाचुन खरोखर उत्सुकता चाळावल्या गेली होती ;) पण तुम्ही आपला कडेकडेनं काढलंत ?
-(डँबीस फॅन क्लब मेंबर ) टारझन
In reply to ड्यांबिसाचार्य .... आपण by टारझन
_/\_
गुंतवणूकविडंबनहास्य >>
सर्वात पहिले हे वाचुन फुटलो ..
डँबीस फॅन क्लब मेंबर >>
+ १ सहमत !!
अजुन येउ द्यात ..
एक बाई ठेवावी म्हणतोय....
एक बाई ठेवावी म्हणतोय,
शुभ्र जवार
सुबक, पातळ, गोलाकार
होऊनि तदाकार
नसो अंगी बाकी काही गुण
फक्त मिळो ऊनऊन
(तुमचा काय डॉक्टरी सल्ला?)
वा !!! जोरदार ...
लिहिण्याची फ्रिक्वेन्सी वाढवा हीच विनंती.
शेखर
कुणी बाई, देता का बाई?
...
या डांबिसाला एक बाई हवीय.
ज्यांच्याकडे नटसम्राट मधला मूळ उतारा असेल त्यांनी तो द्यावा अशी विनंती. म्हणजे मधल्या ओळी भरून काढता येतील.
डांबिसभाऊ, मला (मुक्तसुनीतांसारखाच) डिस्लेक्सिया असल्याने पहिल्या काही ओळी शब्द आलटून पालटून वाचल्या - त्या अशा वाटल्या
एक बाई ठेवावी म्हणतोय गरमागरम
करायला भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर,
जोडी जुळत नाही हो दुसरी!!
आणि मग भाकरी व रस्सा ही कसली रूपकं असतील या विचारात गोंधळून गेलो.
असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात. :)
In reply to कुणी बाई, देता का बाई? ... या by राजेश घासकडवी
असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात.
असेच म्हणतो.
(चमचमीत)बेसनलाडू
In reply to असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात. by बेसनलाडू
बहुदा मलाही डिसलेक्सिया असावा ... मी तर चुकून असं वाचलं
एक बाई ठेवावी गरमागरम म्हणतोय करताना भाकरी, मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर। कुठे मिळत नाही हो दुसरी!काकाश्री, लेखणी अशीच सुरू ठेवा.
In reply to असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात. by बेसनलाडू
>>> असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात.
--- सहमत आहे. पुढचा भाग केव्हा? ;)
In reply to भाकरीचा चंद्र - एक नवा घोर :) by नंदन
वरील सर्वांशी सहमत. पुढची बाई कशाला.. हे आपलं.. पुढचा भाग केव्हा?
छ्या ह्या वरच्या डिसलेक्सिक लोकांमुळी मीही बिघडलो.
In reply to वरील सर्वांशी सहमत. पुढची बाई by Nile
(संघटित)बेसनलाडू
एक बाई ठेवावी म्हणतोय,
करायला गरमागरम भाकरी
मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर,
जोडी जुळत नाही हो दुसरी!!
छान नि सुंदर कल्पना .
खी खी खी...
चालु द्या... ;)
अवांतर :--- बरेच दिवसात पेठकर काका कुठे दिसलेच नाहीत... असो.
मस्त :)
अमोल
बाइ हविये का स्वयंपाकिण काकु हव्यात :-/
In reply to बाइ हविये का स्वयंपाकिण काकु by पर्नल नेने मराठे
आयला ह्या लहान पोरांना आवरा रे कुणी तरी ;)
लय भारी.
हा हा भारीच.
बकी पिडाकाका शिर्षक वाचुन अंमळ अपेक्षा जास्तीच वाढल्या होत्या, त्या काय पुर्या नाही झाल्या.
In reply to हा हा भारीच. बकी पिडाकाका by परिकथेतील राजकुमार
प्राशी शमत आहे. :)
डांबीस काका लगे रहो.
चांगली आहे इच्छा !
>> एक बाई ठेवावी म्हणतोय
दिसायला असु द्या कशीतरी
नसो अंगी बाकी काही गुण
फक्त भाकरी मिळो ऊनऊन
हेच तर परवडत नाय ना.. वेळेवर येउन कुणी जेवण बनवून द्यायला तयार नाही वो.. तुम्हाला भेटल्यास मला पण सांगा..
- पिंगू
ठेवली का हो तुम्ही बाई ?
भाकरी करण्या साठी :) :)
---- एक उगीचंच (चांभार) चौकशी
खि:खि:खि: ...
बादवे, ती यशोकाकू कुठेय? दिसली नाय इकडं या धाग्यावर!!!
राघव
एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला गरमागरम भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!!_/\_ ह्हपुवा
एक बाई ठेवावी म्हणतोय
करायला गरमागरम, भाकरी
मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर,
(मित्रहो, तुमचा काय सल्ला?)
गरमागरम भाकरी झाल्यावर आमलबि बोलवा.
आमि बि येउन आपलं थोडं पोट शेकुन घेतो.
हा हा कल्पवृक्षाखाली बसून