(आसपास)
सुंदर 'खयाली पुलाव' पकवणार्या संजोपरावांचा हा असा 'आसपास' वावर बघून आम्हाला काही कळेनासे झाले की हे असे अचानक का व्हावे? आणि त्या स्तंभितावस्थेतच विडंबन आमच्या 'आसपास' भटकून गेले! ;)
ओढा खाली, पाडा त्याला, बोलत काही बाही
सूर वेगळे, नवी तुतारी जरी वाजवू पाही
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
सांजसकाळी जाऊ लागल्या कानोसा घेण्यात
मग्नच असती कोणी येथे कुजबुज ती करण्यात
दात विचकुनी, किचकिच करुनी घसे कसे बसले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
नमोगताला शरण जाउनी घाली की साकडे
जालावरचे वैर असे की शेपुट ते वाकडे
विडंबलेले काव्य पाहुनी सोगे का सुटले?
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या,
असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या?
दुज्या सुरांचे, स्वागत येथे, वर्ज नसे कुठले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
जालावरती रंग निराळे, दोन असे तर दोन तसे
पूर्वसुरींचे आळवुनी स्वर काव्य नासले असे कसे
मेंढरातल्या लांडग्यास मग रट्टे की बसले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
चतुरंग
वाचने
3022
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
वाव्वा!
In reply to वाव्वा! by बेसनलाडू
असेच
झकास..
In reply to झकास.. by विसोबा खेचर
हेच
अगदी चपखल...