कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि लसूण ..लसूण इथे जरी गड्डाभर दाखवली असली तरी इतकी जास्त नको, नाहीतर झोंबरा व्ह्यायचा पदार्थ.
मिरच्यांची संख्या दुस-या दिवशी सुट्टी आहे की हापिसला जायचे आहे त्यावर आणि आपापल्या भौगोलिक पार्श्वभूमीनुसार ठरवून घ्यावी. (सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई, अमेरिका वगैरे लक्षात घेऊन..) शिवाय आपण विकत घेतलेला मिरचीचा प्रकार कोणता (ब्याडगी, लवंगी, भूत झोलकीया..!!) यावरही ही संख्या अवलंबून ठेवावी. "कॉनसीक्वेन्शियल" ड्यामेजेसना प्रस्तुत लेखक जबाबदार नाही.
उपरिनिर्दिष्ट चिजा पाट्यावर किंवा मिक्सरात वाटून निम्ननिर्दिष्ट खर्डा उत्पन्न होईल. याचा वास जीवघेणा असेल.
(ब्याचलर टिप:आपल्या महालात मिक्सर वा पाटा दोन्ही नसण्याचीच शक्यता जास्त असल्याने इथे अडकून पडण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्व पदार्थ सुरीने अत्यंत बारीक चिरून हाताने एका वाटीत जेझरले तरी चालेल. नंतर हात पाचेक वेळा धुवावेत. अन्यथा पुन्हा कॉनसीक्वेन्शियल ड्यामेजेस..!!)
घरी लावलेले घट्ट दही किंवा (ब्याचलरांसाठी) अमूल नेसलेचे डब्यातले दोन तीन मोठे चमचे भरून घ्या.
या दह्यात वर तयार केलेला खर्डा अंडे फेटतात तसा फेटून मिक्स करा. त्यात शुगर फ्री नेच्युरा दोन चहाचे चमचे किंवा आपापल्या अंदाजाने टाका. ज्यांच्या मागे डायेटची ब्याद नाही त्यांनी सरळ साखर टाका. चिमूटभर मीठ टाका.
अशा रीतीने खालील प्रमाणे "विनामेयोनीज विनाचीज विनाबटर" वालं आपलं मस्त "स्प्रेड" किंवा "डिप" तयार होईल.
एक मेथी खाखरा घ्या. दाढी करताना साबू लावतो तसं त्याला वर बनवलेलं स्प्रेड फासा.
मग या सर्व प्रकरणावर अजून एक खाखरा ठेवून डबल लेयर बनवा.
आणि दहा पंधरा मिनिटांतच पोटातही दडपा नाहीतर ओला होईल.
(ब्याचलर मित्रहो: "खर्डा" जास्तीचा बनवून एक दोन आठवडे बाटलीत ठेवता येतो. खाखराही आणून बरेच दिवस ठेवता येतो. फक्त हापिसातून येताना किंवा सकाळी उठून लुंगीवरच बनियन अडकवून जांभया देत वाण्याकडे गेलं आणि दही आणलं की झालं..
ब्याचलर डिश असल्याने जास्त कॉप्लिकेशन नाय. कांदा चिरायची हौस असेल आणि विशेषत: रॉयल च्यालेंज, हेवर्ड वगैरे पेयांसोबत ही रचना पेश करत असाल तर थोडा कांदा टोमॅटो चिरून वरून पसरावा..!!)

वाचने
9705
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच् !
ईकडे पण का.. मस्तच आजच बनेल
छान छान.
व्वा
गमन"बिहारी" ? गमनमराठी तरी
In reply to व्वा by टारझन
वाह एकदम खर्डा पाकृ हो
येकदम मान्य.. अर्थवाही आणि
In reply to वाह एकदम खर्डा पाकृ हो by परिकथेतील राजकुमार
अग्ग्ग्ग्ग्ग्गं!
In reply to येकदम मान्य.. अर्थवाही आणि by गवि
मलाही आवडत नाही एरवी. पण असा
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्गं! by धमाल मुलगा
येस्स्स!
In reply to मलाही आवडत नाही एरवी. पण असा by गवि
हा हा हा.
In reply to येस्स्स! by धमाल मुलगा
लस्सी !
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्गं! by धमाल मुलगा
'लस्सी' देऊ का साह्येब ?
In reply to लस्सी ! by छोटा डॉन
आयला पाकृ कडकच आहे असे
In reply to लस्सी ! by छोटा डॉन
चविष्ट चटकदार चमचमीत!
निम्ननिर्दिष्ट?????? पहिल्यां
निम्ननिर्दिष्ट?????? पहिल्यां
In reply to निम्ननिर्दिष्ट?????? पहिल्यां by स्पंदना
मी नाय ना कलत! मी ताई नाई
In reply to निम्ननिर्दिष्ट?????? पहिल्यां by गवि
होक्कि तै.. ख्रचकि .. म तु
In reply to मी नाय ना कलत! मी ताई नाई by स्पंदना
मस्तच
गगनविहारी भारी पर्याय दिलास.
मस्त
छान
बायको सुखि आहे तुम्चि!
एकदम भारी
इंदुबेन आहेत का इथे? शोधायला
In reply to एकदम भारी by आचारी
मस्त! करुन बघतो आणि प्रतिसाद
वेळेला