सार काही क्षम्य असतं
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......सकस छे!!! :)
पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं अन मानेच्या हालचाली बरोबर ते कानातल्या लोलकांचे डुलणं ..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं....... वार्यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......हाय्य !!!! खल्लास आपण.... एकदम वास्तववादी तरीही रमणीय :) सुंदर !
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं.... त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं... आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं.... त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं...... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......लाखमोलाची गोष्ट ४-६ ओळीत सांगितलीत भाऊ. मस्त.
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं....हम्म्म....छानच. म्हणजे, ...नकोच बुवा...नाही त्या गोष्टी नको त्या वेळी नकोत बोलायला. लगे रहो विजुभाऊ :)
In reply to वाह! by धमाल मुलगा
मेरा युंही ख्वाबों मे खोये रहेना, और तुम्हारा वो ख्वाबों की तावीर की बातें करना, मै सहम जाऊ तो वो हलकेसे मुझे छू लेना... तुम्हारे छुने का अहेसास, वो छूने की मासुमियत, ये सब इतना लुभावना है, के हजार गमों को भी इनमे बह जाना है|विजुभाऊ - जियो!
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं....... त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......छान जमलंय.
विजुभौ,
प्रेमावर कितीही वेळ बोलत राहिलो, लिहित राहिलो तरी विषय कधीच न संपणारा,
रिकाम्या वेळात तो अनुभव आपल्या मनाभोवती पिंगा घालत असतो. तशी आपली
मनभर फिरणारी....सुंदर कविता.
'' क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असत ''
आपण बस स्टॉपवर तासन तास वाट पाहावी,
अन् तिने आपल्या असण्याचा लांबून अंदाज घ्यायचा अन
निघुन जायचं, हे तर फार जिव्हारी लागतं...!!!!
'' पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं "
बस, याचसाठी केला अट्टाहास तो क्षण सुखाचा व्हावा !!!!
अजूनही फावल्या वेळात सुंदर स्त्रीयांची निरिक्षणे चालली, तर कानातल्या लोलकांवर आमची नजर हमखास जातेच.
टिकली जर चंद्रकोर असेल तर मेलोच आम्ही :)
''वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की''
विजुभौ, दिलसे प्रेम ज्यानं केलं, त्याला हे सर्व आठवतं, सुचतं.....
वा-यामुळे भुरभुरणा-या केसांची बट मागे घेण्याची तिची अदा
जीवघेणीच..... आणि हे सर्व केव्हा आठवतं माहित आहे
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
डोळे खरंच भरतात की असे वाटायला लागते. या निमित्ताने आम्हाला एका कवीच्या कवितेची आठवण होते.
" माझ्याच प्राक्तनात
का वैशाख उन आले,
जेथे विसावलो मी
तिथे तुफान आले. "
सारांश कविता तुमची असेल, पण अनुभव अनेकांचा मांडला राव !!! लिखते रहो, विजुभौ
- दिलीप बिरुटे
In reply to ते by मृगनयनी
In reply to का? by प्रभाकर पेठकर
फिदा.....