या पूर्वी,
काही आत्मचरित्रं! काही व्यक्तिचित्रं! :) -- भाग पहिला.
ऋणनिर्देश -
मिसळपावच्या एक सुगरण सदस्या चकली यांच्या ब्लॉगवरून या लेखातील मिसळीचे प्रकाशचित्रं घेतले आहे.
राम राम मंडळी,
काय ओळखलंत का मला? अहो मी मिसळ! आपल्या सर्वांची लाडकी! आपल्या सर्वांना माझा नमस्कार आणि माझ्या संकेतस्थळावर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत! :)
हो, माझंच संकेतस्थळ आहे हे. अगदी माझ्या नावागावाचं! माझ्या मायमराठीतील एका संकेतस्थळाला माझं नांव लागण्याचा बहुमान मला मिळाला आहे. तात्या नावाच्या माझ्यावर निस्सीम प्रेम करणार्या एका इसमाने मला हा बहुमान दिला आहे! :)
हे संकेतस्थळ माझ्या नावाचं आहे याचा मला निश्चितच आनंद आहे. आज आपल्यासारखी चार गुणी, विद्वान, सर्जनशील, सृजनशील माणसं इथे येतात, दिवसातून एकदा तरी या संकेतस्थळाची आणि पर्यायाने माझी आठवण काढतात ही माझ्याकरता अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे! खरं तर स्वत:बद्दल फार बोलू नये असं म्हणतात परंतु मलाही कधी कधी माझ्या मनातलं कुणाशी तरी भरभरून बोलावसं वाटतं! आणि म्हणूनच आज मी माझ्यावर मनापासून प्रेम करणार्या तुम्हा सर्व खवैय्या रसिकांशी थोड्या गप्पा मारायचं ठरवलं आहे.
माझा जन्म काय, कुठला याबद्दल मला काहीच आठवत नाही. मी कोण, कुठली, कुठून आले याबद्दलही मला कल्पना नाही. परंतु एक मात्र खरं की मी मराठी आहे, महाराष्ट्राची आहे आणि या गोष्टीचा मला प्रचंड म्हणजे प्रचंड अभिमान आहे! ज्ञानोबातुकोबाची बोली हीच माझीही बोली आणि शिवबाचा महाराष्ट्र हाच माझाही महाराष्ट्र!
मी आवडत नाही असा माणूस विरळाच. लोकांनी माझ्यावर अगदी भरभरून प्रेम केलं. तशी बटाटावडा, भजी, थालिपीठ ही माझी आत्येमामेभावंडही खूप लोकप्रिय आहेत परंतु माझ्याइतकं प्रेम आजवर क्वचितच कुणाला मिळालं असेल! तुम्ही हॉटेलात गेलात तर तुम्हाला अगदी दहा पदार्थांची नावं असलेला बोर्ड दिसतो. परंतु त्यात 'चमचमीत मिसळ' हे नांव वाचताचक्षणी, 'अरे वा! मिसळपण आहे का?!' असा विचार तुमच्या मनात डोकावून जातो की नाही ते सांगा बरं! :)
पण मंडळी, तशी मी स्वभावाने गरीबबिरिब नाही बरं का! नेळभटपणा, गुळमटपणा माझ्या स्वभावात बसतच नाही! एकदम मस्त, झणझणीत आणि चमचमीत स्वभाव आहे माझा! आणि तुम्ही लोकं माझ्या झणझणीत व चमचमीतपणावरच तर भरभरून प्रेम करता! माझा चविष्टपणा हीच माझी सर्वात मोठी दौलत!
माझ्याइतकं ग्लॅमर फारच कमी पदार्थांना मिळालं असेल! इथे मिपावरही मी येते अधनंमधनं, इथेही अनेक मंडळी अगदी न दमता माझ्याबद्दल चर्चा करत असतात हे पाहून मला गंमत वाटते! मी कुठे चांगली मिळते, ठाण्याच्या मामलेदार कचेरीजवळची की कोल्हापुरातली? पुण्याच्या रामनाथमधली की काटा कीर्र मधली? लोकांना अगदी चवीपरीने माझ्या नावाची चर्चा करताना पाहून गंमत वाटते. प्रत्येकजण अगदी दांडग्या उत्साहाने, 'अमूकअमूक ठिकाणी गेलो होतो ना, तिथे काय झक्कास मिसळ मिळाली होती!' असं सांगतो तेव्हा माझा ऊर अभिमनाने भरून येतो! अहो नुसतं माझं नांव जरी उच्चारलं तरी लोकांच्या चेहेर्यावर एक प्रसन्नतेची रेषा उमटते त्यामुळे माझ्यात अशी काय खासियत आहे हे कधी कधी माझं मलाच कळेनासं होतं. वास्तविक, चवीने चांगली तिखट आणि झणझणीत असूनही माझं इतकं कसं काय कौतुक होतं असा माझा मलाच प्रश्न पडतो!
पाव!
त्याच्याबद्दल मी काय बोलू? माझा अत्यंत जिव्हाळ्याचा सखा! माझा सर्वात जवळचा दोस्त! पावाशिवाय मी, ही कल्पनाच मला सहन होत नाही. शब्दांपलिकडचं नातं आहे आम्हा दोघांचं! तुम्ही लोकं पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे असं तो स्वत:च मला एकदा म्हणाला होता! हे मी खास तुम्हाला म्हणून सांगत्ये, कुठे बोलू नका बरं! :)
लोकं माझ्या चमचमीतपणावरच प्रेम करत असावेत. तसा मी काही कुणी अनवट पदार्थ नव्हे, शाही नाष्टा वगैरे तर मुळीच नव्हे! साधेपणा परंतु तेवढाच चमचमीतपणा हेच माझे स्वभावविशेष! आणि माझ्या या साधेपणामुळेच पॉश ठिकाणी, मोठमोठ्या पंचतारांकीत हाटेलांमध्ये माझं मन रमत नाही! कोपर्यावरील एखाद्या मारुतीशेजारची एखादी वळचणीची साधी टपरी, "अरे पोर्या जरा फडका मार!" किंवा "एक इसम बारा आणेऽऽ" अश्या दिलखुलास आरोळ्या असलेलं सामान्य जनांचा वावर असलेलं एखादं हाटेल किंवा एखाद्या गजबजलेल्या यष्टीष्टँडचं कँटीन या माझ्या अगदी लाडक्या जागा!
काय म्हणालात? इन्ग्रेडियन्टस कोणते?
इश्श्य, हा शब्द ऐकून मला बाई मुळी अगदी लाजल्यासारखंच झालं हो! :)
अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान!
मंडळी, अमूक एक गोष्टीचा आग्रह न धरता असेल त्या परिस्थितीत स्वत: खुलावं आणि लोकांनाही खुलवावं, आनंद द्यावा ह माझा स्वभाव. मी माझ्या नावाप्रमाणे आहे. सर्वांशी मिळूनमिसळून वागणे, जमवून घेणे आणि स्वत:ही जमेल तितक्या चविष्टपणाने जगणे हाही माझाच स्वभाव! आणि माझ्या मते आपल्या प्रत्येकानेच हा स्वभाव अंगिकारला पाहिजे तरच दोन घटकांच हे आयुष्य सुखी होईल, समाधानी होईल! जीवन म्हणजे नुसतंच सगळं छान छान, गुडी गुडी नव्हे हे माझी झणझणीत तर्री तुमच्या नाकातोंडात पाणी आणून तुम्हाला शिकवते! परंतु एवढं होऊनही तुम्ही अगदी शेवटचा चमचा हौशीहौशीने, आवडीआवडीने खाऊन मला संपवताच की नाही?! :)
काय म्हणालात? जाता जाता संदेश काय देऊ?
अरे माझ्या देवा! अहो संदेशबिंदेश देण्याइतकी मी मोठी महान नाही हो!
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
आपलीच,
मिसळ!

वाचने
21078
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी.
झकास!
यालाच म्हणतात..
In reply to झकास! by स्वाती दिनेश
आरारारारारा! ह्ये काय रं?
हा हा हा!!
In reply to आरारारारारा! ह्ये काय रं? by पिवळा डांबिस
तू

त्ये बी खरंच!!
In reply to तू by विसोबा खेचर
हम्म!
In reply to त्ये बी खरंच!! by पिवळा डांबिस
हम्म!
In reply to हम्म! by विसोबा खेचर
:)
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
चव्हाणबाई
In reply to आरारारारारा! ह्ये काय रं? by पिवळा डांबिस
सहमत...
In reply to चव्हाणबाई by प्रियाली
आईशप्पथ!!! क
In reply to चव्हाणबाई by प्रियाली
व्वा...
मिसळ बाप्या असती तर
In reply to व्वा... by बिपिन कार्यकर्ते
तात्या...
चटपटीत मिसळ
झणझणीत , खुमासदार !
असेच म्हणतो
In reply to झणझणीत , खुमासदार ! by मुक्तसुनीत
वॉ,
छान वर्णन तात्या!
तात्या,
+१
In reply to तात्या, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज ... ब...र...द...स्त !!!
तात्या
और मंगता है!
झकास मिसळ!
तोडलंत...
छान
म्हणजे कसं?
In reply to छान by मनस्वी
देणगी
In reply to म्हणजे कसं? by विसोबा खेचर
प्रयत्न कर..
In reply to देणगी by मनस्वी
सहमत आहे ...
In reply to प्रयत्न कर.. by विसोबा खेचर
काजवे
In reply to प्रयत्न कर.. by विसोबा खेचर
छान
आत्मकथन आवडले...
मिसळ आवडली
मिसळ आवडली
मस्त !
आभार...
तर्री