(पुन्हा दिवाळी)

मेघवेडा जे न देखे रवी...
डिस्क्लेमर : प्राजुतैच्या दिवाळीच्या सुंदर कवितेची अशी चिरफाड केल्याबद्दल तिची जाहीर माफी मागतो. प्रस्तुत कवितेत नवर्‍याचे कपडे धुवून धुवून वैतागलेली बायको आपली व्यथा मांडते आहे. समस्त स्त्रीमुक्तीवाद्यांनी कृपया ह. घ्यावे! ;) रस्त्यावरती लोळत येता का हो तुम्ही संध्याकाळी सदरे, लेंगे आणिक पंचे, काय काय मी धुवू सकाळी? चमचमणारे ओले दुपटे, दिवसामधुनि शतदा वाळी प्लास्टीक घाला गादीवरती, निजण्यापूर्वी अपुली बाळी सजून जाते अंगण अवघे कपड्यांनी या तिन्ही त्रिकाळी दाटीतून त्या मार्ग काढता, नाडी यांची लागे भाळी कष्टांची मम किंमत ऐसि, एकच माझी साडी चोळी नाही घेतली नवीन कधिही, गेला दसरा गेली दिवाळी सप्तजन्मी संसार चालू दे, पण ईशा! कर अदलाबदली मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी - तराजु
वर्गीकरण

23 टिप्पण्या 5,555 दृश्ये

Comments

अनामिका नवीन

सप्तजन्मी संसार चालू दे, पण ईशा! कर अदलाबदली मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी मेघ वा वा ! शेवट एकदम ब्येश्ट म्हणते मी!

पैसा नवीन

दाटीतून त्या मार्ग काढता, नाडी यांची लागे भाळी
जीव गेला..
मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी
अरे ती बिचारी पुढच्या जन्मात 'आयटी नवरा' झाली आणि 'या नवर्‍याला' आयटी बायको मिळाली तर...

असुर नवीन

मेव्याच्या 'प्रस्तुत' विडंबनाला मानाचे पहिले पाचही प्रतिसाद 'पाशवी' असल्याचे पाहून ड्वॉले पाणावले! :-) मेव्या, खल्लास रे! म्हणजे, विडंबन खल्लास रे! --असुर

राजेश घासकडवी नवीन

जबरी विडंबन! मजा आली.

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

अल्लाऽऽऽऽऽऽऽ जीव गेला! आणि ज्योची प्रतिक्रियाही खल्लास आहे. अवांतरः आता काय नवीन आयडी घेणार का काय, 'तराजु' नावाचा? ;-)