(पुन्हा दिवाळी)
डिस्क्लेमर : प्राजुतैच्या दिवाळीच्या सुंदर कवितेची अशी चिरफाड केल्याबद्दल तिची जाहीर माफी मागतो. प्रस्तुत कवितेत नवर्याचे कपडे धुवून धुवून वैतागलेली बायको आपली व्यथा मांडते आहे. समस्त स्त्रीमुक्तीवाद्यांनी कृपया ह. घ्यावे! ;)
रस्त्यावरती लोळत येता का हो तुम्ही संध्याकाळी
सदरे, लेंगे आणिक पंचे, काय काय मी धुवू सकाळी?
चमचमणारे ओले दुपटे, दिवसामधुनि शतदा वाळी
प्लास्टीक घाला गादीवरती, निजण्यापूर्वी अपुली बाळी
सजून जाते अंगण अवघे कपड्यांनी या तिन्ही त्रिकाळी
दाटीतून त्या मार्ग काढता, नाडी यांची लागे भाळी
कष्टांची मम किंमत ऐसि, एकच माझी साडी चोळी
नाही घेतली नवीन कधिही, गेला दसरा गेली दिवाळी
सप्तजन्मी संसार चालू दे, पण ईशा! कर अदलाबदली
मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी
- तराजु
वाचन
5551
प्रतिक्रिया
0