Skip to main content

...

लेखक प्रियाली यांनी मंगळवार, 26/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
...
लेखनविषय:

वाचने 14797
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

गोष्टीच्या शेवटी एक ओळ राहिली ती येथे देते. फार मागे वाचलेल्या एका पाश्चात्य कथेवर आधारित. गोष्टीचे नाव आणि लेखक/लेखिका आठवत नाही.

In reply to by प्रियाली

कथेमधले माळरानातील गवताचे वर्णन वाचुन नारायण धारपांच्या "साठे फायकस" ची आठवण झाली.

In reply to by कानडाऊ योगेशु

अजुन एक नारायण धारपाचे अश्या दिर्घ कथेवर एक पुस्तक आहे.त्यात तो अपंग मुलगा घरात खाटेवर पडल्या पडल्या आपल्या स्वप्नाच्या दुनियेत प्रवेश करतो .त्यात तो स्वःताला एका ताकत्वान तरुणात रुपांतरित करत असतो. पशु कथेचा शेवट मात्र खुपच आटोपता घेतला आहे.पण कथा एकदम झक्कास लिहली आहे. उच्चदर्जाची गुढकथा आहे.

संपली गोष्ट ? अय्यय्यो अय्यो!

In reply to by तिमा

गोष्ट संपली पण तुम्हाला हवं असल्यास त्या गावाचा आणि माळरानाचा पत्ता देते. ;) मग तिसरा भाग नक्की. - ह. घ्या.

'कॅट पीपल' ह्या एका जुन्या सिनेमाची आठवण झाली ...

In reply to by सविता

अग्गो बाई पण युयुत्सूंना का म्हणे समर्पित?
सगळेच कसे तुम्हाला समजावुन सांगावे लागते हो? (ह.घ्या) "पाशवी स्त्रिया" ह्या विशेषणावरुन प्रियालीताईंना कथा सुचली असावी असे वाटते.

ह्या... लेखन चांगलं, पण कथा प्रियालीची वाटलीच नाही. भीतीच वाटली नाही ना मला! :) ओ ताई, जरा सणसणीत द्या की काही तरी. हे काय बुजगावणं!

In reply to by श्रावण मोडक

अहो म्हणूनच वरती गूढकथा असं स्पष्ट लिहिलं होतं. भयकथा नाही असंही लिहायला हवं होतं. :)

In reply to by प्रियाली

होक्की... मी ते वाचलंच नाही. प्रियाली म्हटल्यावर भयकथाच. स्टिरिओटाईप माझाच. :) गूढकथा म्हणून चांगली झाली आहे कथा.

कथेतील पती पत्नींचा परस्परांवरील प्रेमाचा अविष्कार खूप आवडला. हा हा मुकदमाचं नाव रंगराव :P ..... खूप हसले.

मस्त! कालच घरामागच्या गवताळ मैदानात जॉगिंग करून आलो आणि आज हे... माझी नखं वाढल्यासारखं वाटतंय. :-) गूढकथा उत्तम आहे.

In reply to by नगरीनिरंजन

आणि सहीत म्हणून
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च अजापुत्रं बलिं दद्यात देवो दुर्बलघातकः
हे होय? :)

गुढ गुढ म्हणता म्हणता एकदम गुरगुर ऐकू यायला लागली ना! :) आयला, पण एक गंमत नाही कळाली, सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्‍यादिवशी अशी का झाली? (मी आपलं ड्रॅक्युला, झॉम्बी वगैरे संदर्भ डोक्यात ठेऊन विचार करतोय.) अतिअवांतरः संपादकमंडळाच्या सदस्यांनी एखाद्या सदस्याबाबत असं काहीतरी लिहावं हे योग्य नाही असं माझं आपलं वैयक्तिक मत. खटकलं म्हणून बोललो बुवा.

In reply to by धमाल मुलगा

अतिअवांतरः संपादकमंडळाच्या सदस्यांनी एखाद्या सदस्याबाबत असं काहीतरी लिहावं हे योग्य नाही असं माझं आपलं वैयक्तिक मत. खटकलं म्हणून बोललो बुवा.
असं काही तरी म्हणजे कसं? आणि कोणाबद्दल काय लिहिले आहे? कथा श्री. युयूत्सु यांना खर्‍या अर्थाने समर्पित आहे. त्यात त्यांच्याबद्दल काहीही लिहिलेले नसून कथा लिहिताना मनापासून त्यांची आठवण झाली एवढेच सांगायचे आहे. रंगराव (रन्गराव नाही) या पात्राचा आणि मिपासदस्याचा काहीही संबंध नाही.
पण एक गंमत नाही कळाली, सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्‍यादिवशी अशी का झाली? (मी आपलं ड्रॅक्युला, झॉम्बी वगैरे संदर्भ डोक्यात ठेऊन विचार करतोय.)
खाली राजेशने दिलेले उत्तर समर्पक आहे पण तरीही नखंच मारून घ्यायचं असेल तर आहे ना कथेत तसा उल्लेख.

In reply to by प्रियाली

थोड्या वेळानं सांगतो. :) >>खाली राजेशने दिलेले उत्तर समर्पक आहे पण तरीही नखंच मारून घ्यायचं असेल तर आहे ना कथेत तसा उल्लेख. हा हा! अंबळ मिश्टेक झाली...सुहासीची नखं त्याला लागतात ते विसरलोच होतो. :) बाकी, आम्हाला नखं मारुन घ्यायची नव्हे, नखं छाटायची सवय आहे. ;)

In reply to by धमाल मुलगा

सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्‍यादिवशी अशी का झाली?
स्पर्शाने 'पाशवीत्व' एकाकडून दुसऱ्याकडे जाणं हे भयकथांमधलं स्टॅंडर्ड टेक्निक आहे. रक्त हे स्वत्वाशी जोडलेलं अनेक वेळा दिसतं. पण त्याचबरोबर निव्वळ संपर्कानेही बाधा होते. उदाहरणार्थ पिंपळावरचा मुंजा खाली झोपलेल्यांना झपाटतो वगैरे. तसंच इथल्या माळाला एक गुरुत्वीय, भीषण आकर्षण आहे. त्यात तुम्ही खेचला गेलात, एकदोनदा शिरलात की झपाटले जाता, असं असावं. म्हणजे नवऱ्याला सुहासीने नाही, तर दोघांनाही माळाने झपाटलं. अतिअवांतरः संपादकमंडळाच्या एखाद्या सदस्याबाबत सामान्य सदस्यांनी योग्य वा अयोग्य सांगणारं लिहावं का, असा प्रश्न पडला. खटकलं म्हणून बोललो बुवा.

In reply to by राजेश घासकडवी

इथल्या माळाला एक गुरुत्वीय, भीषण आकर्षण आहे. त्यात तुम्ही खेचला गेलात, एकदोनदा शिरलात की झपाटले जाता, असं असावं. म्हणजे नवऱ्याला सुहासीने नाही, तर दोघांनाही माळाने झपाटलं.
आलं लक्षात. म्हणजे एखाद्या भुताटकीच्या विहीरीपाशी किंवा वाड्यात जाऊन आल्यावर माणूस झपाटला जातो तसं. :) ग्वॉट द पाइंट :) ठेंकु.
अतिअवांतरः संपादकमंडळाच्या एखाद्या सदस्याबाबत सामान्य सदस्यांनी योग्य वा अयोग्य सांगणारं लिहावं का, असा प्रश्न पडला. खटकलं म्हणून बोललो बुवा.
सहमत. असाच प्रश्न काही काळापुर्वी संपादकमंडळाला आणि व्यवस्थापनाला छळण्यासाठी म्हणूनच केवळ विघ्नसंतुष्टीसाठी येणार्‍या जीवांबद्दल अनेकांना पडायला हवा होता तो आत्ता अगदीच सहजच बोलल्यावर कसा काय बुवा पडला असं अचानक वाटून गेलं. बाकी वाक्याच्या पुर्वाधाबद्दल अभ्यास कमी पडतो एव्हढं सांगावेसे वाटते. :)

In reply to by राजेश घासकडवी

पिंपळावरचा मुंजा खाली झोपलेल्यांना झपाटतो वगैरे. आमचा एक दोस्त साम्गतो की मुंजाने झपाटलं की तो म्हणे कुस्ती खेळायला बोलावतो आणि त्या कुस्तीत त्याला हरवावं लागतं. नाहीतर तुम्ही संपलातच. - कुस्तीगीर

In reply to by प्राजु

वर प्रियाली ताईंनी म्हटले आहे की रंगराव आणी मिपासदस्य रन्गराव यांचा काही संबंध नाहिये. आणि तसेही कथेतील पात्र रंगराव ह्याने कथेत काहिहि उल्लेखनीय केलेले नाहीये. ते मुख्य पात्र नाहिये आणि विशेष लक्षात रहाण्यासारखे ही पात्र नाहिये . 'रंगराव' बाकी छान हं - हे खोडसाळपणाने लिहील्यासारखे वाटते. मिपावरील एका लेखात रेवतीताईंनी अनुल्लेखाने का नाही मारत, उगाच भाव देऊ नये वगैरे रन्गराव यांना सुचवले होते. हे अशा प्रतिक्रिया देणार्‍यालाही लागू होतेच.

आवडली गोष्ट. वेगवान...आणि पकड घेणारी. :)

In reply to by नितिन थत्ते

आवडली गोष्ट. वेगवान...आणि पकड घेणारी. -दिलीप बिरुटे

In reply to by नितिन थत्ते

(सहमत)बेसनलाडू अवांतर - घराच्या मागच्या अंगणाला 'मागचे अंगण' नाही तर परस म्हणतात. चू.भू.द्या.घ्या. (गावकरी)बेसनलाडू

कथा आवडली. सुहासीला माळाने हळुहळू झपाटून टाकणं चांगलं जमलं आहे. निवेदकाच्या झपाटलेपणालाही थोडी आधीच सुरूवात झाली तेही आवडलं. रानटी पशूंना छळ करून नायनाट केल्यावर त्यांनी मनुष्यांवर उगवायला सुरूवात केलेला सूड - हेही आडवळणाने आलेलं भाष्य आवडलं (कोणीतरी ज्ञानी माणसाने प्रवचन देऊन सांगण्यापेक्षा खूपच परिणामकारक) माळाची दोनतीन वर्णनं येतात. ती चांगली जमलेली आहेत. वेगाने घडणाऱ्या घटनांतून पॉझ घेऊन शांतपणे त्या गूढाचा आवाका वाढवतात. तसे पॉझेस अधिक आलेले आवडले असते. सुरूवातीला कथा काहीशी अडखळत सुरू होते असं वाटलं. अधिक लांब असायला हवी होती ही माझी नेहेमीची तक्रार इथेही लागू होते.

लेखनशैली आवडली पण कथा तितकीशी आवडली नाही. नाविन्य असे काही वाटले नाही. अजून एक म्हणजे - कथानायक स्वतः श्वापद झाला आहे तर त्याच्या तोंडून कथा कशी काय सांगितली जातीये? एकतर त्या अवस्थेत त्याच्या जाणिवा वेगळ्या असणार, मानवी भावना त्यात नसणारच.

In reply to by पक्या

कथानायक स्वतः श्वापद झाला आहे तर त्याच्या तोंडून कथा कशी काय सांगितली जातीये? एकतर त्या अवस्थेत त्याच्या जाणिवा वेगळ्या असणार, मानवी भावना त्यात नसणारच.
हाच प्रश्न मला पूर्वी गबाळ्याच्या बाबत घासकडवींनी विचारला होता आणि त्याचे उत्तर त्यांना स्वतःलाच माहित होते. गूढकथांमध्ये हा प्रश्न गौण असतो. नायक माळाकडे धावत गेला इथे कथा संपते. तो परत आला का, त्याने ती कथा लिहिली का, की कुणाला सांगितली, तो माळावर कुणाला नंतर भेटला का हे मुद्दे गौण ठरतात. बाकी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

मला पहिल्यांदा वाटलं कि प्रियाली शेरलोक होम्स च्या 'द हाउंड ऑफ बास्कर्वील ' च नवीन version लिहितायेत. पण जबरदस्त खिळवून ठेवणारी कथा होती ,आवडली

प्रियालीतै,गूढकथा आवडलीच.. पात्राच्या मनातले, आजूबाजूच्या परिस्थितीचे बारीक पण नेमके तपशील टिपलेत, कथेला योग्य तिथे वेग आणि पॉजही मस्त दिलेत.. सलग लिहीली (त्यापेक्षा प्रकाशली) असतिस तरी चाल्ललं असतं..:)

गूढकथा आवडली. वर्णन जबरदस्त.

मजा आली. हॅलोवीनची कथा द्यायची प्रथा / व्रत नेमाने चालावलेत त्याबद्दल धन्यवाद :-) माळाचे रहस्य पुरेसे उलगडले नाही त्यामुळे भाग ३ पुढे कधी तरी नक्की लिहा.

भयालीदेवी खरे सांगु - ह्या वर्षी काही भट्टी जमली नाही. आमच्यासारखे पुर्ण वर्षभर वाट पाहतातहो तुमच्या हॅलोवीनच्या गोष्टीची. कदाचित पाश्चात्य कथेवर आधारित असल्याने असे वाटत असेल. वळणावर ती येते किंवा गाठ माझ्याशी आहे सारखी अजुन एखादी टरकावु कथा येवु द्या. हॅलोवीनला अजुन थोडा वेळ आहे...

"आई गं! सुहासी तुझी नखं किती वाढली आहेत. " हात सोडवताना सुहासीच्या नखाने माझ्या हातावर भलामोठा ओरखडा उमटवला होता. "काप ती. लागलं मला. " "उद्या सकाळी कापेन हं! " शांत आवाजात म्हणाली आणि मला एकट्याला तिथे सोडून काहीच न घडल्यासारखी बेडरूममध्ये झोपायला गेली.

एकदम भारी आहे

गूढकथा आवडली. दोन्ही भाग खिळवून ठेवणारे.

वेगवान कथा. मस्त !! आता बरेचशे नवरे गवताळ माळाजवळ घरे शोधायला धावतील.

मस्त कथा... माळाचे वर्णन एकदम झकास...

मस्त रंगवलीय गुढकथा!

फार मागे वाचलेल्या एका पाश्चात्य कथेवर आधारित. गोष्टीचे नाव आणि लेखक/लेखिका आठवत नाही. कथा आधारित नाहिये.......तिच कथा तुम्हि एथे दिलेय्......मी नाव लवकरच कळवेन.....लेखक/लेखिका

In reply to by रानी १३

एकतर ही "तिच" कथा नाही. मूळ कथा या धर्तीची असली तरी तीच वगैरे अजिबात नाही. मूळ कथेत गवताचा पट्टा तसाच आहे पण नवरा बायको नाहीत. त्या कथेचा नेमका शेवट मला आठवत नाही परंतु पोलिसांत तक्रार आणि बालंट आपल्यावर येईल अशी गुंतागुंत आहे. त्यातून खालील प्रतिसादांत तुम्ही जी नावे वगैरे दिली आहेत त्यांचा काय संबंध आहे? ते पाश्चात्य लेखक आहेत का? मी तुमचे खालील प्रतिसाद संपादित करत आहे. जे काही लिहायचे ते व्यवस्थित लिहा. उगीच फालतू आरोप नकोत.

In reply to by प्रियाली

अर्रे ! अजुन काही विशिष्ठ आयडींनी येउन 'स्क्रिन शॉट टाका' 'हे लेखन आधी वाचलेले आहे असे वाटतच होते' अशा प्रतिक्रीया कशा चालु केल्या नाहियेत ? ;) प्रियालीतै आपल्याला तर कथा आवडली बॉ ! आणि आपण ती तुझी म्हणुनच वाचली :)

छान. पण शेवट आटोपता घेतला का? बघ... म्हणूनच राणेबाई सांगायच्या नखं कापा म्हणून. कध्धी कध्धी ऐकलं नाहीस त्यांचं...

सुरुवाती पासुनच , म्हणजे ती त्या गवताकडे हरव्ल्या सारखी पहाते तिथ पासुनच हळुहलु काटा यायला लागला. ( अवाम्तरः तुम्ही दिलेला प्रतिसाद संपादीत नसता केलात तरी चालल असत ताई , विषेश फरक नसता पडला. पण तुमच्या लेखावरील प्रतिसाद तुम्हीच काढल्या सारख वाटल. लिखाणाची पद्धत इतकी सुन्दर असताना वाचकांना पकडीत ठेवणारा असताना त्या माहीतीन काहीच नसत झाल.)

मला अजुनही नखं चावायची सवय आहे ते बरं.. च्यामारी कधीतरी आपण नखं कापायला विसरलो तर आपला पण 'नायक' व्हायचा. (मुंबईतील आरे कॉलनीत रात्री अपरात्री बाईक वर फिरणारा आणि अजुनही मानसिक वय ८ असणारा) इंट्या. वेगवान कथा. आवडली. (वाचक) इंट्या. आणी अंगावर आलेला काटा, कथा वाचुन १० मिनिटं झाली तरी अजुनही गेलेला नाही. (शेळपट) इंट्या. कीप इट अप.. (शुभचिंतक) इंट्या.

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे, कथा आवडली किंवा कथा नाही आवडली असे आवर्जून कळवणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद.