कारने इंटर्व्ह्यु ला निघताना सकाळी ग्लासभर "कारनेशन" घेतलं होतं. इंटरव्ह्युचं टेन्शन, मुख्य ठीकाण तर दूरच पण मधे मैलोनमैल विश्रांती स्थळ देखील येत नव्हतं. अशावेळी भयंकर भीती दाटून आली होती , थरकापच उडाला होता का ते ऐका - :P
मला लागली ग बाई घाईची
जाऊ कुठे जाऊ कुठे
लांब स्थळ विश्रांती
मला लागली ग बाई घाईची
मला लागली ग बाई घाईची
जाऊ कुठे जाऊ कुठे
लांब स्थळ विश्रांती
मला लागली ग बाई घाईची
हाहाहा! चांगलं आहे पण सर्वपित्रीच्या मुहूर्तावर शोभत नाही.
हे काव्य नाही चालणार. ;) भयानक हवं. भुतंखेतं, हडळी, मुंजे, देवचार हवेत. पुन्हा प्रयत्न करा, नाहीतर पिडा बाजी मारतील.
अवसेला आला परा असं गाणं म्हणून पहा एकदा, आपोआप सगळ्याचीच भिती बसेल!
अवसेला आला परा,
वाजवत दात कराकरा || धृ||
म्हटला, बोलावतो नानाला,
आणि बोलावतो डान्याला,
सगळे फेर धरून नाचू आणि ,
मधे उभा करुया धम्याला, उभा करुया धम्याला...
याहून भितीदायक काय असू शकेल प्रियाली तै?
ते अॅवार्ड का काय ते भेजून द्या लवकर!!!
--असुर
धात्मारामा, अरे तू या घोळक्यात 'हत्तीचं तोंड' आणलेला वेताळ रे! तुला हत्ती म्हणायची स्वतः हत्तीचीतरी टाप आहे का?
प्रियालीतै, तुमी ते अॅवार्ड लावून द्या बरं रांगेत. आमाला नाय वो, तर या काव्यातल्या परा, नाना, डान्राव आणि धम्सअप या रंगकर्मींना देण्यात यावे ही विनंती!
--असुर
सिच्युएशन : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे. तिला प्रेत आणि आत्मा यांच्या वेशीवर सोडून तो एकटाच सुटला आहे.
पडून आहे गात्र कुजुनि, राजसा खपलास का रे?
सोडुनि मजला वेशिवर एकटा जळलास का रे?
अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला
अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?
बघ जरा कुजतोच आहे, दक्षिणेचा हात माझा
गात गाणी ही भुतांची धुंद तू सुटलास का रे
पुढची कडवी सवडीने देतो. :)
१. अवसेच्या या भयाण राती
दे तुझा हाडाळ हात हाती
मिळून दोघं बसू मानगुटी
तुला कसली मरण-भीती?
२. अक्कणमाती चिक्कण्माती खड्डा तो खणावा
अस्सा खड्डा सुरेख बाई मुडदा तो पुरावा
अस्सा मुडदा पुरला बाई माती ती लोटावी
चवथरा केला बाई क्रुस मात्र लावावा
३. काजळी काळोख गडे
जिकडे तिकडे चोहीकडे
चितेचा उज्जेड पडे
नाचती प्रेते सगळीकडे
:P
चैत पुनवेचि रात , पिंड फोडणीचा भात , कड्कड हाडकाना चल चावू या ,
खाऊ गिळु सारं कसं , मान चोच पाय पिसं , रगताच्या खरवसा चल खावू या,
कापली कि मुर्गी तुमच्या जोडीनं मी प्याले,
"पितरी" च्या या राती राया , टुन्न येडी मी झाले ,
राया सोडा आता तरी , काळयेळ न्हाई बरी ,
पुन्हा भेटू कवा तरी मसणा ,
मला जावु द्या ना घरी ..... आता वाजले की बारा
(१)
आवसेच्या रातीला, असाच होतो जात
वेताळाच्या वाटेवर, भूतनाथाचा भाट
व्हाळापाशी होत्या, आसरा साती सात
आवळल्या मुठीत आला, हडळीचा हात
- - -
(२)
उडाला धुराळा भरारा भरारा
पडू लागल्या जोरजोरात गारा
ढगांच्या मध्ये गर्जना हो कडाडा
घरी एकट्याला नि वाटे थरारा
- - -
(३)
सर्वपित्री किर्र रात्री दार माझे वाजले
'तो' असावा वाटले
एक प्याला ना पुरेसा, दोन प्याले ओतले
कोण प्याले ना कळे
१) भूत म्हणे हाडळीला
नाच माझ्या संगं
मसणाच्या दारी लागे
मुडद्यांची रांग !
२) तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू हाडकांच्या माळा
भूत आणखी हडळीला
चल रे घालू वेताळा !
तुज कवटी, मज दिवटी
आणखी पिंड कोणाला
वेड लागले दादाला
मला नव्हे ते मुंज्याला ॥
३) एक कवटी फोडू बाई दोन कवटी फोडू
सर्वपित्री आवसेला चार हाडं तोडू
" एक कवटी फोडू बाई दोन कवटी फोडू
सर्वपित्री आवसेला चार हाडं तोडू...."
~~ गेले दोन दिवस बेल्जियमच्या धवल क्रांतीवर लिहिणारी ती हीच का, किसानकन्या?
आणि बाई....दोनच का चांगल्या डझनभर फोड......चार नाही चाळीस हाडे तोड....पण ती सेन की झेन नदीकाठी बसून, इकडे कृष्णा-गोदावरी काठंची नको.
इन्द्रा
अरेरे इंद्रा, किती रे तू संकुचित !
पंछी नदिया पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हे रोके
सरहदे इन्सानोंके लिये है। बोलो तुमने क्या पाया ! इन्सां होके !
हे गाणं एका पिशाच्चाने म्हटलेलं आहे. तुझ्यासाठी खास ;)
मस्त मस्त. काय भयानक माणसे आणि काय भयानक डोकी, भयंकर कल्पनाशक्ती बघा एकेकाची आणि उगीच बिच्चार्या भुतांना नावं ठेवतात.
धनंजय,अडगळ आणि मितान पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत. येऊ द्या आणखी. ;)
धनंजयचे नं१ आणि नं३ क्लास. भारी आवडले.
ही स्पर्धेतली वेण्ट्री नाही! ;) असंच सुचलं नि र ला ट जोडण्याचा एक प्रयत्न आहे.
** पिपळावरचा भस्म्या **
वाखरावरचा पिपळ तो बदनाम पंचक्रोशीत
तिथे म्हणे भस्म्याची, अख्खी फ्यामिली आहे
सरपंचाचा बैल खाल्ला, उभा चिरून खुषीत
कालपासून कुलकर्ण्याची गाय हरवली आहे
शेळ्या, बकर्या, कोंबड्या वरचेवर गायब होती
भस्म्याच्या पिपळाखाली पडती हाडांच्या राशी
प्राणिच नाही माणसेही खातो की काय तो?
दिसल्या व्हाळामध्ये होत्या कवट्या खडकाशी
दिवसाढवळ्या सुद्धा तेथे जात नाही कोणि
नाही शाश्वती गेलेल्याची परतुन येण्याची
चुकूनमाकुन कुणि पोचला जरी वाखरापाशी
हिम्मत नाही होत तयाची रिस्कं घेण्याची
एकदा परशा गेला होता मुद्दाम धाडस करून
आठ दिवस कोणाशी काहीच बोलला नव्हता
आमोशेच्या रात्री तो गायबला घरामधून
पडला मुडदा भल्या पहाटे, अखा सोलला होता
मांत्रिक केले तांत्रिक केले भस्म्या काही हालेना
वाखरावरला पिपळ अजुनहि जनपरित्यक्त आहे
सरपंचाला खाईन ऐसी केली तयाने घोषणा
पंचायतिचि खुर्ची तेव्हापासुनि रिक्त आहे!
हा हा हा. नको. "प्रियाली - बस्स नाम ही काफी है" वगैरेतला प्रकार दिसतो एकूण तुमचा. तुम्ही लाख म्हणाल जारण मारण नाही केलेलं, पण उगाच आम्हाला भूतबाधा व्हायची. रिस्क कशाला घ्या! :P
आमच्या कंपूविषयी आम्ही काहीही कविता वगैरे करीत नाही.
(बाकी, खरडवह्यांतून बक्षीस वगैरे ही ऐड्या कुठून तरी चोरलेली वाटते. उद्गात्याला क्रेडिट द्यायला हवे.)
माळावरचा पिंपळ झाला रक्त साकळुन काळा
कुण्या कपीवर भूतनखांचा निर्घृण हल्ला झाला
भुका भडकती, जिभा लपकती, नजर वळे वखवखती
ऋषीमुनींवर, फाडुन खाया हिंस्र नखे पारजती
किर्र रात्र, मुसळधार पाऊस
चिखलात पाय बरबटत चाललो तीला घेऊन
आजूबाजूस - मागे वळून पाहीले आणि समजले..
मीच पोचवला गेलो होतो, ती कधीच परतली होती :(
(डिसक्लेमरः हा काव्यात्मक प्रतिसाद केवळ काव्यात्मक विनोदास विनोद म्हणून दिला आहे. :-) )
श्री.बिका यांना विनंती....
श्री.उत्तम कांबळे आज पुण्यात आहेत. द्या त्यांच्याकडे हे पान कॉपी करून. नक्की 'ठाण्या' ला बोलावतील या समस्त सर्वपित्रीप्रेमीं कविंना, काव्य वाचनात भाग घेण्यासाठी.
इन्द्रा
भयालीताईंचा विजय असो..
मिपावरती खविस,मुंज्जे, हडळींचे काव्य संम्मेलन भरवल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
ही घ्या आमची पण एन्ट्री..
(अग्या वेताळ)केशवसुमार
१. काजल रातीनं ओढून नेला, सये मुंजा माझा
दिस जात सरून वाजती हाडं, कधी रे येशील, मुंजाऽऽऽऽ
२. चितेच्या धगीची उब या राती, आले मी आवसेच्या भयाण राती
'विकेट'ही पडं, मुंजा न झाड, मसणात मलाच गावती
दिलाचा दिलबर, भूतांचा भुतवर
इथं मिळाला मिला, गं, हडळे हिथे मिळाला मला,
हितं मिळाला, तिथं मिळाला
जाऊ कुठं, जाऊ कुठं
दिसला गं बाई दिसला, मला बघून भेसूर हसला गं बाई हसला
(बाकी मी "प्रेरणा" दिली तरी आमचा बेड ओ'क्लॉक झाल्यानंतर धागा टाकणार्या भयालीदेवींचा "खतरनाक" निषेध!)
प्रियाली,
भुतांबद्दलच्या तुझ्या क्रेझला नमस्कार आहे! :)
उत्तम काव्य..!
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
काव्यरक्ताचे पाट असे ओसंडून वाहत असताना भयानक रसात लडबडलेल्या नेमक्या कोणत्या प्रतिभेला बक्षिस द्यावे हे न कळल्याने या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना एक सामायिक बक्षिस दिले जात आहे. आपापल्या आवडीनुसार त्याचे लचके तोडून घ्यावेत.
ही आमच्या घरातली वरिजनल पैदास ;) बक्षिसाच्या रूपाने सर्वांनी भयंकर मानून घ्यावी.
इतके चांगले 'मिसळपाव' संस्थळ.....पण विक्रमादित्यदेखील घाबरून जाईल इथल्या हडळीं, खविस, वेताळ, रक्तपिपासू भुतांची दंगल पाहुन.....संपादक मंडळ, मला वाटते, दुलया रजई घेऊन घाबरून झोपी गेले आहे, असले सदस्य पाहून.
असो....गोविंदाग्रजांनी श्रीमहाराष्ट्र गीत लिहिले होते, एक स्वप्न नजरेसमोर ठेवून. पण त्यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राचे भूतराष्ट्र झाले आहे जणू.....
धागाकर्ती 'प्रियाली' यांनी एकच कडव्याचे बंधन घातले आहे, म्हणून 'हडळगीत' तितकेच.
स्मशान देशा ! खविस देशा ! हडळींच्या देशा
कवटी घ्यावी माझी ही श्रीमहाराष्ट्र देशा ||
नैवेद्याच्या देशा, कटकट देशा, रक्ताळलेल्या देशा
भस्म्या देशा, वेताळी देशा, रुंडमाळाच्या देशा ||
ठाण्यावर ती विक्राळी एक पसरी झिंज्या बिनधोक
डंकर्की ती दुसरी नाव ठेवुनी कवटी खाई रोखठोक
मितानी पसरूनी नख्या शोषिते 'श्याम' प्राणाचा पिंड
ज्योती तर रक्त पिते गटाटा वर काढूनी भटिंडा धिंड
(~~ रक्तास सोकावलेल्या चौघींची मनी भीती बाळगणारा ~ इन्द्रा)
प्रतिक्रिया
हे घ्या!!!
कारने इंटर्व्ह्यु ला निघताना
हेहेहे!
In reply to कारने इंटर्व्ह्यु ला निघताना by शुचि
जर
In reply to हेहेहे! by प्रियाली
गाडीत
In reply to जर by विकास
बघा बघा फांद्या दिसला का रे
आला आला वारा
In reply to बघा बघा फांद्या दिसला का रे by पुष्करिणी
आला आला वारा???
In reply to आला आला वारा by प्रियाली
खपलो !!
In reply to आला आला वारा??? by असुर
काय पुरुषांची मंगळागौर बसवली
In reply to आला आला वारा??? by असुर
अरे एऽऽ
In reply to काय पुरुषांची मंगळागौर बसवली by Nile
धमु हत्ती वाटणे
In reply to अरे एऽऽ by धमाल मुलगा
धात्मारामा...
In reply to धमु हत्ती वाटणे by प्रियाली
चितेवर जळतय मढं, वाजती कड्कड
In reply to आला आला वारा by प्रियाली
अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला.
In reply to चितेवर जळतय मढं, वाजती कड्कड by पुष्करिणी
अर्धाच
In reply to अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
चाललंच आहे तर आणखी एक..
In reply to अर्धाच by पैसा
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा........
In reply to चाललंच आहे तर आणखी एक.. by मेघवेडा
साष्टांग...
In reply to चाललंच आहे तर आणखी एक.. by मेघवेडा
अवसेच्या या भयाण राती दे तुझा
हाडाळ हात
In reply to अवसेच्या या भयाण राती दे तुझा by सेरेपी
धन्स...
In reply to हाडाळ हात by प्रियाली
लाजवाब!
ही हा हा
शुची, पुढचं कडवं - खाऊ दे
In reply to ही हा हा by शुचि
हाहा!
In reply to शुची, पुढचं कडवं - खाऊ दे by मितान
भारी
In reply to ही हा हा by शुचि
..... आता वाजले की बारा
लै लै भारी वाटलं चालीत
In reply to ..... आता वाजले की बारा by अडगळ
लै भारी!
In reply to ..... आता वाजले की बारा by अडगळ
>>आता वाजले की बारा आता वाजले
In reply to ..... आता वाजले की बारा by अडगळ
रंगाशेठच्या सुचवणीसह भारी!!!
In reply to ..... आता वाजले की बारा by अडगळ
हाहाहा!
आवसेच्या रातीला
१) भूत म्हणे हाडळीला
मितान सही!!!
In reply to १) भूत म्हणे हाडळीला by मितान
सहमतीचे राजकारण
In reply to मितान सही!!! by शुचि
तुज कवटी, मज दिवटी!!!!!
In reply to १) भूत म्हणे हाडळीला by मितान
कवटीचा दंगा...
In reply to १) भूत म्हणे हाडळीला by मितान
मितान तू ये गं इथे! आपण
In reply to कवटीचा दंगा... by इन्द्र्राज पवार
अरेरे इंद्रा, किती रे तू
In reply to कवटीचा दंगा... by इन्द्र्राज पवार
मस्त मस्त
हे असंच. र ला ट जोडणे!
वेगळी प्रकाशित करा की
In reply to हे असंच. र ला ट जोडणे! by मेघवेडा
हा हा हा. नको. "प्रियाली -
In reply to वेगळी प्रकाशित करा की by प्रियाली
पास
पुन्हा पुन्हा काय
In reply to पास by मिसळभोक्ता
माळावरचा पिंपळ झाला
मस्त!
अमूशेचा पार उठे मुडद्यांचे
भयाष्टक
एंट्री
किर्र रात्र, मुसळधार
In reply to एंट्री by चित्रा
हाहाहाहाहा
In reply to किर्र रात्र, मुसळधार by विकास
हाहाहाहा!
In reply to हाहाहाहाहा by श्रावण मोडक
येडे
<शरदिनी> क्रूर
In reply to येडे by श्रावण मोडक
__/\__
In reply to <शरदिनी> क्रूर by llपुण्याचे पेशवेll
हा हा हा
In reply to __/\__ by बेसनलाडू
धन्य आहात
In reply to <शरदिनी> क्रूर by llपुण्याचे पेशवेll
__/\__ पुपे!!!
In reply to <शरदिनी> क्रूर by llपुण्याचे पेशवेll
पुप्या, मेव्या..... पक्षातले
In reply to <शरदिनी> क्रूर by llपुण्याचे पेशवेll
पुण्याच्या पेश्व्यानी मारलेला
आम्हावरील कवितांबद्दल सर्व कवी/कवियत्रींचे
टेंपोत बसवला!!! तिच्यायला...
ठाणे साहित्य संमेलन...
In reply to टेंपोत बसवला!!! तिच्यायला... by बिपिन कार्यकर्ते
हा हा
मी पण प्रयत्न करणार!
अल्लाऽऽऽ जीव घेतला!!!!
In reply to मी पण प्रयत्न करणार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
जबरा...
In reply to मी पण प्रयत्न करणार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाईलाज आहे
In reply to मी पण प्रयत्न करणार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
जबरा
In reply to मी पण प्रयत्न करणार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहा!
In reply to मी पण प्रयत्न करणार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रियाली, भुतांबद्दलच्या
आवरा !!
भसभसून उसळे नरड्यामधुनी धार
कवि ग्रेस
हाण्ण तिच्या !! भुतावळच आहे
धन्यवाद भूतलोक्स
बक्षिस
कल्पक धागा
_/\_
हडळगीत
भूतांबद्दल एवढं का बरं प्रेम
बाब्ब्बो