मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आम्हीही पाणी वाहून आणतो !!!

लतिका धुमाळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जर्मनीत आल्यावर माझ्या लक्क्षात एक गोष्ट आली , ईथे गाड्यानची डिकी मोठी असते. त्यात खूप सामान मावते. डिकी उघडली की त्यात बाटल्यान्चे क्रेट्स दिसायचे, सुरवातीला मला वाटले बियरच्या , फळाच्या रसाच्या नाहितर वाईनच्या बातल्या असतील. पण लक्क्षपूर्वक बघितल्यावर लक्क्षात आले की पाण्याच्या बाटल्या जास्त असतात. गाडी कोणतीही असूदे , मर्सडीज, बीएमड्ब्ल्यू , कोणतीही , प्रत्येकजण गाडीतून पाणी वाहून नेत असतो. निरनिराळी पेय मिळणारी मोठी मोठी दुकाने असतात, त्या समोर किमती गाडयात पाण्याच्या बाटल्यान्चे क्रेट्स ठेवताना मी कितीतरी लोक पाहिले आहेत. एके दिवशी मी एक मुलगा फळाच्या रसाच्या बाटल्यान्चे क्रेट्स ट्रॉलीवर घेऊन जात होता ते पाहिले. बाटल्या वाहून नेण्यासाठी ट्रॉली खरचच सुन्दर होती. म्हणजे तो पाणी नाहितर पेय वाहूनच नेत होता. दोन -तीन दिवसानन्तर सुपर मार्केट मधून सामान घेऊन घरी येताना मी बस स्टॉप वर उभी होते. तेव्हढ्यात तेथे एक ६०-६५ वर्शाचे एक जोडपे आले. ट्रॉलीवर पाण्याच्या बाटल्यान्चा क्रेट होता. बाई ती ट्रॉली ओढत होती , पुरशाच्या हातात सामानाने भरलेल्या पिशव्या होत्या. माझ्या डोक्यात विचार आला. अरेरे!!!!!! एव्हढ्या प्रगत देशातही बायकाना पाणी वाहून आणावे लागते !!!!!!

वाचने 5591 वाचनखूण प्रतिक्रिया 49

In reply to by स्पंदना

गणपा गुरुवार, 10/07/2010 - 16:47
त्यांना पाणी फक्त बाटलीतच असत अस वाटत.
अस काही नाही. नळाला येणार पाणी (उसातल्या सारख) दरवेळी शुद्धच असेल याची शाश्वती नाही. आमच्या इकडे कधी कधी तर चक्क तांबड भडक पाणी येत नळाला. प्यायच सोडा आंघोळी आणि कपडे धुवायचे पण वांदे. अश्या वेळी पाणी विकतचच आणाव लागत, मग ते बाटल्यांतल असो वा ड्रम मधल.

In reply to by गणपा

नितिन थत्ते गुरुवार, 10/07/2010 - 16:54
अरेरे. आम्ही उगाचच आमच्या महापालिकेला शिव्या घालतो. :( "णळोणळी गढूळ पाणी" असे संत टारेश्वर महाराज म्हणून गेलेच आहेत.

In reply to by गणपा

रेवती गुरुवार, 10/07/2010 - 19:15
आमच्याकडे मागल्यावर्षी दोन दिवस गढूळ पाणी आलं होतं. पण आधी रहायचो त्या टाऊनचं पाणी सगळ्यांना मानवत असे पण माझ्या मुलाला नाही. मग आम्ही ३ वर्षे पाणक्ये झालो. या टाऊनचं पाणी मात्र छान आहे पण फिल्टरशिवाय वापरायला नको वाटतं.

अपूर्व कात्रे गुरुवार, 10/07/2010 - 16:53
शेवटी बाईमाणसाची अवस्था इथून तिथून सारखीच... भारतात पाणी भरायला नळ, ओहोळ, नदीनाले किंवा विहिरी शोधाव्या लागतात आणि ने-आण करायला डोक्या-खांद्यावरून कळशी आणि हंडे वागवावे लागतात आणि जर्मनीमध्ये पेयांच्या दुकानातून बाटल्यांचे क्रेट गाडीच्या मोठ्या डिक्कीमधून वाहून न्यावे लागतात.

प्रियाली गुरुवार, 10/07/2010 - 17:12
खरे आहे. आम्हीही बाटल्यांतून पाणी वाहून आणतो. आमची विहीर/नदी/तळे - सॅम्स क्लब. ;)

In reply to by प्रियाली

उपास गुरुवार, 10/07/2010 - 18:50
अरे वा तुम्ही अमेरिकेत असता का? छान छान :) *हलकेच घ्या, पराकडून शिकतोय* ;) अवांतरः लेख वाचून पाणीवाल्या बाई आठवल्या आणि डोळे पाणावले!! आणि हो (गाडीच्या) डिकी ला 'बूट' (बूड नव्हे) म्हणावे असा उल्लेख इथेच एका जुन्या लेखात आला होता तेही आठवलं :-))))

In reply to by प्रियाली

श्रावण मोडक गुरुवार, 10/07/2010 - 19:08
गाडीच्या डिकीला आम्ही डिकी म्हणत नाही. Wink ट्रंक म्हणतो.
हाहाहाहा... आवश्यक खुलासा ना हा? ;)

In reply to by श्रावण मोडक

प्रियाली गुरुवार, 10/07/2010 - 19:19
सार्वजनिक ठिकाणी (विशेषतः हापिसात) हा शब्द वापरून गोत्यात आलेले काही महाभाग पाहिले आहेत. ;)

In reply to by प्रियाली

मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 20:38
तुम्ही काळजी करु नका हो. जेवढा वेळ धागा राहील तेवढा वेळ करमणुक. मग नंतर धागा अप्रकाशित का केला म्हणुन संपादक मंडळाला जाब विचारायचा. अजुन थोडी करमणुक. मज्जाच मज्जा.

In reply to by मृत्युन्जय

प्रियाली गुरुवार, 10/07/2010 - 20:45
मग नंतर धागा अप्रकाशित का केला म्हणुन संपादक मंडळाला जाब विचारायचा.
याला दुसर्‍या शब्दांत गद्दारी/फितूरी असे म्हणतात. :(

In reply to by शेखर

प्रियाली गुरुवार, 10/07/2010 - 23:00
असेल पण आम्ही संपादकांशी हुज्जत घालत नाही. आमचे त्यांचे मतांतरही नसते त्यामुळे "नको"वर शिक्कामोर्तब.

In reply to by मृत्युन्जय

Pain गुरुवार, 10/07/2010 - 21:56
मग नंतर धागा अप्रकाशित का केला म्हणुन संपादक मंडळाला जाब विचारायचा. अजुन थोडी करमणुक छे! काय उपयोग त्याचा? संपूर्ण आठवडा झाला तरी संपादक मंडळ नवीन सदस्यांच्या खरडीला उत्तर देत नाहीत हा माझा अनुभव आहे. हा आता तुम्ही त्यांच्या कंपूतले असाल तर गोष्ट वेगळी- ताबडतोब कार्यवाही.

In reply to by प्रियाली

रेवती गुरुवार, 10/07/2010 - 19:38
गोत्यात आलेले काही महाभाग होय नको ते शब्द सर्रास वापरले जातात. धड हसताही येत नाही आपल्याला.;)

In reply to by रेवती

मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 20:36
हो ना. रबर दे असे कोणी म्हणले की माझी अशीच अवस्था होते? मीच उलटा प्रश्न विचारतो की "एरेझर हवे आहे का तुला?" समोरच्या माणसाला तरीही कळत नाही ही गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 10/07/2010 - 20:53
याला म्हणतात राजापेक्षा राजनिष्ठ. एकवेळ अमेरिकन माणसाला हे शब्द कळतील पण इथून गेलेल्या भारतीयांचा गजनी होतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/07/2010 - 23:11
आजकाल पोरासोरांनाही इरेझर म्हणायची सवय असते आणि थोड्या मोठ्या पोरांना दोन शब्दांमधला फरकही बरोबर माहित असतो. बाकी एखाद्याला बोलण्यातली चूक सांगितली तर एवढा काय ब्वॉ चुकलं त्यात? today night ऐकलं की मात्र मला अंगावर झुरळ पडल्यासारखं वाटलं आणि मी पण सुधारणा सांगतेच सांगते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता Fri, 10/08/2010 - 00:31
रबरांच्या झाडाला कुणी इरेझर ट्री म्हटलेले ऐकलेले नाही बॉ ! लेटेक्स म्हटले तरी कोणीतरी खिक करून हसणारच ! शेवटी काय, तर ज्याची त्याची जाण समज वगैरे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नितिन थत्ते Fri, 10/08/2010 - 10:04
>>आजकाल पोरासोरांनाही इरेझर म्हणायची सवय असते असेल असेल. आम्ही तर खोडलब्बर म्हणायचो. आणि शार्पनरला 'कटर'.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चूक झाली तर सांगावी की नाही हा पुढचा मुद्दा. मुळात हे चूक आहे हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवलेत असा प्रश्न मला पडला आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

I is not entirely sure what am called mistake when it comes to language ...पण चारचौघांत आणि कधीमधी शब्दकोषातही काही व्याख्या असतात, त्यांच्या विपरीत बोललं की त्याला मी चूक मानते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 23:08
मी जन्मभर भारतातच राहिलोय आणि उरलेल्या आयुष्यात पण बाहेर सेटल होण्याची इच्छा नाही. पण ज्यांची भाषा वापरता. त्यांची स्लँग पण वापरा. नाहीतर बाहेर गेल्यावर तोंडघशी पडल्यासारखे होते.

In reply to by मृत्युन्जय

>>मी जन्मभर भारतातच राहिलोय आणि उरलेल्या आयुष्यात पण बाहेर सेटल होण्याची इच्छा नाही पाण्याबाहेर राहूनच पोहणे शिकलात म्हणायचे. (हे केवळ स्लँग बद्दल हं, गैरसमज नकोत) >>पण ज्यांची भाषा वापरता. त्यांची स्लँग पण वापरा. http://en.wikipedia.org/wiki/Rubber_(disambiguation) वरील दुव्यावर खालील दोन वाक्ये सापडली. In British and Canadian English, an eraser used to remove pencil markings from paper In American English, a slang term for condoms आता माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार आपण इंग्रजांची भाषा बोलतो ना रे डूड? (जमले वाटते मला पण!!) मग आता स्लँग कुणाची वापरू रे पॅल? (परत जमले. I am getting hang of this) >> नाहीतर बाहेर गेल्यावर तोंडघशी पडल्यासारखे होते. बाहेर म्हणजे अमेरिका का रे मेट ? (I am on fire !!!) भारतीयांचे आपले असे वेगळे व्हर्जन आहे इंग्रजीचे. ते फारच गावठी वाटते का हो तुम्हाला? वेळ मिळाला तर हे पण वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Indian_English (Idioms and popular words/phrases) ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय Fri, 10/08/2010 - 13:16
पाण्याबाहेर राहूनच पोहणे शिकलात म्हणायचे. (हे केवळ स्लँग बद्दल हं, गैरसमज नकोत) तर तर. आयला आम्ही कधी हो अमेरिकेला जाणार असेही. त्यामुळे इथे राहुनच शिकतो. अमेरिकन्स पितात म्हणुन आम्हीही कोक प्यायला लागलो की नाही? तसेच. आता एवढ्या गोष्टी आत्मसात केल्या तर अजुन थोड्या. In British and Canadian English, an eraser used to remove pencil markings from paper In American English, a slang term for condoms मी आत्तापर्यंत एकाही इंग्रजाच्या तोंडी रबर हा शब्द ऐकला नाही. सगळे जण इरेजर असेच म्हणतात. कदाचित अमेरिका वगळता इतर देशात "रबर" या शब्दाचा अमेरिकी अर्थ प्रचलित नसेल. पण रबर हा शब्ददेखील प्रचलित नाही हे नक्की. कदाचित मी चुकीचा असेन कारण मी काही इंग्लंड मध्ये कायमस्वरूपी वास्तव्य कधी केलेले नाही. तिथे दीर्घकाळासाठी राहुन आलेले लोक अजुन व्यवस्थित सांगु षकतील. आता माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार आपण इंग्रजांची भाषा बोलतो ना रे डूड? (जमले वाटते मला पण!!) मग आता स्लँग कुणाची वापरू रे पॅल? (परत जमले. I am getting hang of this) नाही हो काका. आपण स्पेलिंग इंग्रजांकडुन घेतले आहेत. पण पत्रे लिहिताना आपण अमेरिकन इंडेंट वापरतो. बोली भाषा किंवा उच्चार आपले पुर्ण वेगळेच आहेत. इन्ग्रजांचे उच्च्चार मला जास्त वेगळे वाटतात,. त्यामानाने अमेरिकन्स जास्त समजेल असे बोलतात. अर्थात अमेरिकन्स सुद्धा जेव्हा खुप वेगात बोलतात तेव्हा मला पुर्णपणे झेपत नाही. बाहेर म्हणजे अमेरिका का रे मेट ? (I am on fire !!!) बाहेर म्हणजे जिथे जाउ तिथे. इरेजर हा सर्वमान्य शब्द आहे. अजुनतरी रबर या शब्दासारखे अर्थ त्याला चिकटलेले नाहीत. आजवर ज्या ज्या देशात गेलो आहे (इंग्रजी बोलणारे देश अर्थात) तिथे हा सर्वमान्य शब्द आहे. भारतीयांचे आपले असे वेगळे व्हर्जन आहे इंग्रजीचे. ते फारच गावठी वाटते का हो तुम्हाला? नाही सगळे नाही. चालुनही जाते कित्येकवेळेस ते. भारतात वापरायला तर काहीच हरकत नाही. पण परदेशात चालेलच असे नाही. आणि रबर हा शब्द तर डोक्यात फिट्ट बसला आहे. तुमचा प्रतिसाद वाचुन मला मी चुकीचा आहे असे वाटले त्यामुळे अजुन २-३ जणांना विचारले तर त्यांचे अनुभव माझ्यासारखेच होते. आम्ही सगळे भारतात राहणारेच. वेळ मिळाला तर हे पण वाचा. धन्यवाद. वाचले. पण काही गोष्टी नाही समजल्या. Brinjal, ladyfinger, capsicum हे भारतीय शब्द आहेत? curd आणी yoghurt वेगवेगळे नाहीत का? ह.घ्या.हे.वे.सां.न.ल. मि पा वर गोष्टी अश्या मनावर घ्यायला लागलो तर झाले माझे कल्याण. हळुच घेतले. का. न. आणि असेही मोठ्या माणसांच्या सल्ल्यावर किंवा कानपिचक्यांवर मी चिडत नाही :)

In reply to by मृत्युन्जय

शिल्पा ब Fri, 10/08/2010 - 22:59
Brinjal, ladyfinger, त्याला अनुक्रमे एग प्लँट आणि ओक्रा असे म्हणतात ना? म्हणजे अमेरीकेत म्हणतात...वरील कदाचित इंग्लंडाचे इंग्लिश असेल..

In reply to by शिल्पा ब

इंग्लंडात वांग्याला aubergine आणि भेंडीला ocra (शी! घाणेरडे) म्हणतात. आणि भोपळ्या मिरचीला pepper आणि दह्याला yoghurt (उच्चारी यॉगट) म्हणतात.

नाना बेरके गुरुवार, 10/07/2010 - 19:34
एव्हढ्या प्रगत देशातही बायकाना पाणी वाहून आणावे लागते !!!!!! ? पुरश्यांनासुध्दा सामानांनी भरलेल्या पिशव्या वहाव्या लागल्याच कि. त्यांच्या कष्टांना नाही कोणी अरेरे म्हणंत. छे .. छे .. प्रगत देशातही मागासलेले पुरुश आहेत हे वाचून बघून डोळे पा . . ले.