कडधान्यांचे धिरडे -------------
साहित्य :--सर्व प्रकारची कडधान्ये (मूग, मटकी, चवळी, हुलगा, मसुर, हरबरे, प्रत्येकी दोनशे ग्रॆम,व तांदूळ एक पावशेर, उडीद डाळ अर्धा पावशेर, जिरे अर्धा वाटी, धने अर्धा वाटी... हे थोडेसे गरम करुन दळून आणावे.टॊमॆटो सॊस, साजूक तूप, तेल, मीठ-मिरची पावडर चवीप्रमाणॆ.
कॄती :- दळून आणलेले पिठ दोन वाट्या,मिरची पावडर मिठ चवीप्रमाणे घालून पिठ सरसरीत भिजवावे,
निर्लेप तव्यावर थोडेसेच तेल पसरवून धिरडे घालावे...कडेने थोडे तेल सोडावे.
दोन-चार मिनिटांनी उलटावे
चांगले भाजू द्यावे.
गरम गरम धिरडे , साजूक तूप व सॊस बरोबर खायला द्यावे.
ह्यात सर्व कडधान्ये असल्याने हे अतिशय रुचकर लागते.
![]() |
| From माधुर्य |
![]() |
| From माधुर्य |
![]() |
| From माधुर्य |
![]() |
| From माधुर्य |
वाचने
7483
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
निवेदिता ताई,
धिरडे खुपच पौष्टीक आहेत ह्यात शंकाच नाही... फक्त एक अवांतर प्रश्न की ह्यात टमाट्याचे तुकडे घातले तर चालतील का?
- पिंगू
In reply to मस्त by पिंगू
चालेल, टोमॅटो चालेल, बारिक चिरुन कांदा, कोथिंबीर मिरची तुकडे घातलेत तरी चालेल.
शॉल्लेट !!
प्लिज मला कुणीतरी हे गोल आकाराचे (निदान गोल सारखे दिसणारे) धिरडे / डोसा तव्यावर कसा टाकायचा ह्याचा सोपा उपाय सांगेल का ?
In reply to शॉल्लेट !! प्लिज मला कुणीतरी by परिकथेतील राजकुमार
उपायः
१) हे पीठ साधारण घट्ट भिजवून पेल्याने पॅनवर मध्यभागी ओतून त्या पेल्याच्या बुडाने बाहेरच्या दिशेने गोलाकार पसरवा.
२) पीठ पातळ भिजवा आणि पॅनवर ओतून पॅन अशा तर्हेने फिरवा की ते पॅनभर पसरेल.
In reply to शॉल्लेट !! प्लिज मला कुणीतरी by परिकथेतील राजकुमार
लग्न करावे... बायको आयते बनवून देइल.
In reply to लग्न करावे... बायको आयते by दिपाली पाटिल
आता लग्न करायचे आहे म्हणून तर शिकतोय तो! ;)
In reply to आता लग्न करायचे आहे म्हणून तर by रेवती
(जिज्ञासू)बेसनलाडू
धिरडी बाकी छान + पौष्टिक!
(तंदुरुस्त)बेसनलाडू
In reply to परा तू आय टी वाला की नॉन आय टी वाला रे? by बेसनलाडू
तो आयटी मधला नॉन आयटी आहे... पण खरा प्रश्न हा आहे की परा तु आय टी बायको करणारेस की नॉन आय-टी... :D
In reply to तो आयटी मधला नॉन आयटी आहे... by दिपाली पाटिल
मला आत्महत्येला प्रवृत्त करणार नाही अशी बायको चालेल.
In reply to लग्न करावे... बायको आयते by दिपाली पाटिल
दिपाली- लै भारी सल्ला
:))
छान पाककृती :)
हुलगा म्हणजे काय ?
मस्तच ....
पण एक शंका....
पीठ भिजत घालण्या पेक्षा डाळी भिजवून मग दळून पण धिरडी करता येतात का?
माझी आजी मुगाचे धिरडे डाळ भिजून करते म्हणून विचारलं....
छान दिसताहेत धिरडे!
अवांतर - तवा बदला हो निवेदिता-ताई. (ह. घ्या)
In reply to छान दिसताहेत धिरडे! अवांतर - by अनामिक
अनामिक.........अवांतर - तवा बदला हो निवेदिता-ताई. (ह. घ्या)
तुच एक नवा निर्लेप तवा दे पाठ्वून.............हा हा हा .
लय भारी.
याक नंबर !! आमची या विकांताची खादाडी फिक्क्ष झाली ..
In reply to याक नंबर !! आमची या विकांताची by सुहास..
असेच म्हणते!
मितान, हुलगा म्हणजे कुळीथ ...
मस्त दिसताहेत....करुन बघेन.
खुप छान पाकक्रुती...... हे पीठ तयार करुन ठेवल्यास आयत्या वेळी धीरडे करता येतील.....कडधान्य भीजवुन करण्यासाठी पुर्वतयारी लागते...... पीठाचे धीरडे लगेच करता येतिल..... मस्त पाकक्रुती..... :)
पीठ किती वेळ आधी भिजवुन ठेवावे??
आइ करायची ..
छान लागते ना खुप ..
धन्यवाद येथे सांगितल्या बद्दल
तर काय बनवता येत नाहीत.
पण कालच डब्यात आले होते मेसमधुन.
अगदी असेच होते अन चविलाही मस्त होते.
मस्तच




मस्त