द्रष्टेपणा की न्यूनगंड की म्हातारचळ की आणखी काही?
गेल्या काही दिवसांमध्ये काही मनोरंजक बातम्या वाचनात आल्या. वातावरण बदलावरुन किंवा इतर काही कारणावरून मानवप्राण्याच्या भवितव्याबद्दल (नुसतीच) बोंब मारण्याच्या सध्याच्या फॅशनला अनुसरूनच या बातम्या आहेत. पण यात ज्यांचा उल्लेख आहे ते कोणी सोमेगोमे नाहीत. एक आहे प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि दुसरा जैववैज्ञानिक.
त्यांची मते बहुतेकाना टोकाची वाटतील यात शंका नाही आणि त्यातल्या एकाने सांगितलेला उपाय तर एखाद्या हॉलिवुडी विज्ञानपटात शोभून दिसेल असाच आहे.
पहिली बातमी वाचली बीबीसीवर. खाली त्या बातमीचा दुवा दिलेला आहे. सेलिब्रिटी (मराठी शब्द?) भौतिकशास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग यांनी मानवजात वाचवण्यासाठी पृथ्वी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. कारण म्हणे पृथ्वीवर उल्का आदळण्याचा धोका आहे किंवा अण्विक संहार व्हायचा धोका आहे किंवा पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत लवकरच संपुष्टात येतील किंवा सूर्याचं वय झालंय आणि लवकरच (फक्त ७.६ अब्ज वर्षांत) तो पृथ्वीला गिळंकृत करेल. आपल्या ग्रहमालिकेत पृथ्वीसदृश दुसरा ग्रह नसल्याने आपल्याला ४.२ प्रकाशवर्षे दूर (की जवळ?) असलेल्या प्रॉक्सिमा सेंटॉरी नामक तार्याच्या ग्रहमालिकेत जाऊन शोध घ्यावा लागेल हे ही त्यांनी सांगितलंय. म्हणजेच कुठे जायचं, कसं जायचं हा सगळा विचार त्यांनी करुन ठेवला आहे. आता फक्त कोणी जायचं हेच ठरवायचं बाकी आहे.
बीबीसी वरची बातमी
पृथ्वी सोडा किंवा नष्ट व्हा
दुसरे महाशय आहेत ऑस्ट्रेलियन जीवशास्त्रज्ञ फ्रँक फेनर. देवीच्या विषाणूंचा नायनाट करण्यात यांनी फार मोठा वाटा उचलला होता. सध्या ते साधारण ९५ वर्षांचे असावेत. यांच्या मतानुसार येत्या १०० वर्षांमध्ये मानवप्राणी नष्ट होणार. त्यांच्या म्हणण्यानुसार वातावरण बदल आणि लोकसंख्येचा स्फोट या दोन प्रमुख कारणांमुळे इतर अनेक प्राण्यांप्रमाणे माणूसही नष्ट होणार. औद्योगिकीकरण आणि एकंदरच नागरीकरण हे याचे मूळ कारण आहे कारण आदिम अवस्थेत माणूस जवळजवळ ४०-५० हजार वर्षे तगला आणि जगला.
फ्रँक फेनर
हा सगळा 'साठी बुद्धी नाठी' असा प्रकार आहे का? की काही दुर्दम्य आशावादी आणि अध्यात्मवादी म्हणतात तसे हे आत्यंतिक मानवी न्यूनगंडाचे उदाहरण आहे? की तर्काधिष्ठित विचारांचे योग्य अनुमान आहे?
वाचने
8490
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
नॉट फिक्शन फॉर शुअर - द्रष्टेपणा
वैज्ञानिक व सामान्य जीवन
In reply to वैज्ञानिक व सामान्य जीवन by राजेश घासकडवी
म्हणजे या विधानांबाबत ते फार
In reply to म्हणजे या विधानांबाबत ते फार by नगरीनिरंजन
दुसऱ्या दुव्यातल्या लेखात
In reply to वैज्ञानिक व सामान्य जीवन by राजेश घासकडवी
दुर्दैवाने ते आपल्या
भौतिकशास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग
आख्खे जग भले हि माझ्या मातेला सोडून जो,मी मात्र हालनार नाही.
In reply to आख्खे जग भले हि माझ्या मातेला सोडून जो,मी मात्र हालनार नाही. by गांधीवादी
:-)
जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट
In reply to जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट by शिल्पा ब
प्रदूषण नियंत्रणाबाबत तर
In reply to प्रदूषण नियंत्रणाबाबत तर by नगरीनिरंजन
बरोबर आहे...recycled वस्तू
मला यातलं कळत नाही बुवा..
-ल ले लाले ले लले लले ला ले
सेलिब्रिटी (मराठी शब्द?)
आयला मग उद्याचा उपवास करावा क नको?
In reply to आयला मग उद्याचा उपवास करावा क नको? by वेताळ
आजचीच काळजी करतो भौ. आज चर्चा
In reply to आयला मग उद्याचा उपवास करावा क नको? by वेताळ
आजची काळजी कर, वर्तमानात रहा
सौर वादळ मोठ्या प्रमाणात
In reply to सौर वादळ मोठ्या प्रमाणात by मदनबाण
तो पगार
In reply to सौर वादळ मोठ्या प्रमाणात by मदनबाण
सध्या या सौर वादळांची चलती
In reply to सौर वादळ मोठ्या प्रमाणात by मदनबाण
सौर वादळे होण्याचा किंवा अशनी
In reply to सौर वादळे होण्याचा किंवा अशनी by नगरीनिरंजन
केवळ आपल्याला त्याचं ज्ञान
सौर वादळाबद्दल बरेच काही वाचले एकले आहे.....
वेताळा हे वाच बरे
होईलही
हल्ली measuring instruments अचूक मिळतात त्यामुळे अंदाजही अचूक
धागा काढण्याबद्शीचं हे शीर्षक