आनंदी आयुष्याच्या पाककृती - 1 : मिपा कट्टा
0.5 कप (120 मिली) टकिला
0.5 कप (120 मिली) ट्रिपलसेक (किंवा कॉइनत्रॉ)
(ट्रिपलसेक नसेल तर संत्र्याचा इसेन्स काही थेंब, पाव कप व्होडका (किंवा टकिलाच), पाव कप पाणी, चार टीस्पून साखर यांचं मिश्रण)
1 मोठं लिंबू
5 चमचे साखर
5 बर्फाचे तुकडे
सगळं मिश्रण मिक्सरमध्ये घालावं. आणि सर्व बर्फाचा बारीक चुरा होईपर्यंत घुर्रर्र करावं. लोकांना द्यायचं नसल्यास सरळ जगनेच पिता येतं. पण दिलंत तर सुमारे पाच पेयं होतात.
टकिला शॉट्स
डाव्या हाताच्या मागच्या भागावर, अंगठा हाताला मिळतो तिथे थोडं लिंबू चोळून त्यावर चिमूटभर मीठ ठेवायचं. त्याच हातात एक लिंबाची फोड धरायची. दुसऱ्या हातात टकिलाचा एक शॉट (एका वेळी गिळता येईल इतका) शॉट-ग्लासमध्ये घ्यायचा. सगळ्यांनी (हे एकापेक्षा अधिक लोकांनी करायचं तर खरी गंमत) एका वेळी आपला ग्लास एका झटक्यात रिकामा करायचा. हा झटका जिभेला आणि घशाला जाणवला पाहिजे. ती चव विरण्याआधीच पटकन मीठ चाटायचं आणि लगेच लिंबू चावायचं... आहाहाहा... थोड्या वेळाने रीपीट.
खाण्यासाठी पदार्थ
यावेळी घरगुती पाव, राजमा, कोबीची भाजी, लाल मिरच्यांची फोडणी असलेला आंबट खारट दहीभात, व गाजर-अक्रोडाचा केक असा मेनू होता.
पाव
राजमा
लोक अर्थातच प्रेमाने इतर पदार्थही घेऊन आले.
दिपालीने बनवलेला अॅपल अपसाइड डाउन केक
नाटक्याने स्वत:च्या हाताने बनवलेला (असं तो सांगतो...) पनीर अचारी
पारुबाईंनी आणलेला सुंदर कॅरेमल क्रंच व्हाईट क्रीम आणखीन काय काय मस्त मस्त केक
शिल्पाने आणलेले उडीद वडे... कुठे दिसताहेत काय म्हणता, अहो ते संपले केव्हाच.
गोड पोरं
आत्तापर्यंतची कृती नीट केली तर गप्पा व्हायला फारसं काही करावं लागत नाही. म्हणजे पोह्यांना फोडणी दिली की थोडा वेळ नुसती वाफ काढायची असते, तसं. त्यात नाटक्यासारख्याकडून त्याला आलेल्या पुणेरी अनुभव ऐकायचे म्हणजे पर्वणीच. बेसनलाडूसारखं कोणीतरी नव्यानव्या वधूला घेऊन आलेलं असेल तर उत्तमच. मग 'कायरे, गेल्या वेळी दुसरीलाच घेऊन आला होतास ना' म्हणून खेचायला उधाणच येतं. तेवढ्यातल्या तेवढ्यात शिल्पाला सुद्धा नवीन लग्नाबद्दल छेडायचं... आणि मिपाबद्दलचं, नुकत्याच घडलेल्या आयटी, सैपाक व भप्करसारख्या गोष्टींबद्दलचं गॉसिप बबलू, सौरभ,दिपाली, पारुबाईंबरोबर करायचं.
ही अशी 'वाफ' काढत असताना अधून मधून मार्गारिटाचं किंवा टकिला शॉट्सचा हबका मारायचा आणि पुन्हा मंद उबेवर वातावरण राहू द्यायचं. मध्ये मध्ये हास्याची चुरचूर ऐकू येत राहाते. मधूनच कुकरच्या शिटीसारखा हास्याचा स्फोट होतो. एकंदरीत चांगलंच चाललंय म्हणायचं. अशा चर्चांमध्ये काय रंगत येते, व कुठचे विषय डोकावून जातात हे सांगता येत नाही. वानगी दाखल थोडे देतो, इतर कट्टरांनी (म्हणजे कट्ट्याला आलेल्यांनी) भर घालावी, विस्तार करावा.
-संकेतस्थळे कोणी कशी तयार केली? संकेतस्थळांचे मालक, चालक, कंटक यांचा इतिहास-भूगोल
-नवीन लग्न झालेले, संसारात मुरलेले - लक्षणे, स्वयंपाक पद्धती व कौशल्ये इत्यादी. (यावर मी तरी आणखीन काही लिहिणार नाही, मायला आधीच फार बदनाम झालोय) तसंच नाड्या कोणाच्या हातात आहेत/असाव्यात
-"बाब्या कार्टे सिद्धांत" यावरची मौलिक देवाणघेवाण.
-बेलाचा एकोळीचा प्रतिसाद, व त्यावरून त्याची टेर खेचणे, त्याच्या जुन्या चर्चांविषयीच्या रम्य आठवणी
-टॅक्सी/रिक्षा चालकांचा माज व त्यावरील सौ. रभरांग नेकर :) यांचे जालीम उपाय.
थोड्या वेळाने मात्र तयार केलेले पदार्थ खरोखरच द्यायचे लोकांना. मग मोक्याच्या जागेवर म्हणजे बुफे टेबलाभोवती उभं राहून, खुर्च्यांवरती बसून, एकमेकांशी चकाट्या पिटत सगळे पदार्थ फस्त करायचे.
मनसोक्त गप्पा
जेवण झाल्यानंतर पुन्हा स्थानापन्न होऊन तृप्ती व्यक्त करायची व पुन्हा गप्पांचे ग्लास भरायचे. मग सगळ्यांची निघण्याची वेळ आली की चवीचवीने पदार्थ काय फर्मास झाला असं पोटावर हात फिरवत म्हणायचं. तुम्ही बॅचलर किंवा तात्पुरते बॅचलर असलात तर पिशव्या भरभरून उरलेले पदार्थ घेऊन जाऊन दोन दिवस चैन करायची. नक्की कोण नक्की काय बोललं हे सगळं ब्लर होऊन फक्त धमाल आली एवढंच लक्षात राहिलं याचा अर्थ पदार्थ फर्मास झाला, मनात भिनला.
तरी जाता जाता या पदार्थात 'एक' अट्टल पुणेरी माणूस कमी पडला याची हळहळ देखील व्यक्त करायची. सगळंच परफेक्ट झालं तर पुढच्या वेळी काय करणार ना?
असो. तर सांगायचा मुद्दा काय, की मिपावर भेटणारे समधर्मी मित्र-मैत्रिणी, चमचमीत खाणं, एखादं सुंदर ड्रिंक, भरपूर केक आणि छान गप्पा असतील तर आनंदी होणं काय कठीण आहे? त्या संध्याकाळी घातलेला सदरा मी जपून ठेवला आहे.In reply to मस्त वर्णन by खालिद
In reply to वा वा, एकूण मज्जा केलेली by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to त्यांनीच तर सगळे फोटो काढलेत by शिल्पा ब
In reply to त्यांनी फोटो काढले आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण गुर्जी तिथे होते हे सिद्ध करायला काही फोटूगिटू आहे का?बस काय, आमच्याच २ बीएचकेमध्ये झाली ही प्यार्टी :)
In reply to त्यांनीच तर सगळे फोटो काढलेत by शिल्पा ब
In reply to आपले फोटो काढलेच नाहीत नं... by दिपाली पाटिल
In reply to आपले फोटो काढलेच नाहीत नं... by दिपाली पाटिल
आपले फोटो काढलेच नाहीत नं... पुढल्या वेळेस असला स्लॅक चालणार नाही राजेश...तुम्हीच टाइट स्केड्यूलवर होतात ना... असो, वेळात वेळ काढून आलात ते बरं वाटलं.
आणि हो तो अॅप्पल अप-साईड डाउन केक नव्हता काही तो पिअर (pear) अप-साईड डाउन केक आहे..आता पाचापैकी चार शब्द बरोबर आले ते कुठेच गेलं! बाकी तो केक मस्त होता... अ पिअर (pear) अप-साईड डाउन केक इज अ पिअर (pear) अप-साईड डाउन केक बाय एनी नेम... असं काहीसं शेक्सपियर म्हणून गेल्याचं आठवतं. :)
In reply to घासकडवी साहेब जरा फोटुतल्या by मदनबाण
In reply to घासकडवी साहेब जरा फोटुतल्या by मदनबाण
In reply to मनसोक्त गप्पा या हेडिंग खाली by शिल्पा ब
In reply to अगदी समोर उभी आहेस असं वाटलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ऑप्टीकल डेप्थ!! by नाटक्या
In reply to अगदी समोर उभी आहेस असं वाटलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
मानलं ब्वॉ गुर्जींच्या फोटोग्राफीला!!हे हे हे, ते टकिला शॉट्सविषयी नाही वाचलं का? खुलासा संपला.
In reply to मी आत्तापर्यंत कधीही एखाद्या by पारुबाई
In reply to मजा केली तुम्ही लोकांनी by धनंजय
In reply to फार जळजळतय हो!! पण काय करणार by स्पंदना
कारण तो शॉट बसला की माझाच फोटो होतो.म्हणूनच मी इतरांचेच फोटो काढले... :)
In reply to कारण तो शॉट बसला की माझाच by राजेश घासकडवी
In reply to फोटोतली छकुली माझी आहे बरं by शिल्पा ब
In reply to आणखी काही: by नाटक्या
In reply to हा हा हा !!!!! ढाक-चिक, by बबलु
मस्त वर्णन