धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
लेखनप्रकार
आजवर कामाच्या स्वरूपामुळे अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. अजूनही येतच आहे, पायाला चक्र लागलंय कधी थांबणार माहिती नाही. ताकद आहे तोवर फिरतोय, घरट्याची ओढ वाढलीये, भरारीची झेपही. नवीन मुलूख बघतोय, अनवट वाटा शोधतोय, नवीन माणसं धुंडाळतोय. चालूच आहे माझा शोध आणि ‘माझा’ शोध.
माझे सगळे प्रवास तसे लहानसे असतात, दहा-पंधरा-वीस दिवस फारतर एक महिना. आतापर्यंतची सगळी भ्रमंती, सगळे प्रदेश तसे नेहेमीच्या पठडीबाहेरचे, इंग्लंड अमेरिकेत आम्हाला कुणी बोलावत नाही. तिथे जाण्याची तीव्र इच्छा एकेकाळी होती तशी आता जाणवत नाही, तिथे जायचं नाहीच असेही नाही. (‘२२१बी, बेकर स्ट्रीट’ वर मात्र अजूनही जायचंय एकदा तरी ) अजूनही खूप भ्रमंती होणार आहे, सुरुवातीचा ‘लाजते पुढे सरते, फिरते’ चा काळ आता गेलाय. आता मजा वाटतेय... चष्मा काढून बघितलं तरी धूसर नाही दिसत आता.
जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. जाणवतो हा समान धागा या सगळ्या रंगांमध्ये कधीतरी. असो, पाल्हाळ आवरतो नाहीतर रूपक होऊन जायचं.
आजच्या टंकनकळा आहेत, एका नवीन रंगपेटीसाठी. निमंत्रीत प्राध्यापक म्हणून आफ्रिकेतील एका विश्वविद्यालयात यायचा योग आहे. मला त्यांच निमंत्रणपत्र आलेलं, मुद्दाम कुणा मित्रांना दाखवलेलं नाहीये, माझा माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे त्यावरचे कुत्सित कटाक्ष, आणि हलकट्ट हास्य, हे कुणाचाही आत्मविश्वास गमावण्यासाठी पुरेसे आहेत. तर ते एक असो. मी ह्या विश्वविद्यालयात तात्पुरता का होईना पण प्राध्यापक म्हणून दाखल झालो आहे.
आफ्रिकेतला गरीब देश असल्यामुळे विजा, अर्ज, विनंत्या वगैरे भानगड नाही, अगदी ‘येवा, टांझानिया आपलाच असा’ हा घोष सुरुवातीपासूनच ऐकू येतोय. इथे या, साधा अर्ज भरा, सही करा, थोडे डॉलर द्या, लगेज विजा. त्या इमिग्रेशन वाल्या महिला अधिकाऱ्याने, गोड हसून ‘वेलकम’ म्हणाल्यावर डोळे अंमळ पाणावले. कुठल्याही गणवेशधारी अधिकाऱ्याला, सामान्य जनतेकडे बघून हसताही येतं ही भारतात केवळ अफवाच. थोडक्यात काय, तर जगाकडे बघून आपलं ते सुंदर मोहक आफ्रिकन हास्य करत लोकं स्वागताला उत्सुक आहेत.
१०-१२ तासाचा कंटाळवाणा प्रवास करून गेल्यावर, नेहेमीचे कंटाळवाणे सोपस्कार करायला अगदी जीवावर येत होतं. सामान वगैरे शोधाशोध झाल्यावर, स्थानिक चलन घ्यायला गेलो आणि पहिला सुखद धक्का, टांझानियन शिलीन्गाची भलीमोठी गड्डीच घेऊन बाहेर पडलो, चक्क साडेसात लाख शिलिंग मिळाले अवघ्या पाचशे डॉलरला. अगदी खरं लक्षाधिश झाल्यासारखं वाटलं काही क्षण.
बाहेर येऊन विमानतळावर जरा शोधाशोध करतो तर कुणीच माझ्या नावाची पाटी घेऊन दिसेना. मी हल्ली या प्रकाराला वैतागणे सोडून दिले आहे, तरी जरा अचंबाच वाटला. सगळ्या जपानी नावांच्या पाट्या, दोनचार अमेरीकन, ओळखीचे काहीच दिसेना.
त्यातल्यात्यात एका ओळखीच्या पाटीकडे नजर गेली, चांगला हसतमुख कार्यकर्ता होता, बहुतेक त्याने माझा फोटो आधी बघितला असावा किंवा माझ्या चेहेर्यावर केवळ ड्रायवर, रिक्षावाले यांनाच ओळखू येणारा, एक यडबंबु सारखा भाव गोंदून ठेवला असावा. पण तो लगबगीने माझ्याजवळ येऊन पाटीकडे बोट करू लागला. नीट वाचलं आणि दचकलोच. माझा नकळत का होईना पण एवढा मोठा सन्मान बघून मला शब्दच सुचेनात. मनात दणकून खुश झालो, म्हणालं चला सुरुवात तर चांगली झाली. आता ह्या देशात कुणाची माय व्यालीये माझ्या वाटेला जायची.
धक्का ओसरल्यावर मी विचारलं, ही पाटी कुणी लिहिलीये, तेव्हा त्यानं मला अत्यानंदानं आणि अभिमानानं माझ्या तिकीटाची प्रत दाखवली, त्यावरच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या विमानतळाचं नाव त्यानं माझंच नाव समजून अगदी न चुकता पाटीवर लिहून आणलं होतं. मी निरुत्तर. हे बघा काय ते...
क्रमशः
वाचने
13499
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
फक्त लवून मुजरा करतो, आबासाहेब!!!!:)
एक तुम्हाला...
आणि दुसरा हा फलक घेऊन उभ्या असलेल्या सिद्दी जौहराला!!!:)
In reply to काय बोलणार? by पिवळा डांबिस
मुजरा मान्य करावा!
सुरूवाततर झकास झाली आहे. पुढचे भागही पटापट येऊ द्या.
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
जहापना, तुसी ग्रेट हो, तोहफा कबुल करो.
एक नंबर सुरुवात.
फोटोतला माणुस माहितनाही का पण खुप निरागस वाटला.
In reply to काय बोलणार? by पिवळा डांबिस
काय हसवता का जीव घेता? नाकातोंडातुन कॉफी उडाली ना. =)) =)) =))
प्रतिसाद ऑफ द मिलेनियम! ज्जा काका, ज्जा...तुम्हाला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलं. :D
अर्धवटराव, ...सॉरी सॉरी...महाराज,
लेख बाकी फक्कडच हो! मस्तच सुरुवात केलीये.
आणि तुमचा शिद्दी जौहरही खतरनाक बुवा. :)
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय.
क्या बात है? सुरुवात झक्कासच.. पुढचे भाग येऊ देत लवकर लवकर..
स्वाती
In reply to व्वा.. by स्वाती दिनेश
हा हा हा
छत्रपती शिवाजी.... लै भारी. =)) =)) =))
भावश्या.
छान........सुरवात आवडली......येउ द्या अजुन.
छ्त्रपती शिवाजी महारा़जांचा विजय असो.
जय भवानी जय शिवाजी!!!!!!!
दे दणादण सुरुवात ..
सध्या (आम्हा वाचकांचे) ग्रहमान चांगले असावे बहुतेक ... ब्राझिलची सफर नुकतीच आटपून आफ्रिकेची यात्रा सुरू ! :)
आईशप्पथ .. खुर्चीवरून पडेपर्यंत हसलो.. जहापनाँह तोफा कबूल करो...
सुरुवात तर आति उत्तम झालि आहे..
हसुन हसुन पुरे वात झालि आहे....
तोफा कबूल करो...
मुजरा स्वीकारावा महाराज!
:-)
व्वा!! मस्त!! :)
[त्याला एखादा मौल्यवान हार/कंठा नाहीच काही तर किमान सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्यात की नाहीत राजे ? ]
मजा आली वाचायला.
हा हा हा
मस्त!!एकदम धडाकेबाज सुरूवात.. लिहित रहा वाचतो आहोतच
विमानतळावर जंगी स्वागत झालय.. आता घोडा कुठाय? तो काय फोटुत दिसत नाय...
- पिंगू
In reply to मस्त स्वागत by पिंगू
दिसतोय की फोटोत :)
कोलमडलोच खुर्चीवरून. :)
झक्कास सुरवात. लिहिण्याची शैली छान आहे. पुढे लिही लवकर!!!
पुढचे वर्णन लवकर टंका म्हाराज.
ओपनिंग दमदार झाली राव झकास
बाकी तुमच नाव डायरेक्ट थोरले आबासाहेबांप्रमाणे घेतले
मुजरा मुजरा
क्या बात है शिवाजीराव.... हे आपलं अर्धवटराव!!
असलं स्वागत नशिबी यायला सुद्धा भाग्य लागतं!!
बाकी तो माणूस इतका अपार भोळा वाटतोय की काय रागवायचं त्याला? शक्यच नाही!!
दे दणादण सुरुवात, एकदम गड फत्ते!
(पुढे वाचायला कमालीचा उत्सुक)चतुरंग
In reply to खलास!!! by चतुरंग
>>बाकी तो माणूस इतका अपार भोळा वाटतोय की काय रागवायचं त्याला? शक्यच नाही!!
फोटो पाहुन हेच म्हणतो.
काय जबरा निरागसता आहे राव चेहर्यावर, एकच नंबर !
५ मिनिटे खदाखद हसत होतो.
पुढचा भाग येऊद्यात लवकर म्हाराज ! ;)
खी खी खी!
हा हा हा!
पुढे काय झालं ते लवकर लिहा हो!
अर्धवटशेठ,
फोटो पाहून हसण थांबेना..हा हा.. जबरा ..
एकदम झकास सुरवात ..पुढचे भाग लवकर लवकर येउ देत..
चक्क साडेसात लाख शिलिंग मिळाले अवघ्या पाचशे डॉलरला.. वरून माझी सगळ्यात पहिली परदेशवारी -इंडोनेशीया ची आठवण झाली.. १ डॉलर= २६००० रुपय्या असा काहीतरी कन्व्हर्जन भाव होता.. आणि मी ५०० डॉलर बदलले होते.. तिथल्या बँक म्यानेजर ने मला केबिन मध्ये बोलवून नोटांचे ट्रे दिले होते..घेऊन कसे जायचे हा प्रश्न होताच पण आधी दिलेली रक्कम बरोबर आहेत का नाही हे मोजायचे कसे ह्या कप्लनेनेच मी खुर्चीत जवळजवळा पडलो होतो.. १ कोटी म्हणजे १ वर किती शुन्य इथपासून तयारी होती..दरदरून घाम फुटला होता.. अता आठवल की हसू येते.. :)
In reply to खि..खि..खि.. by केशवसुमार
हा हा हा, तरी बर अर्धवटराव झिंबाब्वेला नाही गेले.
त्यांना एस्क्चेंज वाहुन नेण्यासाठी टेंपो मागवावा लागला असता
=)) =)) =))
(टेंपोत बसवला.)
In reply to खि..खि..खि.. by केशवसुमार
सव्वाकोटी रुपये म्हणजे फेसच आला असेल तोंडाला आता पुढे कसं म्हणून?
(केसुशेठ, नुसती तुमच्या वारीची आठवण काय करुन देताय लिहा की राव एखादा फक्कड लेख त्यावर! ;) )
चतुरंग
सुरुवात धडाकेबाज आहे. मस्त! पुढला भाग लवकर टाका.
लई भारी... पुढचा भाग कधी??
सुरुवात झकास! येउद्यात पुढचे भाग फटाफट!
धमाल सुरुवात आहे लेखमालेची..
लवकर टाका पुढचा भाग..
जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. जाणवतो हा समान धागा या सगळ्या रंगांमध्ये कधीतरी. असो, पाल्हाळ आवरतो नाहीतर रूपक होऊन जायचं.या ओळी खासच आहेत. आवडल्या लक्षातही राहतील अशाच आहेत या.
वरील सर्वाशी सहमत !!
पूढला भाग येउ द्यात बीगी बीगी !!
जहापनाह तुस्सी रीयली ग्रेट हो !! :)
पुढच्या भागाची वाट बघतोय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..........!
-दिलीप बिरुटे
...दिल्लीहून नाही निघालात.
मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा!
मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा!
मुजरा! मुजरा! मुजरा!
मुजरा! मुजरा!
मुजरा!
मुजरा! मुजरा!
मुजरा! मुजरा! मुजरा!
मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा!
मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा!
आयच्यान् ... एवढी धमाल क्वचितच बघायला मिळते... १० मिनिटे झाली हसतोय नुसता!!!
स्वागत फारच झकास. भाग्यवान आहात, हेच खरे!
लै भारी!
फोटुमधला सिद्दी जौहर चोता दोनसारखा दिसतोय!
दमदार सुरुवात आणखी येउ घा
हेहेहे... फार हसले !!!
:))))
सह्ही आहे पाटी, तो फोटोतला इसम आणि तुमचा किस्सा! :-)
कुर्निसात ...
जबरा सुरूवात. तोफा कबुल करो म्हाराज!
सगळे काहि छान जमले.
पुढचे लगेच वाचायला घेतो आहे
काय बोलणार?