राष्ट्रभावनेचा अभाव.. भारतासमोरच्या अडचणींचे मूळ?
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे राष्ट्रीय दिन भ्रष्टाचार मुक्त दिन म्हणून पाळल्या जावेत.सर्वच लोक म्हणतात की जो काही भ्रष्ट व्यवहार करतात ते अगतिकतेमुळे करतात. आपण मुद्दामून देशाच्या वाइटासाठी भ्रष्टाचार करत आहोत, असे म्हणणारा कोण सापडेल? स्वतःला "व्हिलन" जाणणारे व्हिलन केवळ सिनेमातच असतात. सरकारने लाच देऊन विरोधी आमदार विकत घेतले, तर काय मुख्यमंत्री असा विचार करतात का - "चला, महाराष्ट्राचे नुकसान करू"? तर, नव्हे. ते असा विचार करतात - "भारताच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे राज्य असणे महत्त्वाचे आहे. त्या हावरट विरोधी आमदारांसाठी कोणाला सुपारी देण्यापेक्षा, त्यांना १०-२०कोटी द्यावेत. सरकार वाचेल, यातच राष्ट्राचे भले आहे." तोच प्रकार गल्लीत लाच घेणार्या पोलिसाचा - "सरकार मला इतके तुटपुंजे वेतन देते, की रोजचा खर्च होत नाही. मग चोरांना पकडू कसे? चला या भुरट्या चोराकडून लाच घेतो, म्हणजे जीवितार्थ चालेल. मग मोठ्या चोराला पकडायला मी समर्थ असेन." राष्ट्राचे नुकसान करण्याच्या हेतूने भ्रष्टाचार करणारा कोणी मला दिसला तर मला कमालीचे आश्चर्य वाटेल. "अगतिक नसेन तर भ्रष्टाचार करणार नाही," असे झाडून ९०-९९% टक्के लोक म्हणतील, आणि २६ जानेवारीलाच नव्हे, कुठल्याही दिवशी. भ्रष्टाचार हा "सिस्टिम्स प्रॉब्लेम" आहे. १९व्या शतकात अमेरिकेत भ्रष्टाचार टप्प्या-टप्प्यावरती बोकाळला होता. आजकाल तो फक्त उच्चपदस्थांपाशी होतो. (कोपर्यावरचा पोलीस असेच कोणाहीकडून लाच मागत नाही. केवळ नेहमीच्या गुंडांकडूनच हप्ता घेतो... वगैरे.) बहुतेक वेळ लाचलुचपत न देताघेता जर उदरनिर्वाह करता आला, अशी सिस्टिम असली तर "परदेशातल्या"सारखे भारतातही वागतील, असे मला वाटते. बाकी कुठल्याही अन्य देशाशी तुलना न करता : "असाल तेथून पुढे चला!" हे तुमचे आवडते तत्त्व पूर्णपणे पटण्यासारखे आहे.
In reply to तुलनेने बघता by धनंजय
अगतिक नसेन तर भ्रष्टाचार करणार नाही," असे झाडून ९०-९९% टक्के लोक म्हणतील, आणि २६ जानेवारीलाच नव्हे, कुठल्याही दिवशी.अगदी अगदी! बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ;) प्रतिसाद आवडला.
In reply to तुलनेने बघता by धनंजय
- तेलगी आणि अनेक राजकारणी यांना राष्ट्राचे नुकसान करूनच स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता.
- पैशाच्या बंडलांसाठी पाचपाच पासपोर्ट एकाच माणसाला एकाच दिवशी पास करणार्या अधिकार्याला हे पासपोर्ट देशविघातक कामासाठीच वापरले जाणार होते हे पक्के माहीत होते. राष्ट्र्घाताला तो हातभारच लावत होता.
- चित्रपटात राहू दे - पण प्रत्यक्षातही औषधांमध्ये भेसळ करणारी, पुलाच्या कामाचे पैसे खाणारी, कंपनीतील मालाची चोरबाजारात विक्री करणारी मंडळी जागोजागी दिसतील.
In reply to कमाल आहे! (सोयीस्कर युक्तिवाद!) by एकलव्य
In reply to +++++१ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अवांतर - by एकलव्य
In reply to कमाल आहे! (सोयीस्कर युक्तिवाद!) by एकलव्य
In reply to कमाल आहे! (सोयीस्कर युक्तिवाद!) by एकलव्य
In reply to करदात्यांचे आणि मतदारांचे नुकसान झाले याबद्दल शंका नाही by धनंजय
In reply to गैरसमज होतोय!! by पिवळा डांबिस
In reply to :-) माहीत असते, पण by धनंजय
In reply to गफलत होतेय. by राघव
In reply to तुलना नाही हो... by राघव
In reply to 'चलता है' ही by चिन्या१९८५
| * | राष्ट्रभावना/त्याग आहे | राष्ट्रभावना/त्याग नाही |
| राष्ट्राचे भले झाले | मराठेशाही,...(आणखी उदाहरणे भरावीत) | राष्ट्रवादाची लाज वाटणारी हल्लीची जर्मनी...(आणखी उदाहरणे भरावीत) |
| राष्ट्राचे भले झाले नाही | राष्ट्रीय समाजवाद काळातली जर्मनी...(आणखी उदाहरणे भरावीत) | पश्चिम-पूर्व एकत्रित (जुना) पाकिस्तान...(आणखी उदाहरणे भरावीत) |
| देशाचे नाव | गुण (अधिक गुण म्हणजे भ्रष्टाचार कमी) | गुणवत्ता क्रमांक |
| न्यू झीलँड | ९.४ | १ | सिंगापूर | ९.३ | २ | ऑस्ट्रेलिया | ८.६ | ३ | हाँगकाँग | ८.३ | ४ | जपान | ७.५ | ५ | मकाऊ | ५.७ | ६ | तायवान | ५.७ | ६ | मलेशिया | ५.१ | ८ | दक्षिण कोरिया | ५.१ | ८ | भूटान | ५.० | १० | सामोआ | ४.५ | ११ | चीन | ३.५ | १२ | भारत | ३.५ | १२ | मालदीव | ३.३ | १४ | किरिबाती | ३.३ | १४ | थायलँड | ३.३ | १४ | श्रीलंका | ३.२ | १७ | वानुआटू | ३.१ | १८ | सॉलोमन बेटे | २.८ | १९ | व्हिएतनाम | २.६ | २० | पूर्व तिमोर | २.६ | २० | नेपाल | २.५ | २२ | फिलिपीन्स | २.५ | २२ | पाकिस्तान | २.४ | २४ | इंडोनेशिया | २.३ | २५ | बांगलादेश | २.० | २६ | पापुआ-न्यू गिने | २.० | २६ | कांबोडिया | २.० | २६ | लाओस | १.९ | २९ | अफगानिस्तान | १.८ | ३० | टोंगा | १.७ | ३१ | म्यानमार | १.४ | ३२ |
In reply to शक्य आहे, शो मी द डेटा by धनंजय
In reply to धनुदादा by एकलव्य
In reply to प्रमेय "भारतात राष्ट्रभावनेचा अभाव आहे, हे पटत नाही" by धनंजय
In reply to प्रमेय "भारतात राष्ट्रभावनेचा अभाव आहे, हे पटत नाही" by धनंजय
"राष्ट्रद्रोह थांबवा" असा प्रचार करून भ्रष्टाचार खरेच थांबत असेल, तर मी ते जरूर मानेन. असा कुठला प्रचार कार्यक्रम कुठेही यशस्वी झाला असेल तर "शो मी द डेटा!" मीही बिनशर्त पाठिंबा देईन.अशा प्रकारचे विदा संकलन हे व्यावहारिक नाही. नमुना पद्धतीचे संकलन संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी केले जात ही असेल. पण हजारो ठिकाणी भ्रष्टाचार घडत असतो त्यावेळी एखादी नोंद होत असते. आरोप असणारे व शिक्षा झालेले यांच्यातील संख्यात्मक गुणोत्तर पाहिले तर तफावत किती असते हे समजेल.
(प्रमेय २)"राष्ट्रद्रोह थांबवा" अशी भडक भाषा वापरण्यापेक्षा "ज्या ज्या प्रमाणात राष्ट्रातील लोकांचे नुकसान होत आहे, त्या त्या क्रमाने त्या त्या कृतींना आळा घाला" हा कार्यक्रम अधिक व्यवहार्य आहे, असे मला वाटतेअसे म्हणणे व्यवहर्य म्हणुन ठीक वाटते पण जनमानसिकता ही आपल्या बाजुने वळवण्यासाठी भ्रष्टाचाराची सांगड ही राष्ट्र द्रोहाशी घातली जाते. तत्वतः ती खोडुन काढता येत नाही. भ्रष्टाचाराचे उच्चाटन झाले पाहिजे असे भ्रष्टाचारी माणुसही म्हणत असतो. काही राजकीय सभांना सत्ताबदल करु नका असे लोकांना आवाहन करताना काही जण म्हणतात कि काँग्रेस पक्षाची पोटे इतक्या वर्षात खाउन खाउन भरली आहेत ते जास्त खाणार नाहीत पण विरोधी पक्ष जर सत्तेवर आला तर इतक्या वर्षापासुन सत्तेपासुन वंचित असल्याने ते हपापल्यासारखे खातील व पर्यायाने जनतेचेच नुकसान होईल. माझ्यामते भ्रष्टाचार ही प्रवृत्ती आहे तो केवळ सिस्टिमचा दोष नाही. लाच घेणारा हा दोषी असेल तर लाच देणाराही दोषी असतो ही मांडणी अॅकॅडमीक आहे. लाच देणारा हा असहाय्य असतो. मी फारतर लाच घेणार नाही पण(कधीच) लाच देणार नाही असे म्हणावे अशी सामाजिक परिस्थिती नाही. स्वार्था पोटी लाच देणे व असहाय्यतेपोटी लाच देणे या बाबी केवळ आपल्या सदसद विवेक बुद्धीवर ठरतात. जगा आणि जगु द्या असे तत्व बाळगताना सुद्धा केवळ मलाच जगु द्या तुम्ही जगु नका कारण तुमच्या जगण्याने माझ्या जगण्याची संसाधन मर्यादित होतात. म्हणुन भविष्यातलया माझ्या सुखाने जगण्यासाठी मी तुमच्या जगण्यावर घाला घालत असतो. हा नैतिक दृष्ट्या भ्रष्ट आचार असला तरी मी तो करीत असतो.
In reply to डेटा by प्रकाश घाटपांडे
In reply to भ्रष्टाचार हा देशद्रोहच आहे... by मदनबाण
In reply to राष्ट्राभिमान/राष्ट्रभावना नसलेले लोक आहेत आपले राजकीय पुढारी by सुधीर काळे
हम्म..