आपल्या देशासमोरचे अनेक प्रश्न अन् अडचणी बघून त्याचे मूळ कशात असावे असा विचार मनात आला. त्यावर चिंतन केले असता जे वाटले ते खाली मांडत आहे. आपली मते जाणून घेण्यास उत्सुकता आहेच!
कोणत्याही देशातील लोकांची मानसिकता, त्या देशाचे भविष्य ठरवत असते. देशासाठी, राष्ट्रासाठी जेथे विचार उगम पावतात तेथे अडचणींवर मात करण्याची शक्ती उत्पन्न होत असते. राष्ट्रभावनेच्या अभावामुळेच आज भारतात एकापेक्षा एक अडचणी उद्भवल्या आहेत. त्या संपवायचे प्रयत्न अपुरे पडतात त्यामागचे कारणही हेच आहे.
राष्ट्रभावना म्हणजे काय हे अगोदर बघावे लागेल -
राष्ट्रभिमान, राष्ट्रप्रेम, त्यासाठी जबाबदारी घेण्याची तयारी, राष्ट्राच्या ताकदीवरील विश्वास या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे राष्ट्रभावना.
याचा अर्थ सारखे तलवार काढून कापाकापी करत फिरावे असे नाही. फक्त साधे जीवन जगताना सुद्धा हा विचार मुळाशी असला तरी कितीतरी गोष्टी आपोआप घडून येतील.
डॉ. विक्रम साराभाई या माणसाने आपल्या देशाला एका बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचे स्वप्न पाहिले. आज जवळपास 40 वर्षानंतर आपण त्याची फळे बघतो आहोत. त्यांची या स्वप्नामागची प्रेरणा राष्ट्रभावना नसेल तर आणखी काय असेल?
आपल्यामुळे किंवा आपणास दिसणार्या इतर लोकांमुळे आपल्या राष्ट्राच्या प्रतिमेस धक्का लागेल, त्याचे नुकसान होईल असे वर्तन घडू न देण्याची जबाबदारी याचमुळे प्रत्येक नागरिकावर पडते. जर ती जबाबदारी पार पडली तर राष्ट्राचे भविष्य बदलण्यास जास्त काळ लागणार नाही.
उदाहरणार्थ, एक साधी सूचना -
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे राष्ट्रीय दिन भ्रष्टाचार मुक्त दिन म्हणून पाळल्या जावेत. "मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही अन् भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणार नाही"असा विचार केल्याने काय एकदम राष्ट्रभावना जागृत होऊ शकेल? नाही. तसे नाही. पण मानसिकता बदलण्यास ही सुरुवात ठरू शकते. १०० कोटी लोकसंख्येत एक जण जरी असा निघाला जो विचार करतोय, "मी भ्रष्टाचार नाही करणार, हे माझ्या देशासाठी हानिकारक आहे. मी असे करता कामा नये!" तर काय कमी झाले? किती मोठा विचार आहे हा!
[
अशी सूचना देण्यामागचा एक हेतू हा की, एक दिवसभर असा विचार करून तो अमलांत आणला तर आपण किती छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये क्षुल्लक स्वार्थासाठी खोटे बोलतो, वागतो ते स्वतःचे स्वतःलाच दिसून येईल.
कारण कितीही केले तरी कुणी स्वमनाला कधीही फसवू शकत नाही.
आपण केलेल्या चुकीबद्दल आपल्याला जाणीव होवून पश्चात्ताप होणे ही चूक सुधारण्याची पहिली पायरी असते.
दुसऱ्याने ती चूक लक्षात आणून दिली तर ती मान्य केल्याच जाईल असे नाही, पण स्वतःला लक्षात आलेली चूक मान्य होण्याचे प्रमाण निश्चितच जास्त असणार.
या साध्या सूचनेच्या पालनामुळे आपण स्वतःच्या वागणुकीकडे बघू शकू असे वाटते.
आणि हेच दिन निवडण्याचे कारण हे की भ्रष्टाचाराचा प्रश्न सरळ देशाच्या प्रतिमेशी आणि प्रगतीशी निगडित असल्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे दुसरे उत्तम साधन कोणते?
दुसरा हेतू असा की, जेव्हा लोकांना स्वतःच्या चुकांबद्दल जाणीव अन् पश्चात्ताप होईल, तेव्हा देशाबद्दल विचार करण्याची वृत्तीही उगम पावू शकेल. काही नाही तर निदान थोडे लोक तरी यादृष्टीने विचार करू लागतील. त्यामुळे आज नाही तर उद्या खचितच आशादायक चित्र बनू शकेल.
(याचा अर्थ असा नाही की आज असा विचार कुणी करतच नाहीत. पण जास्त्तीत जास्त लोक असा विचार करण्यास लागावेत हे नक्कीच चांगले.)
]
मला डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे वाक्य फार आवडते -
"असाल तेथून पुढे चला!" (सौ. वीणा गवाणकर यांच्या "एक होता कार्व्हर" या पुस्तकातून).
आज इतर देशांमधली समृद्धी आपण बघतो तर आपल्याला आपल्या देशाची लाज वाटते. पण त्यांची प्रगती अशाच राष्ट्रभावनेतून झालेली आहे हे आपण कसे विसरतो? आपली राज्यप्रणाली इंग्लंडच्या राज्यप्रणालीवर आधारलेली आहे. एखादे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेत बहुमत असावे लागते हे आपल्याला माहीत आहे. इंग्लंडमध्ये तिथल्या पॉलिटिशियन्सनी पूर्ण बहुमत असताना सुद्धा एखाद्या प्रश्नासाठी लोकमत अजमावण्याची, फिरून निवडणुका घ्यायची हिंमत दाखवली आहे. पुढे जाऊन त्या प्रश्नावर निवडणूक घेतल्यावर, सरकार पडले अन् प्रश्न सर्वमान्य झाला नाही म्हणून पॉलिटिशियन्सना खुर्च्या सोडाव्या लागल्या. आपणास बहुमत आहे म्हणजे एखादा विषय संपूर्ण राष्ट्राला मान्य होईलच असे नाही अन् अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर जनतेचे मत विचारात घेतलेच पाहिजे असे मानणारे लोक तिथे होते (आजची परिस्थिती माहीत नाही!). आज दुर्दैवाने आपल्या देशात तरी अशी परिस्थिती दिसत नाही (उदाहरण - डॉ. वेणुगोपाल आणि श्री. अंबूमाणी रामाडोस वाद).
लहान असताना एकदा आमच्या शाळेत श्री. विनय वाईकर आलेले होते. हे लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणात काही आठवणी सांगितल्या. त्यातली एक आठवण अशी -
एकदा परदेशात गेलेले असताना एके दिवशी श्री. वाईकर त्यांच्या मित्रासोबत एका बागेत उभे होते. त्यांनी एक सिगरेट ओढली अन् विझवताना आपल्या येथील पद्धतीप्रमाणे जमिनीवर टाकून जोड्याने विझवली, आणि परत आपल्या मित्रासोबत बोलत उभे राहिले. इतक्यात कुठुनसा एक मुलगा झाडू न डस्टमेकर घेऊन आला. त्याने श्री. वाईकरांना विनंती केली की त्यांनी आपला पाय बाजूला घ्यावा. यांनी पाय बाजूला घेतल्यावर त्या मुलाने ते सिगारेटचे थोटूक झाडूने डस्टमेकरमधे गोळा केले. आणि यांना थॅंक यू म्हणून तो जाऊ लागला. श्री. वाईकरांना फार ओशाळल्यासारखे झाले. त्यांनी त्या मुलाला माफी मागितली. तर त्यावर तो मुलगा त्यांना म्हणतो, "तसे म्हणू नका. येथे माझी नेमणूक कचरा गोळा करण्यासाठी झालेली आहे. पण कुणी कचराच करत नसल्यामुळे, मी जवळ जवळ फुकटंच पगार घेतो. आज आपण मला काम करायची संधी दिलीत याबद्दल मी आपला आभारी आहे." जेथे अशा भावनेने लोक काम करत असतील तो देश किती भाग्यवान!!
आपले या विषयावर काय मत?
[दुसरीकडेही हा लेख मी अगोदर प्रकाशित केलेला आहे. किंचित मांडणी बदलून येथे प्रकाशित करतोय.]
वाचने
18537
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म..
पूर्ण
तुलनेने बघता
:-)
In reply to तुलनेने बघता by धनंजय
कमाल आहे! (सोयीस्कर युक्तिवाद!)
In reply to तुलनेने बघता by धनंजय
- तेलगी आणि अनेक राजकारणी यांना राष्ट्राचे नुकसान करूनच स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता.
- पैशाच्या बंडलांसाठी पाचपाच पासपोर्ट एकाच माणसाला एकाच दिवशी पास करणार्या अधिकार्याला हे पासपोर्ट देशविघातक कामासाठीच वापरले जाणार होते हे पक्के माहीत होते. राष्ट्र्घाताला तो हातभारच लावत होता.
- चित्रपटात राहू दे - पण प्रत्यक्षातही औषधांमध्ये भेसळ करणारी, पुलाच्या कामाचे पैसे खाणारी, कंपनीतील मालाची चोरबाजारात विक्री करणारी मंडळी जागोजागी दिसतील.
अवांतर - वय वर्षे ९४ असणार्या माझ्या एका दूरच्या आजोबांना पेन्शनसाठी भ्रष्ट्राचाराला सोकावलेल्या कारकुनांनी मारायला लावलेले खेटे हा सरळसरळ राष्ट्र्द्रोहच आहे असे म्हणणे मला चुकीचे वाटत नाही. हा सिस्टिमचा दोष नाही... तर हपापलेल्या वृत्तीचा परिपाक आहे.+++++१
In reply to कमाल आहे! (सोयीस्कर युक्तिवाद!) by एकलव्य
अवांतर -
In reply to +++++१ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
काय करणार पास्पोर्टचे?
In reply to अवांतर - by एकलव्य
सहमत!
In reply to कमाल आहे! (सोयीस्कर युक्तिवाद!) by एकलव्य
करदात्यांचे आणि मतदारांचे नुकसान झाले याबद्दल शंका नाही
In reply to कमाल आहे! (सोयीस्कर युक्तिवाद!) by एकलव्य
गैरसमज होतोय!!
In reply to करदात्यांचे आणि मतदारांचे नुकसान झाले याबद्दल शंका नाही by धनंजय
:-) माहीत असते, पण
In reply to गैरसमज होतोय!! by पिवळा डांबिस
गफलत होतेय.
In reply to :-) माहीत असते, पण by धनंजय
धन्यवाद!
In reply to गफलत होतेय. by राघव
तुलना नाही हो...
सहमत - बदल झाला पाहिजे
In reply to तुलना नाही हो... by राघव
'चलता है' ही
असेच म्हणतो ...
In reply to 'चलता है' ही by चिन्या१९८५
वरिल विषयावरुन
शक्य आहे, शो मी द डेटा
धनुदादा
In reply to शक्य आहे, शो मी द डेटा by धनंजय
प्रमेय "भारतात राष्ट्रभावनेचा अभाव आहे, हे पटत नाही"
In reply to धनुदादा by एकलव्य
आक्रस्ताळेपणा
In reply to प्रमेय "भारतात राष्ट्रभावनेचा अभाव आहे, हे पटत नाही" by धनंजय
डेटा
In reply to प्रमेय "भारतात राष्ट्रभावनेचा अभाव आहे, हे पटत नाही" by धनंजय
समजले नाही
In reply to डेटा by प्रकाश घाटपांडे
जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हरचे उदाहरण
चर्चा
सामान्य माणूस प्रवाहाच्या विरुद्धात पोहू शकत नाही
भ्रष्टाचार हा देशद्रोहच आहे...
पूर्वी कमी होता आणि आता वाढला आहे काय?
In reply to भ्रष्टाचार हा देशद्रोहच आहे... by मदनबाण
राष्ट्राभिमान/राष्ट्रभावना नसलेले लोक आहेत आपले राजकीय पुढारी
सहमत ,
In reply to राष्ट्राभिमान/राष्ट्रभावना नसलेले लोक आहेत आपले राजकीय पुढारी by सुधीर काळे