..

प्रियाली's picture
प्रियाली in पाककृती
30 Jul 2010 - 3:34 am

...

प्रतिक्रिया

(१) तिखट्-मीठ लावून खाणे, पादेलोण घालणे हवे असल्यास
(२) दाण्याचं कूट घालून कोशींबीर
(३) दह्यातील कोशींबीर
(४) डोळ्यांवर चकत्या ठेवणे
(५) झाडांवरच राहू देणे छान दिसत आहेत. नशीबवान आहात तुम्ही "ग्रीन थंब" आहे तुम्हाला.
(६) ऑफीसात कॉमन जागेत नेऊन ठेवणे व पुण्य कमावणे
(७) सँडविच मधे घालणे

ही पाककृती नसून 'आंख कृती' आहे! ;)

राजेश घासकडवी's picture

30 Jul 2010 - 4:31 am | राजेश घासकडवी

खालची मोठी काकडी सुमारे ३३ इंच लांब असून ९ इंच व्यासाची आहे तर दुसर्‍या काकडीचा व्यास १० इंचांपेक्षा अधिक आहे

तुम्हाला व्यासच्या ऐवजी परीघ म्हणायचं आहे का? दहा इंच व्यासाची, म्हणजे जाडीची, काकडी मी तरी आत्तापर्यंत बघितली नाही. चित्रावरूनसुद्धा जाडी लांबीच्या साधारण १/१० वाटते, १/३ नाही.

काकडीचा काही पदार्थ करण्याऐवजी त्या किसून त्याचा चेहेऱ्यासाठी पॅक करावा - विशेषत: उन्हाळ्यात खूप छान वाटेल. दहा इंच व्यासाची असेल तर किसण्याची गरज नाही. आख्खी काकडी आतून पोकळ करून चेहेऱ्यावर बसू शकेल.

सोबत काकडी मार्गारिटा प्यावी - तिची कृती अशी

चार कप फ्रोजन काकड्या (कप =२४० मिली)
तीन टेबलस्पून लिंबाचा रस (टेबलस्पून = १५ मिली)
अर्धा कप टकिला
अर्धा कप ट्रिपल सेक (नसल्यास टकिला पाउण कप घेऊन ऑरेंज इसेन्स टाकावा)
चार टेबलस्पून साखर (चवीनुसार कमीजास्त)

हे सगळं ब्लेंडरमध्ये घालून त्याचा काकड्यांचा बर्फाळ भुगा होईपर्यंत बारीक करायचं. वेळ असल्यास ही सुमारे अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवावी. सुमारे चार माइल्ड ड्रिंक्स होतात. ग्लासच्या कडेला लिंबू चोळून त्या मिठात बुडवून त्यात सर्व्ह करा. किंवा फेसपॅक लावून पडलेल्या असाल तर आपल्या सुहृदाने हे सगळं करून सर्व्ह केल्यास सौहार्द आणखीनच वाढतं, हे सुहृदाला समजावून सांगा.

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 4:39 am | प्रियाली

परीघच. व्यास नाही. ;-) माझ्या डोस्क्यात [वेद]व्यास फिट्ट बसल्याने असं होतं. (खरे म्हणजे स्वयंपाक करता करता कालच्या वादळांत काकड्यांचे काय झाले असे डोक्यात आले. म्हणून बाहेर गेले तर काकडी रात्रभरात आणखीच गब्दूल झालेली दिसली. तोडून खांद्यावर घालून घरात आणायला लागली. लगेच फोटो काढला. अपलोड केला. मिपावर घातला. त्यात परीघाचा व्यास झाला.... हे स्पष्टीकरण होऊ शकत नाही. तरीही...)

दहा इंच व्यासाची असेल तर किसण्याची गरज नाही. आख्खी काकडी आतून पोकळ करून चेहेऱ्यावर बसू शकेल.

हीहीहाहा! व्यास नाहीये १० इंच. गल्तीसे मिश्टेक हुआ था|

बाकी, मार्गारिटा फेवरिट असल्याने शुक्रवारी संध्याकाळची सोय झाली.

आणखी पाककृती येऊ द्या. रोज मार्गारिटा पिऊ आणि पचवू शकत नाही.

राजेश घासकडवी's picture

30 Jul 2010 - 5:49 am | राजेश घासकडवी

लगेच फोटो काढला. अपलोड केला. मिपावर घातला. त्यात परीघाचा व्यास झाला....

असलंच काहीतरी होऊन नासा इंचाचे सेंटीमीटर करते... आणि मग अमेरिकन पब्लिक बोंब मारतं.

संपादक मंडळ या आयडीला खरड टाकून दुरुस्तीची विनंती करा. :)

कोण बरं म्हणतं स्वयंसंपादन अनावश्यक आहे म्हणून :)

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 6:08 am | प्रियाली

लेख लिहिताना अशी घाई करू नये आणि झालीच तर तक्रार करू नये.
(गुन्हेगार)प्रियाली

मी तक्रार केलेली नाही. करणार नाही. (मी शेंगा खाल्ल्या नाहीतच्या चालीवर) ही चर्चा म्हणजे काय कालिदासाचे लिखाण आहे की वेदव्यासांचे? की लोक अजून २००० वर्षांनी राक्षसी काकड्यांच्या पाककृतीची चर्चा करतील? आणि केलीच तर हा प्रतिसादही वाचतील. त्यामुळे त्यांचे निराकरण होईल.

(आशावादी) प्रियाली

झालेल्या चुकीची अस्मादिकांना खंत नाही तेव्हा स्वसंपादन आवश्यक नाही. जी काय चूक झाली ती प्रतिसादातून कबूल केली. हळूच जाऊन स्वसंपादन केलेले नाही. :-) जे इंस्टंट असते त्यात चूक होण्याची शक्यता असते म्हणून प्रतिसाद संपादीत करता येतात आणि यावेत. जे इंस्टंट नाही ते काळजीपूर्वक टाकावे (जे मी केलेले नाही) अशावेळेस चूक मान्य करावी आणि संपादकांना वाटल्यास विनंती करावी.

(निर्लज्ज) प्रियाली

संपादक मंडळ या आयडीला खरड टाकून दुरुस्तीची विनंती करा.

हॅहॅहॅ! संपादकांना यापेक्षा बरी कामे आहेत. त्यांच्या बागेत मिरच्याही आहेत. त्याही काढायच्या आहेत. :प

(पार्टटाईम शेतकरी) प्रियाली

DSC02467

उसको मिर्ची लगी तो मैं क्या करू? ;-)

राजेश घासकडवी's picture

30 Jul 2010 - 6:27 am | राजेश घासकडवी

लेख लिहिताना अशी घाई करू नये आणि झालीच तर तक्रार करू नये.

करू नये हे मान्यच. पण आजकालचं जीवन धकाधकीचं आहे. प्रत्येकजण शेकडो गोष्टी जगल करत असतो. मिपावरचं काम मग ते लेखन असो की वाचन असो की इतर काही...हे आपापलं खाजगी आयुष्य सांभाळूनच करत असतात. जर आपलाच थोडा तोल गेलेला सावरता आला तर बरं नाही का? दर वेळी संपादकांना कुठे त्रास देत बसायचं? ते पण बिझीच असतात.

मी केली का? ही चर्चा म्हणजे काय कालिदासाचे लिखाण आहे की वेदव्यासांचे?

तुम्ही अर्थातच तक्रार केली नाही... आणि दुरुस्ती करण्यासाठी ते लेखन आपल्याला प्रिय असलं की झालं. आता समजा, एखाद्या मुलीला सांगितलं, की तुझ्या चेहेऱ्याला पावडर जास्त लागली आहे, तर ती नीटनेटकी करेलच ना? तिला जर म्हटलं की तू कोण एवढी सुंदरी माधुरी दीक्षित किंवा मधुबाला लागून गेली आहेस की तुझे फोटो प्रदर्शनात मांडणार आहेत? तर?

झालेल्या चुकीची अस्मादिकांना खंत नाही तेव्हा स्वसंपादन आवश्यक नाही.

तुम्हाला व्यक्तीश: नको असेल - ते असताना न वापरण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. पण हे सगळ्यांवरच लादणं योग्य नाही. तुमच्या लेखाचा मी केवळ उदाहरण म्हणून वापर केला.

अशावेळेस चूक मान्य करावी आणि संपादकांना वाटल्यास विनंती करावी.

पण त्यापेक्षा संपादकांनीच/व्यवस्थापकांनीच सामान्य लेखकांवर विश्वास ठेवला, व बहुतेक सर्व जण काहीतरी काड्याघालूपणा करणार नाहीत असं गृहीत धरलं तर? खोडसाळपणा करणारे एरवीही करू शकतातच... हा प्रश्न व्यवस्थापनाचा सर्वसामान्य सदस्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनाचा आहे.

असो. काकडीच्या धाग्यावर झालं इतकं अवांतर पुरे. तुम्हाला नसली तरी मला संपादकांची भीती आहे. ही चर्चा आपण दुसरीकडे कुठेतरी करू.

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 6:31 am | प्रियाली

तुम्हाला नसली तरी मला संपादकांची भीती आहे. ही चर्चा आपण दुसरीकडे कुठेतरी करू.

आम्हालाही आहे पण फार अवांतर नको.

काकड्या खपवायच्या आहेत. खायला येता का बोला? मार्गारिटाही करू आणि स्वसंपादनाची सोय आवश्यक की अनावश्यक याची चर्चा करू.

----------------

स्वतःलाही नाही सोडलं. नतद्रष्ट कुठले? - मास्तर, सामना.

राजेश घासकडवी's picture

30 Jul 2010 - 6:45 am | राजेश घासकडवी

खायला येता का बोला? मार्गारिटाही करू आणि स्वसंपादनाची सोय आवश्यक की अनावश्यक याची चर्चा करू.

बापरे, काही गुहांमध्ये फक्त जाणाऱ्या पावलांच्या खुणा दिसतात असं ऐकून आहे... ;) ती भीती सोडली तरी केवळ काकडीच्या मार्गारिटासाठी तिथपर्यंत येणं महागाचं आहे...काकड्याच पाठवा

(काकड्या आवडणारा (व चतुर) कोल्हा) राजेश

केशवसुमार's picture

30 Jul 2010 - 5:00 am | केशवसुमार

की जय..
ह्या घ्या १. काकडी वापरून करता येणार्‍या पाककॄती..
२. काकडी वापरून करता येणार्‍या ८८२पाककॄती..
(गुगल्या)केशवसुमार
मला काकडी नुसती मिठ-तिखट लावून आणि दाण्याचे कुट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून जीर्‍याची फोडणी दिलेली कोशिंबीर ह्या दोनच प्रकारे खायला आवडते..
(निवडक)केशवसुमार
बाकी तळून, भाजून काकडी खाणारी माणसे मी युरोपात बघितली आहेत..बुळबुळीत लागते..इक..
पुण्यात अलका टॉकिज समोर द्वारका (?)नावाचे उपहारगृह आहे तिथे भेळेत काकडी घालतात...इक..इक..इक..
(स्मरणशील)केशवसुमार

मीनल's picture

30 Jul 2010 - 5:35 am | मीनल

उपासाची भाजी पण छान होते.
काकडीचे साल काढून बारीक चिरून घेणे. कढईत जि-याची फोडणी करून त्यात मिरच्यांचे तुकडे घालावेत. त्यात फोडी घालाव्यात. कढईवर झाकण घालून बारीक गॅस वर शिजू द्यावे. काकडीत पाणी असतेच. त्यामुळे ते लगेच्च शिजेल. हवे असल्यास वरून पाणी घालावे. चवीपुरते मीठ, साखर घालावे. दाण्याचा कूट घालावा. वरून कोथंबीर चालावी.
आई शप्पथ मस्त लागते !

काकडी दहा इंच व्यासाची असेल तर इकडे पाठवून दे. आख्खी काकडी आतून पोकळ करून चेहेऱ्यावर बसवेन.

नाहीतर तू तश्याच जपून ठेव. हॅलोविनला भोपळ्या ऐवजी त्याच कोर. शब्दश: `राक्षसी ` होतील .

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 5:45 am | प्रियाली

हॅलोवीनला वेळ आहे नाहीतर १० इंच परीघाची काकडीही कोरता आली असती. आयड्या मस्त होती पण थोडी लवकर आली. :-)

पाककृतीबद्दल धन्यवाद. मी भाजीत मुगाची डाळही घालते. तीही मस्त लागते पण उपवासाची नाही.

@ शुचि, मी नुकतेच हापिस बदलल्याने कॉमन स्पेस कुठे आहे ते अद्याप माहित नाही. जुन्या हापिसात हे उद्योग केलेले आहेत. तिथे माझ्यासारखे अनेक शेतकरी होते. टॉमेटो, मिरच्या, वांगी, कांदे वाटत फिरायचे. ;-)

@ केसु, गूगलून नको. मिपाकरांना कामाला लावलं आहे ना.

धनंजय's picture

30 Jul 2010 - 5:46 am | धनंजय

मागे केळ्याचे सांदण (दुवा) दिले होते. त्यात केळ्याऐवजी किसलेल्या काकड्या वापरून काकडीचे सांदण करता येते.

काकडीच्या पाण्यात पोहे (पातळ पोहे) दडपून भिजवता येतात - बाकी मिरच्या मसाला चवीप्रमाणे - भरपूर काकडी वापरली जाते.

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 5:48 am | प्रियाली

या सांदणालाच आम्ही धोंडस (तुम्ही धोणस म्हटले आहे) म्हणतो. ही पाककृती केलेली नाही पण डोक्यात होती. माझ्या नाही...मातोश्रींच्या. :-)

स्वाती दिनेश's picture

30 Jul 2010 - 10:42 am | स्वाती दिनेश

काकड्या मस्तच!!!
धोंडस च आले माझ्याही डोक्यात बघितल्या बघितल्या एकदम!
एखादा मिपा कट्टा करुन उसातल्या मिपाकरांना काकड्या वाट..:)
स्वाती

सहज's picture

30 Jul 2010 - 6:24 am | सहज

जबरी काकडोबा

अगदी कोवळ्या असतानाच जर का ह्या काकड्या काढल्या तर चविला बर्‍या लागतात का? तसे असेल प्रश्न सुटावा.

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 6:28 am | प्रियाली

हेच मीही त्यांना म्हणते. काकडोबा!!! त्या काकड्या म्हणायच्या लायकीच्याच नाहीत.

अगदी कोवळी असताना काढून पाहिली पण कच्चट लागली आणि गेले दोन-तीन दिवस जरा बिझी होते. संध्याकाळी बाहेर जाणे झाले नाही. पाऊस वगैरेही होता. आज गेले तर हे काकडोबा नजरेस पडले.

चतुरंग's picture

30 Jul 2010 - 7:15 am | चतुरंग

हिरवे सोटे आहेत! ;)

मिरच्या आणि सोटे दिसताहेत बाकी जबरी बरं का! :)

(मीठ + तिखट + काकडी आवडणारा)चतुरंग

शहराजाद's picture

30 Jul 2010 - 7:40 am | शहराजाद

घासकडवी यांच्या मार्गारीटाच्या कृतीपासून प्रेरणा घेऊन खालील पेय तयार केले आहे.

चार कप फ्रोझन काकडीचे चौकोनी तुकडे
पाऊण कप जिन
दीड टेबलस्पून लिंबाचा रस
चार टेबलस्पून साखर
वीसएक पुदिन्याची पाने

पुदिना सोडून सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बर्फाच्या चुर्‍याप्रमाणे होईल इतपत बारीक करावे. पुदिन्याची पाने जराशी ठेचून त्यात मिक्स करावी. पिण्यापूर्वी अर्धा तास फ्रीझरमध्ये ठेवल्यास पुदिन्याचा स्वाद चांगला लागतो.
सुमारे चार लहान किंव तीन मोठी ड्रिंक्स होतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2010 - 9:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही एखादी काकडी पाठवून दे! बाकी प्रियाली, तुझ्या घरच्या काकड्या तुझ्यासारख्याच खतरनाक दिसत आहेत!
तुझ्यामुळे मलाही चार नवीन पाकृ कळल्या. माहितीत भर पडली. स्वयंपाकाच्या अनुभवात भर पडणार नाही याचीही तेवढीच खात्री आहे.

(आळशी) अदिती

फार्मव्हील खेळतेस का नाही! ;-)

(खेळाडू!) अदिती

ऋषिकेश's picture

30 Jul 2010 - 9:54 am | ऋषिकेश

बापरे!! काकड्या आहेत का दोडके!!
कागदाचे बोळे करून घरातल्या घरात क्रिकेट खेळायला ब्याट म्हणूनही वापरता यावेत ;)

बाकी पाककृती या भागात प्रियाली नाव बघुन दचकलो.. शिर्षक (राक्षसी वगैरे ;) )मात्र लेखिकेच्या पूर्व लेखनाशी सुसंगत

अवांतर: वाळल्यावर काकड्यांना छान जाळी पडते.. त्याला रंग लाऊन शोपीस म्हणून ठेवा

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 4:41 pm | प्रियाली

बाकी पाककृती या भागात प्रियाली नाव बघुन दचकलो.

हा चक्क माझा अपमान आहे. ;-)

याचा बदला म्हणून वेळ झाला की टाकतेच पाककृती काही.

ऋषिकेश's picture

30 Jul 2010 - 4:47 pm | ऋषिकेश

हा हाहा :)
पाकृ ची वाट पाहतोय

*बाकी अपमान कसा? प्रियाली नावाबरोबरच्य मजकुराने दचकणे ही सर्वमान्य रित आहे ना? ;)*

श्रीराजे's picture

30 Jul 2010 - 10:46 am | श्रीराजे

या काकड्यांना कोल्हापुरकडे "वाळके" म्हणतात.
हि वाळके काकडीपेक्षा चवीला छान असतात.

ह्या कोवळ्या काकड्या खुप छान लागतात.
प्रियाली काकडीचे धोंडसही करतात, काकडीचे पुर्‍यांसारखे वडे करतात. काकडी ऋषीपंचमीला भाजी करतो त्या भाजीत घालतात.

या बहुदा मावळी काकड्या/ वाळके आहेत. खूप दिवस झाले खाऊन :(
असो पाहायला तर मिळाल्या.

क्षितिजा's picture

30 Jul 2010 - 12:26 pm | क्षितिजा

कोयते पन छान होतिल...

मी आधी शीर्षक चुकून 'राक्षसी काड्या' असं वाचलं.. हॅहॅहॅ..

नारायण धारपांच्या एका कथेची आठवण झाली .त्यात सुरुवातीला पृथ्वीवर आक्रमण असेच होते. नंतर शेवट वाचताना अंगावर काटा येतो.
तसा काही प्रकार नाही ना ?

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 3:53 pm | प्रियाली

नारायण धारपांच्या एका कथेची आठवण झाली .त्यात सुरुवातीला पृथ्वीवर आक्रमण असेच होते. नंतर शेवट वाचताना अंगावर काटा येतो.
तसा काही प्रकार नाही ना ?

असेल असेल.

आमच्या घरात अवेळी फुलणारी झाडे आहेत.
जमिनीवर तयार झालेले सैतानी चेहरे

trial

आणि आता या राक्षसी काकड्या. ;-)

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 3:46 pm | प्रियाली

प्रतिसादांसाठी धन्यवाद.

या काकड्यांना वाळके म्हणतात हे मला माहित नव्हते. किंबहुना, या काकड्या मी पहिल्यांदाच पाहिल्या.

स्वाती म्हणते तशी उसात एक पार्टी करायला हवी.

केशवसुमार's picture

30 Jul 2010 - 4:22 pm | केशवसुमार

ज्वारीचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिठ. हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जीरे पुड.
काकडी उकडा, मिक्सर मधून त्याचा ज्यूस करा आणि ह्या ज्यूस मध्ये वर दिलेले सर्व साहित्य मिसळा, आणि त्याचे थालिपीठ लावा.. अतिशय खमंग लागते..
(स्वयंपाकी)केशवसुमार
(भाज्या खायची आवड नसल्या मुळे मला आणि आमच्या चिरंजीवांना ,ह्या पध्दतीने आमची बायको थालिपीठात काय वाट्टेल त्या भाजा घालून खायला घालते )

प्रियाली's picture

30 Jul 2010 - 4:40 pm | प्रियाली

असा प्रकार मी कधी ऐकला नव्हता. अवश्य करेन.

पुष्करिणी's picture

31 Jul 2010 - 3:25 am | पुष्करिणी

काकडी-कांद्याचे धपाटे असेच करतात, फक्त काकडी आणि कांदे दोन्ही किसायचे आणि त्याला सुट्णार्‍या पाण्यातच ज्वारीचं / नाचणीचं पिठ किंवा भाजणी आणि मीठ, बारिक चिरलेल्या मिरच्या, जीरे, कोथिंबीर / कसुरी मेथी भिजवायचं....याची थालिपीठं लावायची

दिपाली पाटिल's picture

30 Jul 2010 - 10:42 pm | दिपाली पाटिल

मस्त आहेत काकड्या,तुम्ही कुठे असता उसगावात?...नाही म्हणजे जवळच असाल तर काकड्या घ्यायला येऊ... :D लोकल ग्रोसरी-स्टोर मध्ये देऊ शकता...इकडे भारतीय दुकानात दिसतात काही नविन होम-ग्रोअन प्रकार...

स्वाती२'s picture

31 Jul 2010 - 1:13 am | स्वाती२

मस्त आहेत काकड्या. ४-ह मधे किंवा जत्रेत बक्षिस मिळायला हरकत नाही.

पुष्करिणी's picture

31 Jul 2010 - 3:46 am | पुष्करिणी

मजगे हुळी पण छान होते काकडीची..

१ काकडी , २ मुठी हरभरा डाळ , १ इंच आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या ( चवीनुसार ), मीठ, जिरे, १ वाटी आंबट ताक, २ लाल मिरच्या, फोडणीचे साहित्य ( हिंग मस्ट ).

हरभर्‍याची डाळ ४० मि. भिजवा

हरभर्‍याची डाळ, आलं, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ एकत्र वाटून घेणे.
बारिक चिरलेली काकडी ( फार बारिक नको, २ से.मी ),
जितकी काकडी त्याच्या थोडं जास्त पाणी ( म्हण्जे १ कप काकडीचे तुकडे तर १.२५ कप पाणी ) एका पातेल्यात घेउन उकळायला ठेवा, त्यात काकडीचे तुकडे टाका, ५ मिनिटांत काकडी शिजेल. या उकळत्या पाण्यात वाटलेली डाळ टाका, अजून ५ मि. शिजवणे. गॅस बंद करून ताक घाला. वरून लाल मिरच्यांची फोडणी द्या . चिरलेली कोथिंबीर पेरा..

थोडासा काढीसारखा लागतो हा पदार्थ.

प्रियाली's picture

31 Jul 2010 - 4:10 am | प्रियाली

हे ही कधी न ऐकलेलं.

या निमित्ताने काकडीचे बरेच प्रकार कळले.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

मिसळभोक्ता's picture

31 Jul 2010 - 5:00 am | मिसळभोक्ता

इंडियानापोलीस मध्ये कुठे कुठे फार्मर्स मार्केट असते ह्याचा शोध घ्या.

किंवा हे बघा.

आणि थोडेफार अधिक पैसे कमवा.

प्रियाली's picture

31 Jul 2010 - 7:02 am | प्रियाली

फार्मर्स मार्केट आहे ना गावात. शनिवारी भरते. लेकीला सांगत असतोच आम्ही की पुढच्या आठवड्यात तुला एक बाकडं टाकून देणार, विक भाज्या म्हणून. ;-)

काकड्या इतक्या फोफावत चालल्या आहेत की बहुधा उद्याच प्रयोग करावा लागणार.

चित्रा's picture

31 Jul 2010 - 5:11 am | चित्रा

घरच्या काकड्या छान दिसत आहेत.
मला हिंग-तिखट-मीठ लावून आवडतात.
आणि काकडीचे (मोहरीमुळे नाकात कळ जाते, पण आवडते असे) लोणचे.

कवितानागेश's picture

31 Jul 2010 - 12:44 pm | कवितानागेश

तांदूळाचे पीठ आणी गूळ घालून धिरडी छान होतात.
थोडे जायफळ पण घालता येइल.

सूड's picture

13 Aug 2010 - 8:48 pm | सूड

काकडी (तुमच्या बागेकडे बघून या शब्दाचे अनेकवचनपण चालेल :) ) एका परातीत किसून घ्यावी.
त्यात चवीनुसार गुळ कुस्करावा. किसलेल्या काकडीच्या अंगच्या पाण्यात (आमच्याकडे हाच शब्द वापरतात) गुळ नीट विरघळला की त्यात तांदळाची पिठी हळु हळु मिसळून गोळा करावा. हा गोळा करताना वरील मिश्रणाचेच पाणी वापरावे, वरुन वेगळे पाणी ओतू नये. आणि मग या मिश्रणाचे पाण्याचा हात घेउन केळीच्या पानावर अथवा नॉनस्टिक (मराठी शब्द?) पृष्ठभागावर घारगे थापून छान गुलाबी/ बदामी (अशाच काहीशा ) रंगावर तळावे. आणि मग फडशा पाडावा (केले तर फोटु डकवावे (?))

यात तांदळाच्या पिठीऐवजी भाजणीच्या वड्यांचे पीठ पण वापरु शकता.
(मी येथे नवीन आहे त्यामुळे लिखाणात थोडे कमीजास्त सांभाळून घ्यावे. )

प्रियाली's picture

13 Aug 2010 - 9:13 pm | प्रियाली

करून पाहिला पाहिजे हा पदार्थ. कालच एक काकडी तोडून आणली आत. ;)

आता काकड्यांचा इतका कंटाळा आला आहे की बहुतेक वेल उपटून काढणार मी.

सूड's picture

16 Aug 2010 - 1:02 pm | सूड

नक्की करा, आणि हे वडे तांदळाच्या खीरीसोबत अगदी खास लागतात. फक्त खीर बनवताना त्यात दुधाऐवजी ओला नारळ वाटून घालावा. (हे विकांतालाच करावे म्हणजे आडवा हात मारुन मस्त डुलकी काढता येते दुपारी :) )

पिवळा डांबिस's picture

13 Aug 2010 - 10:11 pm | पिवळा डांबिस

हे बघितलंच नव्हतं!!!
मस्तच आल्यात की काकड्या!!!
बाकी काकडीचे फारसे पदार्थ माहिती नसल्याने तिथे एस ओ डबल आर ई!!
:)