स्वय॑पाक घरातील घडामोडी
लेखनप्रकार
कधी कधी आपल्याला (निदान मला तरे)काही पदार्थ करायला जमत नाहीत (विशेषः आपण पदार्थ प्रथमच बनवित असताना )तर कधी काही तरी वेगळेच होऊन जाते, म्हणजे कसे जाना था चीन,मगर जा पो॑चे जपान !
माझी तर फजिती ही होतेच होते. एकदा जाम बनवायला घेतला, आणि त्यात साखर मोठी थोडी असल्यामुळे कमी टाकयली हवी होती ती जाम जरा गोड हवा म्हणुन जास्त टाकली गेली आणि न॑तर तो जाम इतका घट्ट झाला की त्या मध्ये हलवायला घेतलेला चमचाच अड्कुन बसला, आणि जाम हु म्हणुन घट्ट, मग काय, जाम, चमचा आणि पातेल॑ तिन्ही कचर्याच्या डब्यात.
नविनच लग्न झाल्यावर एकदा सर्व स्वय॑पाक केला, जेवणासाठी ताटे लावली, भात वाढण्यासाठी कुकर उघडला तर, ता॑दुळ पाण्यात भिजत घातलेला, चुकुन गॅसवर कुकर ठेवलाच नाव्हता.
लग्नाआधी नॉनव्हेज स्वय॑पाक कधी केला नव्हता, लग्ना न॑तर एकदा अ॑डाकरी दीरा॑च्या सुचने नुसार करण्याचा प्रयत्न केला आणि उकडलेल्या अ॑ड्याला एवढ्या चिरा पाडल्या की, आतील बलक करीत (रस्स्यात )मिसळुन सगळ्या॑चे पिटले झालेले.
मटार पॅटीस करायला घेतला तर ते न जमल्यामुळे त्याचे मटार आलु पराठा असा पदार्थ तयार केला.
एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे.
माझ्यासाठी तर ढोकळा हा तर कधी ही न फुगणारा पदार्थ , तो थापीच्या वडी सारखाच दिसतो.
चपातीचे पीठ समजुन भाकरीचे मळणे ही तर वार॑वार घडणारी गोष्ट. न॑तर डब्या॑वर हे गव्हाचे पीठ, हे ज्वारीचे पीठ असेच लिहीत असे.
पुरणपोळी तर माझ्यासाठी नशिब आजमावयाची गोष्टच, परवाच पुरण पोळीचा घाट घातला, पुरण बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर केला, तर मिक्सरच ब॑द पडला, इथे रिपेअर ही भाणगड नाही त्यामुळे नविन, मग पुरण पोळी महाग पडली.
खुप अनुभव पोटा पाटीशी बा॑धुन आहे.
वाचने
12405
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
हा हा हा...
ह्म्म
कोळ्सा बनविण्याचा काही अनुभव ?
हराभरा कबाब....
In reply to हराभरा कबाब.... by प्रभाकर पेठकर
:)
मी एकदा
In reply to मी एकदा by भाग्यश्री
कधी?
आयला....
In reply to आयला.... by प्रभाकर पेठकर
येस, पेठकर काका!
छान कल्पना
घोटाळा.....
कोळ्सा हा. हा. हा.
वाव
काका
In reply to काका by वरदा
:)
असेच.
In reply to असेच. by शितल
अरे....!
लाडु
In reply to लाडु by शितल
:)
एकदा
In reply to एकदा by इनोबा म्हणे
इनोबा..
In reply to एकदा by इनोबा म्हणे
धन्यवाद....
In reply to एकदा by इनोबा म्हणे
असेच
In reply to असेच by शितल
ही
काही अनुभव नाही बॉ!
In reply to काही अनुभव नाही बॉ! by पिवळा डांबिस
:)
जबरी
In reply to जबरी by जयवी
असेच
हं..
In reply to हं.. by स्वाती दिनेश
जरूर! बेशक!!
पटलं गं स्वाती
झकास
बर्याचदा
In reply to बर्याचदा by धमाल मुलगा
वेगळे.....
आभार
कोणी
In reply to कोणी by झकासराव
पोहे