मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या गरमीला काय करावे बॉ?

वेदश्री · · काथ्याकूट
इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. ढीगभर काळजी घेत घरातच पडून राहूनदेखील जात्याच उष्ण प्रकृती असल्याने तोंडावर जर उठला आहे. दोन दिवसांनी घरी जायचे आहे. असे थोबाड घेऊन घरी गेले तर घाबरतील सगळे ( हापिसातही घाबरतातच आहेत पण बोलू शकत नाहीत तसे कोणी.. ) लवक्कर फरक पडेल असा काही उपाय आहे का कोणाकडे?

वाचने 52195 वाचनखूण प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

मनस्वी 28/04/2008 - 12:44
गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.

In reply to by मनस्वी

वेडझवा 30/04/2008 - 11:39
टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो -- असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!

In reply to by वेडझवा

स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..
>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :( >पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल. हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !

आर्य 28/04/2008 - 13:16
वेदश्री, मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. हेच प्रवासा साठी ही लागु आहे.

In reply to by आर्य

>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, >आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता.. >ऊन्हात भटकणे वर्ज. हे केले आहे. > फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :( >किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा.. >रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय.. >जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही.. >दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही. >हेच प्रवासा साठी ही लागु आहे. प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !

In reply to by आर्य

धमाल मुलगा 28/04/2008 - 13:33
वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे! त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!! कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. -(निमहक़ीम) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!! तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :( >कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. हे एक बरं झालं. > त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.

In reply to by वेदश्री

मनस्वी 28/04/2008 - 13:43
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
का बरे?
आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.

In reply to by मनस्वी

>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. >का बरे? कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :( >>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. >म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी. चांगली दिसत नाही ना पण..

In reply to by धमाल मुलगा

>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!! बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !

In reply to by वेदश्री

:/
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात.
बुट पायात घालतात ना? मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात? आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी.... मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला.... ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं.... ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला... बोला कोणकोण येतंय?

In reply to by धमाल मुलगा

एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

In reply to by धर्मराजमुटके

धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा! धर्मराजमुटकेजी, पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली - - सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!

In reply to by परिकथेतील राजकुमार

उपास 01/04/2013 - 23:01
पराशेठ, अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)

विजुभाऊ 28/04/2008 - 13:39
एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे. बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. पोहणे हाही एक मस्त उपाय

In reply to by विजुभाऊ

>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. 'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! ) >उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले ! >पोहणे हाही एक मस्त उपाय येत नाही त्यामुळे शक्य नाही.
कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेदश्री 28/04/2008 - 14:19
>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. :,( >ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.

In reply to by वेदश्री

माझी दुनिया 30/04/2008 - 13:15
अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X( आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार 28/04/2008 - 20:10
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. (सहमत)केशवसुमार स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?

दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव. सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे. २-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील). तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.
हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही... फारच त्रास होत असेल तर... थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या. आता कोपर्‍यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात.... डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले..... आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.
एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. आपला, (धन्वंतरी) धोंडोपंत :D आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते. >दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही. >तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते. >गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची. >शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/
वेदश्रीधर्म? हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला. दशावतरी पहनारा इजुभौ आगरी

In reply to by विजुभाऊ

हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)
:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच... मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :

In reply to by भडकमकर मास्तर

केशवसुमार 28/04/2008 - 20:07
काय मास्तर सगळ ठिक आहेना.. गरमी??/ घाबरलोच... हा हा हा हा.. (संशयी)केशवसुमार स्वगत :- सध्या वेगळेच क्लास चालू आहेत वाटत!

In reply to by भडकमकर मास्तर

मलाही तेच वाटले पहिल्या॑दा (करप्ट माई॑ड) मिपा बा॑धवा॑नी सुचविलेले एकसे एक उपाय वाचून मात्र खूप दिवसा॑नी पोट धरून हसलो.. त्यातल्या त्यात धमालचाच उपाय चा॑गला आहे..( बडवायझर चा॑गली की कि॑गफिशर रे?? :)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा 02/05/2008 - 12:17
किंगफिशर जर वरिजनल नाही मिळाली आणि ती स्ट्राँग असेल तर फुकट छातीची जळजळ पदरी पडेल... बडवायझर माईल्ड सध्या उत्तम मिळते....अजुनतरी तिची ड्युप्लिकेट आलेली नाही :) बाकी फॉस्टर्स किंवा बॅरॉनही चालेल....छान आहेत...औषध चांगलं लागू पडेल :)

In reply to by स्वाती राजेश

केशवसुमार 28/04/2008 - 20:14
थंड होशील असे म्हणायचे आहे का तुम्हाला? केशवसुमार स्वगत :- येव्हढे स्पष्ट बोलायची काय गरज आहे का?

वाटाड्या... 28/04/2008 - 19:05
मलाही असाच त्रास होता. आमच्या घरातच आहे म्हणा ना. २ जालीम उपाय मी केले आणी कायमची उष्णता विकाराची वाट लावली, १. कोकम सरबत (बर्फ न घालता) - २ ग्लास नियमित, २. सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. मुकुल

In reply to by वाटाड्या...

सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. माझाही असाच अनुभव आहे. पण जास्त प्रभावशाली परिणामासाठी मी दीड लिटर पाणी दांत घासायच्या आधी प्यायचो नंतर फक्त दात घासायचे, २ तास काहीही खायचे प्यायचे नाही असा उपाय केला होता. ३ आठवड्यात अनेक तक्रारी दूर झाल्या. तळपायाची, डोळ्यांची आग, किडणी शुद्धीकरण, तापमान नियमन, पोट साफ असे अनेक फयदे आहेत. (तेही फुकटात.)

In reply to by प्रभाकर पेठकर

आरंभासाठी पाण्याचे प्रमाण ७५० मिली (ब्रॉडली स्पिकींग, एक खंबा) हेच योग्य. पुढं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवत १५०० मिली (दोन खंबे) करायचं असं ते सूत्र आहे. कंसाचा विचार करता हे पटावं.... :D
वैद्य पाटणकर काढा ह्या वर अतिउत्तम!शरीरातील उष्णता,कडकी,अपचन या सारख्या विकारांवर ताबडतोब गुणकारी दररोज ३ ते ४ चमचे रात्री जेवणानंतर व आठवडाअखेरीस किमान ६० मिली घेणे. ता.क. झाडा जास्त झाल्यास मात्रा कमी घेणे. आयुर्वेद प्रेमी, अण्णा हजारे

रामदास 28/04/2008 - 21:55
पीव्हीसी सोल असलेली चप्पल वापरणे बंद करावे. दर तीस मिनिटांनी २०० मिलि पाणी प्यावे. अधुनमधुन पाण्यात किंचीत मिठ . नाहीतर पायात गोळे ,पेटके येतात. चहा बंद. गोगल वापरणे मस्ट.कूल कूल पावडर वापरू नये.

अभिता 29/04/2008 - 01:49
डोळे येतात तेव्हा जी छोटी टयुब मिळ्ते ति डोळ्यात घालावी.नाहितर नेत्राजन घालावे.लवकर आराम मिळतो.
मिपाकरांनी उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. काल संध्याकाळी तापाने फणफणल्याने कुठलाच उपाय करता जमला नाही पण आजपासून सुरूवात करेन गुलकंद घेणे, मीठाच्या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसणे असे सहजसुलभ उपाय अवलंबायला. भाचर्‍यांना आगाऊ सूचना देऊन ठेवली आहे की आत्या/मावशीला हॉरर रुपात बघायला तयार रहा म्हणून..

In reply to by वेदश्री

आत्या मावशी, सकाळी सकाळी चार अंडी एक ग्लासात फोडून एका दमात गटकवुन टाकायची आणि मस्त पैकी १ मैल धावुन यायच. दाद खाज खुजली गर्मी सगळ एका झटक्यात साफ. -(रॉकी फॅन) नंदा

In reply to by व्यंकट

व्यंकटराव... हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे! =)) विजुभाऊ...आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी??????

In reply to by धमाल मुलगा

हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी?????? नाही हो अगदी जाळी असण्याइतका काही आमचा शुक्र बिघडलेला नाही. पण माझ्या हातावरच्या जाळीचा इथे काय सम्बन्ध आला? हातावर जाळी (शुक्र बिघडलेला) असल्यामुळे गरमी होउ शकते हे मला माहीत नाही. एक खूपच अज्ञानी विजुभौ.
पाहून वेदश्री म्हणेल 'गरमी (उकाडा, उकाडा) परवडला पण...' अर्थात आम्हाला ध. मु. ह्याचीच सूचना सर्वात अधिक पसंत पडली हे वेगळे सांगणे न लगे :)

मन 30/04/2008 - 19:15
गरमीचा त्रास होत असल्यास हिमालायात जावे पुत्री! कायमचाच अंत होइल(त्रासाचा!). तिथे जाउन गंगोत्री वर एका पायावर उभे राहुन नाम जप केल्यास करणर्‍याला (उष्ण्ता,ताप इत्यादी असुरां पासुन) "कायमची मुक्ती" मिळते असे श्रुती,वेद, उप निषदांत वर्र्णिले आहे. तर बोला हरि अऊम तत्सत! हरी भक्त परायण, साठ्यांचे कार्टे.

अभिता 30/04/2008 - 23:56
काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही कसे बरोबर बोललात? तसे मिपाकर हुशार!
काय मंडळी, ह्या उन्हाळ्यात होताहेत का कुणाला गरमीचे त्रास????? ;) वर सांगितलेले उपाय एकापाठोपाठ एक असे वापरुन पहा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
वेदश्री , तु की नाही ओलं कापड ठेव डोक्या वर घरी असताना आणि दिवसा तून ३-४ वेळा गार पाण्या ने तोंड धूत जा, कधि कधि काकडी खा , पन्हं, शहाळ्याचं पाणी पित जा... यामुळे थोडं बरं वाटू शकतं...:)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

मिपाकर हे असामान्य असल्याने त्यांचे उपाय सुद्धा असामान्य असावेत ;) येथे एकट्याने , दुकट्याने, सामुहीक करावयाचे उपाय असे वर्गीकरण करता येईल काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चिरोटा 16/04/2009 - 15:36
१)फळे जास्त खाणे.पालेभाज्यांचा मारा करावा.पोटात चिकटा होईल असे पदार्थ फुकट मिळाले तरी खावू नयेत्.उ.दा.बिस्किटे,वेफर्स्,केक. २)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) ३)घरी आल्यावर आवळा सरबत्,कोकम सरबत(साधे पाणी वापरून) पिणे. ४)दुपारी ताक्,दही(फ्रीजमधले शक्यतो टाळा) जेवणात असु द्या. ५)चिकन मसाला,बटर चिकन्,नान,मटण थाळी ह्यांचा सध्या विचार सोडा. ६)न्याहारीला गूळ पोहे,दडपे पोहे,इडली.शक्यतो त़ळलेले पदार्थ टाळा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

गब्रिएल 01/04/2013 - 01:42
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) हे कळ्ळ :) पण भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?

सँडी 16/04/2009 - 20:29
लग्न करा. थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. नविन घरी मस्त एसीत रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

विजुभाऊ 21/08/2009 - 14:38
हा घ्या खफ झालेला एक धागा पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

JAGOMOHANPYARE 24/09/2009 - 14:54
आता पावसाळ्यातल्या त्रासावर एक लिहा..........

अभ्या.. 01/04/2013 - 01:22
हे वेदश्री मनस्वीं यांना पण डूआयडी म्हणत होतार का रे? सगळ्यानी लैच प्रामाणिकपणे सल्ले दिलेत आणि या आयडी सध्या तरी कधी दिसत नाहीत म्हणून म्हणले. ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. 01/04/2013 - 18:21
ह्यातलं काय पण करु नक्का. सगुणा बागेत कायमचं राहायला जायचं. शिंपल. ;) काय बिशाद आहे असल्या वनराईत, बांबूच्या घरात नदीशेजारी असताना उष्णतेचा त्रास व्हायची. (ह. घ्या हो पिलीअन तै)

In reply to by अभ्या..

जाईन ना मी.. पण माझं पोरगं संध्याकाळी नदीवर नेल्यापासुन चक्रम सारखं वागायला लाग्लय ना!! सारखं बाहेर गार वार्‍यातच ने म्हणुन राह्लय..

In reply to by श्री गावसेना प्रमुख

पोरगं १० सेकंदाच होतं तेव्हा पासुन त्याला काय हवयं हे न बोलता पण कळतं हो मला... फुकट कळा नाही सोसल्या..!! आणि तुम्ही जर "म्हणुन राहलय" ह्या शब्दावर कोटी करत असाल तर.. हॅ हॅ हॅ... खुश?
रात्री झोपताना अर्धा चमचा कैलासजीवन खाणे. २-३ दिवसात उत्तम रिझल्ट मिळेल.... कैलासजीवन खायला बेचव पण किंचितसा कापराचा वास येईल.. त्यामुळे फार चर्चा न करता अर्धा पाऊण चमचा गिळून टाकणे.
औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल. फक्त एक व्य नि करा. प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील.

पोटे 24/04/2014 - 11:29
शीर्षक बदला आधी. गरमी या नावाचा एक गुप्तरोग आहे.
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

In reply to by कंजूस

दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय. >>> गरमी २०१८ नवीन काढा. होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८.