मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!
In reply to अहो .. आधीच by Dhananjay Borgaonkar
आहो अश्या प्रतिकुल परीस्थीतीत सुद्धा आमचा पुणेरी दुकानदार मोठ्या थाटात धंदा करत असतो आणि नफा सुद्धा कमवतो.तरी सुद्धा काही लोक गळ काढतात की पुण्यात दुकानदार धंदा नीट नाही करत.ते नफा कमवत नाहीत असे कोण म्हणतेय ? तुमचे वाक्य असेल ते .. गिर्हाईकांशी नीट वागत नाही हा आक्षेप आहे .. डोळे उघडा साहेब लेख पुन्हा वाचा हवे तर !!
तुम्ही बेडुक असा वा बेडुकमासे मला काही कर्तव्य नाहीहे हे हे .. टाळ्या मिळाल्या .. भले शाब्बास ! पण त्याने वास्तव बदलत नाही !
आहो दुकानदारच काय..काही माणसं जन्मानेच हरामी असतात्..उगाच खोट कशाला बोला.करेक्ट .. आणि त्यातली बरिचशी पुण्यात दुकानदार असतात .. अर्थात सर्व दुकानदार असे नव्हेत; काही सन्माननीय अपवाद याच पुनवडीत आहेत हे नक्की सांगावेसे वाटते.
In reply to आहो अश्या by अभिरत भिरभि-या
In reply to आणि मग हेच by Dhananjay Borgaonkar
In reply to +१००००० परा by Dhananjay Borgaonkar
आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला? तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते. आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाहीअत्यंत सुंदर प्रतिसाद, मनापासून आवडला.
In reply to क्लास.... by प्रदीप
आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला? तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते. आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाहीझ का स !!! आणि तसेही गळे काढणार्या लेखकांना आणि ग्राहकांना गळे काढणारेच पुस्तकवाले भेटणार म्हणा. मुळात आधी हि लोक 'कधीतरी आपली पायधुळ दुकानाला लागेल ह्या आशेन ह्या दुकानदाराने हे दुकान उघडले आहे' अशा थाटात दुकानात वागत-बोलत असतात. एकदा क्रॉसवर्ड किंवा ताजमध्ये वगैरे असे वागुन दाखवा बरे ! तिथल्या वेटरनी १५ मिनिटे लावली पाणी आणायल तरी हे 'हॅ हॅ हॅ' असे गुळमुळीत हसतील, क्रॉसवर्ड वाल्यानी ह्यांच्याकडे 'हे सुशिक्षीत आहेत ?' अशा नजरेने बघितले तरी ह्यांना धन्य वाटेल. पण हेच अप्पा बळवंत चौकात अथवा बादशाहीत घडले की हे शुरवीर लगेच 'काय राव ते पुणे आणि पुणेकर' म्हणुन बोटं मोडायला तयार. आणि पुन्हा पुढच्या खरेदीला ह्यांना पुणेच लागणार. अहो काय जबरदस्ती आहे का ? अगदी हजारोंचे हिशेब देताना, मग करा अजुन हजाराचे पेट्रोल वाया आणि जावा मुंबई-दिल्लीला खरेदीला. तुमच्यावाचुन काय पुण्याचा बाजारपेठा ओस पडणार आहेत का पुण्यावर आर्थीक संकट कोसळणार आहे ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to आणि by परिकथेतील राजकुमार
In reply to आणि by परिकथेतील राजकुमार
In reply to आणि by परिकथेतील राजकुमार
In reply to आणि by परिकथेतील राजकुमार
मुळात आधी हि लोक 'कधीतरी आपली पायधुळ दुकानाला लागेल ह्या आशेन ह्या दुकानदाराने हे दुकान उघडले आहे' अशा थाटात दुकानात वागत-बोलत असतात. एकदा क्रॉसवर्ड किंवा ताजमध्ये वगैरे असे वागुन दाखवा बरे ! तिथल्या वेटरनी १५ मिनिटे लावली पाणी आणायल तरी हे 'हॅ हॅ हॅ' असे गुळमुळीत हसतील, क्रॉसवर्ड वाल्यानी ह्यांच्याकडे 'हे सुशिक्षीत आहेत ?' अशा नजरेने बघितले तरी ह्यांना धन्य वाटेल. पण हेच अप्पा बळवंत चौकात अथवा बादशाहीत घडले की हे शुरवीर लगेच 'काय राव ते पुणे आणि पुणेकर' म्हणुन बोटं मोडायला तयार. आणि पुन्हा पुढच्या खरेदीला ह्यांना पुणेच लागणार. अहो काय जबरदस्ती आहे का ? अगदी हजारोंचे हिशेब देताना, मग करा अजुन हजाराचे पेट्रोल वाया आणि जावा मुंबई-दिल्लीला खरेदीला. तुमच्यावाचुन काय पुण्याचा बाजारपेठा ओस पडणार आहेत का पुण्यावर आर्थीक संकट कोसळणार आहेपराशेठ, पुण्यातले "ते" दुकानदार दिल्लीमुंबईतल्या धनिक लक्ष्मीपतींशी वाईट वागताना सर्वसामान्यांशी चांगले वागले असते तर समजून घेता आले असते. दुर्दैबाने अनुभव तशे नाहीत. ग्रामीण भागातून आलेल्या (ज्यांना ते क्रासवर्ड आणि कॉफी डे माहितही नसेल) अशा लोकांना अतिशय तुच्छतेने वागवताना मी पाहिले आहे. अस्मितेच्या खोट्या दर्पाने तेही समर्थनीय होते का ?
In reply to हम्म by अभिरत भिरभि-या
पुण्यातले "ते" दुकानदार दिल्लीमुंबईतल्या धनिक लक्ष्मीपतींशी वाईट वागताना सर्वसामान्यांशी चांगले वागले असते तर समजून घेता आले असते. दुर्दैबाने अनुभव तशे नाहीत. ग्रामीण भागातून आलेल्या (ज्यांना ते क्रासवर्ड आणि कॉफी डे माहितही नसेल) अशा लोकांना अतिशय तुच्छतेने वागवताना मी पाहिले आहे. अस्मितेच्या खोट्या दर्पाने तेही समर्थनीय होते का ?हा अनुभव फक्त आणि फक्त पुण्यातच येतो का मालक ? नक्कीच नाही. जरा साध्या कपड्यातला, दाढी वगैरे वाढलेला माणुस आला तर साधा पानवाला देखील तो जाईपर्यंत त्यावर डोळ्याच्या कडेतुन लक्ष ठेवुन असतोच की ;) हे असे अनुभव सार्वत्रीक आहेत ! राग आहे तो 'हे फक्त पुण्यातच घडते' ह्या रडगाण्यावर. आणि तसेही काजुचा भाव विचारुन काड्यापेटी विकत घेणारा कोण हे पुणेकर दुकानदार बरोब्बर ओळखतो ;) गंमत अशी आहे की हाच अनुभव 'सातारा -सांगली- खेड' अशा भागात आला तर कोणी पुन्हा तो आठवण्याचे कष्ट सुद्धा घेणार नाही. असो.. शेवटी ज्याची त्याची जाण...समज वगैरे वगैरे... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to पुण्यातले by परिकथेतील राजकुमार
हा अनुभव फक्त आणि फक्त पुण्यातच येतो का मालक ? नक्कीच नाही. जरा साध्या कपड्यातला, दाढी वगैरे वाढलेला माणुस आला तर साधा पानवाला देखील तो जाईपर्यंत त्यावर डोळ्याच्या कडेतुन लक्ष ठेवुन असतोच की Wink हे असे अनुभव सार्वत्रीक आहेत ! राग आहे तो 'हे फक्त पुण्यातच घडते' ह्या रडगाण्यावर. आणि तसेही काजुचा भाव विचारुन काड्यापेटी विकत घेणारा कोण हे पुणेकर दुकानदार बरोब्बर ओळखतो Winkकाड्यापेटी आणि काजूने आपणच (हुश्शार !!) पुणेकर दुकानदाराची पाठ थोपटावी आणि बाकीच्यांनी काही म्हटले तर ते पुण्याला खड्यासारखे बाजूला काढून हेत्वारोप करताहेत असे म्हणावे ते ही एकाच वेळी ! . खरे तर दोन्ही स्टिरिओटायपिंगच ! :) मग एक समर्थनीय आणि दुसरे अब्रह्मण्यम कसे काय बुवा ? फक्त पुण्यातच असे अनुभव येत नाहीत हे खरे; पण पुण्यात हे अनुभव प्रातिनिधिकपणे येतात असे बर्याच जणांना वाटते. आता "न्यून ते सरावे" असे वाटणे आणि ""हे आनंदे मिरवावे" असे वाटणे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पुण्यात सगळेच "तसे" नाहीत याची नोंद चावी म्हणून ही प्रतिक्रिया. आणि इति अलम् :)
In reply to पुणेरी स्टेरिओटाईप by राजेश घासकडवी
In reply to चूक तुझीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुद्दा तो नाही by पंगा
In reply to मुद्दा तो नाही by पंगा
(१) (पुण्यास खरेदी करण्यासाठी) येताना पूर्वग्रह बाळगून येणे.मी कुठचाही पूर्वग्रह बाळगून आलो नव्हतो. आपण माझ्याविषयी पूर्वग्रह बाळगू नये ही विनंती.
(२) (मुबलक इतर पर्याय उपलब्ध असताना) तो पूर्वग्रह बळावेल नेमक्या अशाच ठिकाणी खरेदीला जाणे,हे तर साफ चुकीचं! आधी चांगला अनुभव आला म्हणून तिथे गेलो असं स्पष्ट लिहिलेलं आहे ते दिसलं नाही का? असा आंधळेपणा नक्की कुठल्या ज्वलंत अभिमानाने डोळे दिपल्यामुळे येतो कोण जाणे!
आणि मुख्य म्हणजे (३) त्यानंतरआधीचेच मुद्दे अपुर्या अभ्यासावर असल्याने पुढच्यास उत्तर देण्यात काही हशील नाही. उगाच पंगे करण्याच्या नादात गागाभट्टांनी पांडित्य हरवू नये ही विनंती.
In reply to (तुटक्या) सुतावरून स्वर्ग गाठणे by राजेश घासकडवी
In reply to काही प्रश्न by पंगा
हे शीर्षक या कथेसाठी आपण नेमके कोणत्या कारणास्तव निवडले आहेकथेत तीन प्रश्न मांडले आहेत. त्यांचा सारांश म्हणून हे तीन शब्द येतात.
'पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट आहे' असा साक्षात्कार आपल्याला या अनुभवानंतर घडला, की ..अनुभवाआधीपासून ..?एखादी वदंता माहीत असणं म्हणजे त्यावर विश्वास असणं नव्हे. (जंतूंचा जेम्स लेन विषयीचा लेख वाचावा) प्रतिमा वाईट नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
'एकदा दुधाने तोंड पोळले की माणूस ताकसुद्धा फुंकूनछे हो, मला अजून पुस्तकं घ्यायची आहेत. अनेक दुकानदारांकडे मी जाणार आहे. हा एक क्षुल्लक अनुभव. त्याचं एवढं अवडंबर का होतंय कळत नाही. पार्किंगचा अनुभव हा ग्राहकाची सिस्टीम पातळीवर कशी अनास्था होते हे अधोरेखित करायला आला होता.
हाही एका प्रकारचा पूर्वग्रहच नव्हे काय?मायला पूर्वग्रहविरहित वाचण्यालायक लेख किती असतात? ते किती सिरियसली घ्यायचे हा मुद्दा आहे. अवांतर - केवढा मोठ्ठा प्रतिसाद... पंगा हे डान्राव असावेत का?
In reply to केवढा मोठ्ठा प्रतिसाद... by राजेश घासकडवी
पार्किंगचा अनुभव हा ग्राहकाची सिस्टीम पातळीवर कशी अनास्था होते हे अधोरेखित करायला आला होता.येथे ग्राहक शब्द वापरणे धाडसी वाटते. पार्किंगचा अनुभव हा नागरिकाची सिस्टीम पातळीवर कशी अनास्था होते हे अधोरेखित करायला आला होता - असे वाक्य एकवेळ चालेल. माझ्या मते जगातील कुठल्याही डाउनटाउनमधे पार्किंग मिळणे जितके जिकीरीचे आहे तितकेच जिकीरीचे पुण्यातील पेठांमधे आहे, कधी विशेष फरक जाणवला नाही. पेठांमधे चारचाकी पार्किंगची माझ्या माहितीमधली चारपाच ठिकाणे आहेत( वर प्रतिसादांमधे उल्लेख आहे) या ठिकाणांहून पेठांमधला बराचसा भाग चालत पंधरा मिनीटात कव्हर करता येतो. दुचाकीची पार्किंग तर बक्कळ आहेत. दुकानदार आपल्या परीने ग्राहकांना पार्किंगसाठी मदत करायचा प्रयत्न करतात. अ.ब.चौक, लक्ष्मी रस्ता, गावात एकूणच पेठांमध्ये "आज पार्किंग समोर आहे" अशा पाट्या अनेक दुकानांसमोर दिसतील. तरीही काही महाभाग चुकीच्या बाजूला गाडी लावतात तेंव्हा दुकानदार आत गेल्यावर गाडी उचलून नेतील असा अंदाज देवून ठेवतात.
In reply to केवढा मोठ्ठा प्रतिसाद... by राजेश घासकडवी
एखादी वदंता माहीत असणं म्हणजे त्यावर विश्वास असणं नव्हे. (जंतूंचा जेम्स लेन विषयीचा लेख वाचावा) प्रतिमा वाईट नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का?हो निश्चितपणे असेच म्हणायचे आहे. मला गेल्या २५/३० वर्षात असा अनुभव आल्याचे स्मरत नाही. आता काहि उणे दुणे असणार पण त्यामुळे सगळ्या दुकानदारांची प्रतिमा मलिन करणे योग्य वाटत नाहि. पुणेरी भाषेचे वळण फटकळ्/परखड आहे. त्यात खोटे अगत्य नाहि. किंवा एखादि व्यक्ती ग्राहक आहे म्हणुन तिच्याशी (वरवरच्या) व्यावसायिक सौजन्याने बोलले जाईलच असे नाहि. उलट अनेक वेळा दुकानदार परखड पण योग्य तेच मत व्यक्त करेल. आता ज्याला त्याची सवय नाहि त्याला कदाचित ते विचित्र वाटु शकते आणि अश्या ठिकाणी खरेदि करायची की नाहि हे स्वातंत्र्य त्यांना आहेच कि. कुणी एक खडुस म्हणुनच गेला आहे "व्यक्ती जर स्वतः चांगली असेल तर त्याला नेहमी चांगलेच अनुभव येतात असे माझ्या घरचे म्हणतात" तेव्हा... ;) कृपया हलके घेणे :) - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
In reply to पुणेरी स्टेरिओटाईप by राजेश घासकडवी
कृपया लेख पुन्हा वाचावा. समस्त पुणेकरांविषयी मी काही बोललो नाही.ठीक. म्हणजे बिगरमराठी बिगरपुस्तकवाल्या पुणेकरांविषयी स्पष्टपणे काहीही म्हटलेले नाही, हे मान्य. परंतु लेखाचे शीर्षक 'मराठी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!' याऐवजी 'मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!' असे आहे, याचा अर्थ त्या कॉंबिनेशनाच्या डेडलित्वात पुणेरित्व हा एक अविभाज्य घटक असणे लेखकास अभिप्रेत आहे, असा का घेता येऊ नये, याचा कृपया खुलासा व्हावा. असो. लेखाबद्दल किंवा वरील मखलाशीवजा प्रतिक्रियेबद्दल अजिबात आश्चर्य वाटले नाही, एवढेच नोंदवू इच्छितो. बाकी चालू द्या. - पंडित गागाभट्ट.
In reply to पुणेरी स्टेरिओटाईप by राजेश घासकडवी
In reply to अहो by सहज
कृपया पुन्हा एकदा त्या वाक्यातले फक्त शब्द पहा. पुन्हा आरोप करण्याकरता कसे वापरता येतील हे बघु नका पण नेमका अर्थ ध्यानात घ्या.बरोब्बर. मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणता ते सर्वांनीच केलं तर पूर्वग्रहदूषिततेचे ९९% आरोप गळून पडतील. एका छोट्याशा गोष्टीवर फोकस केलं तर अनर्थ होऊ शकतो हे मला दाखवायचं होतं.
जर ते वयस्क गृहस्थांऐवजी तो सेल्समन तुम्ही गेल्या गेल्या समोर आला असता तर हा लेख आला असता का?अर्थातच नसता आला. तुम्ही आधी लिहिलेला सांख्यिकीचा मुद्दा पटतो. अनुभव भले-बुरे, आधी -नंतर, नशीबाने येतात. दर अनुभवानंतर धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे योग्य रकान्यात आणखी एक फुली असंच बघावं लागतं. अनुभव कथन करताना शक्य तितकं सत्य वाचकासमोर ठेवून मर्यादित निष्कर्ष काढणं इतकंच लेखकाला करता येतं. त्या निष्कर्षाची व्याप्ती वाचक किती वाढवतील हे त्याच्या हाती नाही.
In reply to कृपया by राजेश घासकडवी
In reply to मग by सहज
बडवला कळफलक लिहला लेख असे शक्यतो होउ नयेलेख लिहिण्यामागचं उद्दिष्ट महत्त्वाचं असं तुम्ही म्हणता आहात असं वाटतं. हेच प्रतिसादांबाबतही म्हणता येईल.
एक तरी धागा दंगा करायला मिळाला की दिवस कसा आनंदात जातो नैदंगाच करायचा तर तो पूर्वग्रह कमी करणारा करावा.. हेही जाताजाताच...
In reply to या by बिपिन कार्यकर्ते
In reply to या by बिपिन कार्यकर्ते
या लेखाच्या निमित्ताने श्री. घासकडवी यांना त्यांच्या स्वभावातले विविध पैलू सापडले असतील, त्याबद्दल श्री. घासकडवी यांचे अभिनंदन.बेस्ट वन! बाकी परांच्या प्रतिक्रिया धमाल आहेत. पुण्यात मीही साताठ वर्षे राहिलो आहे. पण नो कॉमेंट्स! पर्सनली नाही घेतलं कुणीच तर हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद म्हणजे निखळ करमणूक आहे. नावं ठेवणं किंवा कौतुक करणं असं दोन्ही टाळणं अशक्य आहे काही किश्शांच्या बाबत. उदा. वरती मास्तरांनी सांगितलेला अर्धवट माहिती असलेल्या लोकांना वाटेला लावणे...खलास झालो! प्रतिसादांमध्ये पुण्यातील चांगली/ वाईट दुकाने आणि पार्किंगची सोय, कुठल्या रस्त्यात तुळशीबाग पडते वगैरे बरीच उपयोगी माहिती आली आहे. एकूण हा विषय बर्याच जणांच्या जिव्हाळ्याचा दिसतोय! :) आळश्यांचा राजा
In reply to पाथफाईंडर by चिंतातुर जंतू
In reply to ऑ..? by योगी९००
दुपारी दुकान बंद असते आणि जेवणाच्या वेळात गेल्यास विक्रेते दुकान बंद करण्याच्या घाईत असतात,पण.. जेवू द्या की त्यांना शांतपणे..तुमच्या जेवणाच्या वेळेत आलो तर चालेल काय?नाहीच चालणार! आमचे विधान ही तक्रार नव्हती तर आम्हाला जी सर्वसामान्य दैनंदिन परिस्थिती वाटते, तिची इतरांना जाणीव फक्त करून देण्याचा त्यामागे हेतू होता - कुणी नेमके जेवणाच्या वेळेत जाऊन आले, आणि मग आमचा अनुभव कसा पुणेरी आणि वाईट होता, असे धागे पुन्हा काढले असे होणे टाळावे यासाठीच केवळ. बाकी दुकानाची तरफदारी आम्ही केली आहेच. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to मला उचंबळून आलंय.... :) by जे.पी.मॉर्गन
In reply to माझा आजवरचा अनुभव उत्तम आहे by खडूस
व्यक्ती जर स्वतः चांगली असेल तर त्याला नेहमी चांगलेच अनुभव येतात असे माझ्या घरचे म्हणतातसच बोला भाई! पण ह्याचा implied अर्थ काय काढावा ;) - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
In reply to व्यक्ती जर by पांथस्थ
In reply to जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा by दिपक
आहो अश्या