टंकेल वीडंबक जैं न काहीं
टंकेल वीडंबक जैं न काहीं
.
टंकेल वीडंबक जैं न काहीं,
तैं हासयाला मिळणार नाहीं.
कोठून पद्यें मिळतील ठोक?
सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥
.
कवित्व लोकांत जरी विकें ना,
विडंबनीं खूप रुची जनांना.
झाकावया लाज कवी न पाहो,
विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥
.
तीं-तींच चोथा यमकें फिरून,
कथानकें तीच फिकी विरून,
स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा,
रुसेल वीडंबक जैं बिचारा! ॥३॥
.
- - -
(मूळ कविता "आठवणीतल्या कविता" संग्रहातून, मूळ कवीचे नाव माहीत नाही, बहुधा प्रत-अधिकार-मुक्त)
पेरील जैं शेतकरी न काहीं
.
पेरील जैं शेतकरी न काहीं,
तैं खावयाला मिळणार नाहीं.
कोठून धान्यें मिळतीं अनेक?
फळाफुलांना मुकतील लोक! ॥१॥
.
कापूस शेतात जरी पिके ना,
कोठून वस्त्रें बनतील नाना?
झाकावयालागिं शरीर पाहीं,
तैं वस्त्र साधें मिळणार नाहीं! ॥२॥
.
पेरी न तो तीळ, तरी तिळेल,
तळावयालागिं कसें मिळेल?
जगांत होईल अनर्थ सारा,
जरी रुसे शेतकरी बिचारा! ॥३॥
.
- - -
वाचने
8354
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वा वा वा !
In reply to वा वा वा ! by मिसळभोक्ता
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
+२
In reply to +२ by श्रावण मोडक
धनंजयशेठ,
In reply to धनंजयशेठ, by केशवसुमार
खतरा...
In reply to खतरा... by श्रावण मोडक
पोपट
In reply to पोपट by क्रेमर
हाहाह्हा
In reply to हाहाह्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
लई भारी !
In reply to +२ by श्रावण मोडक
विशेषतः
वा! धन्याशेठचे विडंबन एकदम मस्त!
In reply to वा! धन्याशेठचे विडंबन एकदम मस्त! by चतुरंग
+१
विडंबन
छान
दोन्ही डगरी...
टाकतो ही नम्ब्रभावे "विचारांची" पुडी
In reply to टाकतो ही नम्ब्रभावे "विचारांची" पुडी by मुक्तसुनीत
हायला...
In reply to हायला... by श्रावण मोडक
भारी
In reply to भारी by बिपिन कार्यकर्ते
हाण्ण!!
In reply to हाण्ण!! by चतुरंग
+१
In reply to +१ by सहज
ऐं ल्ला,
वा, मजा आली.
वा वा!!
जबरा!!!
धनंजय आणि
मस्त!
छान
सर्वांचे आभार