मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टंकेल वीडंबक जैं न काहीं

धनंजय · · जे न देखे रवी...
काव्यरस
टंकेल वीडंबक जैं न काहीं . टंकेल वीडंबक जैं न काहीं, तैं हासयाला मिळणार नाहीं. कोठून पद्यें मिळतील ठोक? सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥ . कवित्व लोकांत जरी विकें ना, विडंबनीं खूप रुची जनांना. झाकावया लाज कवी न पाहो, विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥ . तीं-तींच चोथा यमकें फिरून, कथानकें तीच फिकी विरून, स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा, रुसेल वीडंबक जैं बिचारा! ॥३॥ . - - - (मूळ कविता "आठवणीतल्या कविता" संग्रहातून, मूळ कवीचे नाव माहीत नाही, बहुधा प्रत-अधिकार-मुक्त) पेरील जैं शेतकरी न काहीं . पेरील जैं शेतकरी न काहीं, तैं खावयाला मिळणार नाहीं. कोठून धान्यें मिळतीं अनेक? फळाफुलांना मुकतील लोक! ॥१॥ . कापूस शेतात जरी पिके ना, कोठून वस्त्रें बनतील नाना? झाकावयालागिं शरीर पाहीं, तैं वस्त्र साधें मिळणार नाहीं! ॥२॥ . पेरी न तो तीळ, तरी तिळेल, तळावयालागिं कसें मिळेल? जगांत होईल अनर्थ सारा, जरी रुसे शेतकरी बिचारा! ॥३॥ . - - -

वाचन 8354 प्रतिक्रिया 0