आओ, कानसेन, पहेचानो...दुसरा भाग
लेखनप्रकार
या स्पर्धेचा आधीचा भाग आतापर्यंतच्या गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावासह इथे पहायला मिळेल. तो भाग बराच लांबला म्हणून नवीन धागा काढतोय.
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक १७: चतुरंग
पुन्हा एकदा संयुक्त कानसेन, क्रमांक १८: मिसळपाव आणि रेवती
कानसेन क्रमांक १९: प्रभो
कानसेन क्रमांक २०: मिसळपाव
कानसेन क्रमांक २१: आनंद
****************
पुढचं गाणं मराठी आहे.
![broken image]()
वाचने
10375
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
कसा पिसारा फुलला!
http://www.esnips.com/doc/496db093-545c-437d-a6f3-78681dcddda4/Bai-Bai-Man-Moracha
चतुरंग
आणखी एक मराठी गाणं:

In reply to कानसेन १८: चतुरंग by बहुगुणी
शूर आम्ही सरदार
दुवा
रेवती
In reply to कानसेन १८: चतुरंग by बहुगुणी
'मराठा तितुका मेळवावा' मधलं.
http://www.youtube.com/watch?v=k2JRdHKS-Zw
In reply to शुर आम्ही सरदार आम्हाला काय .... by मिसळपाव
पुन्हा विभागून विजेतेपद काय हो?;)
रेवती
(तुम्ही एकमेकाला खरड/व्य. नि. पाठवून आलटून पालटून उत्तर सुचवा हवं तर;-))
In reply to काय करणार हो?!! by बहुगुणी
... शाळेत असताना करायचो तसं बोट ताणताणून, पुढे झुकत 'सर मी, सर सर मी' असं ओरडायचा मोह होतोय !!
अंतरा दिलेला आहे:

In reply to कानसेन १९: मराठी by बहुगुणी
वेडात मराठे वीर दौडले सात
http://www.youtube.com/watch?v=OArezYEKog0
कानसेन क्रमांक १९: प्रभो
गाण्याचे शब्द इथे मिळतील.
हिंदी गाणं आहे:

In reply to क्रमांक २० by बहुगुणी
आझाद मधलं - http://www.youtube.com/watch?v=e8EjYnEsReM
In reply to कितना हसीं है मौसम by मिसळपाव
__/\__
गाण्याचे शब्द इथे आहेत.
तर या २०व्या राऊंडचे विजेते कानसेन आहेत, पुन्हा एकदा, मिसळपाव!
बाय द वे: इथून पुढच्या काही गाण्यांचे प्रश्न खास आग्रहास्तव पेश करतो आहे, आग्रह इथल्याच कुणा रसिकाचा आहे, कोण ते गुलदस्तात (अर्थात्, ती व्यक्ती उत्तरात भाग घेत नाही!)
हिंदी गाणं आहे: अंतरा देतो आहे..

In reply to क्रमांक २१ by बहुगुणी
http://www.youtube.com/watch?v=D2FUVk0iW9s
In reply to चल उड जा रे by आनंद
मी पण अगदी confidently यू ट्यूब वर हे गाणं शोधून पाहिलं. का गाण्याच्या मधेच कुठे आहे ही स्वरावली?
अवांतर - या 'भाभी' चित्रपटात 'छुपा कर मेरी आंखों से' गाणं आहे. ते पहाताना मी, 'काय बोलका चेहेरा आहे तिचा (ती = मला वाटतं शामा) नाही' असं म्हंटलं. त्यावर मला बायडीने जो काही लुक दिलाय!.......................... ................ ...................... ................. पण होताच मुळी बोलका अगदी!!!
In reply to नाहि रे, हे नाहि वाटत by मिसळपाव
गाण्याच्या शेवटाजवळ ही धून आहे.
शब्द इथे आहेत
कानसेन क्रमांक २१: आनंद
In reply to नाहि रे, हे नाहि वाटत by मिसळपाव
(आता काय बिशाद आहे 'छुपा कर मेरी आंखों से' गाणं तुम्ही कधी विसरायची! - म्हणजे एक वेळ गाणं विसराल, पण तो 'लूक' कधी विसराल काय??!!)
फक्त लांबी वाढत गेली की उलगडायला वेळ लागतो आहे. मजा आली.
एक विचार असा की खरडफळा लोकप्रिय करण्यासाठी या धाग्याचा वापर करू शकू का ?
In reply to मजेदार धागा... by रामदास
हाऊ डिप्लोम्याटीक =))
बाकी खरडफळा ऑलरेडी अमरिक्का ते पाकिस्ताना पर्यंत लोकप्रिय आहे , देशोदेशीचे वाचक तिकडे वाचण्यासाठी असुसलेले असतात , म्हणे !! :)
अवांतर :
बहुगुणींनी बर्याच जणांची करमणुक केल्याबद्दल त्यांचे अभिणंदण :)
In reply to मजेदार धागा... by रामदास
च्यायला खफ डब्बल लोकप्रिय कसा काय ? :)
या पुढचे तिसर्या भागात.
यानंतरचे गाणे हिंदी आहे, आणि अंतर्यातलं संगीत आहे:

तूम भूल भूलैय्या गलींयों में ....."दो दिवाने शहर मे"
घरोंदा - http://www.youtube.com/watch?v=iSuQdho3Yyo
बाकी पुढच्या पानावर.
प्रकाटाआ
बाई बाई मनमोराचा!