अगा लेखकांनो
लेखनविषय:
काव्यरस
हे तुमचं लिखाणबिखाण
गोष्टीबिष्टी, लेखबिख, कविताबिविता
हे सगळं ठीक आहे
चांगलंच आहे उदाहरणार्थ
चंद्र, नद्या, पक्षी, फुले, निसर्ग
पहिला पाऊस, आईची माया, माणुसकी
फुटपाथवरची म्हातारी, प्रेयसीची आठवण, फाटका झगा
जन्म, मृत्यू, प्रेम, स्वार्थ, मैथुनही
गडकर्यांपासून कोलटकरांपर्यंत
दासू वैद्य, वर्जेश इश्वरलाल सोळंकी
मध्ये विंदाबिंदा, बाकीबाब, पाडगावकर आणि कुसुमाग्रज
सगळे झाडून कवी झाले बघा
गाडगीळ, गोखले, माडगूळकरांपासून
गवस पेठ्यांपर्यंतच्या कथा घ्या
आपट्यांपासून महाजनांपर्यंत
कादंबर्या घ्या
दोस्तोवस्की घ्या, टॉलस्टॉय घ्या, स्ट्रिंडबर्ग घ्या
लोकांना माहिती असलेले तर घ्याच, पण माहिती नसलेले आधी घ्या
वैचारिक लेख घ्या, समीक्षणं घ्या, जीव तोडून घातलेले वाद घ्या
वामकुक्षाळ च्युईंगमपासून केसफिस्कार मेंदूखाजेपर्यंत
सगळं तुमचं साहित्य - तुमचं चिरंतन, अजरामर साहित्य घ्या
आणि त्यानी समृद्ध वगैरे केलेली तुमची आयुष्यं घ्या
परिसंवादांत जुन्या गहिवरांबरोबर नवी पालवीही कुरवाळून घ्या
कलेनं माणसाच्या जीवनाला कसा अर्थ आणला हो म्हणून
मिरवणुका काढून त्यात मूठभर गुलालही उधळा वाटल्यास
आणि मग थकून जमिनीवर पडाल जेंव्हा डोळे मिटून
आकाशात एकच मोठा डोळा उघडावा तसं
विक्राळ गगनभेदी आयुष्य दिसेल क्षणभर
आपल्या कोट्यावधी रक्ताळलेल्या हातांनी
तुम्हाआम्हांला कुस्करणारं, कुरवाळणारं
आणि तुमच्या अजरामर वगैरे साहित्याच्या छाताडवर
चिखलतुडव नाचत खदाखदा हसणारं
दचकाल तेंव्हा क्षणभर स्वतःशी रिते होऊन संपूर्ण
संभोगानंतर होता तसे हुबेहूब विरक्त
खाडकन डोळे उघडून बघाल
आपले हस्तमैथुनी दुबळे हात
त्यांतील अशक्त लेखण्यांसह
कापून टाकावेसे वाटतील तुम्हाला
तुमचे हात
हे होईल, उद्या किंवा परवा नक्कीच
तोवर चालू द्या तुमचं
लिखाणबिखाण.
वाचने
18341
वाचनखूण
प्रतिक्रिया
85
कवितेचा
हं खरे आहे त्रास होत असेल
In reply to हं खरे आहे त्रास होत असेल by सहज
आगायायायायाया
In reply to हं खरे आहे त्रास होत असेल by सहज
अरे सहस्रावा
In reply to हं खरे आहे त्रास होत असेल by सहज
मे णकट
In reply to हं खरे आहे त्रास होत असेल by सहज
सहजकाकांन
अले व्वा
In reply to अले व्वा by आनंदयात्री
आंद्याशी
थोडक्यात
आत्मपीडा
In reply to आत्मपीडा by अक्षय पुर्णपात्रे
हस्तलाघव
In reply to हस्तलाघव by प्रकाश घाटपांडे
आत्ममैथुन
In reply to आत्ममैथुन by अक्षय पुर्णपात्रे
कंसाशी
In reply to कंसाशी by बिपिन कार्यकर्ते
नवीन लेखनप्रकार?
In reply to हस्तलाघव by प्रकाश घाटपांडे
प्रकाश राव
In reply to प्रकाश राव by रामदास
नक्षत्र फलित
मौनावर...
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
चोख प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
मुसूंशी
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
मुक्त
In reply to मुक्त by विजुभाऊ
हम्म
In reply to हम्म by मुक्तसुनीत
पर्सनल
आवडले
आल्बेर कामूच्या प्लेग मध्ये
In reply to आल्बेर कामूच्या प्लेग मध्ये by रामदास
सहमत
In reply to आल्बेर कामूच्या प्लेग मध्ये by रामदास
सुडो?
In reply to सुडो? by अक्षय पुर्णपात्रे
सुडो आणि
In reply to सुडो आणि by बिपिन कार्यकर्ते
तसे नसावे
मुक्तक
In reply to मुक्तक by नील_गंधार
हम्म
In reply to हम्म by मुक्तसुनीत
+१
इज इट वर्थ इट?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जगावं की
लागले रे नेत्र, पैलतिरी !
सुचना
आज सकाळी
कविता हा
In reply to कविता हा by बिपिन कार्यकर्ते
"आपला" हे
जगाला
खॅ खॅ खॅ!!!
प्यासा मधील विरक्तीकडे जाणारा गुरुद्त्त आठविला
In reply to प्यासा मधील विरक्तीकडे जाणारा गुरुद्त्त आठविला by वाहीदा
>>कब के मर
In reply to प्यासा मधील विरक्तीकडे जाणारा गुरुद्त्त आठविला by वाहीदा
प्यासा
सध्ध्या
मुक्तक
शहाणे सांगून गेलेत जाता जाता
In reply to शहाणे सांगून गेलेत जाता जाता by अडगळ
सुंदर,
In reply to शहाणे सांगून गेलेत जाता जाता by अडगळ
कोलटकर ?
In reply to कोलटकर ? by मुक्तसुनीत
चूभूदेघे
In reply to चूभूदेघे by अडगळ
कविता
In reply to कविता by मुक्तसुनीत
हाम्बघा सायेब .
प्रत्येकाला करावेच लागते
जमेल तोवर लिखाण करत जावे
आयुष्य आणि कला
In reply to आयुष्य आणि कला by राजेश घासकडवी
हाऽऽण्ण तिच्यायला!!!!
In reply to आयुष्य आणि कला by राजेश घासकडवी
संभोग
In reply to संभोग by अक्षय पुर्णपात्रे
आमै, बलात्कार वगैरे..
In reply to आमै, बलात्कार वगैरे.. by राजेश घासकडवी
आमैकार हा
In reply to आमैकार हा by अक्षय पुर्णपात्रे
टारझन
In reply to टारझन by राजेश घासकडवी
कलाकृती
In reply to कलाकृती by अक्षय पुर्णपात्रे
ग्योडेल आणि टारझन
In reply to ग्योडेल आणि टारझन by राजेश घासकडवी
हमै ते प्रसं
In reply to टारझन by राजेश घासकडवी
निषेध
In reply to निषेध by राजेश घासकडवी
सहमत
In reply to सहमत by अक्षय पुर्णपात्रे
+१
In reply to +१ by धनंजय
संयमित
In reply to संयमित by Nile
१+
In reply to टारझन by राजेश घासकडवी
काल्पनिक व्यक्तिरेखा
In reply to काल्पनिक व्यक्तिरेखा by राजेश घासकडवी
फोलपणा
In reply to फोलपणा by अक्षय पुर्णपात्रे
बाह्य निरिक्षण + हमै
In reply to बाह्य निरिक्षण + हमै by राजेश घासकडवी
गृहीतके
खिखि
In reply to खिखि by मुक्तसुनीत
छे छे!
In reply to खिखि by मुक्तसुनीत
पूर्णपात्
In reply to पूर्णपात् by बिपिन कार्यकर्ते
अगायाया!
In reply to अगायाया! by चतुरंग
वरील सर्व
In reply to पूर्णपात् by बिपिन कार्यकर्ते
अगदी
मिपा क्लासिक- २
मस्तच
मस्त
ऑ अच्चं जाल्लं तल!
आणि मग थकून जमिनीवर पडाल
खतराटच आहे हे!
हे मुक्तक बिकतक