वांग्याच भरीत

गणपा पाककृती
नमस्कार मित्रहो आजच्या उपवासाच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडताना काय बेत आहे आज ? जर अजुन ठरल नसेल तर हा झटपट होणारा पदार्थ कसा वाटतोय? साहित्यः १ भल मोठ्ठ वांग. १ मध्यम कांदा बारीक चौकोनी कापुन. २-४ चमचे भाजलेल्या दाण्याच कुट. १-२ हिरव्या मिरच्या (ज्या प्रमाणात तिखट आवडत त्या नुसार) बारीक चिरुन. १/२ चमचा हळद. १ लहान चमचा लाल तिखट. फोडणीसाठी राई , तेल. मीठ चवीनुसार. कृती: वांग्याला काट्याने/टुथपीक ने टोचे मारुन घ्यावे. वांग्याला तेलाच बोट लावुन ते गॅसवर मध्यम आचेवर चांगले भाजुन काढावे. भाजलेले वांगे गार झाल्यावर त्याचे साल काढुन, त्याचा गर काढावा (मॅश करुन घावं.) तेलावर मोहरीची , मिरचीची फोडणी करुन त्यातच कांदा परतुन घ्यावा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात वांग्याचा गर, लाल तिखट हळद, दाण्याच कुट आणि चवी नुसार मीठ टाकुन एक ५-१० मिनिट परतुन घावं. गरमागरम फुलक्यां सोबत लुफ्त घ्या. :) आपल्या मांसाहारी मंडळींसाठी याच नॉन्व्हेज व्हर्जन लौकरच टाकणार आहे. ;)

45 टिप्पण्या 19,266 दृश्ये

Comments

वेताळ नवीन

आपल्या मांसाहारी मंडळींसाठी याच नॉन्व्हेज व्हर्जन लौकरच टाकणार आहे. मला हा वांग्याच भरीत प्रकार जास्त आवडत नाही.तसेच गवारीची भाजी, ही खाणे म्हणजे एक शिक्षाच आहे. वेताळ

परिकथेतील राजकुमार नवीन

आ हा हा गणपाशेठ अ प्र ति म !!! ह्या भरीताबरोबर गरमा-गरम भाकरीच पाहिजे :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

सहज नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

मस्त भाकरी - भरीत. बाकी गणपाचे किचन पण कायम चकाचक. तिकडे तुझा कुकरी शो असतो का रे? एकदम चकाचक स्टुडिओ किचन :-)

शुचि नवीन

In reply to by सहज

भाकरी + भरीत+ दही+ लसणाची चटणी. मेले!! गतप्राण झाले. मला बोगदा दिसतोय जिथे अनेक आत्मे घुटमळतायत. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मीनल नवीन

In reply to by सहज

माझ्या ही लक्षात आले. तूमचा गॅस किती पांढरा स्वच्छ आहे. आई शप्पथ सांगते मी नियमीत स्वच्छ करते. तरी काळे डाग जात नाहीत. त्याची पण एकदा युक्ती टाका मिपावर. मीनल. http://myurmee.blogspot.com/

चित्रा नवीन

In reply to by मीनल

बरेच लोक त्या गॅसभोवती अ‍ल्युमिनम फॉइल लावून शेगडीचे डागांपासून रक्षण करतात.. मला ते अजिबात जमत नाही, तसे लावले की मला स्वैपाकच करावासा वाटत नाही. मागे एकदा पांढर्‍या शेगडीला असेच डाग पडले, आणि जाता जाईनात.. आमच्या तेव्हाच्या घराच्या मालकिणीने मग एक धातूची चौकोनी चकती आणून दिली आणि अगदी हलक्या हाताने नुसते पाण्याने + चकतीने चरे न पडता डाग काढायला शिकवले. अर्थात एवढे उद्योग करण्यापेक्षा बहुदा फॉईल बरी, पण मग मी स्वैपाकच करणार नाही, त्यापेक्षा हे बरे.. हाहाहा.. ! बाकी पाककृती आणि फोटो झकास. मलाही याला लसणीची फोडणी आवडते.

प्रियाली नवीन

उपवासानंतर केलेले भरीत असल्याने त्याला लसणाची फोडणी नसावी. अन्यथा, लसणाची चरचरीत फोडणी देऊन केलेले भरीत अप्रतिम लागते.

मराठे नवीन

नेहमीप्रमाणेच मस्त .... इथे आमच्या अपार्टमेंट्मधे हॉटप्लेटवाली शेगडी आहे आणि खाली ओव्हन.. तेव्हा ही वांग्याचं भरीत करताना वांग्याला अल्युमिनियम फॉइल लाउन ओव्हनमधे ठेवते.. (किति वेळ्/तापमान वगैरे माहित नाही.. माझं काम फक्त खाण्याचं असतं).. पुढच्यावेळी (म्हणजे उद्याच..) करताना टूथपीकने टोचून करायला पाहीजे...(आमची अगं वाचत असेलच)

jaypal नवीन

णिशेध सभा fsdfsdf लसणाची फोडणी किंवा कमित कमी तेलाची धार तरी पाहीजे वरती. सिंहगडच्या ट्रेकची आठवण झाली. चुलीवर भाजलेल भरीत, गरमागरम भाकरी, ठेचा आणि दही ...आहाहा =P~ *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

मीनल नवीन

आमच्या घरी भरीत खूप आवडत. पण ते भाजताना गॅसवर फार मेस होतो. ते तेल इकडे तिकडे पसरते. त्याच्या सफाईचा वैताग येतो. काही उपाय ??? मीनल. http://myurmee.blogspot.com/

पंगा नवीन

In reply to by मीनल

गॅस खालच्या ओव्हन मधे होतच नाही तासंतास भाजून.
ओह... मला वाटले गॅसवर भाजताय, बर्नरवर फिरवून म्हणून. नेव्हर माइंड. (घरात गॅस आहे, "कासवछाप" नव्हे, हे गृहीत धरतो आहे. "कासवछाप"वर वांगे भाजण्याचा प्रयोग करून पाहिलेला नाही.) (पण तरीही गॅसच्या खालच्या ओव्हनमध्ये भाजून होत नाही हे तितकेसे पटत नाही. फारा वर्षांपूर्वी एकदा ओव्हनमध्ये वांगे ठेवून त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेल्यावर, आणि आधी सुरीने किंचित चिरून ठेवावे ही अक्कल तोवर आलेली नसल्याने, वांगे फुटून ओव्हनच्या अंतर्भागाचा सत्यानाश झालेला आठवतो. पण वेळ लागतो हे पटण्यासारखे. असो.) गॅसवर भाजायचे असल्यास स्टव्हटॉपला (तेवढी बर्नर बाहेर येण्यापुरती गोल जागा वगळून) अ‍ॅल्युमिनियम फॉइलने लाइन करून घेतल्यास स्टव्हटॉप खराब होऊ नये. (किंवा चौकोनी आकाराचे आयते लायनर्ससुद्धा मिळावेत ग्रोसरी स्टोअर्समध्ये.) ओव्हनमध्ये भाजताना वांगे जाळीवर ठेवण्यापूर्वी जाळीवर फॉइल ठेवून त्यावर वांगे ठेवून बघता येईल, पण त्याने वांग्याला थेट उष्णता मिळण्यावर कितपत परिणाम व्हावा, कल्पना नाही. (छोट्या आकाराच्या टोस्टर ओव्हनमध्ये भरताचे वांगे मावावे का? साशंक आहे.) - पंडित गागाभट्ट.

अविनाशकुलकर्णी नवीन

वांगे म्हणजे एक टांगेची कोंबडी..लइ भारी

पिंगू नवीन

कुलकर्णीसाहेब खर आहे!!!!!!! बाकी भन्नाट पाककृती..... - (गणपा गुरुंचा शिष्य) पिंगू

रामदास नवीन

बेगुण (बैंगन)ला गुण बहाल करणारी पाककृती सुंदर रीतीने सादर केल्याबद्दल गणपाचे अभिनंदन. पाकीस्तानची मॅच बघताना त्यांचा विकेटी प्रत्येक बॉलनंतर शाबाश शकी .. बहोत अच्छे बहोत अच्छे अशी आरोळी द्यायचा. तुमच्या प्रत्येक पाककृतीनंतर मलाही असेच काही म्हणावेसे वाटते. शबाश गणपा ...बहोत अच्छे बहोत अच्छे. तसं पाहीलं तर रंग सोडून वांग्यात एकही कौतुकास्पद गुण नाही. (वैगुण्य आचेवर खरपूस भाजल्यावर नाहीसे होते ही काव्यात्मक कल्पना आहे.) उत्तरेत मुल अवगुणानी हाताबाहेर जात असेल तर त्याच्या हाती देवाला वांगे अर्पण करतात. (तेज नसलेल्या बेढब हिर्‍याला मठ्ठ हिरा म्हणतात आणि तो सुधारता येत नाही आणि तुम्ही मात्र बेगुणाला गुण आणलेत.) रांधपात वांग्याचे भरीत हा एक बडा ख्याल आहे.मॅगीसारखी क्वीकी पाककृती नाही. त्यासाठी वांग ताजं तर असावंच लागतं पण हा ख्याल रंगायला गृहीणीला पण निवांत वेळ हवा.तापीकाठचं वांगं मिळालं तर आ..हा.... रविवारी साप्ताहीक भविष्य वाचताना 'सुखद अनुभव येईल ' असं लिहीलं असेल तर समजा आज भरताचा बड ख्याल जमणार आहे. फुलक्याबरोबर वांग्याचं भरीत खाणं म्हणजे रागाचं फक्त लक्षण गीत गाण्यासारखं आहे.सोबत भाकरी हवी. शेपटीवाले कांदे, सतेज लिंबाच्या फोडी हव्यात,ताजे लोणी हवे.(दोन दिवसापूर्वी केलेलं मथीत नको. त्याला इतर वासाचा संसर्ग नको.) आता आमच्या या वयात वाचनमात्र धाग्यासारखी सैपाकमात्र बायको घरात असली की रविवारी सुखद अनुभव आणखी तो काय असणार. ?

सहज नवीन

In reply to by नंदन

काय प्रतिसाद आहे! :-)

वाहीदा नवीन

In reply to by रामदास

क्रिकेट ची मैच नाही पण फुटबॉल विश्वचषक आहे ना तसे आमचे झाले आहे कधी फुटबॉल जागु च्या धाग्यावर तर कधी गणपाच्या वाचकांचाच फुटबॉल झाला आहे जणू .. __/\__ ~ वाहीदा

शुचि नवीन

In reply to by रामदास

रामदासकाका वांग्यावर लेख टाकायचात ना. कशाला इतकं सुंदर लिखाण प्रतिक्रियेत दवडलत? : सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अक्षय पुर्णपात्रे नवीन

छान पाकृ. वाखु साठवली आहे.

नंदन नवीन

झकास पाकृ! >>> आपल्या मांसाहारी मंडळींसाठी याच नॉन्व्हेज व्हर्जन लौकरच टाकणार आहे. --- ब्येष्ट! सोडे घालून का? टाका लवकर. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


अविनाशकुलकर्णी नवीन

तुम्हि कसले थ्यांक्यु..आम्हिच थ्यांक्यु

आशिष सुर्वे नवीन

लेका, नेमीपरमानं झ्याक पाकृ.. गाव आठवायला लावलंस रे! >>आई शप्पथ सांगते मी नियमीत स्वच्छ करते. तरी काळे डाग जात नाहीत.>> गॅस बदला की ओ!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

श्रीरंग_जोशी नवीन

एकदम फर्मास पाककृती आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर भरीताच्या वांग्यात खूप बिया असतील तर वांगी भाजून झाल्यावर जास्त गरे न वाया घालवता त्या बियांचे प्रमाण कमी कसे करावे. अमेरिकेत मला केवळ कॅलिफोर्नियामध्येच (मेक्सिकोच्या कृपेने) कमी बियांची वांगी मिळाली. नंतर जेव्हाही प्रयत्न केलाय तेव्हा प्रमाणाबाहेर बिया होत्या. वेचून वेचून बिया कमी करायचा प्रयत्न केल्यास गरे जवळ जवळ निम्म्याहून अधिक वाया जाते अन तरीही बिया शिल्लक राहतात. रसभंग होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुणी विशेष कॢप्ती वापरत असेल तर कृपया त्याबाबत इथे लिहून उपकृत करावे. देव आपल्यास भरपूर कमी बियांची वांगी देईल :-).

कपिलमुनी नवीन

अवांतर : गणपा .... >>आजच्या उपवासाच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडताना काय बेत आहे आज ? शिन्च्या !!! उपास सोडताना कांदा-लसूण खातोस क ..धर्म बुडवलास की रे !!

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by बापू मामा

बापू मामा - विकत घेताना बाह्यरूपावर अंदाज बांधून वेगवेगळे प्रयोग केले पण बियांची संख्या कधीच कमी झाली नाही. अनेकांना विचारून पाहिले त्यांचाही अनुभव माझ्यासारखाच. त्यामुळे काहीतरी कल्पक उपाय वापरल्याखेरीज यावर तोडगा नाही...

सचिन भालेकर नवीन

In reply to by श्रीरंग_जोशी

वांगी निवडताना छोटि छोटि निवडावीत, एकतर बिया कमी असतील नाहीतर बीया तरी छोट्या असतील.......