ध मु चे लग्न
लेखनप्रकार
डिस्क्लेमरः लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:))
यासाठी "बेस" म्हणून "मिपा" वर लिहले गेले साहित्य तसेच त्याला पडलेले प्रतिसाद हा मसाला कच्चा माल म्हणून वापरण्यात आले आहेत तरी कोणी आमच्यावर "साहित्यचोरीचा आळ" घेऊ नये, तसे झाल्यास त्या निषेघांच्या खलित्यास केराची टोपली दाखवण्यात येईल असे आम्ही नमूद करू ईच्छितो .... :छोटा डॊन काका च्या हुकुमवरून्.
ठण् ठण ठण् ठण घडाळ्याने मोजुन् बारा टोले दिले................
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला. "जब् जागो तब् सवेरा " या स्वामी आत्मप्रबोधानन्द् यांच्या उक्ती नुसार शनिवारी विकान्त उजवुन् रात्री झोपुन रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती...हां तर काय म्हणत् होततो मी; हां! पहाट झाली .धमु उठला.नाईलाजाने ईर्षाद म्हणत् त्याने ब्रशावर् पेष्ट् चढवुन् दातावर टेकवली. खसाखसा चेहेरा वगैरे धुतला.एक धूम्र शलका शिलगावुन झुरका मारला.ठ्यॊ करुन ठसका लागला आणि त्याचा मेंदू जागृत् झाला. त्याच्या मित्रांच्या मते तो हल्ली जर्रा जास्तच् झुरत् होता.
काहीतरी करायलाच हवे. धमु स्वत:शीच् म्हणाला. डॊन्या, इनोबा , आन्द्या यासगळ्यांचे बिचार घेउन झाले होते.कोण काय म्हणत् होते कोण काय म्हणत होते.त्यांचे बरोबर होते . लग्न तर करायलाच् हवे होते. प्रश्न होता की कसे आणि कुठे. स्वारगेट् , नेहरु स्टेडीयम, शान्ग्रीला गार्डन ,स्वीकारपासुन् ते अगदी सिंहगड् रोडवरचे कार्यालय सगळेच् काय काय सूचना देत होते.सगळ्यांचे बरोबर् होते पण् यात गोची एकच् होती ती म्हणजे यातल्या कोणालाही लग्नाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता.
आपण् असे करु यात का. भडकमकरसर सध्या गाईडन्स देतात् त्यांच्या कडे जाउया का? कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले.ईनोबा नेहमीप्रमाणे नाठाळाच्या माथी काय हाणायचे या गहन् विचारत् गढला होता.धमु असा हवालदील् होऊ नकोस्आम्ही आहोत ना आंद्या धमु ला समजावत् म्हणाला.तुझा प्रॊब्लेम् काय् आहे?
"काय येडं आहे रे हे" छोटा डॊन् आनन्दयात्री वर उचकत म्हणाला"हिकडे सगळे रामायण् झाले तरी हे विचारतय् की रामाची सीता कोण"?
मी सांगते रामाची सीता कोण ते.मनस्वी मध्येच् त्याचे बोलणे तोडत् म्हणाली ."रामाची सीता सिन्डी क्राफ़र्ड् बरोबर् की नाही धमु"
"धमु नकाना म्हणु" धमाल मुलगा कळवळुन म्हणाला.इथे माझ्या जिवनमरणाचा प्रश्न चाललाय् आणि तुम्हाला सिन्डी क्राफ़र्ड् सुचतेय्"
"ती तुझा प्रश्न सोडवणारे का रे धमु"?मनस्वी पुन्हा एकदा त्याला धमु म्हणायचे नाही हे पुन्हा एकदा विसरुनच् म्हणाली.
मी काय म्हणतो आपण त्या भडक् मकर सरांकडे जाउया. बघु तर् ते काय सल्ला देतात्.माझ्या मैत्रीणीला त्यांच्या "ईन्टरव्ह्यु देणे.... एक् जीव घेणे" या मार्गदर्शन् शिबीरात मस्त् मार्गदर्शन् दिले होते त्यानी." मनस्वी म्हणाली.
"मग् मिळाली का तीला नोकरी" विवेकग ने न रहावुन् विचारले "हा बघ् हा बघ् एक तर् रोज येत् नाही आणि अशे ऐन् वेळीला कै च्या कै प्रश्न विचारतो":इनोबा " ते भडक मकर् सर् म्हणजे काय वाटले तुला? ऒ ! ते असले तसले क्लासेस् घेत् नाहीत् ते इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात् तुला काय वाटले नोकरी कशी मिळवावी याचे इन्टेर्व्ह्यु ?"
आपण् असे करु यात् आपण् कट्ट्यावर् जाउ या तिथे काहीतरी मार्गदर्शन् मिळेल्..
----------------------------------------------------------------------------
इकडे कट्ट्यावर्.....
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्.
हो रे मला ही आता तसेच् वाटु लागले आहे. तो तात्या तिकडे सध्या नव्या लोकांना दीक्शा देतोय् जोरात् सिंगल् माल्ट् वगैरे ची आणि आपण् या इथे या "छद्मी शेवाळ् ;वटवाघूळ् आणि दक्षीण लेबनॊन् मधल्या चिचुन्द्र्या" असल्या भिकार् चर्चा करत् बसलोय. चित्तर् तुला काय् वाटतेय् आपण् काय् करावे या परिस्थितीत्?
ऒ काय् म्हणालास्? मला ही भिकार् सावकार् खेळत् बसायचा कंटाळा आलाय्.हल्ली तर् पान हा शब्द् ऐकला तरी कंटाळा येतो. जेवणाचे पान् घ्या म्हणाले कोणी तरी भूक् संपते.चित्तर् म्हणाला.पाककृती ला काय् रीस्पॊन्स द्यायचा हेच् कळत नाही. आयला लोक काय च्या काय् चहा आणि पापडावर लिहितात्.
मला तर् सध्या जोरात् भूक् लागते. सध्या प्रत्येकजण पाककृत्या खरडत् असतो.. शिवाय् तात्या त्याची चित्रे पण् देतो . जाम् भूक् लागते.
आणि सध्या चर्चा महाचर्चा अतिमहाचर्चा यापेक्शा "खाद्य पदार्थ" यालाच् जास्त् प्रतिसाद् मिळतो. "खयाली पुलाव" चांगला खपतो. आपण द्यायचो त्यासारखे "जिंकले जिंकले तोडलत् हो तुम्ही" असले प्रतिसाद् आता जवळ् जवळ् ब्यानच् झालेत.
आता मला सांग सन्जोप् मी तीन भागात् "चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले. त्यापेक्शा केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्.
मी तर आता विडम्बन कविता करण्यापेक्शा "मी आता विडम्बन् करणार नाही (१) , "मी आता विडम्बन् करणार नाही" (२)" असेच् लिहीयचे ठरवले आहे ईति:केशवसुमार.
नाहीतर "काय जेवलात" असले तरी सुरु करतो. निदान डोक्याला तरी ताप नाही. "जेन्जारलेली झुरळे, रक्तगाभुळलेले बेडुक आणि उपटसुम्भ्" यापेक्शा "काय जेवलात् " याची वाचने जास्त् होतात
---------------------------------------------------------------------------
सुवर्णमयी आणि ऐश्वर्या राय यांचे वेगळेच् बोलणे चालले होते.
"मी काय म्हणते आपण जालावर् कोण काय काय लिहीतात् त्यात् पुरुष किती. बायका किती आणि बायकांची नावे घेतलेले पुरुष किती हे शोधायलाच् हवे:" सुवर्णमयी
"तुम्हाला काय् म्हणायचे आहे नक्की सांगा" ’ऐश्वर्या राय "मी पुरुष् आहे की स्त्री याचा माझ्या लिखाणाशी काय सम्बन्ध्":ऐश्वर्या राय
आहे पुरुष लेखाकाना स्त्री ने जालावर् काही टीका केली की ती सहन होत नाही.कुठे कुठे जायचे जाला मध्ये हे त्याना कळत् नाही":सुवर्णमयी.
-----------------------------------------------------------------------------
"मला खरेच् कळत् नाहिये की काय करायचे?" धमाल मुलगा "इकडे आबा म्हणतात् की मी एवढा बाप असताना तु लग्नाची काळजी कशाला करतोस् आणि ते तारीख पण् ठरवत् नाहीत्."
"आपण् असे करुयात का? आपण लोकांचा कौल घेउ या" छोटा डॊन काहीतरी सांगु लागला"
"त्याने काय होईल्? धमाल मुलगा
त्याने निदान लोकांकडुन आपल्याला चार पाच् नवे पर्याय मिळतील"छोटा डॊन
आणि तसे पर्याय न मिळता लोकांनी चर्चा भलतीकडे नेली तर? धमाल मुलगा "उगाच ह घ्या ह ह पो दु ह ह पु वा असले प्रतिसाद् मिळाले तर्?"
त्याची तू काळजी करु नकोस् .मी पुण्याचे पेशव्याना याची काळजी घेण्यास सांगितले आहे
"मी काय म्हणतो" उदय सप्रे एकदम् उत्साहाने म्हणाला
"बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन.
"ए याला सांग की मी काहीही बोललो की हा मला प्रत्येक वेळी मधे मधे आडवतो" उदय सप्रे रडवेला चेहेरा करत् म्हणाला.
"बोल रे तू त्या डॊन्याचे येवढे मनावर् घेउ नकोस.तसे पाहीले तर त्याचे चूक् नाहीये आत्ता. पण तू बोल" धमाल मुलगा उदय ला शांत करत् बोलला.
"पण् त्याने मला पुन्हा अडवले तर?"उदय सप्रे.
"तो आता आडवणार नाही"धमाल मुलगा
"कशावरुन म्हणतोस्"उदय सप्रे.
"त्याची सिग्नेचर वाच त्यात् स्पष्ट् लिहीली आहे की त्याची कोठेही इतरत्र शाखा नाही" धमाल मुलगा
" मग ठीक आहे" उदय सप्रे.
"आता बोल ना " धमाल मुलगा.
"आपण संत तात्याकाम जाबाली ना विचारुया"उदय सप्रे. "त्यानी सध्या दीक्षे चे क्लासेस् काढले आहेत ते शिष्याना दीक्शा देण्या अगोदर सिंगल माल्ट् देउन पावन् करुन घेतात्."
"चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती "अन धमाल मुलाच्या लग्नाचे विचारु त्याना"
सगळे लगोलग संत तात्याबा महाराजांच्या त्वरेने आश्रमाकडे निघाले.
( क्रमश:)
वाचने
30159
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
:-))))))))))))))))) ही:हा:हा: बोकाशी बॉ:
In reply to :-))))))))))))))))) ही:हा:हा: बोकाशी बॉ: by धमाल मुलगा
आज मेरे यार की शादी है
लग्नाचा बॅन्डबाजा !!!!!
चालू द्या.. :)
In reply to चालू द्या.. :) by विसोबा खेचर
सहमत
मस्तच
हाण हाण हाण
In reply to हाण हाण हाण by आनंदयात्री
लगे रहो !!!
जिंकले .. जिंकले तुम्ही विजुभाऊ.
सुपर्ब !!
धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक !
तलवारबाजी उत्तम चालू आहे, चालू द्या !!! :)
हाण तिच्यायला ... जबरा !!!
धम्याचं लगीन
In reply to धम्याचं लगीन by इनोबा म्हणे
हा हा हा!
विजुभाऊ,
In reply to विजुभाऊ, by स्वाती राजेश
स्वातीताई....
वा
बेसनलाडवा
माझं नाव
In reply to माझं नाव by ठणठणपाळ
अहो आत्ता तर लग्न ठरते आहे..
टाका उडवून बार!!
In reply to टाका उडवून बार!! by पिवळा डांबिस
चड्डीत रहा
In reply to चड्डीत रहा by इनोबा म्हणे
ओ इनुभाऊ!
In reply to चड्डीत रहा by इनोबा म्हणे
ता तर अगदी
In reply to टाका उडवून बार!! by पिवळा डांबिस
नवरदेवाचीचड्डी लपवुन ठेवायची फ्याशन
In reply to टाका उडवून बार!! by पिवळा डांबिस
पत्रिकेवरच छापायला पाहीजे
In reply to पत्रिकेवरच छापायला पाहीजे by llपुण्याचे पेशवेll
लग्नपत्रिका
In reply to लग्नपत्रिका by मनस्वी
का बुवा?
:)
ह्म्म..
In reply to ह्म्म.. by केशवसुमार
डायरेक्ट धमकी ;)
यात्रीशेठ,
In reply to यात्रीशेठ, by केशवसुमार
:))
काल्पनिक प्रसंग-
In reply to काल्पनिक प्रसंग- by विदेश
पण ऑगदी
रोशोगुल्ला-
In reply to रोशोगुल्ला- by विदेश
:-))))))))))))))))
पिंक-
In reply to पिंक- by विदेश
अर्रर्र..
मी नाही-
तुम्हीच सांगा..
हि हि हिहि हि हि हि ख्या ख्याख्याख्या ख्याख्या
हा हा हा
In reply to हा हा हा by वरदा
नाही पण मग ते 'धमु' स्टाईल नाही होणार..
आहेर..
ही ही
आहेर
In reply to आहेर by शितल
ओ ताईईई ...
ही ही
कसे
In reply to कसे by शितल
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by ब्रिटिश टिंग्या
+१
घोड्याचे काय ???
बरे...
आम्ही तर