महात्म्याची अखेर हे जगन फडणीस यांचे अभ्यासपूर्ण पुसक. हे पुस्तक केवळ गांधीहत्या ह्या विषयाला वाहिलेले व ससंदर्भ दाखले असलेले पुस्तक आहे. 'घरगुती सावरकर' मधे ५५ कोटी साठी गांधीजींनी उपोषण केले का यावर अतिशय रोचक व अभ्यासपूर्ण चर्चा चालली आहे. यावर हे पुस्तक काय म्हणते हे दाखवण्यासाठी व त्यायोगे नव्या धाग्यात खंडन-मंडन करता यावे म्हणून हा काथ्याकूट चालु करत आहे. यातील पुढील परिच्छेद लेखकाच्या पूर्वपरवानगीविना मुळ पुस्तकातून जसेच्या तसे टंकत आहे (मिपाच्या धोरणात बसत नसल्यास, मला एकव्यनी पाठवून - म्हणजे ब्याकअप घेता येईल- धागा अप्रकाशित केला तरी हरकत नाहि):
पुस्तकातील लेखन निळ्या रंगात देत आहे
आधी गांधीजी फाळणीच्या विरोधात होते याचे ४ पुरावे लेखक पुस्तकात देतो. आणि नंतर शेवटाचा पुरावा देतो तो मला लास्त रोचक वाटल्याने तो इथे देत आहे:
फाळणीच्या योजनेला मान्यता देण्यासाठी काँग्रेस कार्यकारीणीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया यांना खास निमंत्रित केले होते. डॉ. लिहियांनी ह्या भेटीचा तपशीलवार वृत्तांत गिल्टी मेन ऑफ पार्टीशन या पुस्तकात दिला आहे तो असा "गांधी, सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान, जयप्रकाश नारायण व मी अश्या चौघांनीच फाळणीला विरोध केला. इतर कोणीही फाळणीच्या योजनेविरूद्ध चकार शब्द काढला नाहि." असे नमुद करून लोहिया पुस्तकात पुढे म्हणतात "या बैठकीतील चर्चेत गांधींनी हस्तक्षेप केला तो महत्त्वाचा आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विषेश विचार केला पाहिजे. फाळणीला मान्यता देण्यापूर्वी नेहरू व पटेल यांनी आपणास त्याची कल्पना दिली नव्हती असे गांधीजी काहिश्या तक्रारवजा भाषेत म्हणाले. गांधीजींना आपले म्हणणे पुरे करू न देताच नेहरू जरा आवेशाने म्हणाले की आपण वेळोवेळी गआंधीजींना सर्व कल्पना दिली आहे. मात्र जेव्हा गांधीजींनी पुन्हा सांगितले की आपणला माहिती नव्हती तेव्हा नेहरूंनी शब्द बदलून "गांधीजी त्यावेळी मोआखलीत होते त्यामुळे त्यांना तपशिल देण्यात आलेला नाहि""
हाच लोहियांच्या पुस्तकातील तपशील तेंडूलकरांच्या महात्मा: खंड७ मधे आहे.
याच्या शेवटी फडणीस टिप्पणी करतात की "भारताला प्रथम स्वातंत्र्य दिले तर ते फाळणीचा विचारच करणार नाहित अशी भीती जीनांना होती म्हणून त्यांना स्वातंत्र्यावेळीच दोन वेगळे देश हवे होते. तर भारताचे तुकडे टाळून स्वातंत्र्य मिळाल्यास आपण वेगळ्या राज्यासाठी जीनांची समजूत काढू शकू असा गांधींना विश्वास होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांनी आधी देश सोडावा फाळणीचे आम्ही काय ते पाहून घेऊ अशी भुमिका घेतली होती. नेहरु पटेल मात्र, या वादात स्वातंत्र्य लांबणीवर पडेल या भीतीने गांधींना कल्पना न देताच फाळणीला मान्यता देण्याचे कबूल केले. त्यामूळे नाईलाजाने काँग्रेसचा शब्द पडू नये म्हणून गांधींनाही झुकावे लागले.
याव्यतीरिक्त हेच मत (गांधी फाळणीस जबाबदार नव्हते तर नेहरू-पटेल यांनी हंगामी सरकारच्या अनुभवांमुळे कंटाळून घाईत फाळणी मान्य केली) डॉ. लोहिया, डॉ. जयप्रकाश नारायण, डॉ. राजेंद्रप्रकाश व मौलाना अब्दूल कलाम आझाद यांच्या लेखांमधे मांडलेले आहे ते फडणीस दाखवतात.
आता ५५ कोटींकडे व़ळू या बाबतीत दिलेला तर्क श्री. थत्ते यांनी मांडला आहेच. तेव्हा द्वीरूक्ती करत नाहि..
१३ जानेवारी : उपोषण सुरू.
१५ जानेवारी : ५५ कोटी देण्याचा प्रस्ताव संमत
१८ जानेवारी : उपोषणाची समाप्ती.
मग मधला वेळ का? याला फडणीस उत्तर देतात कारण उपोषण ५५ कोटींसाठी नसून दिल्लीतील शांततेसाठी होते. याबद्दलचा पुस्तकात काहि पुरावे दिले आहेत त्यातील लेखकाच्या मते सर्वात महत्त्वाच्या पुराव्याचा हा वेचा:
शांततेसाठीच उपोषण होते यासाठी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली १३० जणांची शांतता समिती नेमण्यात आली होती. १७ जानेवारी रोजी दिल्लीत त्यांची जाहिर सभा झाली. त्यात पुढील ७ अटी मान्य करण्यात आल्या
१. हिंदू मुस्लिम, शीख व इतर धर्मिय दिल्लीत भावाभावाप्रमाणे आणि सौहार्दाने राहण्याची हमी देत आहोत. दिल्लीतील मुसलमानांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहील अशी प्रतिज्ञा करीत आहोत.
२. गेल्या वर्षी प्रमाणे ख्वाजा कुतुबुद्दीन मझचा उरूस होईल.
३. सब्जीमंडी, करोलबाग पहाडगंज व अन्य भागांत मुसलमानांना नेहमीप्रमाणे व्यवहार पार पाडता येतील
४. हिन्दुंनी व्यापलेल्या मशिदी मुसलमानांना परत केल्या जातील आणि दिल्लीत मुसलमानांना म्हणून ठेवलेला जो भाग मोकळा आहे त्याचा हिन्दु कब्जा करणार नाहीत.
५. जे दिल्लीतुन बाहेर गेलेले मुसलमान परत येऊ इच्छितात त्यांना हरकत असणार नाहि व त्यांना पूर्वीचे रोजगार करण्यास प्रतिबंध केला जाणार नाहि
६. हे सारे प्रयत्न वैयक्तीक रित्या करू. यात शासनाची अथवा लष्करची मदत घेतली जाणार नाहि.
७. महात्म्यानी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा व आपले उपोषण संपवावे आणि आम्हास नेतृत्त्व व मार्गदर्शन करावे.
या अटी जाहिर सभेत १७ जानेवारीला मंजुर झाल्यानंतरच १८ जानेवारीला त्यांनी उपोषण सोडले. व या अटींमधे ५५ कोटींचा उल्लेखही नाहि. पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते. व ते त्यांनी उपोषणा आधी तसेच उपोषणादरम्यानही सांगितले आहे. मात्र हे उपोषण त्यासाठी नव्हते. उपोषणा दरम्यानही ते अनेकविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडत मात्र याचा अर्थ ते उपोषण त्या मतांसाठी होते असा अर्थ होत नाहि.
आता चर्चेसाठी श्री इंद्रराज व श्री नितीन यांच्याबरोबरच इतर मान्यवरांना पाचारण करत आहे. :)
वाचने
32507
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय
उपोषणाची सुरवात आणि ५५ कोटी न देण्याचा भारताचा निर्णय?
>>तिथल्या
In reply to उपोषणाची सुरवात आणि ५५ कोटी न देण्याचा भारताचा निर्णय? by हुप्प्या
ज्या
In reply to >>तिथल्या by नितिन थत्ते
सगळे मुसलमान
In reply to ज्या by अप्पा जोगळेकर
>>'सगळे
In reply to सगळे मुसलमान by चिंतातुर जंतू
'सगळे
In reply to सगळे मुसलमान by चिंतातुर जंतू
अप्पा++
In reply to 'सगळे by अप्पा जोगळेकर
जरा अवांतर
In reply to उपोषणाची सुरवात आणि ५५ कोटी न देण्याचा भारताचा निर्णय? by हुप्प्या
ऋषिकेशचे
जरासे
उत्तर...!
पाकीस्तान
धन्यवाद
In reply to पाकीस्तान by परिकथेतील राजकुमार
दोन गोष्टी
In reply to पाकीस्तान by परिकथेतील राजकुमार
महात्मा गांधी हे देव नव्हते......
मान्यच आहे
In reply to महात्मा गांधी हे देव नव्हते...... by वेताळ
त्यांनी
In reply to मान्यच आहे by ऋषिकेश
शोकान्तिका....
ज्या
In reply to शोकान्तिका.... by satish kulkarni
नथुराम
In reply to ज्या by परिकथेतील राजकुमार
काही शंका
In reply to नथुराम by शिल्पा ब
thank you for your stupid
In reply to काही शंका by पंगा
बाय द वे...
In reply to thank you for your stupid by शिल्पा ब
बाय द
In reply to बाय द वे... by पंगा
म्हणजे...
In reply to बाय द by शिल्पा ब
म्हणजे
In reply to म्हणजे... by पंगा
"आम्ही ५५
महात्मा....!!!!
+ अतिशय संयमित उत्तर.
In reply to महात्मा....!!!! by इन्द्र्राज पवार
+१
In reply to + अतिशय संयमित उत्तर. by चतुरंग
स्वतंत्र
In reply to महात्मा....!!!! by इन्द्र्राज पवार
तुमच्या
>>या ३-४
In reply to तुमच्या by समंजस
१जाने की १२ जाने?
पुरावे व स्वभाव
In reply to १जाने की १२ जाने? by नितिन थत्ते
+१
In reply to पुरावे व स्वभाव by सोम्यागोम्या
गांधींच्य
लॉजिक....!!!
इंद्रराव
In reply to लॉजिक....!!! by इन्द्र्राज पवार
@मिसळभोक्त
In reply to इंद्रराव by मिसळभोक्ता
माफकरा
In reply to @मिसळभोक्त by आवशीचो घोव्
@मिसळभोक्त
In reply to माफकरा by मिसळभोक्ता
उपोषण संपविल्यानंतर ..
नसेल तर मग
In reply to उपोषण संपविल्यानंतर .. by शेखर काळे
पुण्याचे
In reply to नसेल तर मग by टारझन
२५ डिसेंबर १९४७
'पुरावे'
'आपल्याला
In reply to 'पुरावे' by नितिन थत्ते
हा हा हा
In reply to 'आपल्याला by llपुण्याचे पेशवेll
आगाखान
In reply to 'आपल्याला by llपुण्याचे पेशवेll
सावरकर
अप्पा
In reply to सावरकर by अप्पा जोगळेकर
+१ ************************
In reply to अप्पा by मिसळभोक्ता
प्रा डॉ, झोपलात काय ?
In reply to सावरकर by अप्पा जोगळेकर
हॅ हॅ हॅ
In reply to प्रा डॉ, झोपलात काय ? by मिसळभोक्ता
तुर्तास शेवटचे
५५ कोटी आणि गांधीजी
अवांतर लिहू नये !!
In reply to सुरुवात by अप्पा जोगळेकर
जरुर
In reply to अवांतर लिहू नये !! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालूदे
सर्वसाक्षी
In reply to चालूदे by भडकमकर मास्तर
चुकीचा आक्षेप
In reply to सर्वसाक्षी by मिसळभोक्ता
नम्र विनंती....!!
इंद्रा
In reply to नम्र विनंती....!! by इन्द्र्राज पवार
मला
In reply to नम्र विनंती....!! by इन्द्र्राज पवार
संजू डूड
In reply to मला by समंजस
चुकून
In reply to संजू डूड by मिसळभोक्ता
मुख्य मुद्दा
In reply to चुकून by समंजस
विनंती......
गांधीजींच
प्रश्न*ही*
In reply to गांधीजींच by भोचक
अर्थातच
In reply to गांधीजींच by भोचक
+१
In reply to अर्थातच by समंजस
मला वाटतं
In reply to +१ by मिसळभोक्ता
श्री/सौ/कु समंजस
In reply to मला वाटतं by समंजस
मर्यादेपे
In reply to श्री/सौ/कु समंजस by मिसळभोक्ता
यूसलेस पक्या
In reply to मर्यादेपे by पक्या
यूसलेस मिसळभोक्ता
In reply to यूसलेस पक्या by मिसळभोक्ता
धन्यवाद
In reply to श्री/सौ/कु समंजस by मिसळभोक्ता
धन्यवाद
In reply to धन्यवाद by समंजस
संदर्भ
In reply to धन्यवाद by समंजस
नितिन
In reply to संदर्भ by नितिन थत्ते
जरतर...!!
हो
In reply to जरतर...!! by इन्द्र्राज पवार
मिष्टर इंद्र
In reply to जरतर...!! by इन्द्र्राज पवार
अवांतरः
+१
In reply to अवांतरः by मी ऋचा
मी
In reply to +१ by ज्ञानेश...
पूर्णविराम...!!
भावे -
मराठी
In reply to भावे - by कानडाऊ योगेशु
मिभो काकांशी सहमत आहे.
वाद
+१
In reply to वाद by नितिन थत्ते
खालच्या
कल्याणम ह्यांचे पत्र ...
In reply to खालच्या by आनंद
थांबूच देत नाही.
In reply to खालच्या by आनंद
जरी दोन्ही
In reply to थांबूच देत नाही. by नितिन थत्ते
श्री
In reply to जरी दोन्ही by ऋषिकेश
+१. मी पण
In reply to जरी दोन्ही by ऋषिकेश
सदर संकेतस्थळ