निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रिय (लेखक) बनणे इत्यादी
(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे)
आपण कधीकाळी निवडून येऊ! असे कल्पनेत देखील विचार न केलेली मंडळी, आता मात्र जरा विचारमग्न होऊ लागली आहेत. कारण विचारताय? अहो ह्या गणपतीत, एक नवीन हॉटेल नाही का सूरू झालेय. आपल्या पंसदीचे खाणे पुरवणारे क्षुधाशांतीगृह, च्यामारी कूठेच नव्हते. आता रात्री २ वाजता जर का भूक लागली. काहीतरी चमचमीत खावेसे वाटले तर म्हणे "आत्ता बंद आहे, उघडल्यावर या". चक्क शटर डाऊन करून हो! साध पाणी पण नाही दिल. एकदम पुणेरी** पध्दतीने असे कटवले. तेव्हाच ठरवले, साला २४ तास चोचले पूरवले जातील असे हॉटेल काढतो की नाय बघा. अहो तुमच्याकडे नसतील कोणाला लागत पण बरेचजण आहेत ज्यांना रात्री - अपरात्री भूक लागते. यापूढे तुमच्या मर्जीवर आमची भूक नाय भागवणार आपण, हो!!!
ठीक आहे, हॉटेल तर काढलेय. कॉन्ट्रक्टरने छान बांधले हो. लोकांनी पण जरा फेंगशूई, वास्तूशास्त्राच्या गोष्टी देऊन सजवले हो. आचारी म्हणजे मित्रमंडळीच हो, आपणच बनवून खायचे, खिलवायचे. आहाहा!! राजेहो, काय मजा येतीय म्हणून सांगू! पण मालकाची दादागीरी चालू आहे असे कोणी म्हणू नये मग त्याकरता एक नि:पक्ष व्यवस्थापन बनवायला हवे. लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे ना. निवडणूका घेऊन कारभार चालवूया!
झाल़, लोक म्हणतात तो मुर्श्ररफपण असेच करतो पण सूत्र मात्र......अबे चूप, निवडणूक आयोग काम करतोय. जरा दम धराल की नाय..
इकडे रोज वर्तमानपत्र / निवडणूकवृत्त वाचून सामान्य लेखकांच्या मात्र स्वभावाप्रमाणे कल्पनेच्या भरार्या सूरू झाल्या. आपला नंबर लागेल का राव? लोकशाही, मतदान म्हणजे आता इतरांचे मत आपल्यालाच कसे मिळेल ह्यावर विचारमंथन सूरू झाले. आता लेखनाची कूवत काही का असेना जर संपादक मंडळात निवडून यायचे असेल तर लोकप्रियता तर नक्कीच लागणार. च्यायला इथे राज्यसभा असती तर काय मजा आली असती, फक्त अंगभूत हुशारीवर सन्माननीय सदस्य म्हणून वर्णी लागली असती पण जाउद्या तसे डायरेक्ट इकडून तिकडे बिनतारी लोकांनाच जमेल हो. आपल्याला मात्र जनतेत फिरून कनेक्ट होऊन मते मिळवावी लागणार.
कार्ल रोव्हलाच घ्यावे का? सध्या नाहीतरी मोकळाच आहे पठ्या. एकदा त्याच्या हातात हे प्रोजेक्ट दिले म्हणजे यश हमखास. असे अमेरिकास्थीत एका लेखकाला (ओय लगेच तर्क लावू नका हा हायटेक, श्रीमंत लेखक कोण? हे सगळे काल्पनीक आहे बर का) वाटायला लागले. चला एकदा कार्ल रोव्ह आपल्या कंपनीच्या कार्यक्रमाला आला होता त्याच्या लॅपटॉप वरून एक पॉवरप्वाईंट प्रेसेंन्टेशन कसे ढापले होते ( माझा फोन टॅप करतो म्हणजे काय लेकाचा? जा काही महीने बोलतच नाही कोणाशी. बघू बर काय ऐकतोय.) त्यातून काही मिळते का बघूया.
इकडे आम्हाला वाटले की चला ह्या निमीत्ताने आपण निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रियता मिळवणे म्हणजे कसे ते संभाव्य उमेदवारांना सांगावे.
१) तर मंडळी सध्या माहीत नसलेल्या साइटसवरून जरा विनोदी लेख काढा. ट्रान्सलेशन करा. इथे चिकटवा. लोकांना रिलॅक्स करा. तुमच्या भोवतालचे संशयाचे वातावरण घालवा. म्हणजे चेहरा भयाण आहे तर मुखवटा चढवा हो.
२) इकडे हॉटेलात आवडतील अश्या सगळ्या पदार्थांची नावे असलेली खाती (वेगवेगळ्या ठीकाणाहून) उघडा. नावे सहज लक्षात रहातील कारण हॉटेलात आलेला हा भूकेलाच असणार.
३) वाटल्यास इतर लहान सहान उमेदवारांचे पॅनेल बनवा व म्युचूअल ऍडमीरेशन क्लब जोरात सूरू करा. ते मुशायरात जसे एक वाक्य पूर्ण होताय ना होताय तोवर शेवटचे दोन शब्द घेऊन वा वा उस्ताद! म्हणून सूरू व्हा. तसेच जे कोणी लिखाण करत असतील त्यांच्या खरडवहीत जाऊन मनसोक्त दाद द्या. जमल्यास भारी भारी व्यं. नि. पाठवून. लोक खरडवह्या अगदी चाटून पुसून साफ करतात म्हणून तेथे बरोबर खाद्य ठेवत जा. तुमचे नाव, निवडणूक चिन्ह ठेवा. पण स्पॅमींग मात्र टाळा. येथील मतदार चाणाक्ष आहेत. एकाची दाद दुसर्याला दिलीत तर हे लोक चटकन ओळखतात. पर्सनलाइज्ड दाद द्या.
४) बांगलादेशी घूसखोरांसारखे नवनवीन आयडी असलेले मतदार वर्ग तयार करा. शक्यतो सर्वांचे पासवर्ड एकच ठेवा कारण आयत्यावेळी निवडणूकीच्या दिवशी धपाधप मत मारायची म्हणजे गडबड नको. त्यासाठी आत्ताच रोमींग आय.पी., ब्लॉक ऑफ आय.पी. विकत घ्या. मतदानाला फक्त ५ का १० मिनिटे दिली तर मात्र बोंब आहे. पण आपली तयारी असली म्हणजे झाले.
५) भोकराचे लोणचे किंवा असेच विस्मरणात गेलेले पदार्थ ताबडतोब आपल्या आई, आज्जी यांना विचारून काढा व वरचेवर उल्लेख करत रहा. म्हणजे जी नॉस्टेलजीक मतदारपेठ आहे ती तुमचीच समजा.
६) आपल्याच खोट्या आय. डी. ला एखाद्या तसल्या दुर्मीळ पदार्थाचे पार्सल करा. आपणच तृप्त झाल्याची रिप्लाय ढेकर द्या. पूढेमागे आपला नंबर लागेल असे समजून आशाळभूत मतदार वर्ग तुमचाच. नंतर वेळ आली की कोणाच्या लक्षात रहातेय आपण बाटली प्रॉमीस केली होती. जनतेच्या गाडीतून जनतेचा पैसा खर्च करत चहापाणी घेत तर हिंडायचेय.
६) वेगवेगळ्या नट्यांचे सचित्र लेख द्या, गायकांचे गाण्याचे तुकडे चढवा, भेंड्या खेळा, पाककृतींचा अजीर्ण होइपर्यंत मारा करा, संगणकदुरूस्ती करा, लोकांची काशी, गंगासफर करवा, बाबाजींची प्रवचन करा. बहूसंख्य लोक त्यात गुंगली की कसले राजकारण, कोण वाईट, कोण चांगला ह्याकडे सगळे कानाडोळा करतात. (कान गायकाकडे, डोळे छायाचित्रांकडे असल्यावर तुमच्या "हालचालींवर" कोण नजर ठेवतो)
तर अश्या रितीने वेगवेगळ्या मतदाराला फिल्डींग लावली की झाले तुम्ही निवडून आलेच समजा. काय म्हणालात बुध्दीजीवी मतदारांचे काय? हा हा हा!!! अहो बुध्दीजीवी मतदारांचे नेहमीचे आहे. ते ना धड "इकडचे" ना "तिकडचे" ते तर "मधेच" अडकले. त्यांची काळजी करूच नका. त्यांच्यासाठी वाटलेच तर आपले गिर्यारोहण, अर्थकारण, कोडीताडण (म्हणजे कोडी सोडवणे, मराठीभाषा नवनवे शब्द घालून समृध्द करणे आम्हाला पण जमते राव!) असे मतदानाच्या दिवशी टाका. ते सगळे विसरतील. मतदानाला बाहेरच पडणार नाहीत.
चला, बघता बघता निवडणूका लवकर जाहीर होतील तर कामाला लागा आत्तापासून!
बर फू़कट एवढेच बर का. आधीक माहीतीसाठी सशुल्क भेटा अथवा लिहा.
** तुमचे लेखन यशस्वी व्हायचे असेल तर पूणे, पूणेरीवर एकतरी तोडायचाच, नाहीतर म्हणे फाऊल धरला जातो.
-------------------------------------------------------------------------------------------------
सहज कन्सलचंट. आमची अन्यत्र शाखा नाही.
निवडणूकीत, नेमणूकीत आम्हाला रस नाही. पण सल्ले रोज मिळतील (साठा असेपर्यंतच)
सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही.
वाचने
15435
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
निवडणूक
उमेदवार वादविवाद/डीबेट
In reply to उमेदवार वादविवाद/डीबेट by विकास
+१
झक्कास लेख !
In reply to झक्कास लेख ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधिसूचना
छान लेख..
In reply to छान लेख.. by विसोबा खेचर
ऐकतोय
जबरा............च.
क्या बात है!
आमची माती आमची माणसे
In reply to आमची माती आमची माणसे by सहज
दिनेश
हा हा हा..
In reply to हा हा हा.. by कोलबेर
फूट नोट
शुद्धलेखन शिष्टाचार
In reply to शुद्धलेखन शिष्टाचार by यनावाला
अतिरेक नको.
In reply to शुद्धलेखन शिष्टाचार by यनावाला
भारी आयडिया
In reply to शुद्धलेखन शिष्टाचार by यनावाला
मस्त
शुद्धलेखन
सल्ले
सहज
मस्त
मस्तच ...
ऑनियन राउटिंग
सहजराव