महाराष्ट्रात फेसबुकवर बंदी?
- २२ मेच्या बातमीनुसार जे पान गृहखात्याला बंदीच्या कारवाईयोग्य वाटत होते, ते फेसबुकनेच आदल्या दिवशी (मे २१) काढून टाकले होते. आम्हांस हे कसे ठाऊक? कारण आम्ही आदल्याच दिवशी (मे २०) तेथे जाऊन मुहम्मदाची चित्रविचित्र चित्रे चवीचवीने पाहिली होती, पण दुसर्या दिवशी काही मित्रांस पाठवू जाता ती गायब झालेली दिसली.
- बहुतेक वाचकांच्या प्रतिक्रिया या एका चुकीच्या गृहितकावर आधारित होत्या. ते गृहितक म्हणजे पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्र सरकार अख्ख्या फेसबुकावरच बंदी आणणार. असे त्या बातमीत कुठे म्हटलेले आम्हाला आढळले नाही. त्यामुळे आंतरजालावर वावरणार्या सुशिक्षित भारतीयांचा मूर्खपणा/भयगंड कसा पराचा कावळा करतो, ते पुन्हा एकदा दिसले.
- काही प्रतिक्रियांमध्ये या विषयाच्या मिषाने पुन्हा एकदा हुसेन यांचे (अर्थात जळजळीत) उल्लेख सापडले. त्यामुळे हुसेनचे भूत भारतीयांवरून काही केल्या उतरत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले.
In reply to अरेरे... by धमाल मुलगा
In reply to चित्रे by तिमा
In reply to नाही हो.. by llपुण्याचे पेशवेll
In reply to नाही हो.. by llपुण्याचे पेशवेll
मागे ज्यावरून दंगल झाली होती ती चित्रे देखील कुठे पहायला मिळाली नाहीत. :-( नक्की असं भावना दुखावण्यासारखं काढलं तरी काय होतें बघायचे होते मला.मूळची डॅनिश व्यंगचित्रे इथे पाहावयास मिळतील. त्यांचे इंग्रजीतील वर्णन इथे पाहावयास मिळेल. पूर्वअटः नंतर आम्ही जी हिंदू देवतांची (किंवा शिवाजीची, किंवा पेशव्यांची) चित्रे दाखवणार आहोत, त्यांनी आपल्या भावना दुखवून घ्यायच्या नाहीत हं! - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to डॅनिश व्यंगचित्रे by चिंतातुर जंतू
In reply to चित्रे by तिमा
जालावर ती सगळीकडे उपलब्ध आहेत. कंटाळा येईल इतकी!!!हवे तेच चित्र पुन्हा शोधायला फार कष्ट पडतात हो. उदा. आम्हाला हे चित्र हवे होते. ते गूगलवर सातव्या की आठव्या पानावर आले: सकाळी सकाळी जेव्हा धर्म भ्रष्ट होतो हे चित्र येथे आहे. वि.सू. ह. घ्या. आणि संपादित करू नका, ही विनंती. संपादकीय नोंद : मूळ प्रतिसादातल्या चित्राचे रूपांतर दुव्यात करण्यात आलेले आहे. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to आळस! by चिंतातुर जंतू
In reply to संपादकांनी by आनंदयात्री
In reply to +१ by मदनबाण
In reply to जोपर्यंत by II विकास II
लज्जागौरीचे चित्रही आक्षेपार्ह नव्हते आणि त्याला पार्श्वभुमीही होती.पार्श्वभुमी नव्हती असं कोण म्हणालं ? इनफॅक्ट ते चित्रंच पुर्ण पार्श्वभुमी दाखवणारं होतं .. :) तरीही आक्षेपार्ह नाही म्हणता ? असो ... ज्या दिवशी लज्जागौरीची पार्ष्वभुमी न पाहाता, पब्लिक तिचा चेहरा पाहिल तो दिवस म्हणजे आंबटशौकिणांचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
In reply to लज्जागौरी by टारझन
In reply to श्री by II विकास II
In reply to फोटो by आवशीचो घोव्
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
"मुहम्मदाच्या चित्राची स्पर्धा" हा प्रकार अप्रकाशित केल्यामुळे कुणाची मुस्कटदाबी होते, कुणाच्या स्वातंत्र्याची पायमल्ली होते असे धरले तर , खोडसाळपणा करण्याच्या स्वातंत्र्याची पायमल्ली होते असे असे मला वाटते.यावर आमचे एक प्रिय लेखक मिलन कुंदेरा (मूळचे चेक, आता फ्रेंच नागरिक) यांनी आपल्या 'दि अनबेअरेबल लाईटनेस ऑफ बीईंग' या कादंबरीत फार उत्कृष्ट भाष्य केलेले आहे. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे, पण त्याचा किंचित गोषवारा इथे दिल्याशिवाय राहवत नाही. 'किच्' या संकल्पनेच्या अनुषंगाने ते काहीसा असा विचार मांडतात: मानवी अस्तित्वामध्ये अनेक गोष्टी या विविध कारणांपोटी रुचिहीन वा अप्रिय मानल्या जातात. शक्यतो अशा गोष्टींना दूर ढकलणे किंवा त्यांचे अस्तित्व नाकारण्याकडे समाजांचा कल असतो. विविध समाजांत अर्थातच वेगवेगळ्या गोष्टी या वर्गात मोडतात, पण त्यांचा एक समान गुणधर्म म्हणजे त्यांवर हृदयांची एकाधिकारशाही असते; एकदा हृदयाने एखादी गोष्ट रुचिहीन (वा रुचिपूर्ण) मानली की मेंदूला त्यावर आक्षेप घेणेच रुचिहीन वा असभ्य वाटू लागते. विश्वबंधुत्व वा तत्सम गोड भासणार्या कल्पनांच्या नावाखाली एका विशाल जनसमूहाला एकत्र आणण्यासाठी या 'हृदयांच्या एकाधिकारशाहीचा' राजकीय वापर केला जातो. अशा परिस्थितीत या विशाल समूहापासून वेगळी दिसणारी प्रत्येक कृती वा व्यक्ती ही त्या हृदयांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधातली आणि म्हणून धोकादायक मानली जाते. प्रत्येक शंका व प्रत्येक खोड ही मूलतःच अशा (कोणत्या ना कोणत्या) बहुजनवादी एकाधिकारशाहीच्या विरोधात असते. त्यामुळे अशा समाजांत सर्वप्रथम शंका उपस्थित करणे व खोडसाळपणा करणे यांवर बंधने येतात. यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात रुचिहीनता वाढते (लेखक 'शिट' असाच शब्द वापरतो), पण अशा समाजाच्या आविष्कारात मात्र वरवर पाहाता तिचा अभाव असावा, असे वाटते. (लेखक सोव्हिएट चित्रपटांतली निरागसता आणि प्रत्यक्षातले त्यावेळचे देशातले भयाण वास्तव यांचे उदाहरण देतो). थोडक्यात, शंका उपस्थित करणे, खोडसाळपणा करणे आणि त्याद्वारे या 'हृदयांच्या एकाधिकारशाही'स प्रतिकार करणे, हे कोणत्याही समाजाच्या निरोगीपणाचे लक्षण आहे; त्यास नाकारण्याने वास्तव अधिक सुसह्य न होता अधिक भयाण होऊ लागते. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to खोडसाळपणाचे स्वातंत्र्य by चिंतातुर जंतू
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
मात्र या विवेचनाचा फलक्रम म्हणून वापर केलेला नाही ना ? अशी शंका मला चाटून गेली."फलक्रम" हा शब्द पहिल्या नजरेस संस्कृतोद्भव वाटल्याने बराच वेळ काहीही अर्थबोध झाला नाही. नंतर गोम लक्षात आली. असा गोंधळ टाळण्यासाठी हा शब्द "फल्क्रम" असा लिहिता येईल काय? किंवा, याच अर्थीचा "टेकू" असा एक शब्द मराठीत आहे असे वाटते, त्याचाही विचार व्हावा. धन्यवाद. - पंडित गागाभट्ट.
In reply to "फलक्रम": एक सुचवण by पंगा
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to मुक्तसुनीत by Pain
In reply to हम्म by मुक्तसुनीत
In reply to हम्म by मुक्तसुनीत
In reply to दुरुस्ती by पंगा
In reply to धन्यवाद. by मुक्तसुनीत
म्हणूनच चूभूद्याघ्या. म्हण्टले होते म्हणा ना !नजरचुकीने ते न पाहणेची भूल झाली. चूभूद्याघ्या. - पंडित गागाभट्ट.
In reply to दुरुस्ती by पंगा
In reply to खरे तर by मिसळभोक्ता
In reply to काय फरक पडतो... by फटू
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
In reply to काय फरक पडतो... by फटू
"शंका उपस्थित करणे व खोडसाळपणा करणे" या दोन्ही गोष्टींची मोट एकत्र बांधणे म्हणजे दरवडेखोर आणि सत्याग्रही एकाच वेळी एकाच तुरुंगात आहेत म्हणून त्यांना एकाच मापात मोजण्याचा प्रकार झाला. विद्रोह (dissent) , "Question everything , believe nothing" , मूर्तिभंजन, समूहापेक्षा वेगळा आवाज , अल्पसंख्यांकांना वाटणारी सुरक्षितता हे सगळे आवश्यकच आहे. मात्र या सार्या उदारमतवादी मूल्यांबरोबर "खोडसाळपणा" , प्रोव्होकेटीव्ह गोष्टींना स्मगल करणे ही एकतर गल्लत तरी आहे किंवा अतिचतुर धोरण तरी. आणि दोन्ही अर्थातच त्याज्य.आपण ज्यांना गल्लत वा अतिचतुर धोरण म्हणून त्याज्य मानता आहात, त्या गोष्टींची मोट बांधणे हे कसे त्याज्य नाही, ते दाखवण्यासाठी दस्तुरखुद्द मध्य-पूर्वेतच एक सुप्रसिध्द उदाहरण आहे, ते म्हणजे मुल्ला नसरुद्दीन यांचे. एक मासला पाहा: मुल्लाकडे एक शेजारी आला. त्याला काही सामान वाहून नेण्यासाठी मुल्लाचे गाढव हवे होते. मुल्ला म्हणाला 'माझे गाढव मी आज दुसर्या कुणाला तरी आधीच दिले आहे'. त्याच वेळी त्याचे गाढव ओरडताना ऐकू आले. शेजारी म्हणाला 'पण आपले गाढव तर आत ओरडते आहे!' मुल्ला म्हणाला 'काय? म्हणजे तुमचा मुल्लापेक्षाही गाढवावर जास्त विश्वास आहे तर!' आता, ही गोष्ट सांगणे म्हणजे एकंदरीत मुल्लामौलवींविषयी निंदानालस्ती करण्याचा खोडसाळपणा करणे नव्हे का? कारण यातील मुल्ला खोटे बोलतो, व त्याला आव्हान मिळताच वर आपले मुल्लापण वापरून समोरच्यास गप्प बसवितो. मात्र, यात अंतर्भूत टीका काय आहे, ते लक्षात घ्या. वैज्ञानिक/तार्किक कसोटीवर एखादी गोष्ट सिध्द करण्यासाठी वापरता येईल, असा पुरावा दुर्लक्षून मुल्लामौलवींचे सांगणे अंधपणे ऐकण्यात काय धोका असतो, हे या प्रसंगातून दिसते. पण याला निव्वळ खोडसाळपणा मानून त्याज्य मानले, तर रंजनातून प्रबोधन करण्याचे एक प्रभावी अस्त्र समाज गमावून बसतो. आज अनेक समाज विविध कारणांसाठी हा हक्क गमावून बसत आहेत. सुशिक्षित, समंजस समाजाने तरी हा धोका ओळखला पाहिजे, असे आमचे मत आहे. आम्ही पूर्वी एका धाग्यावर 'द राईट टु जोक' या निबंधाचा दुवा दिला होता. त्यात या विषयीचे अधिक सखोल विवेचन वाचता येईल, म्हणून तोच दुवा इथे पुन्हा देत आहे. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to शंका उपस्थित करणे व खोडसाळपणा करणे यांची मोट by चिंतातुर जंतू
In reply to किस्सा by Nile
कुठपर्यंत खोडी काढलेली चालेल ही रेखा ठरवणे कठिण आहे खरे.इथे पाश्चिमात्य देश आणि भारत यांच्यात थोडी तुलना केल्याने कदाचित थोडी स्पष्टता येईल. उदा: राष्ट्रध्वज वा राष्ट्रगीताचा अवमान केल्यास तो भारतात सरसकट गुन्हा ठरतो (यास अपवाद आहेत का?). फ्रान्सच्या कायद्यानुसार सार्वजनिक सरकारी सोहळ्यांत वा खेळाच्या मैदानात केलेला अवमान गुन्हा ठरतो, पण कलाकृतींना यातून सूट आहे. सरकारला सार्वजनिकरीत्या विरोध करण्याच्या मोर्चासारख्या पारंपरिक ठिकाणीही संयोजन सरकारचे नसल्यास अवमान करण्यास गुन्हा मानत नाहीत. सरकार अवमान करू शकत नाही, पण सरकारला विरोध करताना अवमान करण्यास वाव आहे, हे येथे महत्त्वाचे तत्त्व आहे. भारतात चित्रपट किंवा नाटकांस सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र लागते. ते देण्यासाठी बोर्ड कलाकृतीत काटछाट सुचवू शकते. अनेक पाश्चिमात्य देशांत प्रमाणपत्र हे निव्वळ एक सल्ला देऊ शकते (१२ वर्षांच्या खालील मुलास प्रवेश नाही, वगैरे), पण काटछाटीचा हक्क त्यास नाही. विशिष्ट वयाच्या मर्यादेपलीकडे (उदा. १६ वर्षे) तुम्हांस कलाकृती पाहाण्यास कायद्याने प्रतिबंध करण्याचा हक्क सरकारकडे नाही. यामागे अंतर्भूत तत्त्व हे आहे की, विशिष्ट वयोमर्यादेपलीकडे आपल्या भावना न दुखवून घेण्याची जबाबदारी व्यक्तीकडे आहे, समष्टीकडे नाही. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to खोडीची मर्यादा by चिंतातुर जंतू
In reply to शंका उपस्थित करणे व खोडसाळपणा करणे यांची मोट by चिंतातुर जंतू
मुल्ला नसरुद्दीनचा किस्सा रोचक आहे. यामध्ये विनोद आहेच. परंतु प्रस्तुत संदर्भात तो कितपत रेलेव्हंट आहे याबद्दल मला शंका आहे.एका प्रतिसादात वर मी दिलेले व्यंगचित्र उदाहरणार्थ घेतल्यास त्यात असे आहे, की रोज सकाळी दंतमार्जन करणारा मुहम्मद आरशात स्वतःला न्याहाळतो, व 'ब्लास्फेमी' असे चित्कारतो. प्रेषिताची प्रतिमा न काढण्यामागचा मूळ हेतू मूर्तिपूजा होऊ नये, हा होता. ज्यांना मूर्तिपूजा करायचीच असते, ते काबाची चित्रे, कुराणातल्या सुरा इथपासून ते ९/११ चे ट्विन टॉवर वा ओसामा बिन लादेनचे चित्र इथपर्यंत कशाचीही प्रतिमा समोर ठेवतात. मग स्वतःचीच प्रतिमा नको, असे म्हणणारा मुहम्मद रोज सकाळी आपलाच धर्म भ्रष्ट करतो का? जर तसे नसेल (कारण मुहम्मद आपला धर्म भ्रष्ट करत नाही, हे उघड आहे!), आणि जर इतर सर्व प्रतिमा विविध मिषाने वापरल्या जातच असतील, तर मग आता फक्त मुहम्मदच नको, या म्हणण्याला फारसा अर्थ नाही; विशेषतः प्रतिमांनी भळभळणार्या आजच्या जगात तर नाहीच नाही. असे तार्किक विवेचन मांडण्यासाठीही जर मुहम्मदाची वापरलेली उपरनिर्देशित (रंजक, खोडसाळ) प्रतिमा त्याज्य ठरत असेल, तर मुल्लाचा वरील किस्साही तसाच आहे. कुंदेराचा मूळ मुद्दाही असाच आहे. एकदा सारासार विचार न करता कडक नियम (नियमासाठीच) पाळायचे म्हटले, की 'शिट'ला प्रातिनिधित्व नाही म्हणजे नाही. मग जे निर्माण होते, ते किच्. "Kitsch is the inability to admit that shit exists" - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to मुहम्मदाच्या प्रतिमेची परंपरा by चिंतातुर जंतू
In reply to सहमत !! by वाहीदा
In reply to जोसेफच्या प्रतिमा by चिंतातुर जंतू
In reply to हे ख्रिस्तपिता जोसेफ नाही हो त्यांच्याही फार आधीचे जोसेफ by वाहीदा
In reply to मुहम्मदाच्या प्रतिमेची परंपरा by चिंतातुर जंतू
आजूबाजूचे वास्तव , त्यात अस्तित्त्वात असलेली व्यवस्था, त्यात असलेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि एकंदर प्रशासनाची असलेली जटिल स्थिती या सर्वांचा विचार इथे होतो असे मला वाटत नाही. अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या गुंतागुंतीमधे, सहज भडका उडेल अशा गोष्टींच्या उच्चारा-आविष्काराच्या स्वातंत्र्याचा उपयोग समाजविघातक घटक करू शकतात - नव्हे करताताच. या सार्याचा कुठेही मागमूस या विवेचनात येत नाही.यात एक मूलभूत प्रश्न प्रथम उपस्थित करावा लागेल. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही: व्यापक समाजहितासाठी प्रसंगी जनतेस अप्रिय निर्णय घेण्याची आपल्या सरकारची तयारी असते का? याचे उत्तर आज खेदाने नाही म्हणून द्यावे लागते. एकेकाळी सती वा विधवा विवाह प्रथेवर बंदी घालताना या व्यापक समाज हिताचा विचार असावा, पण शाहबानो (१९८६) वा ताजे राम सेतू प्रकरण अशा प्रसंगी सरकारे बोटचेपी भूमिका घेताना सातत्याने दिसतात. येथे 'आमच्या भावना भडकतात', हे एक प्रभावी शस्त्र झालेले आहे, असे दिसते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रकरणांच्या बाबतीत असेच होताना दिसते. सलमान रश्दी प्रकरण (१९८८) आणि शाहबानो प्रकरण (१९८६) यांमध्ये हे साम्य आहे. या काळात हा बोटचेपेपणा वाढू लागला. 'भावना भडकल्या म्हणून दंगल' ही आता (इतक्या वर्षांच्या बोटचेपेपणापोटी) इतकी चिघळलेली बाब बनली आहे, की कोणती दंगल उत्स्फूर्त आणि कोणती घडवलेली, हेच सांगता येणे कठीण झाले आहे. नुकतीच तेहेलकाने उघड केलेली 'श्रीराम सेने' विषयीची माहिती वा मागच्या वर्षीच्या मिरज दंगलींच्या पूर्वनियोजिततेविषयीची हळूहळू बाहेर आलेली माहिती ही कोणत्याही समंजस माणसास भयावहच वाटावी. या परिस्थितीत कोणत्याही गोष्टीमुळे (निव्वळ अभिव्यक्तीच नाही) दंगल होईल, या भीतीने सरकारने बोटचेपे धोरण स्वीकारणे म्हणजे एक प्रकारच्या दहशतवादास शरण जाणे आहे. परिस्थिती आधीच हाताबाहेर गेलेली आहे, पण केव्हातरी हा बोटचेपेपणा सोडला नाही, तर परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जात राहील. हृदयांच्या एकाधिकारशाहीसंदर्भातली भीती ही अशी व्यापक आहे. यामध्ये आशादायी काहीतरी शोधायचे झाले, तर ते असे: सरकारे जरी भावनांचे लांगूलचालन आणि बुध्दीचा अवमान करीत असली, तरी न्यायालये मात्र या बाबतीत आपले काम बर्यापैकी चोखपणे करीत आहेत. पूर्वीच्या काळातल्या मर्ढेकर वा तेंडुलकर (बाईंडर, गिधाडे) प्रकरणांत असो, वा अधिक ताज्या शेखर कपूर (बँडिट क्वीन - १९९४) वा खुशबू प्रकरणांत असो, न्यायालयांनी दिलेले निर्णय हे राज्यघटनेच्या चौकटीतच राहून, सारासार विचाराअंती, समंजसपणे दिलेले दिसतात. शाहबानो प्रकरणातही न्यायालयाचा निर्णय समंजसच होता. त्यामुळे अखेर असा विचार मांडून थोडे हलके वाटते की, आपली राज्यघटना व न्यायालये गंभीर अभिव्यक्तीच्या (म्हणजे अगदी गांभीर्याने केलेल्या रंजक खोडसाळपणाच्याही!) पाठीशी उभी राहातील, अशी आशा आहे. मात्र त्या त्या प्रकरणात निर्मिकाने (म्हणजे अभिव्यक्तीच्या लेखकाने) या हृदयांच्या एकाधिकारशाहीविरोधात न्यायाची भीक मात्र मागावी लागेल. म्हणजे अगदी माओवादी घटनाविरोध करण्याची गरज नाही, पण घटनात्मक विरोध मात्र हवा. थोडक्यात, सरकारने बोटचेपेपणा केला, तर व्यक्तीवर येणारी लोकशाही जबाबदारी वाढते. या वाढत्या जबाबदार्या स्वीकारण्यास आपणा सर्वांस शुभेच्छा. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to आविष्कार स्वातंत्र्य आणि सामाजिक वास्तव by चिंतातुर जंतू
In reply to आविष्कार स्वातंत्र्य आणि सामाजिक वास्तव by चिंतातुर जंतू
जातीवंत