भारताची लोकशाही किती दिवस तग धरू शकेल ?
In reply to परिस्थिती खरोखर by गोगोल
In reply to >>फार दिवस by नितिन थत्ते
In reply to बर मग.. by गोगोल
In reply to तसे नाही by नितिन थत्ते
In reply to सावधगिरीन by Manoj Katwe
In reply to सावधगिरीन by Manoj Katwe
In reply to जोपर्यंत by ऋषिकेश
In reply to अहो हि by Manoj Katwe
पण हे कोण करणार आणि केव्हा ?तुम्ही आणि आम्ही.. भ्रष्टाचार संपवण्याचा सर्वोत्तम उपाय त्यात सहभागी न होणे. नेते तेव्हाच बदलतील जेव्हा समाज कारण ते समाजातूनच येतात व लोकशाहीत सरकार नेहेमी समाजाच्या लायकी प्रमाणे असते. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
In reply to अहो हि by Manoj Katwe
In reply to अहो हि by विशाल कुलकर्णी
जर भ्रष्टाचार भारतास नष्ट करण्यास समर्थ असता तर आतापर्यंत पाकिस्तान, नायजेरीया, मलेशिया सारखी राष्ट्रे नामशेष व्हायला हवी होती.हा हा हा... बरोबर पकडले! +१.
पण ती नाही झाली कारण त्याच्या भ्रष्टाचारात सामील असणार्यांना ते परवडणारे नाहीये.त्यांचा भ्रष्टाचारात सामील असणार्यांनाच का, बहुतेक कोणालाच ते परवडण्यासारखे असेल असे वाटत नाही. पाकिस्तानच्या बाबतीत, भारत पाकिस्तानच्या भ्रष्टाचारात सामील थोडाच आहे? मला नाही वाटत! पण उद्या समजा पाकिस्तान फुटलेच, तर भारतालाही ते परवडेल असे वाटत नाही. समजा पाकिस्तानचे दहा तुकडे झाले, तर आजच्या एका डोकेदुखीच्या जागी दहा डोकेदुख्या निर्माण होतील, एवढेच. (बांग्लादेशची गोष्ट थोडी वेगळी होती असे वाटते.) - पंडित गागाभट्ट.
In reply to जोपर्यंत by ऋषिकेश
In reply to +१ by पंगा
In reply to प्रत्येक by Manoj Katwe
नक्षलि आणि अतिरेकी तुम्हाला किरकोळ समस्या वाटते हे हास्यास्पद आहे.नक्षलवादी आणि अतिरेकी ही साधारणपणे १९८०नंतरच्या दशकातल्या पंजाबमधील दहशतवादाइतकीच गंभीर समस्या आहे असे वाटते. त्यावेळीही ऊठसूट मिलिटरी घुसवलेली नव्हती. जेव्हा आत्यंतिक गरज भासली तेव्हाच आणि तेवढ्यापुरताच सैन्यदलांचा वापर केला होता. त्याचीही किंमत पुढे मोजावी लागलीच, पण तरीही त्यावेळी दुसरा इलाज राहिला नव्हता म्हणून. आणि तेव्हाही सैन्याचा हातभार मर्यादित उद्दिष्टांपुरताच होता, एरवी बहुतांशी आणि प्रामुख्याने पोलीस दलेच सर्व सांभाळत होती, असे आठवते. मिलिटरी घुसवणे म्हणजे जादूची कांडी फिरवणे नव्हे. त्याने प्रश्न चुटकीसरशी सुटतात असे नाही. जम्मू-कश्मीरमध्ये प्रचंड प्रमाणात भारतीय सैन्य बर्याच वर्षांपासून तैनात आहे, पण म्हणून कश्मीरप्रश्न सुटलेला नाही. मात्र तेथे कदाचित इतक्या प्रमाणात नाही तरी सैन्य तैनात ठेवण्याची इतर कारणे असू शकतील. मला माहीत नाही. शिवाय सैन्याच्या नुकसानाचा आणि सैन्य तैनात ठेवण्याच्या इतर फायद्यातोट्यांचा, जमाखर्चाचाही विचार करावा लागतो असे वाटते. आणि सगळीकडेच सैन्य घुसवले गेले तर सैन्य एकही काम - आणि आपले नेहमीचे, देशाच्या संरक्षणाचे कामसुद्धा - धड करू शकणार नाही हा भाग वेगळाच. शेवटी सैन्यालाही मर्यादा आहेत, आणि कितीही झाले तरी बाहेरच्या शत्रूपासून देशाचे रक्षण करणे हे सैन्याचे मुख्य काम आहे, देशाच्या आतल्या गडबडींचा मुकाबला करणे नव्हे, हा मुद्दा राहतोच. देशाच्या आतल्या गडबडींच्या मुकाबल्यासाठी गरज लागेल तिथे जिथे सैन्याजवळ त्या हाताळण्याचा अनुभव आहे तिथे सैन्याची मदत घेता येते, पण ते सैन्याचे मुख्य काम नव्हे. सैन्याला आपले मुख्य काम करू दिले पाहिजे, इतर गोष्टींत शक्यतो अडकवता कामा नये. बरे, अतिरेकी दहशतवाद्यांच्या मुकाबल्यासाठी सैन्याला तैनात करावे म्हणत आहात, तर नेमके कुठेकुठे अतिरेकी हल्ला करणार आहेत, आणि त्याप्रमाणे नेमके कुठेकुठे लष्कराला तैनात करावे लागेल, याबद्दलही खात्रीलायक आगाऊ माहिती असल्यास कळवावे. संरक्षण मंत्रालयास त्याप्रमाणे तुमचा निरोप कळवता येतो का ते पाहतो. (किंवा खरे तर तुम्हीच का नाही कळवत?) बाकी, जिथेतिथे दिसल्या (लहान किंवा मोठ्या) समस्येपाठी सैन्य घुसवावे अशी मानसिकता जर भारतीय समाजमनात रुजू लागली (आणि अर्थातच अशी मानसिकता असलेली मंडळी घाऊक भावाने जर सैन्यात जाऊ लागली), तर मात्र भारताचा पाकिस्तान व्हायला फार वेळ लागणार नाही अशी भीती वाटते. सुदैवाने तितकी वाईट परिस्थिती असल्याचे जाणवत नाही; अशी मानसिकता अल्पमतातच दिसून येते, आणि दिसते तिथे फक्त तोंडाची वाफ दवडण्याइतपतच दिसून येते. ही परिस्थिती जोपर्यंत आहे, तोपर्यंत भारताच्या लोकशाहीबद्दल चिंता करण्याचे काहीही कारण मला तरी दिसत नाही. - पंडित गागाभट्ट.
भारत प्रगती करीत नसून अधोगती करत आहे.नक्षली, अतिरेकी, जातीयवाद यांपेक्षाही लोकशाहीचे व एकंदरीतच समाजाचे खरे महाभयानक शत्रू म्हणजे अज्ञान, निरक्षरपणा, रोगराई, दुष्काळ, गरीबी, भुकेकंगाली हे आहेत. या सर्व आघाड्यांवर भारताने (किंबहुना सर्वच जगाने) गेल्या पस्तीस वर्षांत नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. अधोगतीचे तुमचे निकष काय आहेत हे मला काही कळलं नाही. असो, तुम्ही खूप सीरियस दिसता. तेव्हा तुमचे काही ठाम निकष असतील देखील...
राजकारणी लोक फक्त मलिदा लाट लाट लाटतील आणि हा देश वार्यावर सोडून निघून जातील एक दिवस.अहो ते ब्रिटिशांनी केलं... तेव्हापासून मलिदा वाढला, हे कसं? आज परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट आहे असं तुमच्या लेखनावरून वाटतं. कुठच्या काळी आजच्यापेक्षा चांगली परिस्थिती होती हे सांगता येईल का?
In reply to हम्म्म्म... by राजेश घासकडवी
In reply to हम्म्म्म... by राजेश घासकडवी
In reply to हम्म्म्म... by राजेश घासकडवी
In reply to मनोजराव by हेरंब
In reply to डेरिव्हेटिव्ह by राजेश घासकडवी
In reply to शास्त्र, maths by Manoj Katwe
In reply to शास्त्र, maths by Manoj Katwe
In reply to केवळ व्यक्तिगत by राजेश घासकडवी
In reply to केवळ व्यक्तिगत by राजेश घासकडवी
In reply to अधोगती व by Manoj Katwe
अधोगती व प्रगती याचं मूल्यमापन साधनांशी का करता. जरा मानसिक स्थैर्य, नागरिक सुरक्षा ह्यावरून करून बघा कि.माझ्या मूळ प्रतिसादात मी कुठेच 'साधनांचा' उल्ले़ख केलेला नव्हता. अज्ञान, दारिद्र्य व रोगराई हे राष्ट्रीय सुरक्षा किंवा नक्षलवाद यांपेक्षा गंभीर प्रश्न आहेत असं म्हटलं होतं. ते तुम्हाला पटत नाही असं दिसतंय. राह्यलं.
In reply to अधोगती व by Manoj Katwe
In reply to डेरिव्हेटिव्ह by राजेश घासकडवी
In reply to असे विषय by Dipankar
In reply to साला तगेल by परिकथेतील राजकुमार
In reply to हे आहे हे by अरुण मनोहर
In reply to अश्लिल ... by टारझन
In reply to साला तगेल by परिकथेतील राजकुमार
In reply to साला तगेल by परिकथेतील राजकुमार
In reply to खरतर बातमी अपुर्ण आहे असे दिसते. by वेताळ
In reply to भारतात by शिल्पा ब
In reply to बालिश by बाळकराम
In reply to हा बालिश by Manoj Katwe
In reply to इतर प्रश्नांची उत्तरे by बेसनलाडू
In reply to हा धागा मी by Manoj Katwe
In reply to साफ चूक! by बेसनलाडू
In reply to चर्चा by Manoj Katwe
In reply to चर्चा by Manoj Katwe
माझे मुद्दे खोडून काढण्यापेक्षा एकतरी प्रश्नांबाबत काहीतरी समाधान सुचवा.जिथे उत्तरे मिळाली आहेत तिथे दुर्लक्ष करायचे आणि नुसते इथून तिथे चर्चा हलवत रहायची.. जरी साहित्यसंमेलन नसले तरी चर्चा सुसंबद्ध रितीने झाली नाहि तर होतो तो गोंधळ काहि निष्कर्ष निघणारी चर्चा नव्हे. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
In reply to हा बालिश by Manoj Katwe
In reply to प्रगती वा by मराठे
१९४६