".....हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा".....
आपल्यातील काही परंपरांचे काळाच्या ओघात अर्थ आणि औचित्य या दोन्ही अंगांनी नव्याने परिशीलन होणे गरजचे आहे. विशेषत: आताच्या माहितीच्या प्रचंड विस्फोटापुढे असे प्रश्न वा विचार एकमेकासमोर विचारार्थ ठेवणे काहीच वावगे नसून किंबहुना या आदान प्रदानामुळे का होईना विविध विचारांचे लोक एकत्र येऊन यातून सुवर्णमध्य काढू शकल्यास अंतिमत: समाजाच्या स्वास्थ्यासाठी तो एक स्वागतार्ह बदल होईल अशी माझ्याप्रमाणे कित्येकांची भावना आहे. त्या अनुषंगाने दोनेक दिवसापूर्वी इथे दिलेल्या "पिंड विधी आणि कावळा" या धाग्याला जो प्रतिसाद मिळाला तो पाहून हे तर निश्चितच झाले कि सदस्यांचा कल हा बराचसा वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून नव्याने अशा परंपरकडे पाहिले पाहिजे असाच आहे.
अर्थात काहींचे म्हणणे असेही दिसले की, "हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा." या मतावर खरे तर त्या ठिकाणी माझे उत्तर दिले गेले पाहिजे, पण ज्यावेळी उत्तर लिहायला मी संगणकासमोर बसलो, त्यावेळी असे जाणवले की याच विषयावर एक नवा धागा होऊ शकतो, ज्याचे वाचन सर्वजण करतील आणि नव्याने हा विषय पुढे चालू राहील.
मुळात "रानटी आणि सुसंस्कृत" या दोन संकल्पना या मानवाने स्व:ताच्या सोयीने करून घेतलेली मोरपिसे आहेत. आपण आता ज्या ऐहिक सुखात, सुविधात, सुव्यवस्थेत आहोत त्याच्या तुलनेने या पृथ्वीवरील मूळ पुरुष नसल्याने आपण ते राहणीमान "रानटी" म्हणतो. सुसंस्कृत माणूस ज्यावेळी जनावरासारखे वागतो (विशेषत: कौटुंबिक पातळीवर...) त्यावेळी त्याचा अवतार हा कोणत्या युगातील हा प्रश्न आजुबाजुन्च्यावर नक्कीच पडतो. आता न चुकता सत्यनारायणाची पूजा घालून साधू वाण्याला होडीत बसवून दुनियेत फिरवायचे आणि पुण्य मिळवायचे ही रूढी सांभाळायची आणि दुस-या दिवशीच कार्यालयात जाऊन टेबलखालून हातमिळवणी करून नको असलेले व्यवहार कलमात बसवायचे, व वरिष्ठांच्या सह्या झाल्यावर तोच कालचाच शिरा प्रसाद म्हणून समोरच्याला द्यायचा (ही घटना मी प्रत्यक्ष बघितली आहे, आणि त्या सो-कॉल्ड साहेबाकडून त्याच्या सत्यनारायणाचा तो शिळा प्रसाद त्या व्यापा-याने खाल्लादेखील....). रानटी अवस्थेत असे प्रकार होते कि नाही याचे संशोधन मानववंशशास्त्रीय अभ्यासक करू शकतील, मात्र सुसंस्कृतपणाने माणसाला माणुसकी विसरायला लावली हे कटू वाटले तरी सत्य आहे हे नाकारता येणार नाही. बंगला, कार, सीसी, पाल्यांचे इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेश, एनआरआय दर्जा मिळविण्यासाठी चाललेली धडपड ! या आणि कितीतरी तत्सम बाबी हल्ली सुसंस्कृतच्या व्याख्येत बसविण्याचा यत्न चालू असतो. अशावेळी त्रयस्थ नजरेने पाहिले असता प्रगत आणि सुसंस्कृत ही विशेषणे लाऊन घेताना आपल्या परंपरा, रूढी, श्रद्धा यांचा विसर पडतो तिकडेही लक्ष दिले जाते का?
"विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहे" हे मत आपल्या एका सदस्य भगिनीचे असल्याने मी इथे त्यांना विचारू इच्छितो की "स्त्री" वर याच परंपरा/रूढी/श्रद्धा यांनी खरोखरी जोखड नावाची जी काही कठोर बंधने घातली होती तिचा स्वीकार आजच्या युगात आपणास मान्य होईल का? त्याही सुसंस्कृत आणि सांकेतिक अर्थाच्याच होत्या ना? एक काळ असा होता की आम्ही (आमचे पूर्वज म्हणा हवे तर....) "मनुस्मृती" ला डोक्यावर घेऊन नाचत होतो व त्याचप्रमाणे समाज रचना करून घेतली व त्याची अत्यंत कठोर पद्धतीने (रानटी म्हणा हवे तर...) अंमलबजावणीही करीत होतो. २० व्या शतकातही मनुस्मृतीची व्यवस्था या देशात पुन्हा यावी, म्हणून एक जबरदस्त मोहीम चालू होती, ती अशावेळी की महिलांनी देशाच्या आणि एकूणच समाजाच्या वृद्धीसाठी आपले बहुमोल असे योगदान देणे चालू केले होते. आणि एका विशिष्ट भूमिकेचा आग्रह धरणा-या गटाला "स्त्री" ही आता डोईजड होईल अशी भीती वाटू लागली होती (आजही... आत्ता, संसदेत महिला आरक्षणावरून जे वादळ चालू आहे त्याची जातकुळी हीच आहे.)
मनुस्मृतीत भृगु आचारधर्म सांगतो तो असा की, "विवाहविधी हाच स्त्रियांचा उपनयानाख्या संस्कार मन्वादिकानी मानलेला आहे. केवळ पतीची सेवा हेच त्यांचे गुरुकुल व गृहकृत्ये हाच एकमेव जन्म उद्देश होय ." यावरून या सुसंस्कृत माणसाने स्त्रीला किती गौण स्थान दिले आहे याची जाणीव होते. आता या मुद्द्यावर मी जर मनुस्मृतीचा हा आचार धर्म मानु नका असे सांगितले तर "हे जोखड नसून यात सांकेतिक अर्थ आहे" असे म्हणता येईल का? काळाच्या कसोटीवर आपण स्त्रीचे समाजातील प्रमुख स्थान तसेच बरोबरीचे मान्य करू नये का?
मनुस्मृतीच्या तिस-या अध्यायात "ब्राह्मण स्त्रीने स्वजातीतच विवाह करावा" असे म्हटले आहे. इतरत्र केल्यास ते हिणकस असल्याचे सूचित केले आहे. म्हणजे इ. स. २०१० मध्ये एखाद्या ब्राह्मण मुलीने असा एखादा प्रेमविवाह केल्यास तिने सुसंस्कृत परंपरेचा संकेत मोडला असे मानने ठीक होईल काय? सातव्या अध्यायात तर असे म्हटले आहे की राजाने ब्राह्मणांना दान द्यावे व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे "कर" आकारू नयेत. आता चालू युगात ही परंपरा कितपत योग्य मानावी? अध्ययन आणि अध्यापन तर ब्राह्मण जातीनेच करावे, क्षत्रिय व वैश्य यांनी करू नये, तर शूद्रांचा या बाबतीत उल्लेख देखील केलेला नाही. ही कोणत्या प्रकारची परंपरा? हे एक प्रकारचे काही वर्गांवर असह्य असे जोखड नव्हे का?
स्त्रीच्या बाबतीत तर अशा प्रकारच्या आज्ञा आहेत की त्या वाचल्यानंतर, त्या मांडणीचा विचार केल्यावर, 'त्या काळात ते ठीक होते' अशा प्रकारचे समर्थन आजची एक ब्राह्मण स्त्री देखील करण्यास धजावणार नाही. १. वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळून विद्येची उपासना करावी, हे एकवेळ ठीक मानू या, पण हा अधिकार सर्व जातीच्या स्त्रियांना नाकारलेला होता. २. मुलीचे लग्न वयाच्या ८ व्या (आठव्या) वर्षी झाले पाहिजे (म्हणजे तिचा "पाय" घसरणार नाही....); तर वराचे वय त्यावेळी १८ असायला हरकत नाही. २४ वर्षाच्या युवकाला १२ वर्षाची मुलगी करावी. ३. पुत्राला पुत्र झाल्यानंतर आजोबा आजीनी वानप्रस्थास निघून जावे. ४. सगळ्यात अविश्वसनीय आणि भयावह तरतूद अशी आहे की, नवरा वेडा , व्यसनी, वा नपुंसक असला तरी स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता. पती मेल्यानंतर दुसरा विवाह करण्याला तिला मुभा नव्हती.
सतीच्या चालीबाबत लिहायचे म्हणजे आणखीन एक नवा धागा करावा लागेल.
आता सध्याच्या या युगात जर कुणी म्हटले की "मनुस्मृती" प्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे, तर आजची युवती पेटून उठेल की नाही? ज्या काळात या परंपरा मागे पडल्या त्यावेळी देखील याच्या योग्यते बाबत बराचसा उहापोह झाला असणारच, विरोधही स्वाभाविकपणे ! तरीही काळाच्या ओघात यातील जोखड स्त्रीने टाकून दिलेच ना? मग ते कोणत्याही समाज सुधारकच्या प्रयत्नाने असो, वा सरकार दरबारी योग्य ते मांडणे झाल्यानंतर अंमलात आले असेल, तो मुद्दा महत्वाचा नाही. महत्वाचे आहे ते हे की, विज्ञान युगाच्या कसोटीवर परंपरेच्या पुस्तिकेतील त्याज्य वाटणारी प्रकरणे समाज धुरंधारणी लोकांनी योग्य त्या कारणासाठी टाकून फेकून दिली आणि त्यामुळेच या देशातील "स्त्री" ही ख-या अर्थाने मोकळा श्वास घेण्यास समर्थ झाली आहे. त्याच अनुषंगाने धर्मातील ज्या अतार्किक तसेच फोलपणा सिद्ध झालेल्या बाबींना "राम राम" म्हणणे म्हणजे परंपरेचा -हास केला असे मानने चुकीचे होईल.
कृपया मत प्रदर्शन करावे.... धन्यवाद !!
वाचने
42373
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यामुळेच
+१
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
सहमत
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
आमच्या
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
स्वगतः
In reply to आमच्या by विंजिनेर
सहमत
In reply to आमच्या by विंजिनेर
सहमत आहे.
In reply to सहमत by सन्जोप राव
वेळ....!
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
मोकळा श्वास .... !
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
अभिनंदन
In reply to मोकळा श्वास .... ! by इन्द्र्राज पवार
सहमत आहे.
In reply to अभिनंदन by सन्जोप राव
बदलती परिस्थिती
वेळ...!!
In reply to बदलती परिस्थिती by अक्षय पुर्णपात्रे
पेला अर्धा भरला आहे का अर्धा रिकामा?
मुळात
वेळ...!!
In reply to मुळात by राजेश घासकडवी
असहमत
In reply to मुळात by राजेश घासकडवी
पवारसाहेब
वेळ....
In reply to पवारसाहेब by शुचि
हाऊ रोमँटिक
In reply to वेळ.... by इन्द्र्राज पवार
आणखिन काही म्हणु शकतो ....
In reply to हाऊ रोमँटिक by टारझन
सातव्या
किती शंख करणार?
मनुस्मृती
In reply to किती शंख करणार? by हुप्प्या
खरे
In reply to मनुस्मृती by जयंत कुलकर्णी
असो. खरे
In reply to मनुस्मृती by जयंत कुलकर्णी
+१
In reply to असो. खरे by नीधप
सुंदर
In reply to मनुस्मृती by जयंत कुलकर्णी
कारण आपल्या इतिहासात माणसे नाहीत, देव वावरतात.
In reply to मनुस्मृती by जयंत कुलकर्णी
वेळ...!!
In reply to किती शंख करणार? by हुप्प्या
सारख सारख कोल्हापुरला विजेचा लपंडाव चालु आहे
In reply to वेळ...!! by इन्द्र्राज पवार
सॉरी.... दोन
In reply to किती शंख करणार? by हुप्प्या
हुप्प्या
हे घ्या
सर्वांसाठी एक उत्तर....!!
उत्तम उत्तर
In reply to सर्वांसाठी एक उत्तर....!! by इन्द्र्राज पवार
उत्तर
हॅहॅहॅहॅ............
मला वाटते
In reply to हॅहॅहॅहॅ............ by वेताळ
स्त्रीला स्वतः इतका मान द्या
सुंदर ओळी
In reply to स्त्रीला स्वतः इतका मान द्या by शेखर जोग
मनातून गेलेली नाही
असहमत
In reply to मनातून गेलेली नाही by नितिन थत्ते
झोडणे
In reply to असहमत by हुप्प्या
मनु- क्षत्रिय होता!
In reply to झोडणे by नितिन थत्ते
"पॉझिटीव्ह" गोष्टी ... !
In reply to मनु- क्षत्रिय होता! by मृगनयनी
मनू
In reply to मनु- क्षत्रिय होता! by मृगनयनी
नितिन
In reply to मनू by नितिन थत्ते
उदा. रोज
In reply to नितिन by मृगनयनी
"सध्या आपण
In reply to नितिन by मृगनयनी
शैलेन्द्र,
In reply to "सध्या आपण by शैलेन्द्र
"शैलेन्द्र,
In reply to शैलेन्द्र, by मृगनयनी
कुचकामी लोकांमुळेच......
In reply to "शैलेन्द्र, by शैलेन्द्र
माझा अनुभव
In reply to शैलेन्द्र, by मृगनयनी
नेहमीचेच दावे
In reply to नितिन by मृगनयनी
माझा प्रतिसाद फक्त नितिन थत्तेंसाठी नाही
In reply to नेहमीचेच दावे by नितिन थत्ते
अंतिम उद्देश
In reply to माझा प्रतिसाद फक्त नितिन थत्तेंसाठी नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
असेल. पण
In reply to नेहमीचेच दावे by नितिन थत्ते
?
In reply to असेल. पण by मृगनयनी
नितीन
In reply to ? by नितिन थत्ते
पुष्पक विमान थेअरी
In reply to असेल. पण by मृगनयनी
"परन्तु,
In reply to नितिन by मृगनयनी
>>हे सगळे
In reply to "परन्तु, by शैलेन्द्र
तुमच्या
In reply to >>हे सगळे by II विकास II
"किमान
In reply to तुमच्या by मृगनयनी
किमान
In reply to तुमच्या by मृगनयनी
अन्यथा
In reply to तुमच्या by मृगनयनी
सूर्याजी
In reply to अन्यथा by VarKari
विमान!
In reply to नितिन by मृगनयनी
ही लिंक पाहा...
लीन्क...!
In reply to ही लिंक पाहा... by स्वाती राजेश
गैरसमज नको....!!
यावर काय
In reply to गैरसमज नको....!! by इन्द्र्राज पवार
हे नेहमी असच असतं !!
माणसाचि नियत....!
In reply to हे नेहमी असच असतं !! by अर्धवटराव
उदा. रोज