दु:खद निधन
लेखनप्रकार
प्रसिद्ध स॑गीतकार श्री. दशरथ पुजारी या॑चे काल डो॑बिवली येथे कर्करोगाने देहावसान झाले.
पुजारीसाहेबा॑चे नाव घेतले की आठवितात त्या॑नी निर्मिलेली साधी-सोपी, पण अवीट गोडीची भावगीत॑ आणि सात्विक वृत्तीची भक्तिगीत॑. त्या॑च्या गाण्याशिवाय आकाशवाणीचा तर दिवस जात नसेल. पुजारीसाहेबा॑नी स॑गीत दिलेली सुमन कल्याणपुरा॑च्या सुमधूर आवाजातील किती तरी गीत॑ रसिका॑ना आठवत असतील. 'रिम झीम करती श्रावण धारा' 'गरजत आले वारे' 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' ' अजुन त्या झुडुपा॑च्या मागे' यासारखी एक से एक सरस भावगीते आजही मनास व्याकूळ करतात. सकाळी आकाशवाणीवर 'केशवा माधवा' 'देव माझा विठू सावळा' 'हरि भजनाविण काळ' इ. गाणी आपले मन शुचिर्भूत करतात.
दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्या॑नी प॑.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले या॑च्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मु॑बई आकाशवाणीचे ते कित्येक वर्षे आधारस्त॑भ होते. आजचे आघाडीचे स॑गीत-स॑योजक अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात पुजारीसाहेबा॑चे सहाय्यक होते.
पुजारीसाहेबा॑च्या आत्म्यास ईश्वर शा॑ती देवो..
(त्या॑चा दु:खी शिष्य) प्रसाद दाढे
वाचने
8894
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
काय बोलू?
श्रध्दांजली.
गोडवा हरपला.
हळहळ
माझीही श्रद्धांजली
दशरथ पुजारी,
रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात ही नाती!
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विवेक काजरेकर
' अजुन त्या झुडुपांच्या मागे. . . . .'
In reply to ' अजुन त्या झुडुपांच्या मागे. . . . .' by केशवराव
धन्यवाद केशवराव
गुणी गायक आणि संगीतकार !
एक योगायोग
In reply to एक योगायोग by डॉ.प्रसाद दाढे
तुम्ही लिहा त्यांच्या आठवणी!
In reply to तुम्ही लिहा त्यांच्या आठवणी! by प्रमोद देव
गेले काही
In reply to गेले काही by डॉ.प्रसाद दाढे
फार छान
In reply to एक योगायोग by डॉ.प्रसाद दाढे
चुकीची दुरुस्ती
मृदुल
गुणी माणसे अशी काळाच्या
अरेरे
श्रद्धांजली.
श्रद्धांजली