मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दु:खद निधन

डॉ.प्रसाद दाढे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रसिद्ध स॑गीतकार श्री. दशरथ पुजारी या॑चे काल डो॑बिवली येथे कर्करोगाने देहावसान झाले. पुजारीसाहेबा॑चे नाव घेतले की आठवितात त्या॑नी निर्मिलेली साधी-सोपी, पण अवीट गोडीची भावगीत॑ आणि सात्विक वृत्तीची भक्तिगीत॑. त्या॑च्या गाण्याशिवाय आकाशवाणीचा तर दिवस जात नसेल. पुजारीसाहेबा॑नी स॑गीत दिलेली सुमन कल्याणपुरा॑च्या सुमधूर आवाजातील किती तरी गीत॑ रसिका॑ना आठवत असतील. 'रिम झीम करती श्रावण धारा' 'गरजत आले वारे' 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' ' अजुन त्या झुडुपा॑च्या मागे' यासारखी एक से एक सरस भावगीते आजही मनास व्याकूळ करतात. सकाळी आकाशवाणीवर 'केशवा माधवा' 'देव माझा विठू सावळा' 'हरि भजनाविण काळ' इ. गाणी आपले मन शुचिर्भूत करतात. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्या॑नी प॑.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले या॑च्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मु॑बई आकाशवाणीचे ते कित्येक वर्षे आधारस्त॑भ होते. आजचे आघाडीचे स॑गीत-स॑योजक अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात पुजारीसाहेबा॑चे सहाय्यक होते. पुजारीसाहेबा॑च्या आत्म्यास ईश्वर शा॑ती देवो.. (त्या॑चा दु:खी शिष्य) प्रसाद दाढे

वाचन 8894 प्रतिक्रिया 0