मित्रहो,
बर्याच दिवसांनी लिहितोय. जरा बिझी होतो.
पण आधी सातत्याने लिहूनही आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळूनही, `सध्या कुठे उलथलायंस बाबा?' असं विचारणारा एकही `माई का लाल' इथे भेटला नाही, याचं आश्चर्य वाटतंय.
असो.
सध्या हे वाचा.
-----------------------
तसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्न आणि वाक्ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल. बघा बरं आठवून...!
1. हा...कोन बोल्तय?
- अरे गाढवा! फोन तू केलायंस ना? मग तू आधी सांग, तू "कोन' बोल्तोय्स ते! मग माझं बघू.
---
2. कुठे आहेस?
- मसणात! तुला काय करायचंय? तुझं काम काय आहे, ते बोल ना!
---
3. काय म्हणतोस?
- वयाच्या साधारणपणे वर्षापासून, म्हणजे बोलता यायला लागल्यापासून मी बरंच कायकाय म्हणतोय. त्यापैकी काय काय सांगू?
---
4. काय, हल्ली भेट नाही, बोलणं नाही!
- तुझा मुडदा बशिवला! मसण्या, भेटायला वेळ आहे का तुला? कामाशिवाय तोंड उचकटतं का तुझं? समोर दिसलो, म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं?
---
5. काय विशेष?
- डोंबल! आमच्यासारख्या यःकश्चित मध्यमवर्गीय जंतूंच्या आयुष्यात काय असणार आहे विशेष? अवशेष आहेत फक्त!
---
6. बाकी काय?
- शून्य. भाज्य आणि भाजक यांचा भागाकार पूर्ण होतोय. बाकी काहीच उरत नाही.
---
7. या की एकदा घरी!
- हो, येतो हां "एकदा' घरी! अरे कंजूषनारायणा, "कधीपण या' म्हण की! "एकदा' या म्हणजे काय? तुझ्या समोरच तर राहतो मी! घरात जोरात शिंकलास, तरी आम्हाला अभिषेक होतो. मग कधीही आलो, तर तुझी इस्टेट कमी होणारेय काय?
---
8. ठेवू का मग?
- प्लीज! अजून किती वेळ पिडशील?
----
हे पुढे ढकललेल्या इपत्रातील लेखन वाटते आहे! या संदर्भात काय तो खुलासा केल्यास बरे होईल. जर हे पुढे ढकललेल्या इपत्रातील लेखन असेल तर मिपाच्या धोरणानुसार व या निवेदनानुसार सदर लेखन हे येथून कधीही काढून टाकले जाऊ शकते याची संबंधितांनी नोंद घ्यावी!
--जनरल डायर.
वाचने
9331
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही ही ही
हाहाहा...
कुणी 'बाकी
मला एकदा
:)
:) +१
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
छान
शिरिष कणेकरांच्या
मस्त !
माझ्या
उत्तर..
In reply to माझ्या by विजुभाऊ
अग्ग्ग्ग्
In reply to उत्तर.. by प्रभाकर पेठकर
काका,
आता कसलं
In reply to काका, by स्वाती राजेश
चक्कर आली...
In reply to आता कसलं by धमाल मुलगा
कमाल आहे राव !!!
In reply to आता कसलं by धमाल मुलगा
काय सांगतोस?
In reply to कमाल आहे राव !!! by छोटा डॉन
हद्द आहे ...
In reply to काय सांगतोस? by धमाल मुलगा