मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(बस्स नकोस आता...)

३_१४ विक्षिप्त अदिती · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हा दिसला मुक्त हाफव्हॉली आणि लगेच मला "साहित्य सेवा" करण्याचा उमाळा आला. तुझ्यामागे धावणं पुरे आजपासून कारण तू येत नाही समोरासमोर मुळी यदाकदाचित धर्मकर्मसंयोगाने आलास तरी माझी गरज नाही तुला मग माझी धावपळ कशासाठी? मला इतकं पळवून, डिवचून दमवून, दमवून मिळालास तर कसा मिळालास? किती आणि कसं सांगू कालपर्यंत हवा होतास जितका नकोस आता बस्स!!! झुरळामागे धावणं थांबलं आजपासून (बेगॉन वापरा, झुरळं मारा)

वाचने 4784 वाचनखूण प्रतिक्रिया 16

रेवती Wed, 03/31/2010 - 18:49
शेवटी कुणामागं एवढं धावलीस ते वाचून फिस्सकन् हसू आलं. रेवती

मुक्तसुनीत Wed, 03/31/2010 - 19:14
तुझ्यामागे धावणं पुरे आजपासून कारण तू येत नाही डेव्हलपमेंट मधे मुळी यदाकदाचित धर्मकर्मसंयोगाने आलास तरी माझी गरज नाही तुला मग माझी धावपळ कशासाठी? मला इतकं पळवून, डिवचून दमवून, दमवून मिळालास तर कसा मिळालास? (प्रॉडक्शन मधे ! :-( ) किती आणि कसं सांगू कालपर्यंत मिळायला हवा होतास जितका नकोस आता बस्स!!! बग फिक्स करणं थांबवलं आजपासून (युनिट टेस्ट्स लिहा, बग्ज फिक्स करा )

In reply to by चतुरंग

शुचि Wed, 03/31/2010 - 21:50
मुसुं ची कविता खूपच आवडली. (+१ बग फायंडर) शुचि ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

In reply to by मुक्तसुनीत

वाहीदा गुरुवार, 04/01/2010 - 15:24
युएटी मध्ये दिसतच नाही कधी हे बग्ज मुसुशेठ एकदम सिक्सर, the Bug Fixer :-) कविता एकदम झकास ~ वाहीदा

तिमा Wed, 03/31/2010 - 19:24
एक झुरळ एकदा तुपाच्या डब्याजवळ गेलं इश्य, 'डालडा' म्हणून परत आलं|| हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चतुरंग Wed, 03/31/2010 - 21:45
एकदम 'झुरळाया दाही दिशा' असं झालेलं दिसतंय! ;) फुल्टू इडंबन! :D (टर्मिनेटर)चतुरंग

शानबा५१२ गुरुवार, 04/01/2010 - 17:01
विडंबन की काय ते करण्याचा उद्देश काय असतो एखाद्याचा? की उगीचच लाडात आलाय काय सर्वजण? प्रॅक्टीकल सोचो ना भाय.........तकलिफ होती है क्या? *******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****