समर्थ
संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते
आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)
कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते
तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?
स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते
वाचने
5699
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सहज सुंदर
अगदी प्रवाही गझल
आज कोणत्या
क्लासच!
छानच......
सुंदर
कल्पनेस
अफाट!!! स्वत
सुंदर !!
आवडली!!!
समर्थ कविता!
मस्त!
व्वा !!
काय त्या दयाघनास व्यर्थ माग
In reply to काय त्या दयाघनास व्यर्थ माग by sur_nair
मागायचे कुणाकडे?
In reply to मागायचे कुणाकडे? by प्रमोद देव
कळलं.
छानच
छानच
छानच