मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समर्थ

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
संहिता जुनी नवीन अर्थ मागते अन्यथा विसर्जनास गर्त मागते आज कोणत्या अटीत गुंतणार मी? (भेट नेहमीच ती सशर्त मागते!) कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी, ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते तोच घेउनी फिरे रिता कमंडलू, काय त्या दयाघनास व्यर्थ मागते? स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो, भूमि ही असा नवा समर्थ मागते

वाचने 5697 वाचनखूण प्रतिक्रिया 19

राजेश घासकडवी Wed, 03/17/2010 - 12:35
काव्य झालेलं आहे. नादमय आणि अर्थवाही. तुमच्या संहितेला तक्रार करायला जागा नाही. काव्य हे समर्थ अर्थ गर्भ जाहले संहितेस डोहळे मुळी न राहिले राजेश

शानबा५१२ Wed, 03/17/2010 - 13:04
आज कोणत्या अटीत गुंतणार मी? (भेट नेहमीच ती सशर्त मागते!) --ती कोण? संहीता? पण संहीता म्हणजे काय? आमच अज्ञान मोठ्या मनाने दुर करा. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

प्रभो Wed, 03/17/2010 - 20:46
सुंदर --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

मदनबाण Wed, 03/17/2010 - 20:48
कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी, ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते वा,अती सुंदर... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

प्राजु Wed, 03/17/2010 - 21:10
अफाट!!! स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो, भूमि ही असा नवा समर्थ मागते खासच!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by sur_nair

प्रमोद देव गुरुवार, 03/25/2010 - 07:55
ज्याच्याकडे देण्यासारखे काही असेल...त्याच्याकडे...इथे तो स्वत:च रिता कमंडलू घेऊन दारोदार भटकतोय... आता आलं लक्षात? क्रान्ति,नेहमीप्रमाणेच अतिशय सकस अशी रचना झालेय...अभिनंदन.

In reply to by प्रमोद देव

sur_nair गुरुवार, 03/25/2010 - 21:09
कळलं. पण बाकीची सर्व कडवी 'third person ' मध्ये लिहिली आहेत आणि ह्या कडव्यात मात्र 'first person ' मध्ये प्रश्न आहे म्हणून थोडा गोंधळलो.

धनंजय गुरुवार, 03/25/2010 - 21:50
समर्थ! ("अर्थ मागते" चे यमक दोनदा घेतल्यामुळे थोडेसे बोचते. फार नाही.)

sidhivinayak Sat, 03/27/2010 - 13:40
खुपच सुन्दर !! नविन समर्थ खरेच हवेत !! शेकदार