शिवी देतो भगवंत!
Taxonomy upgrade extras
अर्जुनाने द्रौपदीला
स्वयंवरात जिंकिले
मात्र भावांनी फुकट
पत्नीसुख संभोगले
वस्त्रहरणप्रसंगी
षंढ पाचही दादुले
आणि भीष्म द्रोण थोर
पोरासारखे वागले
उच्च तात्विक कारणे
देती महा प्रज्ञावंत
पतिव्रतेच्या अब्रूला
कवडीमोलाची किंमत
बंधुप्रेमाच्या शेल्याने
शील रक्षिले अभंग
एक पान थाळीतले
भक्षी भुकेला श्रीरंग
कृष्णे कृष्णा ओवाळिले
भाऊबीज ती अपूर्व
वनवासातही लाभे
महाराणीचे वैभव
पण एक शल्य होते
भाऊरायाच्या अंतरी
कुरुक्षेत्री झळाळली
क्रोधवह्नीने वैखरी
क्लीब म्हणता अर्जुना
नाही जीभ कचरली
शहाण्याला शब्दाचीच
एक ठिणगी पुरली
अर्जुनालाच कळला
अर्थ शब्दांचा ज्वलंत
तारे तोडती विद्वान
शिवी देतो भगवंत!
--अशोक गोडबोले, पनवेल.
वाचने
17120
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
वा!!
आवडली
In reply to आवडली by गुंडोपंत
क्लीब
In reply to क्लीब by प्रियाली
बरोबर
छान पण
बृहन्नडा
In reply to बृहन्नडा by सहज
अर्जुनाला शाप होता
दरोगा
In reply to दरोगा by प्रकाश घाटपांडे
दरोगा बाबू
In reply to दरोगा by प्रकाश घाटपांडे
खोजे
In reply to खोजे by प्रियाली
अधिक माहिती
In reply to दरोगा by प्रकाश घाटपांडे
फॉरबीडन सिटी
खरं आहे! :)
आभार.