मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवी देतो भगवंत!

अशोक गोडबोले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अर्जुनाने द्रौपदीला स्वयंवरात जिंकिले मात्र भावांनी फुकट पत्नीसुख संभोगले वस्त्रहरणप्रसंगी षंढ पाचही दादुले आणि भीष्म द्रोण थोर पोरासारखे वागले उच्च तात्विक कारणे देती महा प्रज्ञावंत पतिव्रतेच्या अब्रूला कवडीमोलाची किंमत बंधुप्रेमाच्या शेल्याने शील रक्षिले अभंग एक पान थाळीतले भक्षी भुकेला श्रीरंग कृष्णे कृष्णा ओवाळिले भाऊबीज ती अपूर्व वनवासातही लाभे महाराणीचे वैभव पण एक शल्य होते भाऊरायाच्या अंतरी कुरुक्षेत्री झळाळली क्रोधवह्नीने वैखरी क्लीब म्हणता अर्जुना नाही जीभ कचरली शहाण्याला शब्दाचीच एक ठिणगी पुरली अर्जुनालाच कळला अर्थ शब्दांचा ज्वलंत तारे तोडती विद्वान शिवी देतो भगवंत! --अशोक गोडबोले, पनवेल.

वाचन 17120 प्रतिक्रिया 0