उन्हाळा आला की आमची दरवर्षीप्रमाणे 'उन्हाळ्याची बेगमी' सुरु होते.
म्हणजे सर्व जाडजूड पांघरुणे, दुलया ह्यांना माळा दाखवायचा आणि त्या जागी डोळ्यांना शांत करणार्या रंगांच्या स्वच्छ सुती, तलम चादरी, पडदे वगैरे लावायचे.
कूलरची साफसफाई करून ठेवायची! ठुमकत ठुमकत कुंभारवाड्यातून चांगल्यापैकी माठ आणायचा आणि त्याला दोन तीन दिवस आधी पाण्यात, मग उन्हात असे आलटून पालटून ठेवायचे.... त्याला तिपाईवर ठेवून त्यात पाणी भरायचे, वाळ्याची जुडी घालायची, ओले फडके बाहेरून गुंडाळायचे आणि थंडगार पाण्याच्या चवदार आस्वादाला सज्ज व्हायचे!
तशी निसर्गाने उन्हाळा आलाय ह्याची वर्दी आधीच दिलेली असते. बाजारात रसरशीत कलिंगडे येऊ लागली असतात. त्यांचा तो जर्द हिरवा आणि गुलाबी लाल रंग पाहूनच डोळे निवतात. कधी एकदा त्या कलिंगडाचा आस्वाद घेतो असे होऊन जाते!
घरी कोकम, रुह अफ्जा, खस, गुलाब वगैरेची पारंपारिक सरबते पाहुण्यांसाठी सज्ज असतातच! शिवाय कैरीच्या पन्ह्याची तर काय महती वर्णावी!! पण, कधीही, कोठेही सहज उपलब्ध होणारा व तप्त जीवाची तृषा भागविणारा पर्याय म्हणजे लिंबूपाणी! रस्त्यांवर असे लिंबूपाणी, लिंबू सरबत विकणारे दिसले की त्यांच्यासमोरही ग्राहकांची भरपूर गर्दी असते! सर्वात मस्त म्हणजे घरीच केलेले लिंबाचे सरबत.... त्यात जर जलजिरा, पुदिन्याचे एखादे हिरवेगार पान आणि भरपूर बर्फ घातला तर अजूनच मजा येते!
घरी जर लहान मुले असतील तर मग त्यांना आया, आज्ज्या झळवणीच्या पाण्याने आंघोळ करायला लावतात. तांब्याच्या घंगाळ्यात पाण्यात हिरवागार कडुनिंब घालायचा, त्याला वरून सुती मलमलीचे पांढरे कापड बांधायचे व ते घंगाळे दिवसभर उन्हात ठेवून द्यायचे. सायंकाळी त्या सूर्यकिरणांनी अप्रत्यक्षपणे तापलेल्या पाण्याने मुलांना आंघोळ घालायची. त्या अगोदर उकडलेल्या कैरीचा गर अंगाला लावायचा, आणि आंघोळ झाल्यावर सुती पंच्याने अंग कोरडे करून मुलांना सुती, मलमलीचे कपडे घालायला द्यायचे. त्या झळवणीच्या पाण्यातल्या कडुनिंबाच्या डहाळ्या आंघोळ करताना गुदगुल्या करू लागल्या की मुले जी खुदूखुदू हसतात त्यांतही गंमत आहे!
आंब्याच्या उल्लेखाशिवाय आणि रसास्वादाशिवाय उन्हाळ्याविषयीचा कोणताच लेख पुरा होऊ शकत नाही! अक्षय्यतृतीया झाली की देवाला डाळ-पन्ह्याचा व आंब्याचा नैवेद्य दाखवून समस्त जनता आंब्यांवर तुटून पडायला सिध्द होते. मग ते आंबे हापूसचे असोत, तोतापुरी, शेंदरी, पायरी की गोटी आंबे! सकाळ- संध्याकाळ जेवणात आमरस, मधल्या वेळेला आंब्याच्या फोडी, आईसक्रीम, लस्सी, पियूष.... एकसे बढकर एक! आंब्याने उन्हाळा सुसह्य होतो. लहान असताना मधोमध आंब्यांचा ढीग ठेवून आम्ही मुले सर्वांग आंब्याने माखून घेत त्यांचा गर ओरपत, साली, कोयी चोखत स्वर्गप्राप्तीचा आनंद अनुभवत असू. इतर सर्व जग त्या आनंदापुढे तुच्छ वाटे!!
आणि उन्हाळ्याचे वर्णन सुगंधाच्या त्या मौक्तिक कळ्यांच्या उल्लेखाशिवाय अपुरेच राहते! मोगर्याच्या शुभ्र, देखण्या, नाजूक, प्रसन्न रुपाला तितक्याच मोहक सुगंधाची जी अपरिमित देणगी मिळाली आहे त्याची लयलूट तो जणू आसमंतात आपल्या चित्तवृत्ती उल्हसित करणार्या परिमळाने करतो. बागेतल्या मोगर्याच्या झुडुपांपासून ते रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडच्या ह्या रेखीव चांदण्यांच्या माळा मग सखी सजणी मोठ्या दिमाखात आपल्या केशसंभारात मिरवायला लागतात.
ग्रीष्माचा ताव कितीही कडक असला तरी आपल्याच लेकरांना निसर्ग त्यावरचा उपायही प्रदान करत असतो. निसर्गाने दिलेली ही रंग, रूप, रस, गंध, स्पर्शाची अनमोल देण दोन्ही ओंजळींनी भरभरून घेतली तरी हात अपुरे पडतात. त्या बहराने अस्तित्त्व व्यापले जाते, मन प्रसन्न होते आणि ग्रीष्माच्या दाहकतेला शांत करते!
-- अरुंधती कुलकर्णी
http://iravatik.blogspot.com/
(चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. केवळ तुमच्या डोळ्यांना निववण्यासाठी!! :-))
तशी निसर्गाने उन्हाळा आलाय ह्याची वर्दी आधीच दिलेली असते. बाजारात रसरशीत कलिंगडे येऊ लागली असतात. त्यांचा तो जर्द हिरवा आणि गुलाबी लाल रंग पाहूनच डोळे निवतात. कधी एकदा त्या कलिंगडाचा आस्वाद घेतो असे होऊन जाते!
आंब्याच्या उल्लेखाशिवाय आणि रसास्वादाशिवाय उन्हाळ्याविषयीचा कोणताच लेख पुरा होऊ शकत नाही! अक्षय्यतृतीया झाली की देवाला डाळ-पन्ह्याचा व आंब्याचा नैवेद्य दाखवून समस्त जनता आंब्यांवर तुटून पडायला सिध्द होते. मग ते आंबे हापूसचे असोत, तोतापुरी, शेंदरी, पायरी की गोटी आंबे! सकाळ- संध्याकाळ जेवणात आमरस, मधल्या वेळेला आंब्याच्या फोडी, आईसक्रीम, लस्सी, पियूष.... एकसे बढकर एक! आंब्याने उन्हाळा सुसह्य होतो. लहान असताना मधोमध आंब्यांचा ढीग ठेवून आम्ही मुले सर्वांग आंब्याने माखून घेत त्यांचा गर ओरपत, साली, कोयी चोखत स्वर्गप्राप्तीचा आनंद अनुभवत असू. इतर सर्व जग त्या आनंदापुढे तुच्छ वाटे!!
आणि उन्हाळ्याचे वर्णन सुगंधाच्या त्या मौक्तिक कळ्यांच्या उल्लेखाशिवाय अपुरेच राहते! मोगर्याच्या शुभ्र, देखण्या, नाजूक, प्रसन्न रुपाला तितक्याच मोहक सुगंधाची जी अपरिमित देणगी मिळाली आहे त्याची लयलूट तो जणू आसमंतात आपल्या चित्तवृत्ती उल्हसित करणार्या परिमळाने करतो. बागेतल्या मोगर्याच्या झुडुपांपासून ते रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडच्या ह्या रेखीव चांदण्यांच्या माळा मग सखी सजणी मोठ्या दिमाखात आपल्या केशसंभारात मिरवायला लागतात.
ग्रीष्माचा ताव कितीही कडक असला तरी आपल्याच लेकरांना निसर्ग त्यावरचा उपायही प्रदान करत असतो. निसर्गाने दिलेली ही रंग, रूप, रस, गंध, स्पर्शाची अनमोल देण दोन्ही ओंजळींनी भरभरून घेतली तरी हात अपुरे पडतात. त्या बहराने अस्तित्त्व व्यापले जाते, मन प्रसन्न होते आणि ग्रीष्माच्या दाहकतेला शांत करते!
-- अरुंधती कुलकर्णी
http://iravatik.blogspot.com/
(चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. केवळ तुमच्या डोळ्यांना निववण्यासाठी!! :-))
वाचने
10930
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहा!! लेख
कधी येतोय अस झालाय
In reply to आहाहा!! लेख by रेवती
अगदी, अगदी...
In reply to कधी येतोय अस झालाय by मीनल
उन्हाळा थंडी
In reply to अगदी, अगदी... by स्वाती दिनेश
हे वाचून
In reply to कधी येतोय अस झालाय by मीनल
व्व्वा !!
आता तुला
In reply to व्व्वा !! by टारझन
कलिंगडात
In reply to व्व्वा !! by टारझन
व्वा...!
लेख भलताच
क्या बात है!!
हेच
In reply to क्या बात है!! by चतुरंग
मस्तच
सुंदर...
फार सुंदर
अरुंधतीताई
सुरेख लेख..
मस्त लेख.
वा !!.. अतिशय
सुंदर
वाचून गार
वा!!
मस्त लिव्हलय.....
Wow !
+१
In reply to Wow ! by वाहीदा
अरुंधती मी
अप्रतिम लेख!
सहमत
In reply to अप्रतिम लेख! by समीरसूर
मस्तच!!!
थंडावा
क्या बात है !!
धन्यवाद!
सुरेख लेख आणि फोटो
संदीप
ऊसाचा थंडगार रस
In reply to संदीप by अरुंधती
उन्हाळा
सुंदर