या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...
या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...
नाडीग्रंथांतील अदभूतता मला सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
मालकंसाची लकेर हवेत विरते आहे. संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय. बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे. शंकरारागातील खर्जातून सुरू झालेला ख्याल नुकताच द्रुत लईशी लडिवाळपणे जुळवुन घेतोय. अशा माहौलातील आनंदाची अनुभूती मला नाडी महर्षींच्या लिखाणातून भासते. महर्षीच्या विराट प्रज्ञाशक्तीच्या लीलेने, त्यांच्या करुणाभावाने ह्रदय भरून येते. आणखी जाणून घ्यायला ललचावते.एक धागा नाडीचा शम्भर धागे राशीन्चे जरतारी हे वस्त्र 'मिपावा' तुझिया आयुष्याचे... या धाग्याना विणतो कोण ? एक सारखी नसती दोन! कुणा न दिसले त्रिखन्डात या बोर्ड टन्कणार्यान्चे ! पुर्वी एकांनी, मला वाटते जागो मोहन प्यारेंनी "एक धागा नाडीचा" असे काव्यात अचुक वर्णन करून नाडी ग्रंथांची महती नकळत गायली होती. त्यावर प्रतिसाद फार नव्हते. सध्या 'काका' लोक अनेक नव्या मिपावाचकांना नाडीग्रंथांवरील घिशापिट्या पुराण्या-तकलादू संशयांना पुढेकरून नाडी ग्रंथांना दूषणे देणाऱ्या अनेक जुन्या दुव्यांचा 'कडबा' नव्याने चा(वा)यला टाकून, स्वतः अन्य धाग्यांचा 'रवंथ' करायला नामानिराळे होतात. काहीं मिपाकरांना नाडीग्रंथांतील दिलेल्या मार्गदर्शनाने थरारक प्रेरणा मिळतात पण ते आपल्या अनुभवांचा गवगवा करायला उत्सुक नसतात. तात्या मंडळींना नाडीच्या आठवणींनी आशिकीचे रोमानी शौक खुणावतात. मला नाडीग्रंथांतील अदभूतता सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते. मालकंसाची लकेर हवेत विरते आहे. संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय. बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे. शंकरारागातील खर्जातून सुरू झालेला ख्याल नुकताच द्रुत लईशी लडिवाळपणे जुळवुन घेतोय. अशा माहौलालातील आनंदाची अनुभूती मला नाडी महर्षींच्या लिखाणातून भासते. महर्षीच्या विराट प्रज्ञाशक्तीच्या लीलेने, त्यांच्या करुणाभावाने ह्रदय भरून येते. आणखी जाणून घ्यायला ललचावते.... गायनाची अशी महफिल सजलेली असताना कोणी उगाचच टाळी वाजवून, अधोवायूचा ढुंमकार काढून रसभंग करावा असा कधी कधी विरस होते. मग वाटते आपलेच मिपाकर आहेत. थोडे वात्रट. काहीसे खट्याळ. मधेच बोचरे. आवेशाने लिहितात पण तात्कालिक उत्साहानंतर थंडावतात. चालायचेच. माझ्या रखडत टंकण करून पाठवलेल्या लिखाणाला वाचक आहेत. हे ही नसे थोडके... असो... मोहनप्यारे म्हणतात... ...विन्ग कमान्डर महोदय, ..... भरकटलेली ही चर्चाच काय हल्ली विमाने, हेलिकॉप्टर्स आणि रॉकेट्स सुद्धा भरकटतात... एक शन्का आहे.... शशिकान्त नावाची हजारो माणसे असणार....... नेमका हाच तो हे पट्टी बघून कसे कळते? लग्न झाले, दुसरे लग्न झाले, धर्म बदलला, गम्मत म्हणून बदलले अशा कारणानी जर नाव बदलले तर नेमके कुठले नाव बघतात ? एखादा माणूस नन्तर नाव बदलणार असेल तर तेही आधीच्या पट्टीत दिसायला हवे.. ते दिसते का ? सांगाना? -------------- सांगतो.... "या धाग्यांच्या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन" ... खरे आहे. 'शशिकांत' नावाचे अनेक लोक असणार त्यापैकी ती पट्टी माझीच कशावरून ठरणार? असे न होण्यासाठी पट्टीत व्यक्तीच्या आई-वडिलांची नावे, पति वा पत्नीचे नावे, जन्मदिनांक, जन्मकालाची ग्रहपरिस्थिती, शिक्षण व सध्याची नोकरी वा व्यवसायाची माहिती भावा-बहिणींची, अपत्यांची संख्या असे अनेक दुवे त्यापट्टीत लिहिलेले असतात. त्यासर्वांवरून विशिष्ठ ताडपट्टी आपली आहे किंवा नाही याचा पडताळा घेता येतो. म्हणून तुम्ही म्हणता तसे या नाडीपट्टीला आपल्या जन्माच्याही आधीपासून लिहितो कोण? असा प्रश्न पडतो खरा. असो. मात्र या अनुभवायच्या गोष्टी आहेत. मी किती सांगितले तरी त्या थापाच वाटणार, कोणाचाही विश्वास बसणार नाही, जसा माझाही एके काळी नव्हता. मासला म्हणून मी फक्त माझ्या नावाचा उल्लेख असलेला भाग पुरावा म्हणून येथे सादर केला होता. आता चिकित्सा करणाऱ्यांनी आपापल्या पट्टीचा शोध घेताना त्यात अशीच माहिती कुठे व कशी लिहिलेली आहे ते दाखवण्यास नाड़ीवाचकाला सांगितले तर तो ते नाडपट्टीतून व त्या शिवाय दिल्या जाणाऱ्या वही,कॅसेट मधून शोधता येते. आता इतका पुरावा आपण न मागता दिला जातो. त्याची चिकित्सा करणे आपल्या हातात आहे. --------- नाडी केंद्रात ताडपट्टी फुकट बघितली जात नाही. नाडीग्रंथातील विवक्षित पट्टी ग्राहकाने त्यातील माहिती 100 टक्के बरोबर आहे असे समाधानाने म्हटले की मग त्या ताडपट्टीतील मजकून सावकाशपणे वाचून वही उतरवला जातो. हे काम बऱ्याचदा केंद्राची जागा अपुरी असेल तर ग्राहकासमोरच केले जाते. त्यामुळे ज्या पट्टीतून माहिती जुळली त्याच पट्टीतील मजकूर वहीत उतरवला जात आहे किंवा नाही याची खात्री आपणांस आपसुकच घडते. त्यानंतर त्या त्या केंद्राने ठरवलेली बिदागी ते पुजारूम मधील थाळीत ठेवायला सांगतात. त्याआधी फी पट्टी सापडली नाही तरी आगाऊ घेतली जात नाही. अनेकदा त्या केंद्रातील पट्ट्यांचा साठा संपूनही एखाद्याची विशिष्ठ पट्टी सापडली नाही तर त्याला नंतर काही काळानंतर बोलावले जाते. त्यामधेही त्याची पट्टी खात्रीने सापडेलच अशी हमी नाडी केंद्रवाले देऊ शकत नाहीत. ------ ओकसाहेब ही चक्क माघार झाली हो. मी आपले भविष्य पहा असा सल्ला दिला. मी आपल्यासारख्यांना बरोबर नेतो वा नाडीच्या खरेपणाचा अनुभव आणण्यासाठी पुढाकार घेतो असा मी दावा कुठे होता म्हणून मी माघार घेतली? उलट मी अनेकदा आपापले अनुभव घ्या व बोला असे सुचवत आहे. त्यासाठी आपणांस पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आता इतके झाल्यावरही आपण वा अन्य किती लोक खरोखर जातील कोणास ठाऊक. ते पाहून आल्यावर आपल्या पट्टीतील माहितीची वही व कॅसेट आणि फोटोसह केलेली चिकित्सा आम्हाला वाचायला आवडेल. मात्र नाडी केंद्रावाल्यांचा खोटेपणा उघडा करण्याच्या नादात पुर्वग्रहामुळे आपण आपल्याला सचोटीपासून ढळू देऊ नये ही विनंती.
वाचने
5746
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
'शशिकांत'
मला तर
ओकसाहेब,
In reply to ओकसाहेब, by विसोबा खेचर
अरे काय हा
In reply to अरे काय हा by Nile
अरे काय हा
In reply to ओकसाहेब, by विसोबा खेचर
अती अवांतर प्रतीसाद!!
In reply to अती अवांतर प्रतीसाद!! by अर्धवटराव
अहो साहेब,
In reply to अहो साहेब, by विसोबा खेचर
बनीया !!
In reply to ओकसाहेब, by विसोबा खेचर
लकेर
समवन सेड ...
In reply to समवन सेड ... by टारझन
मिशन
टारुलियाजी
आईच्य्या गावात........
नाडीग्रंथ
हद्द आहे
मला एक कळत
स्वगत :
In reply to स्वगत : by विसोबा खेचर
आम्ही
In reply to आम्ही by Nile
नायल्या,
In reply to स्वगत : by विसोबा खेचर
तसा काही