आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.
ही एक विसंगतीच वाटते की नवे वर्ष साजरे करण्यासाठी एकीकडे गोडाचे जेवण करायचे आणि दुसरीकडे मात्र कडुझार अशा कडुनिंबाची चटणी खायची. बरोबर की नाही?
माझी एक चांगली किंवा वाईट म्हणा, सवय आहे की या काही प्रथांमागचा विचार शोधून काढणे(अर्थातच माझ्या अल्प बुद्धीने).
काल संध्याकाळी सहजच विचार डोक्यात आला की यालाही काहीतरी कारण असेल.
एकीकडे गुढी उभारुन आपण त्याला साखरेची माळ लावायची याचा अर्थ आपले सुख जगापुढे मांडायचे;
घरी जरी गोड धोड असले तरी कडू चटणी खायची; याचा अर्थ जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही.
हा मंत्र जर तुम्ही आयुष्यभर जपलात तर जीवन नक्क्कीच सुखी होऊन जाईल.
याचा गाभा म्हणून जाता जाता बहिणाबाईची एक ओळ सुचली ती सांगतो आणि थांबतो.
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख
तळघरात कोंडलं
वाचने
10666
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही !!!
प्रथांमागचा विचार शोधून काढणे- ही एक चांगली सवय आहे, आम्हीही तसा प्रयत्न करतो कधी-कधी !!!
विचार नाही शोधता आला तरी, त्या परंपरा शास्तर मारे नक्की पाळतो :)
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख
तळघरात कोंडलं
आमचं सुखही टांगलेलं असतं आणि दुख:ही, आधी कोणतं बोकांडी पडेल याची काही गॆरंटी नाही :)
काही शंका
माझ्या मते...
In reply to काही शंका by इनोबा म्हणे
धन्यवाद!
In reply to माझ्या मते... by प्रभाकर पेठकर
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
:)
In reply to || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || by संजय अभ्यंकर
औषधी..
सांभाळून...
In reply to औषधी.. by विसोबा खेचर
धन्यवाद, :)
In reply to सांभाळून... by प्रभाकर पेठकर
तसे नाही...
In reply to धन्यवाद, :) by विसोबा खेचर
उत्तम माहिती
??
In reply to उत्तम माहिती by अन्या दातार
तात्या, तुम्हाला विसरणे शक्यच नाही
कडूनिम्ब
ऐकले आहे
In reply to कडूनिम्ब by डॉ.प्रसाद दाढे
हे जरा अतिरंजित वाटतेय.
सहमत..
In reply to हे जरा अतिरंजित वाटतेय. by प्रमोद देव
म्हणूनच
हा: हा: कशी
वाह वाह !
अगागागागा.
In reply to वाह वाह ! by प्रसाद गोडबोले
आम्हाला हे
In reply to अगागागागा. by प्रचेतस