मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<फालतू धागे आणि विडंबने>

लंबूटांग · · जनातलं, मनातलं
ती - तुला हे २-४ ओळींचे धागे, लोणची/थालिपीठांचे कौल, काथ्याकूट आवडतात? तो - नाही ती - अरसिक कुठचा! तो - मी अरसिक म्हणून तर मिपा आवडते. ;) ती - चूप्प . एकदम चूप्प!! तो - तुला कुठे विडंबने आवडतात? ती - त्यात काय असतं आवडण्यासारखं? तो - तेच जे तुमच्या २ ओळींच्या धाग्यांत, लोणची/थालिपीठांच्या कौलांत, काथ्याकूटांत असतं ती - तुझी विडंबने लई खवट आहेत. तो - असल्या धाग्यांवरूनच तर ती सुचतात. मग ते धागे फालतू की विडंबने ? :P ती - मी नाही ज्जा!! विडंबनेच का नाही लिहीत? तो - कारण ती तुझ्या धाग्यांसारखी मनात आले की पाडता येत नाहीत, आणि फार काळ मालक/ संपादकांपासून सुरक्षित राहातही नाहीत. :) ती - अजून काही? :) तो - उगाचच्या उगाच बॅण्डविड्थ खात नाहीत, अन कुणाच्या** डोस्क्याला तापही देत नाहीत :). ती - :) :) :) ...... राजा कोण म्हणतं रे तुला मिपा आवडत नाही? :) **conditions apply(मालक, संपादक आणि प्रेरणादायी धागेलेखक सोडून)

वाचने 3037 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रभो 16/02/2010 - 22:26
हॅहॅहॅ...... रसमलाई + कढीचा विरजणाचा असर चालू झाला वाटते... :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

चिरोटा 16/02/2010 - 22:40
हॅ हॅ हॅ. त्याला आणि तिला कोठेतरी दूरवर जंगलात नेऊन सोडा आता. डोकी फिराया लागलेनी. भेंडी

In reply to by खान्देशी

शुचि 16/02/2010 - 23:48
पॉइंट हॅज बीन नोटेड फायनली!!!!!!!!!! परत कोणाचं डोकं दुखणार नाही ....... ना बँडविड्थ खाल्ली जाइल. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

लंबूटांग 17/02/2010 - 05:49
ह. घ्या. हे लिहायचेच विसरलो.:) शुचिताई, भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.

In reply to by लंबूटांग

शुचि 17/02/2010 - 12:06
भावना दुखावायचा काही प्रश्नच येत नाही. हे "विडंबन" आहे. 'विडंबन" हा एक साहित्यप्रकार आहे. :) सो प्लीझ डोंट वरी. :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

प्रकाश घाटपांडे 17/02/2010 - 09:44
हॅहॅहॅ धागे नी विडंबने यकदम हल्की घ्यायची असत्यात ब्वॉ! ती गंमत असतीया. मिपावरील पहिले वर्ष पहा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती 16/02/2010 - 22:45
हॅ हॅ हॅ ... तू पण का रे लंबू!! फिस्सकन हसायला आलं, नावच वाचून .... बास आता, मी जाते थालीपीठाबरोबर लोणचं खायला! अदिती

विसोबा खेचर 16/02/2010 - 23:05
आहे हे असं आहे... ....................! पुढचं बोलत नाही! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 16/02/2010 - 23:57
सरळ चपल्या घालून आत ये .. जिमीन घाण झाली तरीबी चालंल :) असं म्हणायचं असावं बहुदा मालकांना =)) =)) =)) असो !! जबर्‍या लिखाण रे लंबुटांगेश :) इथे प्रतिसादित होण्याआधीच वाचलेला .. णै का ? ;) - बाटा

चतुरंग 16/02/2010 - 23:15
साक्षात मालक हजर असताना थालीपिठाला नावे ठेवतोस!? (पुरे)! (संदर्भ - अशी ही बनवाबनवी - अशोक सराफ आणि सुधीर जोशी) चतुरंग

Nile 17/02/2010 - 04:42
हॅ हॅ हॅ! चला एक प्रकार बंद (अन दुसरा सुरु?) होतोय बहुतेक!