राजू परुळेकर : राजकीय पत्रकार ?
नितेश खूप समजूत असलेला, खोल माणूस आहेखोल माणूस म्हणजे कसा?
मुख्य म्हणजे त्याची काम करण्याची पद्धत शिवसेना टाइप नाही. त्या टाइपची झाक असली तरी मूलत: त्याची खोली काँग्रेससारखी आहे.काँग्रेसची खोली हा काय प्रकार आहे? आपण काँग्रेस हाउस ऐकून आहोत.!!
तो कार्यक्रम एका समूह चर्चेसारखा होता. राज्य आणि देशाबद्दलची दूरदृष्टी आणि शासन संस्था याबाबत चर्चा होती. सर्व चर्चा छान झाली.क्लास !!. नितेश राणे,प्रणिती शिंदे,पंकज भुजबळ्,पूनम महाजन ह्यांनी राज्य आणि देशाबद्दलची दूरदृष्टी आणि शासन संस्था ह्याबद्दल चर्चा केली!! ह्याचा अर्थ आता मी पण आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलू शकतो. :) भेंडी P = NP
In reply to सहमत by नंदन
In reply to आधी by आनंदयात्री
In reply to ह्या by बंडू बावळट
In reply to ह्या by बंडू बावळट
In reply to ह्या by बंडू बावळट
In reply to ह्या by बंडू बावळट
In reply to करियर पाथ by सहज
In reply to मला by बिपिन कार्यकर्ते
In reply to कुमार by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to कुमार by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to कुमार by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to प्रत्येका by संजा
प्रत्येकाला आपापला धंदा नफ्यामधे आणण्याचा अधिकार आहे.एक वेगळा विचार! आवडला...! :) बंड्या.
In reply to प्रत्येका by संजा
In reply to परुळेकरांचा आणखी एक लेख by मी_ओंकार
सचिनचं एक मला आवडतं. त्याला उकडीचे मोदक आवडतात. मला पण.लोकप्रभेसारख्या साप्ताहिकात परुळेकर लिहितात आणि लोकप्रभावाले ते खपवतातही ह्याचे आश्चर्य वाटते. क्रिकेटबरोबरच राजकारण आणि चित्रपट ह्या गोष्टींचा भारतिय(मराठी) नागरिकांना मूर्ख बनवण्यास उपयोग होतो हे परुळेकर विसरलेले दिसतात. भेंडी P = NP
In reply to परुळेकरांचा आणखी एक लेख by मी_ओंकार
In reply to हेत्वारोप by प्रदीप
In reply to हेत्वारोप by प्रदीप
In reply to हेत्वारोप by प्रदीप
खरे तर नितेश राणे काय किंवा राज ठाकरे काय, हे दोन्ही अगदी (आपापल्या) कोपर्यातील नेते आहेत, त्यांची भवितव्ये अजून स्पष्ट नाहीत, तेव्हा त्यांची खुशामत करून परूळकरांना काही फायदा असे म्हणणे जरा खेचून ताणून आणल्यासारखे वाटते.आता आमचा काय फायदा आहे परुळेकरांवर टिका करण्यात? वर अनेकांनी माझ्यासकट लाळघोटेपण किंवा तत्सम शब्द वापरला आहे. या सर्वांच्या फायद्याचे/ हेतूचे गणितही मांडा. एक महसूल मंत्र्याचा मुलगा आणि दुसरा ११ आमदार असलेल्या पक्षाचा प्रमुख. यांचा उदोउदो केल्यास काय फायदा मिळतो? कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे? पत्रकारांनी व्यक्तिमत्त्वास भारावून जाऊन लिहिले आहे. त्या व्यक्तिमत्त्वांचा खोलात जाऊन का प्रभाव पडला याचा आढावा घेतला आहे. परुळेकरांच्या लेखात दोन-तीन वेळेला 'खोली' शब्द सोडून इतर काय आहे? बाकी श्री मोडक यांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत. ................................. I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
In reply to हास्यास्पद by अक्षय पुर्णपात्रे
In reply to हेत्वारोप by प्रदीप
प्रेषक : अक्षय पुर्णपात्रे, शुक्र, 01/29/2010 - 02:46 धनंजय, मदत हवी आहे. हेत्वारोप या शब्दाचा अर्थ काय? काहीतरी हेतू मनात ठेऊन केलेले आरोप की इतरांच्या हेतूंबाबत केलेले आरोप?
प्रेषक : धनंजय, शुक्र, 01/29/2010 - 03:45श्री प्रदीप यांनी 'परुळेकरांवर आम्ही (मी व इतर) काहीतरी हेतू मनात ठेऊन आरोप करत आहोत' असे म्हणायचे आहे, असा चुकीचा अर्थ मी लावला. या चुकीबद्दल श्री प्रदीप यांची माफी मागतो आणि त्यांच्या प्रतिसादासाठी वापरलेला 'हास्यास्पद' शब्द मागे घेतो. लेखास 'लाळघोटेपणा' म्हणणे यावर आक्षेप घेणे निश्चितच हास्यास्पद नाही. हे स्पष्ट करूनही श्री प्रदीप यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत मी असहमत आहे. ते म्हणतात तसे नितेश राणे व राज ठाकरे 'कोपर्यातले नेते' वाटत नाहीत. (वरच्या प्रतिसादात कारण स्पष्ट केलेले आहे.) ते म्हणतात:काहीतरी हेतू मनात ठेऊन केलेले आरोप की इतरांच्या हेतूंबाबत केलेले आरोप?पैकी दुसरा अर्थ. "हेतूचा आरोप". उदाहरण : मित्र वेळेवर माझ्या मदतीला आला नाही. माझी फजिती व्हावी असा त्याचा हेतू होता, असे मी म्हणतो. अशा हेतूचा आरोप त्याच्यावर करतो. मित्राच्या वागण्याबाबत, किंवा मित्राबाबत मी हेत्वारोप करतो. सामासिक शब्दाची फोड (रूढ अर्थ वेगळा नसल्यास) "अमुकचा/ची/चे तमुक" असा करणे, हा 'डीफॉल्ट' अर्थ. (शालेय व्याकरण आठवत असेल तर "षष्ठी तत्पुरुष". हा समासाचा सर्वात सामान्य प्रकार. अन्य प्रकार त्यामानाने अपवादात्मक असतात.)
येथे नितेश राणे हे त्यांचे मॅनेजमेंटच्या शिक्षणाचा वापर त्यांच्या सामाजिक/ राजकिय कार्यासाठी करत आहेत, त्याविषयी जे काही लिहीले आहे, त्यात नक्की काय आ़क्षेप आहे, हे मला समजलेले नाही.सर्वप्रथम श्री परुळेकर यांनी केवळ 'परदेशात उच्च डिग्री घेतलेला*' एवढाच उल्लेख केला आहे. त्यात व्यवस्थापनाच्या अभ्यासाचाही उल्लेख नाही तसेच त्या अध्ययनाचा (व्यवस्थापन असो किंवा इतर काही) वापर केल्याचाही उल्लेख नाही. त्यामुळे 'शिक्षणाचा वापर करत आहे' हे दाखवणारा हा लेख नाही. लाळघोटेपणाचा आरोप करण्याचे कारण म्हणजे लेखात खोल, A man to be watched, मानवी अँगलने विचार करणारा, सुसंस्कृतपणा, धारदार आणि स्पष्ट, स्वत:ची आयडेन्टिटी असलेला व इतर विशेषणे श्री नितेश राणे यांचे वर्णन करण्यासाठी वापरली आहेत आणि या विशेषणांना पाठबळ देणारे काहीच नाही. 'धारदार आणि स्पष्ट' नंतर त्याला एसी बाधतो, याचा उल्लेख आहे. प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल कळकळ आहे पण एकाही प्रश्नाबद्दल तो कसा सोडवणार आहे याचा उल्लेख नाही. मानवी विचार अॅंगलने विचार करतो म्हणजे नेमके काय करतो? हे काहीच धड स्पष्ट नाही. मग वाचक म्हणून एखाद्याने हे श्री नितेश राणे यांचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न असा अर्थ काढल्यास त्यात काय वावगे आहे? पत्रकार लिहितात तेव्हा हजारो लोक वाचतात. त्या लोकांना फक्त मतेच नाहीतर त्या मतांचे स्पष्टीकरणही हवे असते. लाळघोटेपणाचा वापर करुन बर्याच पत्रकारांनी काय-काय पदरात पाडून घेतले आहे हेही लोकांनी पाहिलेले असते. वाचकांनी का म्हणून एखाद्या पत्रकाराविषयी होमवर्क करावा? त्यांच्याकडे या सर्व उठाठेवी करायला वेळ नाही म्हणूनच तर ते पत्रकारांचे लिखाण वाचतात ना. हा लेख वाचल्यास वाचकांचा काही एक समज झाल्यास तो दोष लेखकाचा आहे, वाचकांचा नाही. मी व अनेकांनी केलेले आरोप हे आता बरोबर अर्थाने हेत्वारोप आहेत, हे मान्य आहे. पण श्री परुळेकरांच्या लेखात असे अनेक आरोप आहेत. उदा. "दुसरं म्हणजे ‘झेंडा’ नावाचा एक विकृत चित्रपट उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि कशाकशाने अवधूत गुप्ते नावाच्या माणसाने नारायणराव, राज ठाकरे व इतर अनेकांचं असत्यावर आधारित चारित्र्यहनन करणारा चित्रपट काढला. " अधोरेखित केलेल्या आरोपांना काय पुरावा आहे? या विधानात काय 'सॅक्रेड फॅक्ट्स' आहेत आणि काय 'फ्री कमेंट्स' आहेत. आता लेखाबद्दल काही मत व्यक्त करण्यासाठी वाचकाने पुरावे शोधायला जायला पाहीजे आहे का?
तरीही ते जे काही लिहीतात ते काही स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन लिहीतात असला आरोप मी करणार नाही-- अगदी उद्या ते काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले तरी.हा श्री प्रदीप यांच्या मनाचा मोठेपणा आहे. माझे मन दुर्दैवाने तितके मोठे नाही. श्री केतकर यांचे लिखाण काँग्रेससोडून काही वेळा वाचनीय असते. पण केवळ ते चांगले लिहितात म्हणून लाळघोटेपणा करत नसतील (म्हणजे सध्या ते करत आहेत असे म्हणायचे नाही) असे काही मी मान्य करणार नाही. *परदेशात एसी असलेल्या वर्गात श्री नीतेश कसे बरे बसत असतील? त्यांना रोजच ताप येत असावा. त्यांच्यासाठी विद्यापीठाला वेगळीच व्यवस्था करावी लागली असेल. **श्री प्रदीप यांनी अत्यंत सभ्यपणे मला हेत्वारोपाच्या अर्था संदर्भात तसेच त्यांची भुमिका स्पष्ट करणारा व्यनि पाठवला. त्यांच्या सभ्यपणाचे अतिशय कौतुक वाटते. ............................. मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
आरतीच्या वेळी मात्र आम्ही सर्वजण एकत्र उभे होतो (देवासमोर सर्व समान!) त्यात माझ्या एका बाजूला राज होता, दुसऱ्या बाजूला नितेश राणे. त्या रात्री मी डायरी लिहिताना नोंद केली. नितेश राणे A man to be watched.म्हणजे काय? आरतीला एकत्र असणार्या माणसांपैकी एका बाजूला राज होता, म्हणून दुसर्या बाजूचा माणूस to be watched का? तोंड भरून स्तुती करताना किमान एका वाक्याचा दुसर्या वाक्याशी संबंध ठेवण्याची काळजी घेतली असती, तर थोडी अब्रू वाचली असती.
नितेश कोणत्याही विषयावर बोलताना खूप मानवी अँगलने विचार करतो. शक्यतोवर सुसंस्कृतपणा सोडत नाहीअच्छा, म्हणजे अवधूत गुप्तेला धमकी देण्यात सुध्दा 'सुसंस्कृतपणा' आणि 'मानवी अँगल' होता का? झेंडा हा विकृत सिनेमा आहे, असं वादापुरतं मानलं, तरीही एका पत्रकारानं झुंडशाहीचा उदोउदो करणं, म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुर्हाड मारणं होतं. आम्ही यालाही विकृतच म्हणतो. - चिंतातुर जंतू :S "तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या | उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
In reply to काही शंका... by चिंतातुर जंतू
...एका पत्रकारानं झुंडशाहीचा उदोउदो करणं, म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुर्हाड मारणं होतं. आम्ही यालाही विकृतच म्हणतो.खरंय आणि गंभीर आहे. आणि हे सारं ते करताहेत ते समाज लयाला चालल्याचा 'आक्रोश' करीत. दोन हजार वर्षांनी आपलंच लेखन कसं योग्य ठरेल याच्या गर्जना करीत. हास्यास्पद हे विशेषणही तोकडे पडावे.
In reply to प्रसिद्धी डोक्यात जाणे... by चतुरंग
In reply to वा! वा! by प्रसन्न केसकर
In reply to +१ by सुनील
In reply to वा! वा! by प्रसन्न केसकर
In reply to छान!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to वा! वा! by प्रसन्न केसकर
शिवाय स्वतःची मते मांडण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र त्याले द्यावेच लागेल.अहो परुळेकरांनी जे अभिव्यक्तीस्वातंत्र वापरले तेच आम्ही वापरले तर आम्हालाही ते वापरू द्या. श्री परुळेकर यांचे लेखन लाळघोटेपणा वाटणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्हाला तसे वाटत नाही तर ठीक आहे. माझे असे मत असणे आणि मी ते मिपावर मांडणे ही झुंडशाही कशी झाली ब्वॉ. आता पत्रकारितेच्या व्यवसायात जाण्यासाठी आर्थिक दृष्ट्या त्याग करावा लागतो आणि काहींना तो झेपत नाही तर बाजारांच्या नियमाप्रमाणे पत्रकारितेकडे वळणारे लोक कमी होतील, प्रसारमाध्यमांची संख्या कमी होईल. भारतभर ती वाढतेच आहे म्हणजे चांगलाच तेजीचा व्यवसाय असावा. आजकाल लोक जाहीरातसंस्था काढण्याऐवजी वृत्तपत्र काढतात की काय? कारण तुमचे विवेचन वाचल्यास या दोन व्यवसायांत फारसा फरक नाही उलट वृत्तपत्रे भारीच पडतील. ग्राहक पैसे देऊन जाहीराती वाचतो यापेक्षा आणखी फायदेशीर काय असू शकेल.
येथे लेखकाने स्वतःची मते त्याच्या लेखात मांडली आहेत आणि त्यात लिहिलेल्या घटनाबाबतच्या फॅक्ट्स चुकीच्या आहेत असे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही.कोणाला एसीत थंडी भरते आणि कोणाला ते भयानक वाटते आणि कोणता चित्रपट विकृत आहे आणि कोण कोणाला माफ केल्यास कोणाच्या जीवनाचे कल्याण होते अशा लेखात काय चुकीचे दाखवावे? आम्ही उगाच जगभर पत्रकार जीव धोक्यात घालून जे लेखन करतात, प्रामाणिकपणे, तटस्थपणे आपली मते मांडतात त्यांना पत्रकारितेतील गुणवत्ता समजत होतो. पण आता हे निकष तपासून पहायला हवेत कारण पत्रकारिता हा व्यवसाय आहे आणि त्यांचे प्रॉडक्ट हे त्यांचे लिखाण आहे. तुमच्या गाडीत दोष असला तर तुम्ही गाडी उत्पादन करणार्या कंपनीस जबाबदार धरता का? तुम्ही तसे धरत नसल्यास श्री परुळेकर यांच्या लिखाणाबाबत प्रश्न न विचारणे योग्यच आहे. ........................................ I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
In reply to समाजाचे प्रतिबिंब by अक्षय पुर्णपात्रे
In reply to छान कल्पनाविलास आहे..... by प्रसन्न केसकर
छान कल्पनाविलास आहे.....असेच बव्हंशी म्हणावेसे वाटते.कल्पनाविलास काय आहे ते समजावून घेऊ या. कल्पनाविलासात रंगण्यापुर्वी लाळघोटे म्हणणे म्हणजे झुंडशाही कशी? यावर आपण मौन बाळगून त्या मुद्द्याला बगल दिलेली नसावी तर नजरचुकीने राहीले असावे, अशी आशावादी अपेक्षा करतो. गैरलागू वाटण्याची कारणे या चर्चाप्रस्तावात श्री परुळेकरांचे काही व्यक्तिविषयक लेखन तसेच श्री राऊत आणि श्री केतकर यांचा संदर्भ आला आहे. हे सर्व पत्रकार सुस्थित आहेत, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यांचे लेखन वाचले जाते. तेव्हा पत्रकारितेतील समाजकारण आणि अर्थकारण या व्यापक प्रश्नाशी संबंध जोडण्यापुर्वी या पत्रकारांचे 'काही चुकते आहे का?' यावर प्रथम चर्चा व्हावी. तुम्हाला श्री परुळेकरांच्या लेखनात मतप्रदर्शनाचा निकष लावून काहीच गैर वाटत नाही. (संदर्भ: हा निकष लावला तर उपरोक्त लेखामधे काहीही गैर दिसत नाही.) जेव्हा काही चुकलेलेच नाही तर पत्रकारितेत होणार्या गैरव्यवहारांबाबत भाष्य करण्याची गरज नाही. पण तुम्ही चुकलेले नाही असा निष्कर्ष काढून आणि वर चुका घडण्याची व्यापक कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता श्री मास्तर यांनी काय मत मांडले आहे ते पाहू.
एखादा पत्रकर अमुक एका पक्षाचा आहे, म्हणजे त्याने एक विशिष्ट पक्षाची भूमिका घेऊन बोलावं , त्या पक्षाला डिफेंड करत राहावं हे पाहणं मला अवघड जातंश्री मास्तर यांनी पत्रकारांमी एक प्रकारे पक्षाशी निष्ठा ठेऊन लेखन करू नये तसेच त्यांच्याकडून वाचकांनी एखाद्या पक्षाच्याच समर्थनार्थ लेखनाची अपेक्षा ठेऊ नये, असे मत मांडले आहे. मी आणि इतर सदस्यांनी थोडेसे पुढे जाऊन हा प्रकार श्री परुळेकर यांच्यापुरताच मर्यादीत ठेऊन, श्री परुळेकर यांच्या लेखावर मत नोंदवून मग श्री मास्तर यांच्या वर व्यक्त केलेल्या मताशी सहमती दर्शवली आहे. (मी मराठी पत्रकारितेच्या अवस्थेबद्दल शंका विचारली आहे.) या पार्श्वभुमीवर तुमचा प्रतिसाद पहावा. ज्यात समाजाची नैतिकता, समाजा घटक असल्यामुळे त्याचे पत्रकारितेवर होत असणारे परिणाम याविषयी चर्चा आहे पण यात तुम्ही श्री परुळेकरांना धारेवर न धरता निव्वळ वाचकांवरच ही (नैतिकता जोपासण्याची) जबाबदारी सोपवली आहे. या अर्थाने मला असे जाणवले की तुम्हाला या व्यवसायाबाबत अतिशय तळमळ आहे. जी योग्य आहे पण येथे तेवढ्या व्यापक पातळीवर न जाता श्री परुळेकरांच्या लेखनाबाबतच चर्चा व्हावी. कारण तुम्ही या लेखनाचे वर्णन 'लाळघोटेपणा' करणे यास आक्षेप घेतला होता. तुमच्या प्रतिसादात तुम्ही म्हणता: काही पत्रकारांना मिळालेली राजकीय पदे अश्या वर्तनानेच मिळाली असा सरसकट दावा करणे ही देखिल झुंडशाही आहे असे मला वाटते. माझ्या आवडीच्या (ज्यांचे लेखन मी आवर्जुन वाचतो) काही पत्रकारांना राजकिय पदे मिळालेली आहेत. माझे श्री प्रदीप यांना दिलेल्या उपप्रतिसादातील विधान पुन्हा एकदा उदधृत करतो: कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे? येथे सरसकट विधान न करता या पत्रकारांना मिळालेल्या पदांविषयी तसेच त्यांनी अनुसरलेल्या मार्गांविषयी शंका व्यक्त केली आहे. इतर कोणी तसे सरसकट विधान केल्याचे आढळत नाही. (श्री घाटपांडे पत्रकार माणसेच असल्याकडे बोट दाखवून त्यांनी गैरवर्तन केल्यास वाचकांना आश्चर्य वाटू नये, श्री केतकर राज्यसभेत जातील असे भाष्य केले आहे पण त्यांनीही सरसकट काहीच दावा केलेला नाही. उलट त्यांचे मत तुमच्या सामाजिक घटक असलेल्या मताच्याच जवळ जाणारे वाटते.) मुद्दा एवढाच आहे की व्यापक कारणांवर चर्चा करण्याकरता प्रथम प्रश्न आहेत, हे मान्य करायला हवे. तुम्हाला त्यासाठी प्रथम श्री परुळेकर यांच्या लेखनाकडे वाचक म्हणून बघणे आवश्यक आहे. तुम्ही तसे न करता व्यापक चर्चा करू पाहत असाल तर ते गैरलागू आहे. पत्रकारिता तेजीचा व्यवसाय आहे किंवा नाही? एखाद्या व्यवसायात अधिक नफा असल्यास त्या व्यवसायात गुंतवणुकीचे प्रमाण वाढते, असे एक तत्त्व अर्थशास्त्रात आहे. तसा ढोबळ तर्क वापरल्यास पत्रकारिता हा तेजीचा व्यवसाय वाटतो असे मी म्हटले आहे. याचा अर्थ सर्वच पत्रकारांच्या आर्थिक समस्या नष्ट झाल्या आहेत का? पत्रकारांवर मालक अन्याय करीत नाहीत का? पत्रकारांच्या वेतनाबाबत उदासिनता नाही का? अजिबात नाही. आणि माझ्या विधानाचा तसा अर्थही नसावा. एक उदाहरण देतो. बांधकाम व्यवसाय आजकाल तेजीत आहे. म्हणजे बांधकाम करणार्या मजुरांच्या जीवनात सर्व आलबेल आहे, असे नाही. तुम्ही म्हणता:दुसरा भाग येतो व्यावसायिकतेचा. वर म्हणले तसे मीडीया हा देखिल व्यवसाय आहे. त्यापेक्षादेखिल तो आतबट्ट्याचा व्यवसाय आहे. तर माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणावर मीडीयामध्ये गुंतवणूक होण्याचे काय कारण असावे? व्यवसाय जर इतका जिकिरीचा आहे तर मग गुंतवणूक का होत आहे? याची अनेक कारणे असू शकतील. मूळात पत्रकारितेच्या व्यवसायाशी, त्यातील नैतिक भुमिकेशी काडीचाही संबंध नसलेले लोक या व्यवसायात पैसे गुंतवतात. गुंतवलेले पैसे व त्यावर परतावा म्हणून अनेक उद्योग (उदा. पेड बातम्या) करतात, जे पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांना अनुसरून नाही. माझ्या विधानात अशा सर्व ग्रॅन्युलर घटकांवर काहीच भाष्य नाही. तुम्हाला तशी वेगळी चर्चा (माध्यमांचे अर्थकारण व पत्रकारितेची मूल्ये) सुरू करता येईल. (मला वाटते श्री घाटपांडे यांनी अशीच काही चर्चा सुरूही केलेली आहे.) जाहीरातसंस्था आणि वृत्तपत्रे तुम्ही हे दोन व्यवसाय एकच असल्याचे विधान केलेले नाही. मी तुम्हाला कोटही केलेले नाही. तुमच्या विवेचनावरून मी असा निष्कर्ष काढला आहे. तुम्ही पत्रकारितेच्या व्यवसायाचे अर्थकारण मांडून पेड न्युज वगैरे प्रकार घडण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. पण हे गैर आहे, हे थांबायला हवे याबद्दल काहीच मत नोंदवलेले नाही. तडजोडी म्हणून हे घडते आहे तर मग जाहीरातसंस्था (ज्या सरळ सरळ पैसे घेऊन पाहीजे तशा जाहीराती बनवून देतात) आणि वृत्तपत्रे जे पैसे घेऊन तुम्हाला हवी तशी बातमी छापतात, यांच्यातील सीमारेषा संपुष्टात आली आहे. तेव्हा जाहीरात संस्थांनी वृत्तपत्रे काढावीत म्हणजे लोकांचे लक्ष आकर्षुन घेण्याकरता पैसे घेण्याचीही गरज नाही वर लोक जाहीराती वाचण्यासाठी पैसेही देतील. तटस्थपणा तटस्थपणा म्हणजे मत न मांडणे असे नव्हे. नाण्याच्या दोन्ही बाजू मांडून तुम्ही एखाद्या बाजूने झुकण्याची कारणे देणे. असे केल्यास वाचकाविषयी, त्याच्या तारतम्यभावाविषयी आदर तर दिसतोच पण समाजही प्रगल्भ होत जातो. पत्रकारांनी मते मांडण्याला आक्षेप नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे. पत्रकारितेविषयक संकल्पना आणि घोळ घोळ आहेच. मी पत्रकारितेच्या व्यवसायात नाही. पण पत्रकारितेमुळे माझे जीवन समृद्ध झाले आहे. मी पत्रकारांचे लिखाण वाचतो. ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी दिलेल्या माहिती आणि मतांवर अवलंबून निर्णय घेतो. (उदा. फ्लुची साथ आहे, पुन्हा पुन्हा साबण लावून हात धुवायला हवेत. शहरात रात्री लुटमारीचे प्रकार वाढीस लागले आहेत, मी सावध असले पाहीजे. वगैरे) थोडक्यात मी अनेकांप्रमाणे एक सुजाण वाचक आहे. पत्रकारितेच्या व्यवसायात असलेल्या लोकांनी माझी दिशाभूल करू नये, अशी माझी किमान अपेक्षा आहे. ही अपेक्षा गैरवाजवी असल्यास किंवा गैरसमजूत असल्यास माझ्या आकलनात बराच घोळ आहे. ............................. मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
In reply to वा! वा! by प्रसन्न केसकर
In reply to पटले नाही by कालिन्दि मुधोळ्कर
पत्रकार म्हटले की लोकांना टिळक्-आगरकरांची पत्रकारीता आठवते आणि त्यांच्या मापाने ते आजच्या पत्रकारांना मोजायला जातातअसे नाही. वाचक इंग्रजी व्रूत्तपत्रेही वाचतात.इंग्रजी पत्रकारांनाही राजकिय मते असतात पण एवढे उथळ मत प्रदर्शन क्वचितच दिसते. दिलीप पाडगावकर(TOI), गोविंद तळवलकर्,शेखर गुप्ता, एन्.राम ह्यांनाही राजकिय मते होती/आहेत आणि कधी कधी त्यांच्या लेखनातून तसे जाणवतेही. पण त्यांचे लेखन एवढ्या खाली कधी घसरत नाही. अर्थात प्रत्येक क्षेत्रात एक क्लास असतोच. वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचा क्लास परुळेकर्/राऊत ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे हे सहज कळते. भेंडी P = NP
In reply to इंग्रजी by चिरोटा
In reply to पुनेरी यांच्याशी असहमत. by ज्ञानेश...
त्यांचे